पहिली भेट भाग ११

Story of a friendship

पहिली भेट भाग ११

     श्रीराजने किती छान पद्धतीने समजावून सांगितले. त्याच बोलणंही माझ्या पर्यंत पोहोचलं आणि माझ्या भावनाही दुखावल्या गेल्या नाही. श्रीराजशी सगळं क्लिअर झाल्यामुळे मनाला शांती भेटली होती. मी प्रिया व पुजाला श्रीराज काय बोलला ते सर्व सांगितले.

प्रिया---- श्रीराजला समजण्यात माझी खूप मोठी चुक झाली होती, मी त्याला इतर मुलांप्रमाणेच समजत होते, खरंच श्रीराजचे किती चांगले विचार आहेत.

पुजा---- हो ना, आपण श्रीराजच्या बाबतीत खूप चुकीचा विचार करत होतो.

जान्हवी---- तुम्ही स्वतःला अपराधी नका, तुम्ही दोघींनी चांगल्या प्रकारे मैत्री निभावलीय.

           मी आता कॉलेज लाईफ एन्जॉय करायला शिकले होते. सर्व मित्र मैत्रिणींशी मिसळत होते. मुलांशीही बिनधास्तपणे बोलत होते. डान्सच्या प्रॅक्टिस च्या वेळेस सगळेच मजा मस्ती करायचे. श्रीराजशी अधूनमधून बोलायचे, तोही खूपच व्यस्त झाला होता. थोड्याच दिवसात annual function झाले, खूप एन्जॉय केले होते ते दिवस. आम्हाला ग्रुप डान्ससाठी फर्स्ट प्राईझ मिळाले होते.

          Annual function च्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. 3 ते 4 महिन्यांत फायनल परीक्षा असल्याने आता अभ्यासाला लागावे लागणार होते. यावेळेस मला श्रीराजला त्रास नव्हता द्यायचा. मी रात्रंदिवस अभ्यास सुरू केला. बोलता बोलता सेकंड इअर ची फायनल एक्साम पण झाली. दिवस किती पटपट जातात. थिअरी एक्साम झाल्यावर एक आठवड्यासाठी घरी गेले होते, त्यावेळी घरी देशमुख काका काकू म्हणजेच श्रीराजचे आई बाबा आले होते, श्रीराजचे खूप कौतुक करत होते, मी श्रीराजला ओळखत नाही असच मला वागावे लागत होते. 

          सुट्टी संपल्यावर परत कॉलेजला आले. यावर्षी प्रॅक्टिकल एक्साम, ओरलची अजिबात भीती वाटत नव्हती. पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले. प्रॅक्टिकल एक्साम झाल्यावर घरी गेले. एक्सामच्या घाईगडबडीत श्रीराजशी साधा एक मॅसेज पन नव्हता झाला. घरी असताना एक दिवस श्रीराजचा मॅसेज आला,

श्रीराज---- हाय, फोनवर बोलायला वेळ आहे का?

जान्हवी---- नाही रे, मी घरी आली आहे, फोनवर बोलता येणार नाही. काही काम होते का?

श्रीराज---- ठीक आहे. कशी आहेस? खूप दिवस झाले आपल्यात काहीच बोलणे झाले नाही म्हणून बोलायचे होते.

जान्हवी---- ओके, तुपण घरीच असशील ना.

श्रीराज---- हो मी घरीच आहे पण आई बाबा बाहेर गेले हवेत सो बोलता आलं असत.

जान्हवी---- एक्साम कशी गेली?

श्रीराज---- मस्त. तुला यावेळेस एक्सामसाठी माझी गरज नाही पडली.

जान्हवी---- तुझ्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून तुला फोन नाही केला.

श्रीराज---- ओके, किती दिवस सुट्टी आहे?कॉलेजला कधी जाणारेस?

जान्हवी---- कॉलेजला परवा जाणार आहे. तुझी मज्जा आहे, अभ्यासाचा काही ताण नाही, मस्त सुट्ट्या एन्जॉय करायला भेटतील.

श्रीराज---- मागचे काही दिवस खूपच हेक्टिक गेलेत, थोड्या दिवस आराम करून परत अभ्यासाला लागावे लागेल. MD Medicine भेटलं पाहिजे.

जान्हवी---- तुला नाही भेटणार तर मग कुणाला भेटेल.

श्रीराज---- खूप अभ्यास करावा लागणार आहे. माझी इंटर्नशिप सुरू झाल्यावर आपण सोबतच अभ्यास करू.

जान्हवी---- सोबत कस काय? मला समजलं नाही.

श्रीराज---- अगं एन्ट्रान्स एक्सामसाठी फर्स्ट इअर ते फायनल इअरचा सर्व अभ्यासक्रम असतो. तुझ्यासोबत फोनवर टॉपिकस डिस्कस केले तर तुझाही अभ्यास होईल आणि माझी revision पण होईल, पुन्हा तोच अभ्यास करायला खूप जीवावर येतंय, तुझ्यासोबत अभ्यास केला तर बोअर नाही होणार.

जान्हवी---- हो चालेल.

         दोन दिवसांनी कॉलेजला परत जावे लागले. थर्ड इअर सुरू झाले, आता अभ्यासाचा लोडही बऱ्यापैकी वाढला होता. थोड्याच दिवसांत सेकंड इअर चा रिझल्ट लागला, मला फर्स्ट क्लास मिळाला होता. श्रीराजचा रिझल्ट लागायचा बाकी होता. काही दिवसांत श्रीराजचा रिझल्ट लागला, श्रीराज कॉलेजमध्ये पहिला आला होता, श्रीराजने रिझल्ट लागल्यावर पहिले मला फोन करून ही गोड बातमी दिली होती, मी श्रीराजसाठी खूप आनंदी होते, त्याच्या कष्टांना फळ मिळाले होते. श्रीराजच्या नावासमोर डॉ लागले होते, आपल्या नावापुढे डॉ लागण्यासाठी खरच खूप कष्ट घ्यावे लागतात.त्याच दिवशी बाबांचा मला फोन आला, बाबांनी श्रीराज कॉलेजमध्ये पहिला आल्याची बातमी सांगितली व सांगितले की देशमुख काकांच्या फोनवर फोन करून श्रीराजला शुभेच्छा दे. बाबांना कस सांगू की मी या आधीच श्रीराजला शुभेच्छा दिल्या आहेत.

       बाबांच्या आदेशाप्रमाणे मी देशमुख काकांना फोन केला.

जान्हवी---- हॅलो, काका मी जान्हवी बोलतेय.

देशमुख काका---- बोल जान्हवी बाळा, काय म्हणतेस, आज अचानक कसा काय फोन केलास?

जान्हवी---- काका बाबांकडून श्रीराजच्या रिझल्ट बद्दल कळलं, बाबाच म्हणाले की श्रीराजला फोन करून शुभेच्छा दे, श्रीराज आहे का?

देशमुख काका---- हो आहे ना, इथेच बसलाय बोल त्याच्याशी.

देशमुख काका फोन श्रीराजकडे देतात व सांगतात की जान्हवीचा फोन आहे. जरावेळ श्रीराज गोंधळून जातो, त्याला कळतच नाही की मी त्याच्या बाबांच्या फोनवर फोन का केला?

श्रीराज---- हॅलो जान्हवी, श्रीराज बोलतोय.

जान्हवी---- काका जवळच आहेत का?

श्रीराज---- हो

जान्हवी---- अरे बाबांचा फोन आला होता, त्यांनी तुझे अभिनंदन करण्यासाठी फोन करायला सांगितला. Congratulations.

श्रीराज---- थँक्स

श्रीराजला काय बोलावे काही सुचत नव्हते, त्याला त्याच्या आई बाबांसमोर खोटे वागता येत नव्हते, मला त्याच्या स्थितीचा अंदाज आल्यामुळे मी थोडंच बोलून फोन ठेवला. मला फोन ठेवल्यावर मात्र खूप हसू येत होते, तेवढ्यात श्रीराजचा फोन माझ्या फोनवर आला.

श्रीराज---- फोन करण्याआधी मला थोडी कल्पना तर द्यायची, माझी किती धांदल उडाली होती.

जान्हवी---- बाबांनी फोन करायला लावले होते.

श्रीराज---- अगं मग माझ्या फोनवर फोन करायचा ना.

जान्हवी---- तुझा फोन नंबर कुठून भेटला हे बाबांनी विचारलं असते तर मी काय सांगणार होते.

श्रीराज---- अरे हो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं, बाबा विचारत होते, जान्हवीशी फोनवर जास्त का नाही बोललास, मला काय उत्तर द्यावे हे कळतच नव्हते.

जान्हवी---- आता आई बाबा कुठे आहेत?

श्रीराज---- ते घरात आहे, मी बाहेर येऊन बोलतोय, पुढच्या आठवड्यात कॉलेजला जावे लागणार आहे, तेव्हा फोन करतो, आत्ता फोन ठेवतो. 

जान्हवी---- ऐक आता एक काम कर, काकांकडे जाऊन माझा फोन नंबर घेण्याचे नाटक कर म्हणजे पुढच्या वेळेस असा पेच उद्भवणार नाही. 

श्रीराज---- तुझं म्हणणे मला पटतय, पण नंबर घेण्याचे काय कारण सांगू.

जान्हवी---- अरे देवा, आता तुला कारण पण मीच सांगू का, त्यांना सांग की तुझा सिनिअर माझ्या कॉलेजला असून त्याचे तुला एन्ट्रान्स एक्साम साठी मार्गदर्शन घ्यायचे आहे, त्याच्याशी संपर्क करण्यासाठी तुला माझी मदत लागणार आहे. 

श्रीराज---- जान्हवी तु खरचं खूप हुशार आहेस, परफेक्ट कारण शोधून काढलंस.

जान्हवी---- माझा कौतुक सोहळा आपण नंतर करुया, बाय.

            बिचारा श्रीराज माझ्या फोनमुळे त्याची खूपच फजिती झाली. आमचा फोन झाल्यावर घडलेला सर्व प्रकार मी पूजा व प्रियाला सांगितला, दोघीही पोट धरून हसत होत्या. एकच आनंद होता की श्रीराजचे कॉलेज सुरू झाल्यावर अभ्यासाच्या निमित्ताने का होईना आम्हाला परत फोनवर बोलता येणार होते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all