पहिलं प्रेम
रिमझीम पावसाच्या सरींमधे
थंडगार हवेची झुळूक जेव्हा हवीशी वाटते.
तेव्हा प्रेमाची खरी सुरुवात होते
एकांतात असतानाही जेव्हा
कोणाचा तरी भास होतो,
त्याच्यासाठी मनात आपुलकिची
आस निर्माण होते....
तेव्हा प्रेमाची खरी सुरुवात होते.
आपण कसे दिसतो हा प्रश्न जेव्हा मनात येतो...
कोणासाठी तरी सजण्याचा मोह निर्माण होतो
तेव्हा प्रेमाची खरी सुरुवात होते....
आयुष्य सुंदर व्हायला लागते
प्रत्येक क्षण जगावासा वाटतो
सहवास त्याचा हवासा वाटतो
तेव्हा प्रेमाची खरी सुरवात होते...
हेच ते पहिले प्रेम असते
जे आयुष्यभर मनात राहते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा