पहिलं प्रेम.. (अलक लेखन)
"किती सहज मी प्रेमात पडले होते त्याच्या, त्यानं दाखवलेल्या त्या स्वप्न नगरीत मी स्वतःला झोकुन दिलं होते. प्रेमात घेतलेल्या त्या आणाभाका.. आपण लग्नानंतर इथं फिरायला जायचं, तिथं घर घ्यायचं, ती गाडी घ्यायची, आपल्या मुलांना या शाळेत घालायचं. किती आणि काय काय जगले होते मी कल्पना विश्वात त्या पहिल्या प्रेमात.
पण आज हे सगळं आठवून खरंच हसायला येतंय त्याच पहिल्या प्रेमावर.. बरं झालं मी आईवडीलांनी ठरवलेल्याच मुलाशी लग्न केले. कारणं नंतर मला माझ्याच जवळच्या मैत्रिणी कडून कळलं. ते माझं पहिल प्रेम होते, पण त्याचं आठवं, नवव की दहावं? माहिती नाही.. तिच स्वप्ने त्यानं "पहिलं प्रेम" च्या नावाखाली कित्येक मुलींना दाखवली होती.
खरंच म्हणतात ना प्रेम आंधळं असतं तेच खरे. पहिलं प्रेम म्हणतं मी त्याच्या सोबत तेव्हा पळून गेले असते तर ती माझी शेवटची चुक ठरली असती आणि आजच्या या गोड सुखाला मी मुकले असते कदाचित.."
#vishuzpoetry
- विशाल पाटील "Vishu.." कोल्हापूर
- विशाल पाटील "Vishu.." कोल्हापूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा