A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session06087cdf902a9194bd3e100cbb34d8dfda9015bfed2c80ae02645153d88c3fef2af3e729): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

First audition
Oct 26, 2020
मनोरंजन

जाहिरातीसाठी पहिलं audition

Read Later
जाहिरातीसाठी पहिलं audition

आईसाठी तिच्या बाळाच्या सगळ्याच पहिल्यावहिल्या गोष्टी खूप जवळच्या असतात. त्या आठवणी तिच्या मनाच्या खूप जवळ असतात. अशीच एक सुंदर आठवण आज मी तुम्हाला सांगणार आहे,माझ्या अश्वथचे जाहिरातीसाठी दिलेले पाहिलं ऑडिशन!

वाचून धक्का बसला असेल ना?दोन वर्षाचाही नाही अजून हा चिमुरडा आणि कसलं ऑडिशन. ते काय झालं ना अश्वथ खूपच गुटगुटीत आणि हसरा आहे.म्हणजे अंघोळ घालताना, कपडे घालताना किंवा आवरताना तो कधीच रडल्याचे मला आठवत नाही. वेगवेगळ्या वेशभूषा करून त्याचे फोटो काढणे हा माझा छंद. मी अगदी त्याला कृष्ण बनवून तर कधी राधेसारखं  सजवून सुद्धा फोटो काढले आहेत????.

एकदा तो दीड महिन्याचा असताना माझी आई त्याला अंघोळीच्या आधी मालिश करत होती,तेव्हा त्या आजी आणि नातवाचा चाललेला संवाद, त्याचा आजीच्या बोलण्याला खळखळून दिलेला प्रतिसाद, आणि त्याचे हावभाव ते सगळं माझ्या कॅमेरात कैद झालं.तो विडिओ आणि त्याचे काही फोटो मी एका लहान मुलांच्या फोटो काँटेस्ट मध्ये सहजच पाठविले,त्यात तो पहिला राऊंड जिंकला दुसऱ्या राऊंडमधे हरला मग तो विषय तिथेच संपला आणि मी विसरूनही गेले.

साधारण पंचवीस दिवस उलटून गेले असतील,दुपारी दोनच्या सुमारास मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि ते म्हणाले की त्या फोटो काँटेस्टच्या दीडशे मुलांमधून मधून आम्ही पाच मुलं निवडली आहेत एका जाहिरातीसाठी. ती जाहिरात होती "firstcry" नावाच्या नामांकित ब्रँडची (बऱ्याच लोकांना माहीत असेल). firstcry ही लहान मुलांच्या खेळणी, वस्तू,कपडे यांच्यासाठी खूप नामांकित कंपनी आहे. त्यांचे दुकानही आहेत आणि मोबाइल अँप्लिकेशन ही आहे तर त्यात नवीन कपड्याच्या जाहिरातीसाठी मॉडेल्स हवे होते.ती जाहिरात टीव्ही वरही दिसणार होती आणि त्यात स्वतः श्री.अमिताभ बच्चन मुलांसोबत असणार होते.

मला तर विश्वास बसलाच नाही असं वाटलं एकतर कुणीतरी आपली मज्जा घेत असावं किंवा काहीतरी फसवणुकीचा प्रकार असावा.मी त्यावेळी दुर्लक्ष केलं पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा फोन करून ऑडिशनसाठी येणार आहेत की नाही विचारलं मग मी प्रकरण नवरोबाच्या हाती सोपवलं. त्याने फोनवर बोलून सोक्षमोक्ष लावला. आम्हाला आधी वाटलं काहीतरी पैसे उकळण्यासाठी असेल पण ते बोलले खरंच ऑडिशन आहे आणि एक रुपयाही भरायचा नाहीये फक्त बाळाचे फोटो आणि विडिओ चांगला झाला पाहिजे. माझा भाऊ इव्हेंट मॅनेजर आहे, मुंबईतच काम करतो मग त्याला हे सगळं सांगितलं तेव्हा त्याने सांगितलं ही कास्टिंग कंपनी आहे आणि खरी आहे.तो तिथे जातही असतो तर ऑडिशन द्यायला काही हरकत नाही मग आम्ही ठरवले की एकदा जाऊन बघायला काही हरकत नाही.

पण आमचा निर्णय होईपर्यंत संध्याकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑडिशन होती. इतक्या लहान बाळाला घेऊन जायचं तेही रात्रीचा प्रवास तर आरक्षण पाहिजे ऐनवेळी आरक्षण कुठे मिळणार मग ट्रेनचा पर्याय तर नव्हताच.आम्ही माझ्या साडेतीन महिन्याच्या बाळाला घेऊन वडोदरा ते मुंबई असा प्रवास एसी वोल्वोने केला.पहाटे साडेचारच्या सुमारास आम्ही बोरिवली स्टेशनजवळ उतरलो ,तिथून एका मैत्रिणीकडे जाणार होतो. विरारची लोकल पकडली,तिच्या घरी गेलो.तिथे फ्रेश झालो, बाळालाही अंघोळ घातली. चहानाश्ता करून पुन्हा लोकलने अकरा वाजेच्या सुमारास अंधेरी स्टेशनला उतरलो. तिथून ऑफिसला पोहचायला आणखी अर्धा तास लागला तोवर बाळाची मस्त झोप झाली होती.तिथे पोहचलो, अर्ज भरला आणि प्रतीक्षाकक्षात आम्हाला बसवले गेले.ऑफिस तर खूपच सुंदर होते, शिवाय स्टाफही खूप सहकार्य करत होता. अगदी पाणी,चहा सगळं ते लोक आपुलकीने विचारात होते.अगदी लहान बाळांना दूध पाजण्यासाठीही तिथे वेगळी रूम होती.

एका तासाभरानंतर आमचा नंबर आला, इतका वेळ अगदी प्रसन्न असलेला अश्वथ आता जरा चिडचिड करू लागला होता.मला खरंतर टेन्शनच आलं होतं.जेव्हा आम्ही ऑडिशनरूम मधे गेलो,ते कॅमेरा,त्या लाईट्स, ते वातावरण बघून मीच अतिउत्साही होऊन गेले.अगदी फिल्मची शूटिंग सुरू असल्यासारखं वाटत होतं. अश्वथला त्यांनी छान आवरून वगैरे कॅमेरासमोर उभं केलं,आणि माझा पठ्ठा जसा काही प्रोफेशनल हिरो आहे अशा पोज देत होता.सगळे त्याच्याकडे बघताय, हसताय हे बघूनच तो इतका खुश झाला की त्याचे सगळेच फोटो खूप सुंदर आले.

ऑडिशन खूप छान झालं पण सगळ्याचे ऑडिशन झाले की निकाल लागणार होता म्हणून त्यांनी आम्हाला वेटिंग रूममधे बसून वाट बघायला सांगितले. अश्वथला काही घेणेदेणे नव्हतं काय चालू आहे फक्त त्याला काहीतरी वेगळं अनुभवायला मिळत होते म्हणून तो खुश होता. इथे आम्हा नवराबायकोला बोर्डाच्या परीक्षेला आलं नव्हतं इतकं टेन्शन आलं होतं.

त्या जाहिरातीत काम करण्यासाठी सहा मुलं निवडणार होते,वेगवेगळ्या वयोगटाचे पाच ग्रुप करून प्रत्येक गटात पाच मुलं शॉर्टलिस्ट केलेली होती म्हणजे तीस मुलांचे ऑडिशन होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास सगळे ऑडिशन्स झाले आणि निकालाची वेळ आली. सगळेच पालक डोळ्यात आणि कानात प्राण आणून निकाल ऐकायला उत्सुक होते.अश्वथच्या गटातील पाच मुलांमधून एकच जण निवडलं जाणार होतं आणि सगळ्यात लहान वयोगट म्हणून याचा निकाल शेवटी होता. मी एक एक क्षण मोजत होतो अखेर त्यांनी नाव पुकारलं.......


पण ते दुसऱ्याच मुलाचं होतं. थोडं वाईट वाटलं आम्हाला पण ते मुलंही खूपच देखणं आणि गोड होतं. त्यांनी सांगितलं की हा गट तीन महिने ते आठ महिन्यांच्या बाळाचा होता तर जो मुलगा निवडला गेलाय तो उभा राहत असल्याने त्याची निवड झाली कारण कपड्यांची जाहिरात आहे तर ड्रेस पूर्ण दिसायला हवा असा चौफेर विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय कारण सगळीच मुलं खूप सुंदर होती. आम्हा सगळ्या पालकांना त्यांचा मुद्दा पटला. कोई बात नही,इस बार नही तो अगली बार सही असं म्हणत आम्ही तिथून परतीच्या वाटेवर निघालो.

भलेही अश्वथची निवड झाली नाही पण तो अनुभव खूपच सुंदर आणि अविस्मरणीय होता. आता ती जाहिरात आम्ही बऱ्याचदा टीव्हीवर बघतो.अश्वथ मोठा झाल्यावर नक्की त्याला सांगायला आवडेल की त्याचं पहिलवहिलं ऑडिशन किती छान होतं.

लेख आवडल्यास लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा.