फिल्मी लव.. विथ डायलॉग

Ek chutki sindhur ki kimat tum kya jano

"एक चुटकी सिंधुर की किंमत तूम क्या जानो रमेश बाबू"...
आरती आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलत होती

"झालं असेल तर आवर लवकर, पार्टी ला जायला उशीर होतोय...
रमेश हॉल मधून ओरडला...

"आरती झालं का तुझं...

"तू चल, मै आई...

"तुझे हे फालतू डायलॉगस ना, मला वेळ लागेल एखाद्या दिवशी...

"मी कशी दिसतीय?....
"छान दिसतेस ग,चल आता...

"तुला साधं बायकोच कौतुक करता येत नाही का रे?....
"अग खरच छान दिसत आहेस, चल आता

आरती आणि रमेश पार्टीसाठी निघाले.. खाली गाडी येऊन तयार होती... रमेशच्या ऑफिस मध्ये काम करण्याऱ्या अनिकेतची रिषेप्शन पार्टी होती... दोघेही गाडीनी निघाले..
गाडी एका मोठ्या फाईव्हस्टार हॉटेल समोर येऊन थांबली,
दोघेही आता गेले, पार्टी सुरू झाली होती... रमेश नी सगळ्यांना हाय हॅलो करून आरतीची सगळ्यांशी ओळख करून दिली...लग्नानंतर आज पहिल्यांदा आरती अशी पार्टीला गेली होती त्यामुळे ती जरा जास्तच उत्साही दिसत होती...

पार्टी सुरू झाली, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं....कुणीतरी आरती ला ड्रिंक्स प्यायला दिली तीही कॉल्डड्रिंक समजून घटाघट प्यायली.. आणि नंतर डान्स सुरू झाला... सगळ्यांनी डान्स एन्जॉय केला...

डान्स सुरू असताना कुणीतरी जाणूनबुजून आरतीला त्रास देण्याचा प्रयत्न केला... आरतीच्या जवळ जवळ करायला लागला... आरतीला समजलं आणि तिनी रमेश ला सांगितलं...
रमेश चा पारा चढला आणि त्याने त्याला चांगलाच चोपला... तो सॉरी सॉरी म्हणत निघून गेला..

"रमेश शांत हो.... चल निघायचंय का आपण..?..

"तू बस थोडावेळ... आरती तू हे काय केलस...?

"मी काय केलंय?..
"तू काय प्यायली आहेस...?

"कॉल्डड्रिंक... त्या वेटर नी दिली मला...
"ते कॉल्डड्रिंक नव्हतं... वाईन होती...

रमेश तू काय बोलतोस मला काहीच कळत नाही आहे...
तू चल घरी, मला खूप झोप येत आहे, आणि डोकही दुखायला लागलय....

ओके...

दोघेही घरी गेले...
"तू कुठे येतोस, हे माझे घर आहे..
चल जा तू...
"आरती आता तू शुद्धीत नाही आहेस, म्हणून तुला कळत नाही आहे, चल हो बाजूला लॉक उघडू दे....

"ये तेरा घर,ये मेरा घर
किसींको देखना हो गर
तो पहले आके मांगले
तेरी नजर मेरी नजर

आरती च गाणं गुणगुणन सुरूच होत..
रमेश तिला आत घेऊन गेला...


रमेश नी आरती ला निंबूपाणी बनवून दिल, थोड्यावेळानी तिला बर वाटल...

पार्टीत घडलेला प्रकार आठवला...
"रमेश.. आय एम सॉरी... मला पार्टीत अस करायला नको होतं...

"इट्स ओके ग,तू जाणून नाही केलस ते....मी समजू शकतो...

"रमेश तू किती समजून घेतोस रे मला..
"आय लव यु...."
"आय लव यु टु.."

"खोटारडा ऑफिस मध्ये गेल्यावर वर विसरून जातोस...

"मै तुम्हे भूल जाऊ ये हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दुंगा..."

रमेश तू पण...
दोघेही खळखळून हसले..