चित्रपट समीक्षा

रिव्ह्यूः दे धक्का २

दे धक्का २ चित्रपट समीक्षा : 


दे धक्का २ मराठी चित्रपट review


मराठी चित्रपट

Marathi films, latest marathi films, de dhakka marathi film review


कलाकार : मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी.

दिग्दर्शक : महेश मांजरेकर, सुदेश मांजरेकर


समीक्षा : 


दे धक्का या चित्रपटा नंतर तब्बल चौदा वर्षानी दे धक्का २ हा सिनेमा प्रकाशित झालेला आहे. काही सिनेमे असे असतात ज्यातील पात्र कायम स्वरुपी, त्या व्यक्तिरेखांच्या नावानिशी लक्षात राहतात. दे धक्का हा त्यातीलच एक सिनेमा. धनाजी (सिद्धार्थ जाधव), मकरंद जाधव (मकरंद अनासपुरे), मकरंदची बायको सुमती (मेधा मांजरेकर), तात्या सूर्यभान जाधव (शिवाजी साटम) आणि मकरंदची दोन पोरं पहलवान किसना आणि नृत्यांगना सायली. या व्यक्तिरेखांची छाप प्रेक्षकांच्या मनावर बसलेली आहे. एक तप उलडून गेलं तरी या व्यक्तिरेखांची ‘टमटम’ चाललेली धमाल मस्ती आणि त्यांच्यातील ते भावनिक नातं आजही स्मरणात आहे. हीच मंडळी आता पुन्हा एकदा ‘दे धक्का २’ या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला भेटायला आली आहेत. पण, यावेळी ते पुरते चकचकीत झाले आहेत. थेट गावाकडून लंडनला पोहोचले आहेत.


यावेळी दुसऱ्या पर्वाची गोष्ट तिथूनच सुरु होते जिथे पहिला पर्वाची गोष्ट संपली होती. गावचा सर्वसामान्य मोटार मकरंद (मकरंद अनासपुरे) याने बनवलेला पार्ट आता इतका हिट झालाय की, मकरंदची स्वतःची कोट्यावधी रुपयांची कंपनी आहे. सोबत तो स्वतःच्या ब्रँडची नवी गाडी देखील लॉंच करणार आहे. हे प्रस्त किती मोठं झालं आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पण, आता त्याच छोट्या ‘पार्ट’मुळे ‘दे धक्का २’मध्ये धमाल मस्ती उडाली आहे. 


 जाधव कुटुंब काही कारणास्तव लंडनला गेलं आहे. तिकडे त्यांना नीरज नावाच्या एका गृहस्थाने फसवलं आहे. त्या पार्टचे हक्क मिळवण्यासाठी हा कपटी नीरज (विद्याधर जोशी) उलथापालथ करतोय. त्याच्या सोबतीला मल्लेश विजयवाडा (प्रवीण तरडे) आहे. जो या जाधव कुटुंबियांना गोड-गोड बोलून स्वतःच्या ‘पॅटर्न’मध्ये अडकवतो. त्यामुळे आता या विजयवाडा पासून सुटण्यासाठी जाधव कुटुंबीय पुन्हा एकदा खटारा गाडीत बसून लंडनचे रस्ते पालथे घालतात. हाच चकचकीत, पण रंगदार प्रवास यावेळी दिग्दर्शक सुदेश मांजरेकर, महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का २’मध्ये रेखाटला.


सिनेमांचा कथाविस्तार पूरक झाला आहे. पण, पटकथा आणि त्यातील तर्क डगमगले आहे. त्याकडे तुम्ही वास्तविक नजरेने पाहू शकत नाही. तसं केल्यास तुम्हाला सिनेमा अवाजवी दिसेल. त्यामुळे अक्षरशः ‘मॅड कॉमिक कॉमेडी’ म्हणून ‘दे धक्का’कडे तुम्हा प्रेक्षकांनी पाहायला हवं.


सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यावेळीही यशस्वी झाली आहे. पण, सर्वांमध्ये सर्वाधिक रंगतदार भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचे अतिरिक्त संवाद लिहिले आहेत. परिणामी ही त्यांच्या भूमिका पडद्यावर अधिक जिवंत होते आणि प्रेक्षकांना भावते.


दुसरीकडे सिद्धार्थ जाधव आणि त्याचा क्लेप्टोमेनिया आपल्याला पोट धरुन हसवतात. अक्षरशः आपण त्याच्या सीन्सला टाळ्या पिटतो. बाकी शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी, विद्याधर जोशी, संजय खापरे, अभिजित देशपांडे यांनी आपापल्या परीनं उत्तम काम केलं आहे. 


सायली ही व्यक्तिरेखा साकारणारी ‘गौरी’ तिच्या नृत्यसादरीकरणामुळे सिनेमानंतर विशेष लक्षात राहते. लहान वयात तिनं केलेला नृत्याविष्कार दखलपात्र आहे.