Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व - एक संघर्ष भाग-९

Read Later
अस्तित्व - एक संघर्ष भाग-९
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-९


प्रतिक राजीवबरोबर कार घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. काही अंतर गेल्यावर राजीव प्रतिकला म्हणाला, मला तुझी एक गोष्ट समजली नाही..तसा प्रतिक म्हणाला, कोणती रे...? त्यावर राजीव म्हणाला, अरे तू एवढा हॉस्पिटलमध्ये गेलास पण तू प्रेरणाला बघायला सुद्धा गेला नाही..हेच समजलं नाही मला... तसा प्रतिक म्हणाला, तुला खरं सांगू राजीव, काल मी तिला जेव्हा ते तसं आयसीयु मध्ये पाहिलं ना त्यानंतर माझी आज हिंमतच होत नव्हती तिला पुन्हा बघायला जाण्याची...तसा राजीव म्हणाला, मग तू विचार कर तिच्या फॅमिलीला किती त्रास होत असेल तिला असं पाहताना....त्यावर प्रतिक म्हणाला, हो खरं बोलतोय तू...म्हणूनच आज सकाळी मी गणपतीबाप्पाला म्हणालो, मला प्रेरणाला पूर्वीसारखंच हसताना बोलताना असं पाहायचं आहे. तिला लवकर शुद्धीवर येऊ दे..तसा राजीव म्हणाला, हो येईल ती लवकरच शुद्धीवर...आणि आपण आहोतच ना तिच्या फॅमिलीला सपोर्ट करायला. त्यावर प्रतिकने मानेनेच हो म्हंटलं. दोघेही बोलता बोलता पोलीस स्टेशनच्या समोर येऊन पोहचले तशी प्रतिकने कार पार्किंगमध्ये पार्क केली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले.

पोलीस स्टेशनला मि जाधव त्यांना पाहून म्हणाले, या राजाध्यक्ष, तुमचीच वाट पाहत  होतो मी...तुम्ही कॉल केला होता म्हणून थांबलो मी...नाहीतर निघणारच होतो घरी जायला..तसा प्रतिक म्हणाला, ओह सॉरी सर, मला माहित नव्हत तुमची शिफ्ट संपली ते...तसे मि. जाधव म्हणाले, आम्हाला शिफ्ट वगैरे प्रकार कुठे असतो..आलं काम की बस झपाट्याने कामाला लागायचं...बोला तुम्ही इथे येणं कसं केलं..? आणि बसा तुम्ही... असे उभे कशाला....? दळवी, साहेबांना २ कप चहा सांगा त्या चायवाल्याला...मि जाधव हवालदार दळवी यांना उद्देशून म्हणाले. तसं दळवी यांनी चहासाठी ऑर्डर दिली. हां बोला राजाध्यक्ष, कसं येणं केलं, मि. जाधव प्रतिकला पुन्हा विचारू लागले. तसं प्रतिकने मि जाधव यांची राजीव बरोबर ओळख करून दिली...तेवढ्यात प्रतिकला समिधाचा कॉल आला म्हणून तो कॉलवर बोलण्यासाठी बाहेर गेला. इथे राजीव मि. जाधव यांच्याकडून केसची रूपरेषा समजून घेऊ लागला. सर, ती तुम्ही तरुणी म्हणालात, जिने हा सगळा प्रकार पाहिला म्हणून, तिचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळेल का...म्हणजे तिचा जबाब मला केससाठी उपयुक्त ठरेल....राजीव मि. जाधव यांना उद्देशून म्हणाला. त्यावर जाधव म्हणाले, हो आज बोलावलं आहे मी त्यांना... तेवढ्यात मि. जाधव यांना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. मि. जाधव कॉल उचलून म्हणाले, हो हो या तुम्ही, मी आहे...आणि कॉल ठेवत म्हणाले, त्याच तरुणीचा कॉल होता. त्या इथेच कुठेतरी त्यांचं काम होत म्हणून आल्या होत्या..तर तिथूनच इथे येणार होत्या...पण येण्यापूर्वी कन्फर्म करावं म्हणून त्यांनी कॉल केला होता..

त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच एका तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केला आणि दळवी यांना जाधव सर आहेत का विचारू लागली. तसे दळवी यांनी मि. जाधव यांच्याकडे हात दाखवून जायला सांगितलं..तिला येताना पाहून मि. जाधव म्हणाले, या मॅडम, तुमचीच वाट पाहत होतो. तशी ती तरुणी काहीशी ओशाळून म्हणाली, सर मॅडम नका म्हणू, माझं नाव रेखा आहे..तुम्ही मला मॅडम नका म्हणू....तसे मि जाधव हसत राजीवच्या बाजूच्या खुर्चीकडे हात दाखवत म्हणाले, ओके मिस रेखा बसा...तशी रेखा खुर्चीमध्ये बसली.. तिला पाहून राजीव मनात म्हणाला, सकाळी जिला पाहून आपण पाहतच राहिलो होतो ती हीच ती ....म्हणजे हिनेच सगळा प्रकार पाहिला होता तर...तेवढ्यात मि जाधव राजीवकडे हात दाखवत रेखाला उद्देशून म्हणाले, मिस रेखा तुमची ओळख करून देतो, हे मि राजीव यांनीच ती केस घेतली आहे..तर तुम्हाला त्यांना आणि आम्हाला तुम्ही जे काही पाहिलं, ऐकलं ते सविस्तर सांगायचं आहे... तसं रेखाने राजीवकडे पाहिलं आणि तिने दचकून जीभच चावली. सगळं ठीक आहे ना मिस रेखा...? तुम्ही comfortable आहात ना आम्हाला जे घडलं ते सांगायला... मि जाधव यांनी रेखाला विचारलं. त्यावर रेखा म्हणाली, हो, हो सर...मी सांगते सगळं, मी जे काही त्या दिवशी पाहिलं...असं म्हणून तिने सगळा घडलेला प्रकार मि. जाधव आणि राजीव यांना सांगितला. मि जाधव यांनी तो जबाब लिहून घेतला. तसा राजीव रेखाला म्हणाला, मिस रेखा, तुम्ही या केसमध्ये साक्षीदार झालात त्यामुळे मला या केसमध्ये तुमची मदत होईल. तशी रेखा म्हणाली, सर मला त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं मनापासून वाटतं आणि माझ्या परीने मी जी काही मदत होईल ती करेन...तसं राजीवने मि जाधव यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्वतःकडे सेव्ह करून घेतला आणि राजीव, रेखा दोघेही मि जाधव यांचा निरोप पोलीस स्टेशन मधून निघाले.पोलीस स्टेशनच्या बाहेर पडताक्षणी रेखा राजीवला म्हणाली, सॉरी सर, मी सकाळी तुम्हाला खूप काही बोलले...i know खूप अति बोलले मी...तसा राजीव म्हणाला, काही हरकत नाही....तूमच्या जागी कोणीही असतं तर असंच रिऍक्ट झालं असतं...तशी रेखा खुश होऊन म्हणाली, म्हणजे तुम्ही मला माफ केलं सर....त्यावर राजीव म्हणाला, माफ मी फक्त एका अटीवर करेन......तशी रेखा म्हणाली, कोणती अट...तसा राजीव म्हणाला, तुमची हरकत नसेल तर we can meet in coffee shop...अर्थात तुम्हाला चालणार असेल तर....तशी रेखा हसून म्हणाली, ok done... हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जेव्हा जमणार असेल तेव्हा मला सांगा...असं म्हणून तिने आपलं ऑफिस कार्ड राजीवला दिलं...राजीव मनात म्हणाला, वाह मला कॉन्टॅक्ट नंबर मागायची पण गरज पडली नाही....चला एक स्टेप तरी आपण पुढे गेलो....तसं ती पुन्हा राजीवला म्हणाली, I am extremely sorry again... ok bye sir...मला ऑफिसला पण जायचं आहे इथून...असं म्हणत ती तिची scooty स्टार्ट करून निघून गेली...आणि राजीव तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहून मनातल्या मनात हसला...थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं अरे हा प्रतिक कुठे गेला....मघाशी गेला तो आलाच नाही...तेवढ्यात त्याच प्रतिकच्या कार कडे लक्ष गेलं...तर तिथे त्याला प्रतिक कारमध्ये काम करताना दिसला....ओह म्हणजे याला काहीतरी काम आलं होतं तर....असं मनात म्हणत राजीव प्रतिकच्या कार कडे आला...आणि त्याने कार च्या काचेवर ठकठक केलं तसा प्रतिक कार मधून बाहेर आला...ओह सॉरी राजीव ते ऑफिसच एक अर्जंट काम आलं होतं त्यामुळेच मी इथे करत बसलो होतो...तुझं झालं का बोलणं मि जाधव यांच्याशी...?? तसा राजीव म्हणाला, हो हो त्यांच्याशी तर बोलणं झालंच...आणि...आणि.....तसा प्रतिक कारमध्ये बसत म्हणाला, आणि कोणाशी...?? त्यावर राजीव हसून म्हणाला, अरे तीच रे जी सकाळी भेटली होती ना आपल्याला.... तिच्याशी.....आणि तो ही कारमध्ये हसत बसला...त्याच्या हसत्या चेहऱ्याकडे पाहत प्रतिक म्हणाला, स्वारी आज कोणाला तरी भेटून भलतीच खुश झाली आहे....कुछ तो गडबड है....तसा राजीव प्रतीकला म्हणाला, सांगतो तुला सगळं....आधी कार तर सुरु कर....तशी प्रतिकने कार सुरु केली. तसं राजीवने पोलीस स्टेशनमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर प्रतिक म्हणाला, ओह म्हणजे मि जाधव मला ज्या मुलीबद्दल म्हणाले होते, ती दुसरी तिसरी कोणी नसून ही सकाळचीच मुलगी आहे तर...तसा राजीव म्हणाला, हो...आणि मी तिला कॉफी शॉपमध्ये भेटणार आहे...त्यावर प्रतिक हसत म्हणाला, आता हे कधी ठरलं तुझं...? त्यावर राजीव म्हणाला, हा मग तिला समजून घ्यायला मला तिला भेटणं गरजेचं आहे...ती सिंगल असेल तर ठीक आहे पण ऑलरेडी engaged असेल तर बाबा लांब राहिलेलेच बरं...त्याच हे वाक्य ऐकून प्रतिक म्हणाला, ओह तो मेरे दोस्त के दिल में किसी के लिये गिटार बजने लगी है....तसा राजीव त्याच्या हृदयावर हात ठेवत म्हणाला, हां यार तिला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच माझी विकेट गेली होती.....ती मला मघाशी सॉरी नक्की कशासाठी म्हणत होती हे ही मला माहित नव्हत...तसा प्रतिक म्हणाला, अरे ती तुला खूप बडबडत होती सकाळी, तू कार दुसरीकडे पार्क नव्हती केली म्हणून, आणि ती तुला चुकून ड्राइवर सुद्धा समजली होती म्हणून ती तुला सॉरी म्हणत होती...त्यावर राजीव म्हणाला,आयला म्हणजे ती मला इतकं बोलून गेली होती...आणि मला काही ते कळलंच नाही...खरंच प्रतिक, माझ्या माईंड मध्ये आता हेच गाणं चालू आहे, एक लडकी को देखा तो ऐसा लगा...असं म्हणून राजीवने त्याच्या मोबाईलमधलं तेच गाणं लावलं...आणि गाणं ऐकता ऐकता त्याचा डोळा लागला...गाण्याचे बोल ऐकून प्रतिकच्या मनात प्रेरणाच येऊ लागली...तिचं हसणं, तिचं बोलणं सारं काही त्याला आठवू लागलं...शेवटी त्याने कारला ब्रेक देऊन थांबवली... अचानक कार थांबवल्यामुळे राजीव खडबडून उठला आणि प्रतिककडे पाहत म्हणाला... काय झालं प्रतिक, तू अचानक ब्रेक का मारलास...तसा प्रतिक म्हणाला, तू ड्राईव्ह करतो का मला थोडं बरं वाटतं नाही आहे... मी पडतो जरा वेळ.... चालेल ना...! तसा राजीव हो म्हणाला, आणि दोघांनी जागा अदलाबदल केली...आणि राजीवने कार सुरु केली.

ड्राईव्ह करत असताना राजीव विचार करु लागला, अचानक असं काय झालं जे प्रतिक असा म्हणू लागला...अरे हो, नक्कीच मी ते गाणं लावलं होतं त्यामुळे त्याच्या मनात प्रेरणाचा विचार आला असावा...मी पण किती मूर्ख आहे... नको त्यावेळी नको ते करत असतो... जाऊदे थोडा वेळ त्याला झोपू दे...तसा ही तो रात्री झोपला की नाही हे ही माहीत नाही...आणि हे traffic निघेपर्यंत त्याला झोप तरी मिळेल...थोड्या वेळाने सिग्नल मिळाला तसं राजीवने पुन्हा कार सुरु केली. ट्रॅफिकमुळे जिथे १५ मिनिटांत ऑफिसमध्ये पोहचतील असं अंतर होतं तिथे त्या दोघांना १ तास लागला.

ऑफिसच्या खाली येताक्षणी राजीवने प्रतिकला उठवलं तसा प्रतिक म्हणाला, आलो आपण...? हो हो आलो आपण तुझ्या ऑफिसमध्ये...अभी तू तेरे ऑफिस और मै चला मेरे ऑफिस....राजीव म्हणाला. अरे थांब जेवून जा...तसं ही तुझं ऑफिस पार लांब असल्यासारखा बोलतो आहेस...इथेच १० मिनिटे पण नाही लागणार..तसं राजीवने घड्याळ बघितलं आणि काही विचार करून म्हणाला, ठीक आहे तू चल वर मी थोडे एक दोन कॉल करून येतो....त्यावर प्रतीक म्हणाला, हो चालेल पण कॉल च्या बहाण्याने कलटी मारू नकोस...I am waiting for you...तसे दोघेही कार मधून बाहेर पडले. राजीवने चावी प्रतिककडे दिली आणि प्रतिक ऑफिस बॅग घेऊन ऑफिसमध्ये गेला..प्रतिक जाताक्षणी राजीवने प्रतिकच्या बाबांना भेटायची वेळ आणि त्याच्या ऑफिसचा पत्ता सांगून ठेवला. मग त्याने जजसाहेब यांना कॉल करून प्रेरणाची केस सांगितली आणि त्याने त्याच्या सेक्रेटरीला काही इतर कामे सांगून तो प्रतिकच्या ऑफिसमध्ये जायला निघाला.

प्रतिकच्या ऑफिसमध्ये पोहचल्यावर दोघांनी ठरल्या प्रमाणे जेवण करुन घेतलं आणि केस संदर्भात जजसाहेबांशी झालेलं बोलणं राजीवने त्याला सांगितलं. तसा प्रतिक म्हणाला, सगळं होईल ना ठीक, म्हणजे तिच्या फॅमिलीला काही त्रास नाही ना होणार यातून...? त्यावर राजीव म्हणाला, हो काही त्रास होणार नाही त्यांना...आणि आपण आहोत ना...आपण त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ..चल निघतो मी आता...परत उद्या शनिवार आहे...म्हणजे काम माझं बंद असणार...भेटू घरी चल बाय...आणि जास्त विचार करू नकोस.... असं म्हणून राजीव स्वतःच्या ऑफिस मध्ये जायला निघाला.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...