अस्तित्व - एक संघर्ष भाग-७

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-७


आई जशी किचन मध्ये गेली तसं बाबांनी राजीवला पुन्हा विचारलं, काय झालं रे तुमचं असं बोलणं... तसा राजीव म्हणाला, काका मी सांगेन तुम्हाला आज किंवा उद्या नक्की...पण आपण बाहेर भेटून बोलूया.... कारण विषय थोडा गंभीर आहे... घरात बोलायचं म्हणजे आजी असणार... तसे बाबा म्हणाले, अरे हो, ते आहेच म्हणा. चालेल आपण तसं बाहेर भेटू...तुला तर माहित आहेच आमचा प्रतिक फक्त तुझ्या बरोबर सगळं शेअर करतो.... तू त्याचा जिगरी बालमित्र आहे... मला सकाळी पण तो खूप डिस्टर्ब वाटत होता म्हणून मी तुला विचारलं की नक्की काय झालं आहे ते....! तसा राजीव म्हणाला, हो काका मी सांगेन तुम्हाला पण माझी पण एक अट आहे की घरात आजीला यातलं काही कळता कामा नये... आणि जोपर्यंत प्रतिक समोरुन काही तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा तुम्हाला काही माहीत आहे का हे दाखवू नका..तसे बाबा म्हणाले हो ठीक आहे तसंच करेन.

तेवढ्यात आजीने बाबांना देवघरातून आवाज दिला. तसे बाबा देवघरात गेले. तोपर्यंत राजीवने ऑफीसला जाण्यासाठी तयारी सुरु केली. बाबा जसे लिविंग रूम मध्ये आले तसं त्याने त्यांना इशाऱ्याने आपण बोलू नंतर असं सांगितलं. बाबांच्या मागोमाग आजी सुध्दा देवघरातून आल्या. राजीवला तयार झालेलं बघून आजीने आईला आवाज दिला... नंदा ए नंदा, हा बघ राजीव जायला निघाला आहे त्याला डब्बा दे नाश्त्याचा... तशी आई आतूनच म्हणाली, हो हो आई...आणते आहे... आणि थोड्या वेळाने डब्बा घेऊन बाहेर आली. राजीवच्या हातात डब्बा देत आई म्हणाली, तुम्हाला दोघांना पुरेल असा यात नाश्ता ठेवला आहे. तसा राजीव म्हणाला, काकू पण मी तर नाश्ता केला ना...मघाशी... तशी आई म्हणाली, अरे प्रतिक तुला पुन्हा करायला लावणार तिथे म्हणून मी जास्तीचं देते आहे..ओके काकू...मी निघतो आता...असं म्हणून राजीवने त्याची ऑफिस बॅग घेतली..बाय काकी काका...बाय आजी...म्हणत तो घरातून निघाला.

तिथे ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे प्रतिकचं प्रेरणाच्या डेस्ककडे लक्ष गेलं... त्याला क्षणभर तिथे ती आपल्याकडे पाहून हसत असल्याचा भास झाला.. तेवढ्यात समिधाच्या गुड मॉर्निंग सर च्या आवाजाने तो भानावर आला.. वेरी गुड मॉर्निंग असं म्हणत तो घाईने केबिनमध्ये गेला...समिधा त्याला असं घाईने जाताना बघून क्षणभर विचारात पडली आणि पुन्हा तिच्या कामात बिझी झाली...खरं तर प्रतिकचं काम करण्याचं बिलकुल मन होत नव्हतं पण सगळं काम तो एकट्या समिधावर ही टाकू शकत नव्हता... त्याने लॅपटॉप चालू केला आणि कामात स्वतःला झोकून दिलं... बराच वेळ झाला तो कामात असाच बुडून गेला होता तेवढ्यात राजीव त्याच्या केबिनचा दरवाजा उघडत आपल्या नाटकी ढंगात May i come in sir म्हणाला.तसा प्रतिक म्हणाला, अरे तू होय, ये ना आत. तसं राजीवने आईने दिलेला डब्बा प्रतिकच्या हातात दिला... हे आधी खाऊन घे...काकूंनी स्पेशल माणसाबरोबर तुझा नाश्ता दिला आहे... राजीव शर्टाची कॉलर वर करत म्हणाला...त्याचा हा नाटकी प्रकार पाहून प्रतिकला हसू आवरेना... त्याला बसायला सांगून आणि पाणी देऊन प्रतिकने कॅन्टीन मध्ये कॉल करुन प्लेट्स मागवून घेतल्या..डब्ब्याचं झाकण काढत तो म्हणाला, मी एकटा नाही खाणार आहे हे... तुला पण खायचं आहे माझ्या बरोबर...तसा राजीव म्हणाला...काकूंनी हाच विचार करुन दिला आहे हा नाश्ता... तसे दोघे हसू लागले आणि नाश्ता करायला बसले. काहींना काही सांगून राजीव प्रतीकला बोलण्यात बिझी ठेवत होता.. गप्पांमध्ये  दोघांचा नाश्ता करुन झाला... तसं राजीव म्हणाला, किती वाजता निघूया आपण इथून...? त्यावर प्रतिक म्हणाला, हो काही documents वर माझी सही लागेल... आणि थोडं एका फाईलचं काम आहे ते झालं की निघूच आपण... तोपर्यंत तू हवं तर ऑफिसमध्ये एक राउंड मारुन ये...मी पटकन करतो तोपर्यंत सगळं. जशी आज्ञा प्रतिकराजे...मी येतो मग राउंड मारुन असं म्हणत राजीव केबिन मधून बाहेर पडला.

राजीव जाताक्षणी प्रतिकने पुन्हा कामाला सुरवात केली. प्रतिकने महत्त्वाची सगळी कामे करून घेतली. दुसऱ्या दिवशीच्या मीटिंग ही ठरवून ठेवल्या. तेवढ्यात समिधाने केबिनचा दरवाजा ठकठकवला. May I come in Sir म्हणत तिने आत यायची परवानगी मागितली.  प्रतिक लॅपटॉप मध्ये काम करत असतानाच म्हणाला, Yes come in.नक्की कोण आलं आहे हे न बघता  तो म्हणाला, प्रेरणा ते मि. सिंग यांच्या documents च काय झालं... तशी समिधा म्हणाली, सर मी समिधा आहे. तसं प्रतिकने समिधाकडे पाहिलं... आणि म्हणाला, सॉरी मला वाटलं प्रेरणाच आहे. ते जरा मला फक्त त्या documents बद्दल चेक करून सांग. तशी समिधा म्हणाली, ओके सर... सर या काही फाईल्स होत्या त्यावर तुमची साइन हवी होती. तसं प्रतिक म्हणाला,ठीक आहे मी चेक करून साइन करून ठेवतो तू नंतर येऊन घे आणि काही महत्त्वाचं काम असेल तर मला कॉल कर.. माझा लॅपटॉप मी घेऊनच जातो आहे.... तशी समिधा म्हणाली, म्हणजे सर कोणती मीटिंग आहे का आता...तुम्हाला...? त्यावर प्रतिक म्हणाला, नाही समिधा मी प्रेरणाला ऍडमिट केलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये जातो आहे.... हे सांगताना प्रतीक खूप हळवा झाला होता...समिधासमोर तो त्याला काय वाटतं होतं ते लपवायचा प्रयत्न करत होता..तशी समिधा म्हणाली, सर प्रेरणा कशी आहे... आणि डॉ कधी डिस्चार्ज देणार म्हणाले...? तिचा प्रश्न ऐकून प्रतीकला काय बोलावं हे सुधरेना... नेमकं समिधा हे विचारत असतानाच राजीव प्रतिकच्या केबिन मध्ये आला होता. प्रतिक काहीच बोलत नाही आहे हे पाहून राजीव म्हणाला, मिस समिधा तुम्ही थोड्यावेळाने याल का केबिनमध्ये मला तुमच्या सरांशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे.. तशी समिधा राजीवला म्हणाली, ओके सर...मी थोड्या वेळाने येते आणि प्रतिककडे पाहून म्हणाली, सर ते मि. सिंग यांच्या documents चेक करून तुम्हाला सांगते मी नंतर...ओके सर म्हणत समिधा केबिनमधून बाहेर पडली.

समिधा जाताक्षणी राजीव प्रतिकला म्हणाला, तू तिला सांगणं गरजेचं आहे असं नाही का वाटत तुला...I mean, she is your team member...आणि आज ना उद्या तुला तुझ्या टीम मेंबर्सना सांगणं भाग आहे...आणि तुला तुझ्या बॉसला पण हे सांगावं लागेलच की... हे कसं विसरून चालेल तुला... राजीव प्रतीकला समजावत होता... तसा प्रतिक म्हणाला, अरे मला नाही समजत आहे की मी हे सगळं कसं सांगू ते...? त्यावर राजीव म्हणाला, हे बघ राहिला समिधाला सांगायचा प्रश्न तर ते मी आता तुझ्या समोर तिला सांगू शकतो पण I guess, this is not right thing. म्हणजे तू त्यांचा बॉस आहे तर ते तू सांगणं योग्य ठरेल..एका अनोळखी माणसाने म्हणजे मी हे सांगणं योग्य होणार नाही... तुला स्वतःला तयारच करावं लागेल...राजीव प्रतिकला पुन्हा समजावून सांगत होता... आणि घाबरू नकोस मी आहे इथेच तुझ्या बरोबर... पण बोलायचं तुलाच आहे..हे लक्षात ठेव.. तसं प्रतिकने मानेने हो म्हटलं आणि त्याने समिधाला कॉल करून केबिनमध्ये बोलावलं.. तशी समिधा केबिनमध्ये आली.. सर ते मि. सिंग यांच्या documents चेक केल्या मी आणि फाईल approval ला लोन डिपार्टमेंट मध्ये पाठवली आहे. तसा प्रतिक म्हणाला, समिधा बस जरा मला बोलायचं आहे तुझ्याशी.. तशी समिधा चेअरवर बसली. तसा प्रतिक म्हणाला, तू मला मघाशी विचारलं होतं ना प्रेरणाला डिस्चार्ज कधी मिळणार ते... तशी समिधा म्हणाली, हो सर.. पण तुम्ही मला काही सांगितलं नाही.. तसा प्रतिक म्हणाला, तेच सांगायला मी तुला बोलावलं आहे.... असं म्हणून प्रतिकने समिधाला प्रेरणाच्या बाबतीत घडलेला सगळा प्रसंग सांगितला.. सगळं ऐकून समिधाला ही धक्का बसला... तिने डोळे पुसत विचारलं, सर डॉ काय म्हणाले, प्रेरणाला किती वेळ लागेल शुद्धीवर यायला...तसा प्रतिक म्हणाला, हे काही सांगता येऊ शकत नाही.... सगळं देवाच्याच हाती आहे आता. सर मग प्रेरणाच्या केस चं कसं करणार आहेत... I mean जर आरोपी पकडले गेले आहेत तर केस साठी वकील ही तिच्या आईबाबांना बघावा लागेल ना... समिधाने विचारलं. तसा प्रतिक राजीवकडे हात दाखवत म्हणाला, तुला माझा हा मित्र माहीतच आहे.. पण तो वकील आहे हे कदाचित तुला माहित नसावं..यानेच प्रेरणाची केस घेतली आहे. काही दिवसांनी मीना ही सुट्टी संपवून जॉईन होईल. तुला तिला हे सगळं सांगायचं आहे.. आपण टीम मेंबर्स आहोत त्यामुळे आपण या गोष्टी लपवून ठेवू शकत नाही.. मी माझ्या सरांशी सुद्धा एक दोन दिवसांत बोलणार आहे.. समिधा मी समजू शकतो तुझ्यावर सध्या कामाचा ताण खूप आहे...पण शक्यतो उशिरापर्यंत मी ऑफिसमध्ये नसताना थांबू नकोस...म्हणजे मी असलो ऑफीस मध्ये तर, मी तुला घरी सोडू शकतो...पण मी नसताना शक्यतो थांबू नकोस. या फाईल्स मी साइन केल्या आहेत अजून काही फाईल्स साइन करायच्या असतील तर दे...मी थोड्या वेळात निघतो आहे कोणतंही काम असेल तर मला कॉल कर. सर अजून तरी काही फाईल्स नाही आहेत... ही फाईल फक्त संजीव सरांना द्यायची आहे... आज ते येऊ शकणार नाहीत म्हणाले... त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे तर ते घरुनच काम करणार म्हणाले आहेत... ते म्हणाले होते कोणी त्यांच्या अपार्टमेंट च्या इथून जाणार असेल तर फाईल त्यांच्याकडे दे म्हणून...त्यांना ही फाईल थोडी अर्जंट हवी आहे असं म्हणाले...समिधा प्रतिककडे फाईल देत म्हणाली. ओके ठीक आहे मी तिथूनच जाणार आहे तर मी फाईल देऊन पुढे जाईन...प्रतिक फाईल घेत म्हणाला. सर मला सुद्धा प्रेरणाला भेटायचं होतं.... समिधा प्रतिकला म्हणाली. हो ती शुध्दीवर आली की तू भेटून ये तिला... पण सध्या नकोच... त्या अवस्थेत बघवत नाही तिला...ती शुध्दीवर आली की मी सांगतो तुला...प्रतिक म्हणाला. तशी समिधा म्हणाली, ओके ठीक आहे सर...सर, अजून काही काम नसेल तर मी जाऊ का सर्विस डेस्कला..? तसा प्रतिक म्हणाला, हो हो चालेल. तशी समिधा साइन केलेल्या फाईल्स घेऊन केबिन मधून बाहेर पडली.

क्रमशः

🎭 Series Post

View all