Mar 01, 2024
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-६७

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-६७

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६७


आज प्रतिकची सकाळची फ्लाईट होती. राजीव बरोबर प्रेरणा ही प्रतिकला सोडायला एअरपोर्ट वर आली होती. 
राजीव: प्रतिक, तिकडे रेंज मिळत नाही तुझ्या मोबाईलला... I guess तू दुसरं sim घ्यायला हवं होतं.
प्रतिक: अरे मी already घेतलं आहे...
राजीव: अच्छा, ओके मला नंबर शेअर करुन ठेव... म्हणजे मी त्या नंबर वर contact करु शकेन.
प्रतिक: अरे प्रेरणाला नंबर दिला आहे मी... ती शेअर करेल तुला...
राजीव:(दोघांना चिडवण्याच्या उद्देशाने) ओह, म्हणजे नंबर शेअर पण झाला तर..... और ये दोस्त को पता भी नहीं... दोस्त दोस्त ना रहा...(acting करत म्हणाला)
प्रतिक: overacting बंद कर.... म्हणत प्रतिकने त्याला hug केलं आणि हळूच म्हणाला, आईबाबांची आणि प्रेरणाची काळजी घे please माझ्या absence मध्ये...
राजीव: अरे तू सांगितलं नसतं तरी मी घेणारच आहे... dont worry, तू फक्त स्वतःची काळजी घे. 
तसा प्रतिक प्रेरणाकडे आला. प्रेरणा त्याला काळजीने भरपूर काही सुचना देतच होती. प्रतिकने तिलाही hug करून सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितलं तशी प्रतिकच्या फ्लाईटची announcment झाली. प्रतिक मागे वळून वळून दोघांना बाय बोलून निघाला.
***

बेंगलोरला उतरल्यावर प्रतिक पहिल्यांदा जाऊन PI नायर यांना जाऊन भेटला. त्यांना त्याने सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी ही त्यांची काही खास माणसे प्रतिकच्या मदतीला लावली. तिथून तो सरळ बेंगलोरच्या ऑफिसमध्ये गेला. मि शेट्टी, सुब्रमण्यम प्रतिकच्या विश्वासातील माणसे होती. दोघेही त्याच्याच येण्याची वाट पाहत होते.
शेट्टी: Sir, you directly come to the office... From Mumbai to Benglore travel is hectic... I think you should take some rest before starting your work.
प्रतिक: Yes I know Mr Shetty, but to solve this problem I have to work.
सुब्रमण्यम: सर, मैं क्या बोलता जी, शेट्टी और मैने कुछ फाईल्स निकालके साईड में रखे है... आप एक बार उनपे नजर डाल दो...
म्हणत त्यांनी काही फाईल्स प्रतिककडे दिल्या.
शेट्टी: प्रतिक सरजी, हम आपके लिए कुछ खाने का ऑर्डर देता है...
असं म्हणत त्यांनी इडली आणि मेदूवडा केबिनमध्ये घेऊन यायला सांगितलं. प्रतिकचं खाउन आटपेपर्यंत शेट्टी आणि सुब्रमण्यम यांनी त्यांना अजून काही फाईल मिळत आहेत का चेक केलं.
***

प्रेरणा ऑफिस मध्ये आली खरी, पण प्रतिकच्या काळजीने तिचं कामात लक्ष ही लागत नव्हतं. दुपारचे 12.30 वाजून गेले तरी प्रतिकचा कॉल आला नव्हता... आणि नाही त्याने तिच्या मेसेजचा रिप्लाय दिला होता. कॉल करावा तर तो कामात बिझी असेल म्हणून ती स्वतःला कॉल करण्यापासून रोखत होती. जेवताना तिचा पडलेला चेहरा बघून मीना आणि समिधाने तिला तिच्या मूड ऑफचं कारण विचारलंच...
प्रेरणा: बघ ना, सकाळपासून प्रतिकंनी ना कॉल केला आहे, ना मेसेजचा रिप्लाय... कोणीतरी इथे काळजी करत असेल याची ही त्यांना पर्वा नाही...
मीना: कोणीतरी म्हणजे नक्की कोण ग...
प्रेरणा: गप्प ना यार... आधीच माझं मन थाऱ्यावर नाही आहे. 
समिधा: हे बघ प्रेरणा, तुला ही माहिती आहे सर तिथे कोणत्या कामासाठी गेले आहेत ते... सो जरा समजून घे ना त्यांना... कामात बिझी असतील... नंतर फी झाले की तुला नक्की कॉल करतील.
प्रेरणा: हं... खूप टेन्शन आलं आहे मला... असं झालं आहे कधी एकदाच हे प्रकरण solve होत आहे.
मीना: हं, खरं आहे, ज्यांनी कोणी हा घोटाळा केला आहे ना... तो जाम शातीर दिमाखवाला असणार...
समिधा: हो.. ऐकना मला एक आयडिया सुचली आहे...
प्रेरणा, मीना: कसली आयडिया...?

समिधा: तुम्हा दोघींना तर माहितीच आहे आपल्या सगळ्या लोकेशन च्या ऑफिसच्या अकाउंट्सच्या डिटेल्स एका कॉमन सॉफ्टवेअर मध्ये आहेत ते...
मीना: हां पण त्याच काय...?
समिधा: अरे येडू, मग आपण त्या सॉफ्टवेअर मध्ये एन्ट्रीज चेक करू शकतो ना... I mean बेंगलोरच्या ऑफिसच्या डिटेल्स पण आपल्याला तिथून मिळून जातील.
प्रेरणा: पण आपल्याला तो access असेल का...? म्हणजे असं कसं चेक करणार आपण...?
मीना: पण आयडिया भारी आहे ही... पण access लागेल त्याच काय...?
समिधा: hey मी आयडिया दिली आहे ना... पुढचं solution पण मी देते की...
मीना: ओह हो, म्हणजे सगळी सेटिंग लावली आहे सॅमी भाई ने अपने...
समिधा: (शर्टची कॉलर वर करत) हां मग काय...!!
प्रेरणा: पण तुझी ओळख अकाउंट डिपार्टमेंट मध्ये कशी....
समिधा: अरे राहुल आहे ना त्याचा cousin आपल्याच ऑफिस मध्ये आहे अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये... सो त्याला आहे ऍक्सेस असणार... आणि हवं तर आपण सरांच्या कानांवर घालून ठेवू... म्हणजे आपण full on permission घेतल्या सारखं सुद्धा होईल... what say ...?
प्रेरणा, मीना: चलेगा, done 
समिधा: ठीक आहे उद्या मी तुला राहुलच्या cousin बरोबर इंट्रो करून देते... मग तुम्ही त्याची मदत घेऊन कामाला लागा...
प्रेरणा: आणि तू आम्हाला मदत नाही करणार का...?
समिधा: ओह मिसेस प्रतिक, विसरलात वाटत तुम्ही... मी २ ३ दिवसांत सुट्टीवर जाणार आहे ते... माझं लग्न आहे यार....
प्रेरणा: सॉरी यार मी ते बंगलोरच्या टेन्शन मध्ये विसरूनच गेले...
समिधा: its ok, I can understand... पण लग्नाला यायचं बरं आठवणीने... तुम्हा दोघींसाठी special राहुलशी भांडून मी संडेला लग्न ठेवायला सांगितलं...
प्रेरणा, मीना: yes boss, we are coming for your wedding....
तिघींनी हसत हसत आपलं जेवण आटपलं आणि पुन्हा डेस्कवर कामाला लागल्या.
***

प्रतिक संध्याकाळी उशिरा काम आटपून त्याच्या हॉटेलच्या रूमवर आला... फ्रेश होऊन त्याने प्रेरणाला कॉल लावला.
प्रेरणा: हं बोला...
प्रतिक: ओह इतका राग...
प्रेरणा: आता आठवण झाली आहे तुम्हाला कॉल करायची... सकाळपासून कोणीतरी तुमच्या कॉल, एक मेसेजची इतकी वाट पाहतंय पण तुम्हाला त्याच कुठे काय पडलं आहे...
प्रतिक: सॉरी ना यार... पण तुला ही माहित आहे की मी सध्या कोणत्या situation मध्ये आहे ते...
प्रेरणा: हं... ( काही वेळ शांत बसून) माहिती आहे म्हणून तर तुम्हाला कॉल करून त्रास दिला नाही...
प्रतिक: (हळूच हसला) मग राणी सरकार, हा नाकावर राग कशाला...?
प्रेरणा: ते... ते...
प्रतिक: (तिची नक्कल करत) ते... ते.... ते...जाऊ दे.. ऐकना... I miss you so much.... तू पण मिस करते आहेस का मला...
प्रेरणा: नाही करत मी मिस कोणालाच...
प्रतिक: (मुद्दामून चिडवण्याच्या उद्वेशाने) हो का.... बरं ठीक आहे उगाच मी तुला कॉल केला मग.... चल ठेवतो मग मी कॉल...
प्रेरणा: हां आता असं करणार ना तुम्ही... you are so ....(तिला सुचेनाच काय बोलावं ते)
प्रतिक: (जोरजोरात हसत) मी काय आहे... बोलना....ऐकतोय मी...
प्रेरणा: प्रतिक, तुम्ही सगळं मुद्दाम करत आहात ना... मला जाणूनबुजून चिडवायला...
प्रतिक: (हसत हसत) ओह कळलं तर मग... anyways आजचा दिवस कसा गेला...
प्रेरणा: (डोक्यावर हात लावून) अय्या बरं झालं हे विचारलं... मला तुम्हाला काही सांगायचं आहे असं म्हणत तिने समिधाने अकाउंट्स चेक करण्याची दिलेली आयडिया प्रतिकला सांगितली.
प्रतिक: वाह, भारी सुचलं समिधाला...
प्रेरणा: मग मैत्रीण कोणाची आहे...?
प्रतिक: माझ्या होणाऱ्या बायकोची... तसे दोघेही हसायला लागले...
प्रेरणा: प्रतिक, मग करायचं ना आम्ही चेक डिटेल्स... म्हणजे बॉस म्हणून तुमच्या कानावर घालायला हवं... म्हणून विचारतेय...
प्रतिक: हो हो करा... मी सुरेश सरांशी पण बोलून घेतो या विषयावर.... 
प्रेरणा: हो हो चालेल.... आणि तुम्ही काही विसरत तर नाही ना...?
प्रतिक: आणि काय....
प्रेरणा: प्रतिक, समिधा सुट्टीवर जाणार आहे २-३ दिवसांनी....विसरलात वाटतं...
प्रतिक: ओह येस... विसरलोच होतो मी पार.... मला शक्य नाही होणार... तू जाऊन ये...
प्रेरणा: I Know तुम्हाला शक्य नाही... पण wish तर करु शकता...
प्रतिक: Yes my boss.... चल मी जरा आता घरी कॉल करतो... सकाळपासून त्यांना पण कॉल केला नाही आहे..
प्रेरणा: काय.... तुम्ही आईबाबांना पण कॉल केला नाही... असं कसं वागतात तुम्ही.... चला पटकन कॉल करा... ते काळजी करत असतील.
प्रतिक: अग हो माझे आई.... तुझा कॉल ठेवला की लगेच करतो कॉल...
प्रेरणा: बरं ठेवते मी कॉल.... तुम्ही काळजी घ्या स्वतःची.....
प्रतिक: ok dear, love you ... you also take care ....
प्रेरणा: हं
प्रतिक: हं काय....तू पण बोल ना...
प्रेरणा: (लाजून) मी ठेवते कॉल... मला वाटतं आई बोलावते आहे मला... म्हणत तिने लगेच कॉल ठेवून टाकला.
प्रतिक तिच्या अशा वागण्याने हसू लागला... काही वेळाने त्याने त्याच्या घरी कॉल करून सगळ्यांची चौकशी केली. मग राजीवला कॉल करून बेंगलोरच्या ऑफिसमध्ये त्याला आज मिळालेल्या फाईल्स बद्दल माहिती दिली.
राजीवने त्याला सगळं सावधगिरीने करायला सांगितलं. कारण घोटाळा वाटतो त्यापेक्षा ही मोठा निघण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
***

सकाळी आजी देवपूजा करून नंदा-मिलिंदबरोबर नाश्त्याला बसली होती.
आजी: नंदा, प्रतिकने काल फोन केला होता की नाही...?
नंदा: हो आई, खूप उशीर झाला त्याला ऑफिसमधलं काम आटपेपर्यंत मग रात्री खूप उशिरा केला होता. तुम्ही झोपलेल्या जेव्हा त्याचा कॉल आला म्हणून तुम्हाला उठवलं नाही...
आजी: बरं... आज परत त्याने कॉल केला तर म्हणावं वेळेवर जेव... उगाच धावपळ करू नकोस.. 
नंदा: हो आई.
आजी: मिलिंदा, ते प्रतिक, राजीवच्या साखरपुड्याचे फोटो कधी येणार आहेत...?
मिलिंद: या आठवड्याच्या शेवटी देईल म्हणाला होता फोटोग्राफर..
आजी: हं... बरं त्यालाच बोलवायचं का लग्नासाठीचे पण फोटो काढायला...?
मिलिंद: हो आई माझा पण तसाच काहीसा विचार चालू आहे... आता देईल ना अल्बम तेव्हा फोटो कसे काढले ते बघून ठरवता येईल...
आजी: हो... ( मग काही विचार करून) नंदा, ऐक ना, प्रेरणा आणि रेखाला बोलावून घेऊ म्हणतेय आज नाहीतर उद्या आपल्या घरी... जेवायलाच बोलावूया का...?
मिलिंद: आई अचानक कशाला दोघींना बोलवतेय...
आजी: अरे साखरपुड्यानंतर त्या दोघींशी माझं काहीच बोलणं झालं नाही... आणि जमलं तर त्या माझ्या लबाड राजीव बोक्याला पण बोलवूया...
मिलिंद, नंदा: (हसत हसत) हो आई.
आजीने लगेच राजीवला कॉल करून रेखा आणि त्याने रात्री घरी जेवायला या म्हणून बोलावणं धाडलं आणि येताना प्रेरणाला पण घेऊन या म्हणून ही सांगितलं. मग प्रेरणालाही कॉल करून त्यांच्याबरोबर यायचं म्हणून कबूल करून घेतलं. 

प्रतिक इतक्यावेळा बेंगलोरला गेलाय पण एरवी इतकं कधी बैचेन वाटतं नव्हतं जितकं हल्ली वाटतं आहे. त्यादिवशी पण तो त्याच्या जाण्यामागचं कारण सांगताना खूप काळजीमध्ये वाटला. प्रेरणाला नक्की या काळजीमागचं कारण माहित असणार... आजी तिच्या रूममध्ये बसून विचार करत होती.
***

समिधाने मीना आणि प्रेरणाची आदल्या दिवशी ठरल्या प्रमाणे राहुलच्या cousin नचिकेत बरोबर ओळख करून दिली. त्याने ही त्याच्या बॉसची परमिशन घेऊन त्यांना या कामात मदत करायचं कबूल केलं. तिघी ही त्याचा होकार मिळाल्यामुळे खुश झाल्या आणि कामाला लागल्या.

प्रतिक आजही सगळ्या फाईल्स चेक करत बसला होता. कालच्या फाईल्स वरून मिळालेल्या डिटेल्स वरून आता फक्त त्याला एकाच पर्सनवर doubt घेता येणं कठीण होतं. कारण त्या फाईलवर बरेचजण काम करत होते. संध्याकाळपर्यंत शोधून शोधून तो वैतागला पण हवं तशी प्रोग्रेस दिसूनच येत नव्हती. रात्री उशिरा तो रूमवर जायला निघाला त्यावेळी त्याला सतत कोणीतरी त्याचा पाठलाग करत असल्याचा भास होतं होता. त्याने एकदा दोनदा मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं. रूमवर आल्यावर दिवसभरच्या धावपळीमुळे त्याला रात्री जेवल्या जेवल्या झोप लागली.

ठरल्याप्रमाणे प्रेरणा, राजीव आणि रेखा प्रतिकच्या घरी आले. रेखा आणि प्रेरणा दोघेही नंदा नको नको म्हणत असताना सुद्धा तिला कामात मदत करत होते. राजीव मिलिंद आणि आजीबरोबर गप्पा मारत बसला होता. जेवण बनवून झालं तसं तिघींनी टेबलवर अरेंज केलं.
राजीव: (मुद्दाम दोघीना चिडवायला) आजी, बघताय ना.... तुमच्या दोन्ही नातसूना एकदम घरी येताक्षणी आल्या आल्या कामाला लागल्या. पण तुम्ही कशा आहात वगैरे काहीही विचारलं नाही त्यांनी...
रेखाने राजीवला चिडका लुक दिला... आजीला त्याचं बोलणं ऐकून राग यायचं सोडून हसूच आलं.
राजीव: आजी तुम्ही हसताय... रागवायचं सोडून....?
आजी: हसू नाहीतर काय करु... तू कॉल आला म्हणून गेला तेव्हा माझ्या या दोन्ही नाती माझ्याच बाजूला बसून माझ्याशी गप्पा मारत होत्या.
आजीचं बोलणं ऐकून रेखा राजीवला जीभ दाखवत आजीच्या बाजूला येऊन बसली.
रेखा: एका मुलाचा पचका झाला....
यावेळी रागाने लुक द्यायची वेळ राजीवची होती... त्याचा पडलेला चेहरा पाहून सगळे हसू लागले.
नंदा: (रेखाला डोळा मिचकावून) पुरे हा रेखा आता... माझ्या राजीवची मस्करी... चला आता जेवायला घेऊ... म्हणत सगळे जेवायला बसले. सगळ्यांचं हसत खिदळत जेवून झाल्यावर आजीने प्रेरणाला तिच्या रूममध्ये काही कारण काढून बोलावून प्रतिकच्या बेंगलोरला जाण्यामागचं कारण विचारलं. प्रेरणा आजींना सांगू की नको या विवंचनेत असतानाच आजीने तिला जबरदस्तीने सांगायला भाग पाडलंच. आजीच्या हट्टापुढे प्रेरणाला नमतं घेत तिला प्रतिकच्या तिकडे जाण्यामागचं कारण सांगावंच लागलं. त्यांचं बोलणं चालू असतानाच राजीव रेखा आजीच्या रूममध्ये आले आणि त्यांचं सुरु असलेलं बोलणं दोघांनी ऐकलं.
राजीव: आजी, डोन्ट वरी, प्रतिक एक-दोन आठवड्यांत येईल...
आजी: हं
राजीव: (आजीला हसवण्यासाठी) मेरी लेडी डॉन हस दे जरा...
आजी: (हसत) गप्प रे लबाडा... आता घरी जायला निघालात का...?
राजीव: हो आजी
आजी: सांभाळून ने....दोघींना घरी...आणि तू पण घरी पोहचल्यावर नंदा नाहीतर मिलिंदला फोन करून कळवं
राजीव: हो आजी म्हणत तिघेही आजीच्या पाया पडून मिलिंद, नंदा, आणि आजीचा निरोप घेऊन घरी जायला निघाले.

 

क्रमशः


(माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे भाग उशिराने पोस्ट करते आहे त्याबद्दल क्षमस्व.)

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ujwala Desai

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...

//