Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-६३

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-६३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६३


सगळ्यांच्या नजरा दरवाजाच्या दिशेने गेल्या. Light गेली असल्याने कोणाला ही तिचा चेहरा दिसेना. एंगेजमेंटला आलेले काहीजण तर तिला पाहायला उभे राहिले होते. प्रतिकच्या हृदयाची धडधड वाढत होती. आजीने हात घट्ट पकडून ठेवला होता त्यामुळे तो तिथे थांबला होता नाहीतर त्याने अंधाराचा फायदा उचलून तिथून निघून जायचा विचार केला होता. त्याला समोरुन येणाऱ्या मुलीला पाहायची ही इच्छा नव्हती. त्याने त्याचे डोळे बंद करुन घेतले होते. 

हळूहळू ती स्टेजपाशी आली आणि आजीच्या थोड्या अंतरावर जाऊन उभी राहिली. Generator light चा प्रकाश फार पडत नसल्याने अजूनही तिचा चेहरा अंधारामुळे कोणाला पाहता आला नाही. आजीने तिला तिच्याजवळ बोलावलं. ती मान खाली घालूनच तिच्याजवळ येऊन उभी राहिली. आजीने तिचा हात हातात घेतला आणि प्रतिकच्या हातात देत म्हणाली, आता तुम्हा सर्वांच्या उपस्थित माझ्या दुसऱ्या नातवाचा ही साखरपुडा होणार आहे तर तुम्ही तुमच्या शुभेच्छा माझ्या या नातवाला आणि नातसूनेला द्या. तिने चमकून आजीकडे पाहिलं आणि तेवढ्यात light आली. त्या दोघांना पाहून एंगेजमेंटला आलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तिचे भांबावलेले डोळे पाहून आजी म्हणाली, आता यापुढे तुलाच आमच्या प्रतिकच्या आयुष्याची धुरा सांभाळायची आहे. मग अजूनही डोळे बंद केलेल्या प्रतिकला म्हणाली, "प्रतिक चालेल ना तुला, हिची आयुष्यभराची साथ...?" प्रतिकने बंद केलेले डोळे उघडले आणि समोर असलेल्या तिला पाहिले आणि तो पाहतच राहिला.... purple कलरचा लेहेंगा आणि त्यावर साजेशी दुपट्टा, केस क्लिप लावून मोकळे सोडलेले, कपाळावर बिंदी, डोक्यावर मांग टिक्का, काजळ आणि लायनरमुळे अजूनच आकर्षक झालेले डोळे, गुलाबी रंगाच्या ओठांची होणारी थरथर... हातातल्या बांगड्यांचा होणारा आवाज... त्याची प्रेरणा जी त्याच्यापासून काही दिवसांपासून दुरावलेली ती आज त्याच्यासमोर एंगेजमेंटसाठी उभी होती... तिच्या डोळ्यांत तो स्वतःला हरवून गेला. तिचीही अवस्था फार वेगळी नव्हती... दोघांच्यामध्ये आता फक्त डोळ्यांचा संवाद होत होता. तोपर्यंत त्या दोघांचे आईबाबा, राजीव-रेखा, त्यांचे आईबाबा, सोना-समीर सगळे स्टेजवर आले. अजूनही प्रतिकची नजर तिच्यावरची हटत नव्हती. शेवटी आजीने प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, "एकमेकांना पाहून झालं असेल तर करुया ना साखरपुडा...? सगळेजण वाट पाहत आहेत...?" आजीचं बोलणं ऐकून दोघांचे ही चेहरे लाजेने गुलाबी झाले. आजीने प्रतिक आणि प्रेरणाच्या बाबांना त्या दोघांकडे अंगठी द्यायला सांगितली. प्रेरणाच्या बाबांनी तिच्याकडे अंगठी पुढे केली. प्रेरणा आईबाबांना तिथे पाहून आश्चर्यचकित झाली. तिने त्यांच्या हातातून अंगठी घेतली. प्रतिकच्या बोटांत अंगठी घालण्यासाठी तिने त्याला हात पुढे करायला सांगितला. तशी आजी प्रतिकला म्हणाली, अरे प्रतिक तुझ्या बोटांना तर बँडेज आहे ना, मग प्रेरणा अंगठी कशी घालणार...? आजीचं बोलणं ऐकून प्रतिक आणि राजीव दोघेही आजीकडे चकित होऊन पाहू लागले. आजीने त्याच्या पाठीवर हाताने मारत त्याला बँडेज काढायला सांगितली. प्रेरणासकट सगळेच जण नक्की काय झालं याचा विचार करु लागले. त्याने कोणालाही कळणार नाही अशी हळूच हाताने बोटांवरची बँडेज काढली आणि हात प्रेरणाच्या समोर पुढे केला. आजीने विचार करणाऱ्या प्रेरणाला हात लावून अंगठी घालायला सांगितली. तिने अंगठी घालताक्षणी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता अंगठी घालण्याची टर्न प्रतिकची होती. त्याने हातात अंगठी घेऊन तिच्या डोळ्यांत पाहत तिचा हात मागितला. तिने हात पुढे केल्यावर त्याने गुडघ्यात वाकून तिच्या बोटांत अंगठी घातली. प्रेरणाने लाजून दुसऱ्या हाताने चेहरा लपवला. प्रतिक तिच्या हातावर किस करत उठला. फोटोग्राफर त्यांचे वेगवेगळ्या अँगलने फोटोज काढतच होता. 

ती मनात विचार करु लागली, अगदी आजपर्यंत ती तिच्या प्रतिक पासून दूर व्हायचा प्रयत्न करत होती आणि आज त्याच्याशी एंगेजमेंट झालेली पाहून तिला अजून हे स्वप्नच वाटत होतं. प्रतिकने तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला इशाऱ्याने काय झालं म्हणून विचारलं. तिच्या नकळत डोळ्यांत पाणी आलं. प्रतिकने तिच्या डोळ्यांत आलेलं पाणी बघून क्षणाचाही विलंब न लावता तिला त्याच्या दोन्ही हातांनी उचलून घेतलं. फोटोग्राफरने हा ही क्षण फोटोमध्ये कैद केला.

प्रेरणा: प्रतिक, सोडा मला... कोणी काय म्हणेल...

प्रतिक: अं हं, मी तुला म्हणालो होतो ना... आपल्या एंगेजमेंटला मला तुझ्या डोळ्यांत पाणी नको आहे म्हणून...!!

प्रेरणा: (लाजून) प्लीज प्रतिक, सोडा ना मला खाली...

इथे स्टेजच्या खाली सोना-समीर, राजीव-रेखा प्रतिकला अजून चेतवायला लागले... "सही जा रहे हो भाई...."

प्रेरणाने लाजून तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. तिला इतकं लाजलेलं पाहून प्रतिकने हसत हसत तिला खाली उतरवलं. तिचा चेहरा लाजून लाजून गुलाबी झाला होता. सोना-समीर, रेखा-राजीव यांनी स्टेजवर येऊन त्या दोघांसोबत फोटो काढला. मग सगळ्यांच्या फॅमिली सोबत फोटोज काढण्यात आले. राजीव-रेखा, प्रतिक-प्रेरणा यांनी मिळून आजी बरोबर ही बरेच फोटो काढले. चौघांनी ही आजीच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घेतले. मग आजी स्टेजवरुन मिलिंदचा हात धरुन खाली उतरून सोफ्यावर येऊन बसली. 

***

 

आजीच्या मनात प्रतिक-प्रेरणाला एकत्र पाहून घडलेल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर तरळून गेल्या.

प्रतिकसाठी ती प्रेरणाला भेटायला तयार झाली होती. पण त्यावेळी तिने तिला त्याच्यापासून दूर व्हायला भाग पाडलं होतं. प्रेरणाचं प्रतिकवर प्रेम असूनही आजीच्या शब्दासाठी ती त्याच्यापासून दूर राहत होती. आजीला कळत होतं प्रतिक प्रेरणाच्या वागण्याने क्षणोक्षणी तुटतो आहे पण तिला तिचा हट्टीपणा सोडवत नव्हता. राजीवच्या ऑफिस मध्ये गेल्यावर मंजूला भेटून आणि त्याच्याकडून प्रेरणाबद्दल ऐकून तिला ती कुठेतरी निर्णय घ्यायला चुकत तर नाही आहे ना असं वाटू लागलं होतं. विचार करून करून तिच्या तब्येतीवर त्याचा परिणाम ही होत होता. मग किर्तन ऐकून थोडा बदल व्हावा... मनःशांती मिळावी म्हणून ती बुवांच्या कीर्तनाला जायला तयार झालेली.... पण रस्त्यात सिग्नलला तिला गजरा विकणाऱ्या मुलीला वाचवणारी प्रेरणा दिसली होती. नंतर अनाथ मुलांना मंदिरात दर्शनासाठी घेऊन आलेली प्रेरणा तिला खूप भावली. पण अजूनही तिला तिचा निर्णय घ्यायला कठीण होत होता. बुवांच्या कीर्तनाला तिला तिच्या चुकीची जाणीव झाली. आपली चूक सुधारावी म्हणून हॉस्पिटलमध्ये प्रेरणाशी बोलावं यासाठी तिने शुध्दीवर येताक्षणी मिलिंदला प्रेरणाबद्दल विचारलं होतं पण त्या ही वेळी प्रेरणाने लगेच तिथून निघून तिचा शब्द पाळला होता. आपली नात सोनाला प्रेरणाबद्दल भरभरुन बोलताना पाहून, प्रतिकसाठी दुसरी मुलगी निवडल्याचं ऐकल्यावर सोनाने प्रेरणाची बाजू घेत तिच्याशी केलेलं भांडण... सगळ्यांच गोष्टींनी तिला तिची चूक कळली होती. पण गोष्टी इतक्या पुढे गेल्या होत्या की तिला ते सगळं नीट करणं कठीण होऊन बसलं होतं... प्रेरणाला तिने दिलेल्या शब्दांपासून मुक्त करायचं ठरवलं होतं पण हे सगळं कसं करावं हे तिला त्याक्षणी सुचेनासं झालं होतं. मग यातून आपल्याला फक्त राजीवंच मदत करु शकतो म्हणून तिने त्याच्याशी बोलायचं ठरवलं होतं. विचारांच्या प्रवाहात ती असतानाच तिच्या मैत्रिणी देशपांडे, बर्वे आणि जाधव आजी तिच्यापाशी येऊन पोहचल्या.

बर्वे आजी: (आजीला हात लावून) शशी पूर्ण हॉलमध्ये शोधून थकलो आम्ही तुला... आणि तू इथे बसली आहेस...

आजी: अग उभं राहून राहून पाय दुखू लागले म्हणून म्हटलं जरा बसावं...

देशपांडे आजी: आता बसून झालं ना तुझं... मग चल बघू आमची ओळख करून दे तुझ्या नातवाशी आणि नातसूनेशी...

जाधव आजी: ओ देशपांडे आजी, जरा थांबावं लागेल आपल्याला... फोटोग्राफर त्यांचे फोटो काढतोय...

देशपांडे आजी: (स्टेजवर फोटो काढत असलेले पाहून) अग हो की, माझं म्हातारीचं लक्षच गेलं नाही तिकडे... हा फोटोग्राफर ना नेमका मध्ये उभा आहे... शशीच्या नातसुनेचा चेहरा काही दिसत नाही इथून... देशपांडे आजींचं बोलणं ऐकून आजीसकट सगळ्याजणी हसू लागल्या.

आजी: (सोफ्यावरुन उठत) चला मी तुम्हाला माझ्या दोन्ही नातसूनांची ओळख करून देते...सगळेजण आजीच्या मागे जायला निघाले.

जाधव आजी: शशी, पण तुला तर एकच नातू आणि नात आहे ना...?

आजी: हो, पण हा नातू पण माझाच आहे... आमच्या प्रतिकचा बालमित्र तो... खूप घट्ट मैत्री आहे दोघांमध्येही... म्हणूनच दोघांचा ही साखरपुडा आम्ही एकाच दिवशी ठेवला...

बर्वे: वाह शशी, मला तुझी ही कल्पना खूप आवडली बघ...

आजीशी बोलत बोलत सगळ्याजणी स्टेजवर पोहचल्या. आजीने राजीव-रेखा आणि प्रतिक-प्रेरणाची सगळ्यांबरोबर ओळख करून दिली. चौघेही सगळ्यांच्या पाया पडले. देशपांडे आजी तर प्रेरणाला मिठीच मारत आजीला म्हणाल्या, शशी माझा नातू अजून लहान आहे म्हणून फावलं बघ तुझं... नाहीतर आज प्रेरणाला तुझी नाही माझीच नातसून मी करुन घेतली असती बघ... प्रेरणाने त्यांचं बोलणं ऐकून लाजून प्रतिककडे पाहिलं... राजीव-रेखाला ही त्यांचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं.

आजी: (मनापासून हसत) माझं पुण्य बहुधा तुझ्यापेक्षा जास्त झालं असावं म्हणून मला या दोन सोन्याहून सुंदर अशा नातसूना मिळाल्या.

देशपांडे आजी: शशी, काळजी घे ग दोन्ही नातसूनांची... त्यांना काही त्रास नको देऊस... नाहीतर या देशपांडे आजीशी गाठ आहे... त्यांचं बोलणं ऐकून देशपांडे आजी आणि आजीसकट सगळेजण हसू लागले. प्रेरणाचे आईबाबा हे दृश्य पाहून भरून पावले.

***

 

प्रतिकच्या टीममधले सगळेजण प्रतिक-प्रेरणाला शुभेच्छा द्यायला स्टेजवर आले. समिधा आणि मीना दोघींनी तिला hug करुन शुभेच्छा दिल्या. त्या दोघांबरोबर टीमचा फोटो काढून झाल्यावर न विसरता समिधा-मीनाने प्रतिकला प्रेरणाची साथ कधीच सोडू नका म्हणून कबूल करुन घेतलं. विवेक सुद्धा प्रेरणाला hug करताना भावूक झाला होता. मालगुडे फॅमिली मेम्बर्स ही त्यांच्या मागोमाग स्टेजवर आले. प्रेरणाला तर त्या सगळ्यांना पाहून सुखद धक्का बसला आणि न राहवून तिने अनू आणि आदिला या एंगेजमेंटबद्दल कसं कळलं म्हणून विचारलं. तिचं बोलणं ऐकून आदी हसत म्हणाला, तुझ्या आजींनी आम्हाला तुमच्या चौघांच्या साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रेरणा-प्रतिक दोघेही हे ऐकून अवाक झाले. एका मागोमाग एक सुखद धक्के त्या दोघांना मिळत होते. आदिने प्रतिकला गळाभेट करत अभिनंदन केलं आणि प्रेरणाला जप म्हणून सांगितलं. प्रतिकने ही त्याचा हात हातात घेऊन आश्वासन दिलं. प्रतिक-प्रेरणा दोघांनी मालगुडे काका-काकूंच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. काका-काकूंचे डोळे दोघांना आशीर्वाद देताना आनंदाने भरून आले. मालगुडे फॅमिली बरोबर फोटो काढून झाल्यावर राजीव-रेखा स्टेजवर येऊन प्रतिक-प्रेरणाला म्हणाले, "तुम्हा दोघांनी आम्हाला काही गिफ्ट नाही दिलं...सो आम्हाला आमच्या लग्नात तुमच्या दोघांकडून 2 गिफ्ट हवे आहेत..." पण तुम्ही दोघांनी तरी आम्हाला कुठे काय गिफ्ट दिलं आहे.... प्रतिक प्रेरणाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

रेखा: असं कसं, आणलं आहे बरं का आम्ही गिफ्ट...!! म्हणत तिने प्रतिक-प्रेरणाला सोना-समीर बरोबर स्टेजच्या दिशेने येणारे त्याचे गार्डन फ्रेंडस असलेले आजी-आजोबा दाखवले. 

प्रतिक-प्रेरणा दोघेही त्यांना येताना पाहून स्वतःच्या गालांवर हात ठेवून अवाक होताना पाहत राहिले.

राजीव: (त्या दोघांना असं पाहून) मग आवडलं की नाही आमचं surprise gift..

प्रतिकने हे ऐकून राजीवला तर प्रेरणाने रेखाला घट्ट मिठी मारली. 

प्रतिक: खरंच आयुष्यभर विसरणार नाही असा क्षण तुम्ही दोघांनी आम्हाला गिफ्ट दिला.

राजीव: तुझ्या आंनदासाठी काय पण... फक्त आता दोघं एकमेकांना समजून घ्या आणि कधी एकमेकांची साथ सोडू नका. दोघांनी त्याला डोळ्यांनी हे कबूल केलं. त्यांचं बोलणं चालू असताना सोना-समीर आजी-आजोबांना घेऊन स्टेजवर आले. प्रतिक-प्रेरणा, राजीव-रेखा आणि सोना-समीर सगळ्यांनी त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले.

आजोबा: (प्रतिक-प्रेरणाला) तुम्हां दोघांना एकत्र बघून खरंच खूप छान वाटलं.... आता आमच्या वयाचे होईपर्यंत तुमच्या नात्याला जपा... आयुष्यात कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नका. (मग राजीव-रेखा,समीर-सोनाकडे पाहत) तुम्हाला पण माझं हेच सांगणं आहे बरं का...!!

सगळे: हो आजी-आजोबा... त्यांचं बोलणं झाल्यावर सगळ्यांनी मिळून आजी-आजोबांबरोबर फोटो काढले.

***

 

एंगेजमेंट नंतरचा जेवणाचा कार्यक्रम आटपेपर्यंत ९ वाजले. आतापर्यंत सगळे आपापल्या घरी गेले होते. हॉलमध्ये आता फक्त रेखा, राजीव, प्रतिक आणि प्रेरणाची फॅमिली उरली होती. सगळे आता सामान आवरून घरी जायच्या तयारीत असताना आजी प्रेरणाच्या आईबाबांना म्हणाली, तुम्ही आता आमच्या बरोबरच आमच्या घरी चला... मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आजीचं बोलणं ऐकून प्रतिकसकट सगळे विचारात पडले...आता काय बोलायचं असेल आजीला...?

प्रेरणाचे बाबा: (आजीला) आई, तुमची हरकत नसेल तर मी विवेक आणि प्रेरणाला घरी जायला सांगून आम्ही नवरा-बायको तुमच्याकडे येतो.

आजी: नाही, तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी यावं असं माझं म्हणणं आहे.... मला जे बोलायचं आहे हे तुम्हां सगळ्यांच्या समक्ष बोलायचं आहे.

मिलिंद: आई, आता खूप उशीर झाला आहे... आपण त्यांना उद्या बोलावलं तर....?

आजी: मिलिंदा, हे बघ... काही गोष्टी आज नको, उद्या नको म्हणून टाळणं योग्य नाही... आणि राहिला प्रश्न उशीर होतो आहे तर... राजीव आणि प्रतिक त्यांना कारने घरी सोडतील...

आजीच्या या बोलण्यावर मिलिंदसकट कोणीही पुढे काही बोलू शकलं नाही. रेखा आणि तिच्या फॅमिलीने राजीव आणि प्रतिकच्या फॅमिलीचा निरोप घेतला आणि ते त्यांच्या घरी जायला निघाले तर प्रतिक, राजीव आणि प्रेरणाची फॅमिली प्रतिकच्या घरी जायला निघाले. प्रत्येकजण कारमध्ये आता घरी गेल्यावर आजी काय बोलेल याचाच विचार करत होते.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...