Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व - एक संघर्ष भाग-६

Read Later
अस्तित्व - एक संघर्ष भाग-६
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-६


प्रतिकच्या मनातले सांगू की नको सांगू हे विचार थांबले आणि त्याने राजीवला सांगायचं ठरवलं.  प्रतिक म्हणाला, तुला माझ्या ऑफिस मधली प्रेरणा आठवते का...? तसा राजीव काहीसा आठवून म्हणाला, तुझ्या टीम मध्ये आहे तीच का...? जिच्या एका स्माईलमुळे तुझा पूर्ण दिवस छान जातो ती काय....? राजीव प्रतीकला हाताच्या कोपराने पोटाला मारुन विचारु लागला....? मग तिचं काय, तिने आज स्माईल नाही दिली का....? त्यामुळे तुझा मूड ऑफ आहे का....? राजीव प्रतिकला प्रेरणाच्या नावाने चिडवत म्हणाला.

Just shut up Rajiv, तुला माहीत तरी आहे का काय झालं आहे ते....प्रतीक भडकून बोलला. तसा राजीव थोडा सिरीयस होऊन म्हणाला, I am sorry, सांग तू नक्की काय झालं... तसं प्रतिकने सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सगळा प्रसंग त्याला सांगितला... मी कुठेतरी यासाठी जबाबदार आहे रे, प्रतिक असं म्हणून रडू लागला, ना मी तिला ती फाईल रेडी करायला सांगितली असती ना ती थांबली असती ना हे असं काही घडलं असतं.... तसं राजीव त्याच्या पाठीवर हात थोपटत म्हणाला, स्वतः ला दोष देऊ नकोस, तुला तरी माहीत होतं का ती ऑफिसमध्ये थांबेल हे...? आणि तिच्या बाबतीत जे घडलं ते व्हायला नको होतं....मी तिला फार ओळखत नाही पण एकदा तुझ्या ऑफिसमध्ये मी आलो होतो तेव्हाचं तिचं माझं बोलणं झालं होतं, खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ वाटली ती...आता कशी आहे ती...? डॉ काय म्हणाले..? तसा प्रतिक म्हणाला, तिच्या शुद्धीवर येण्यावर सगळं अवलंबून आहे... मला त्या माणसांचा खूप राग येतो आहे...समोर आले ना तर मला सजा झाली तरी बेहतर पण मी त्यांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही... का तिच्या बाबतीत असं घडलं रे...? प्रतिक एकदम हताश होऊन बोलत होता... येईल ना रे ती शुध्दीवर...? असं म्हणून त्याने राजीवचा हात हातात घेतला..

राजीव प्रतिक बरोबर बोलत असताना प्रतिकला न्याहाळत ही होता... आतापर्यंत प्रतिकच्या बोलण्यातून वागण्यातून त्याच्या ही गोष्ट लक्षात आली होती की प्रतिकचं प्रेरणावर प्रेम आहे आणि हे प्रतीकला स्वतःला ही अजून नीट समजलेलं नाही आहे...की त्याला प्रेरणाबद्दल जे वाटत आहे ती मैत्री नसून प्रेम आहे हे....राजीवने प्रतिकच्या हातावर हात ठेवून सांगितलं, Don't worry होईल ती ठीक.

तसा प्रतिक राजीवला म्हणाला, राजीव मी तुझ्याजवळ काही मदत मागितली तर तू करशील का मदत...? त्यावर राजीव म्हणाला, अरे हे काय विचारणं झालं, तू फक्त सांग, काय मदत हवी आहे ते....!! तसा प्रतिक म्हणाला, माझ्यासाठी तू प्रेरणाची केस लढशील का...? कारण मला वाटतं तुझ्याशिवाय तिला न्याय कोणीही मिळवून नाही देऊ शकणार...! तुझी जी काही फी होईल ती मी देईन तुला, पण ही केस तूच लढावी असं वाटतं मला....तसा राजीव म्हणाला, अरे मित्र आहोत आपण आणि मी मित्राकडून पैसे घेऊ.... शक्य नाही हे....? आणि राहिला केसचा प्रश्न तर ही केस मी लढेन ही आणि जिंकेन ही.... फक्त आपल्याला प्रेरणाची ही साक्ष लागेल.... कारण समोरच्या वकिलाला प्रेरणाची साक्ष नसेल तर ही केस फिरवता ही येऊ शकते... म्हणजे तशी शक्यता आहे फक्त..  मी उद्याच जाईन, आणि त्या पोलिसांना भेटेन, आणि काही अजून उपयोगी माहिती मिळेल का पाहीन.... उद्या तू प्रेरणाला हॉस्पिटलमध्ये बघायला जाणार आहे ना...तर मी सुदधा तुझ्या बरोबर येईन... तसं प्रतिक म्हणाला, हो चालेल ठीक आहे....ही केस आपण कोर्टात न घेता जजच्या केबिनमध्ये चालवू शकतो का.... कारण मला यातून जो प्रेरणा आणि तिच्या फॅमिलीला जो त्रास होणार आहे तो होऊ द्यायचा नाही आहे....तसा राजीव म्हणाला, हो त्यासाठी आपण Special request घेऊ शकतो.... ते करतो मी सगळं हँडल....Don't worry....आणि उद्या हॉस्पिटलमध्ये असा पडलेला चेहरा घेऊन जाऊ नकोस....चल आता झोपायला... असं म्हणून राजीव प्रतिकला रुममध्ये घेऊन गेला.

दोघे एकमेकांचे मित्र कमी भाऊ म्हणूनच जास्त होते... राजीव जेव्हा कधी प्रतिकच्या घरी येत असे तो प्रतिकच्याच रुममध्ये झोपत असे....राजीव बेडवर पडल्या पडल्या झोपला... पण प्रतिकला झोप काही लागत नव्हती. तो प्रेरणाचे त्याच्या मोबाईलमधले ऑफिस फ़ंकशन मध्ये काढलेले फोटोज बघत बसला होता, तेवढ्यात मोबाईलच्या लाईटने राजीवला जाग आली... त्याने पाहिलं की, प्रतिक प्रेरणाचे फोटोस पाहतो आहे...तसा राजीव मनात म्हणाला, हं म्हणजे मला जे प्रतिकला पाहून जाणवलं ते खरं आहे तर.... He loves Prerna...आणि त्याला अजून ते समजत नाही आहे.... I Hope so everything will get changed...आणि राजीव पुन्हा झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी प्रतिक नेहमीपेक्षा लवकरच उठला...खरंतर उठण्यासाठी झोप ही लागायला पाहिजे...तो अंघोळ करुन आला आणि त्याने राजीवला आवाज दिला....तसा राजीव कंटाळत उठला.... आणि आळस देत म्हणाला, अरे तुझी अंघोळ पण झाली, मला वाटलं तू उशीरा उठशील...ओके थांब थोडा वेळ मी पटकन आवरतो... तसा प्रतिक म्हणाला, मी निघतोय ऑफिसमध्ये, तू मला तिथेच भेट मग आपण तिथून पुढे हॉस्पिटलमध्ये जाऊ...चल मी तयारी करुन निघतो आता...तसं राजीवने मानेने हो म्हटलं... प्रतिकने तयारी केली आणि आईला हाक दिली, आई मी ऑफिसमध्ये जातोय... तशी आई म्हणाली, अरे नाश्ता तर करुन जा...तसा प्रतिक म्हणाला, नाही आई, मी ऑफिसमध्येच करेन... तसा राजीव त्या दोघांचं बोलणं ऐकून लिविंग रुममध्ये आला. तशी आई म्हणाली, अरे तुझ्यासाठी एवढा लवकर उठून मी नाश्ता बनवला पण तुला तर खायचं पण नाही... तसे न्यूजपेपर वाचत असलेले बाबा म्हणाले, अरे ती एवढा फोर्स करतेय तर चार घास खाऊन जा...पण प्रतिक म्हणाला, ठीक आहे एक काम कर तू मला डब्बा दे मी ऑफिसमध्ये खातो... जशी आई किचनमध्ये गेली तसा प्रतिक लगेच म्हणाला, हे बघ मी निघतोय...थोडं काम आहे ते करतो लवकर जाऊन... तू ये नंतर...ऑफिसमध्ये...आणि प्रतिक लगेच ऑफिसमध्ये जायला घरातून निघाला...इथे आई डब्बा घेऊन बाहेर आली, बघते तर प्रतिक कुठे दिसेना... तिने राजीवला विचारलं प्रतिक कुठे आहे...? तसा राजीव म्हणाला, तो गेला ऑफिसमध्ये... तशी आई रागातच म्हणाली, मग आता या डब्याचं काय करु मी... तसा राजीव म्हणाला, काकू मी जाणार आहे त्याच्या ऑफिसमध्ये तर मला घेऊन ये म्हणाला. तशी आई शांत झाली... तू पण ऑफिसमध्येच जाऊन करणार की कसं काय...? तसा राजीव प्रतिकच्या बाबांच्या बाजूला जाऊन बसून  म्हणाला, छे छे, मी इथेच काकांना कंपनी देऊन खाणार आहे...तशी आई हसून डब्बा घेऊन आत गेली...

तसे प्रतिकचे बाबा हळूच राजीवला म्हणाले, तुमच्या दोन्ही मित्रांमध्ये काय एवढं सिक्रेट चालू आहे....तसा राजीव हसून म्हणाला, सिक्रेट आहे पण आणि नाही पण... तसे प्रतिकचे बाबा म्हणाले, म्हणजे...? तसा राजीव म्हणाला, काका बोलू आपण यावर... मी अंघोळ करुन येतो, मग आपण नाश्ता करुया... असं म्हणून राजीव बाथरुममध्ये गेला. थोड्या वेळाने राजीव अंघोळ करुन डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी आला... तर तिथे आजोबांच्या बाजूला प्रतिकच्या आजी सुद्धा होत्या. तसे बाबा म्हणाले, अरे बस ना रे, तसे प्रतिकचे बाबा राजीवला म्हणाले, हां काय सांगणार होता तू  मघाशी....? तसं राजीव मनात म्हणाला, छे आताच विचारायचं होतं का हे काकांना, एकतर प्रतिकच्या आजी म्हणजे जिवंत तोफगाडा, कधी त्या भडकतील काही सांगता येत नाही... आणि मी यांच्यासमोर प्रेरणाचा विषय काढला ना तर माहीत नाही या कशा रिऍक्ट होतील... राजीव काही बोलत नाही हे पाहून आजी म्हणाल्या, अरे काही तरी विचारलं तुला याने.... कुठे हरवलास...? आजीचा तो धारदार आवाज ऐकून राजीव मनात म्हणाला, आता आपलं काही खरं नाही...तसं राजीव काहीसं आठवून म्हणाला, हां काका, ते मी तुमच्याकडे अजून काही दिवस राहणार आहे हेच सांगायचं होतं मला मघाशी... हे खरंतर प्रतीकच सांगणार होता पण त्याला लवकर जावं लागलं ऑफिसमध्ये.... त्यामुळे राहून गेलं....तशा आजी म्हणाल्या, अरे महिनाभर रहा, आणि नुकताच नाश्ता घेऊन येणाऱ्या प्रतिकच्या आईकडे पाहत त्या म्हणाल्या, तुला कोणी कशासाठी नाही म्हणालं तर सरळ माझ्याकडे यायचं... आणि काय ग नंदा, माझ्या प्रतिकला नाश्ता दिलास की नाही...तसं आईच्या घशातून आवाज निघेना.... आता आजी होत्याच तशा की भल्या भल्यांची बोलती बंद करतील....तसं प्रतिकच्या बाबांनी राजीवकडे इशारा केला तसा राजीव म्हणाला, ते प्रतिकने मला आणायला सांगितलं आहे ऑफिसमध्ये नाश्ता त्याची मिटिंग आहे ना त्यामुळे तिथेच घेऊन ये म्हणून...तसं आजी म्हणाल्या, असं आहे तर...मग नंदाला नाही का काही सांगितलं त्याने....तसा राजीव पुन्हा म्हणाला, ते काकू किचनमध्ये होत्या ना त्यामुळे त्यांना नाही माहीत... काकू द्या नाश्ता मी खातो आणि निघतो असं म्हणून राजीवने काकूंच्या हातातून पोहे घेऊन काकांना आणि स्वतःला घेतले... तशी प्रतिकच्या आई पुन्हा किचनमध्ये गेल्या...आजी तुम्ही नाही का करणार नाश्ता....राजीवने खाता खाता विचारलं. तशा आजी म्हणाल्या, अरे माझा सकाळचं पारायण झालं की मी घेते चहा.... तू आलाच आहे म्हंटलं आधी थोडा वेळ बोलते तुझ्या बरोबर आणि मग करु म्हंटलं पूजा...चल आता तू नाश्ता कर आणि सांभाळून जा हां, मी आता पारायण करायला जाते... देवघराच्या दिशेने जाता जाता आजीने पुन्हा प्रतिकच्या आईला नाश्त्याच्या डब्ब्याची आठवण करुन दिली...

क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...