Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५६

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५६
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५६


मंजू गेल्यावर आजी राजीवच्या समोरच्या खुर्चीवर येउन बसली.

आजी: राजीव, मला तुला काही विचारायचं आहे...

राजीव: हां आजी, विचारा ना...

आजी: प्रेरणाची केस तूच लढली होती ना...?

राजीव: हो आजी...

आजी: बरं... मग मला तिच्या केस संदर्भात माहिती सांग... अर्थात तुला वेळ असेल तर...

राजीव: (घड्याळात पाहून) चालेल आजी...आहे माझ्याकडे वेळ... म्हणत त्याने प्रेरणाच्या केसबद्दल, तिच्या ट्रीटमेंट बद्दल सगळी माहिती आजीला दिली. आजी तिला पडणारे प्रश्नही त्याला अधून मधून विचारत होती. त्यांचं बोलणं चालू असतानाच प्रतिकचे बाबा मिलिंद त्याच्या केबिनमध्ये आले.

आजी: (लगेच विषय बदलत राजीवला म्हणाली) तर मग राजीव, घरी कधी येतोय...?

राजीव: अं, हं येईन येईन सोना दिदी येणार आहे ना राहायला तेव्हा येईन...(मिलिंदना उद्देशून बोलत) बसा ना काका...

मिलिंद: अरे, राहू दे रे परत कधीतरी येईन... चल आई निघायचं ना...?

आजी: (मिलिंदच्या हातात हात देऊन) चल राजीव येतो आम्ही..

राजीव: हो आजी... म्हणत तो ऑफिसच्या बाहेरपर्यंत त्या दोघांना सोडायला गेला.

***

 

प्रतिक केबिनमध्ये काम करत बसला होता पण त्याचं अधून मधून प्रेरणा काय करतेय याकडेच होतं. थोड्या वेळाने काही दिवसांपूर्वी आलेला मुलगा पुन्हा प्रेरणाच्या डेस्ककडे आला. त्याने पाहिलं, प्रेरणा त्याच्याशी एकदम जुनी ओळख असल्यासारखी बोलत होती. त्या दोघांना असं बोलताना पाहून प्रतिकने रागाने त्याचा हात डेस्कवर आपटला. कोण आहे कोण हा मुलगा...? ज्याच्याशी प्रेरणा इतकी आपुलकीने बोलते... आणि ज्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे त्याला मात्र हल्ली इग्नोरच करत असते... तो स्वतःशी पुटपुटला. त्याच्या मनात हा विचार चालू असताना तो मुलगा प्रेरणाला बाय बोलून तिथून निघायला लागला. तशी प्रेरणाही त्याला ऑफिसच्या बाहेरपर्यंत सोडायला त्याच्या मागोमाग गेली. प्रतिकने त्या दोघांना निघताना पाहिलं तसा तो ही त्यांच्या मागोमाग कॉलवर बोलत असल्यासारखं इतरांना दाखवत ऑफिस मधून निघाला. त्याला आज काहीही करुन तो मुलगा कोण आहे हे शोधून काढायचं होतं म्हणून तो हळूच एका कोपऱ्यात थांबून त्या दोघांना पाहत होता. त्या मुलामध्ये आणि प्रेरणामध्ये काही बोलणं झालं आणि तो तिला hug करुन लिफ्टमध्ये गेला. लिफ्टचा दरवाजा बंद होऊन जशी जाताना दिसली तसा प्रतिक प्रेरणाच्या मागून आला आणि तिचा हात पकडून तिला ऑफिस टेरेसच्या दिशेने नेऊ लागला.

प्रतिकने तिचा हात इतका घट्ट पकडला होता की प्रयत्न करुन ही तिला तो सोडवता येईना.

प्रेरणा: (हात सोडवायचा प्रयत्न करत) सर, काय करताय तुम्ही, प्लिज सोडा मला.

प्रतिकने तिला एका हाताने इशारा करत गप्प रहा म्हणत टेरेसवर आणलं. तिला भिंतीला टेकवत आणि दोन्ही हात भिंतीवर ठेवून तिला बंदिस्त करुन तो तिच्याकडे पाहू लागला.

प्रेरणा: सर प्लीज मला जाऊ द्या... कोणी बघितलं तर काय म्हणेल...

प्रतिक: माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाल्याशिवाय मी नाही जाऊ देणार आहे तुला...?

प्रेरणा: (खाली मान घालून) कोणत्या प्रश्नांची उत्तरं...?

प्रतिक: (तिची हनुवटी हातात धरुन) का वागतेय तू माझ्याशी अशी... का इग्नोर करतेय तू मला... आणि कोण कुठला कस्टमर तो... तो तुझ्याशी इतका close होऊन का बोलत होता... तू ओळ्खतेस का त्याला....? प्रेरणा, मी तुझ्यावर doubt नाही घेत आहे... I trust you... but मला राहून राहून वाटतंय तू माझ्याशी अशी कोणत्यातरी कारणाने वागतेयस...!

तिचे डोळे तो वाचायचा प्रयत्न करत होता. प्रेरणाने कसंबसं स्वतःला त्याच्यापासून दूर केलं आणि ती जाऊ लागली तरी त्याने तिचा हात धरुन तिला मागे ओढलं. तिचा हात त्याच्या हातात घट्ट पकडून ठेवला... त्याने पाहिलं तिच्या हातात त्याने घातलेली रिंग नव्हती.

प्रतिक: (त्याने तिचा चेहरा स्वतःच्या हातांच्या ओंजळीत धरला) का करतेय तू अशी... you are hurting me... and yourself... आणि रिंग कुठे आहे तुझ्या बोटांतली...?

प्रेरणा: सर, तुम्ही ऑफिसमध्ये आहात... असं वागणं शोभत नाही...

प्रतिक: नाही मी ऑफिस मध्ये नाही टेरेसवर आहे...(प्रतिक गालातल्या गालात हसत म्हणाला)

प्रेरणा: (त्याला जोरात धक्का दिला) का करताय तुम्ही असे... लांब रहा माझ्यापासून...

प्रतिक: लांब राहू तुझ्यापासून... असं म्हणत पुन्हा तिच्या जवळ येऊ लागला.

प्रेरणा: (तो तिला हात लावणार तितक्यात) Don't touch me... Mr. Pratik... otherwise I'll make a mentally harassment complaint against you in HR department.

प्रतिक: (हे ऐकून त्याचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने तिचे गाल एका हाताने पकडले) काय बोललीस, परत बोल... मी mentally harasment करतोय... कशी बोलू शकतेस तू अशी...

तिला त्याला असं काही बोलायचं नव्हतं पण आजीला दिलेला शब्द ती मोडू शकत नव्हती आणि प्रतिक तिला बोलल्याशिवाय जाऊही देणार नव्हता. माफ करा प्रतिक मला मी असं बोलायला नको होतं तुम्हाला... ती स्वतःच्याच मनाशी म्हणाली. नकळत तिच्या डोळ्यांतून पाणी आलं...

तिच्या डोळ्यांत आलेल्या पाण्याने प्रतिक अस्वस्थ झाला.. मला hurt करुन ती स्वतःच जास्त hurt झाली आहे... प्रेरणा नक्कीच माझ्यापासून काही तरी लपवतेय तो मनाशी विचार करु लागला. त्याने तिचे पकडलेले गाल सोडले आणि तो तिच्या गालावर सॉरी बोलून किस करणार इतक्यात प्रेरणाने त्याच्या गालावर चपराक दिली... दूर रहा माझ्यापासून... शेवटचं सांगतेय मी तुम्हांला... बोलता बोलता ती रडत रडतच ऑफिसच्या floor वर गेली. तिच्या अशा अनपेक्षित कृतीने प्रतिकला धक्का बसला आणि तो धपकन खाली बसला... माझ्यापासून दूर रहा..... तिचं जातानाच वाक्य प्रतिकच्या कानातून घुमू लागलं.

***

घरी आल्यावर प्रेरणा कोणाशीही न बोलता सरळ तिच्या रुममध्ये निघून गेली. प्रतिकने पकडलेला तिचा हात... त्या हाताला ती कितीतरी वेळ पाहत होती. भरभर तिच्या डोळ्यासमोरून टेरेसवर घडलेल्या गोष्टी येऊन गेल्या.... याच हाताने मी प्रतिकना मारलं...त्या हाताला शिक्षा ही व्हायलाच हवी.... म्हणत तिने तिचा दुसरा हात मेणबत्तीच्या ज्योतीवर धरला.

आई रुममध्ये तिच्यासाठी खायला काहीतरी घेऊनच येत होती. प्रेरणाला असं करताना पाहून आईने प्लेट तिथेच साईडला ठेवली आणि तिचा हात मेणबत्तीपासून दूर केला.

आई: काय वेडेपणा करतेय प्रेरणा तू...

प्रेरणा: आई, या हाताची चूकच आहे तशी...मग त्याला शिक्षा व्हायला हवी...

आई: (तिचा चटका लागलेला हात हातात घेतला) काय हे करुन घेतलं आणि कशासाठी..? मी आता जरा देखील उशीर केला असता तर किती हे अवघड होऊन बसलं असतं.

आई काय बोलतेय याकडे प्रेरणाचं लक्षच नव्हतं. तिला हाताला काही झालं आहे याचं ही भान नव्हतं. आईने लगेच first aid चा बॉक्स आणून तिला क्रीम लावली.

आई: काय केलंस तू हे असं...

प्रेरणा: हीच माझी शिक्षा आहे... मी खूप चुकीचं वागले प्रतिकबरोबर... याच हाताने मी त्यांना मारलं...

आई: प्रेरणा... का असं वागतेय तू...

प्रेरणा पुन्हा काहीच बोलेना. तिच्या डोळ्यांतून सतत पाणी येत होतं. आईच्या ही डोळ्यांत पाणी आलं तिने तिला जवळ घेऊन मिठी मारली. आईने तिला मिठीतून दूर करत नाश्त्याची प्लेट पुढे केली.

प्रेरणा: आई, नको आहे मला...

आई: तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी तरी खा थोडं तरी... म्हणत आईने तिला खायला भाग पाडलं.

प्रेरणा: (थोडंसं खाऊन झाल्यावर) आई बस झालं मला आता...

आई: बरं पाणी पी आणि थोडा वेळ झोपून रहा मी जेवण झालं की उठवते तुला... आणि जास्त काही विचार करु नकोस... होईल सगळं ठीक... आई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली.

प्रेरणा: हं...

तिला झोपायला सांगून आई पुन्हा किचनमध्ये काम करायला गेली.

प्रेरणाच्या मनात तिच्या दोन्ही हातांकडे पाहत विचार येऊ लागले...

हातांच्या रेषांमध्ये.. नाव तुझे शोधु किती..

जणू वाळूवरच्या खुणा.. लाटा गेल्या खोडूनी...

***

 

प्रतिक घरी आला पण त्याचं कोण काय बोलतंय याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. मोहनकाका त्याच्यासाठी पुन्हा काही स्थळं घेऊन आले होते. त्यांनी मुलीचे फोटो, तिची माहिती प्रतिकच्या बाबांच्या हातात दिली आणि ते प्रतिकसकट सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले. आजी प्रतिकचं निरीक्षण करत होती. त्याच्याकडे पाहून तिच्या लक्षात आलं की नक्कीच प्रतिक कोणत्या तरी गोष्टीमुळे अपसेट आहे. तिने त्याला जबरदस्तीने तिच्या बाजूला बसवलं.

आजी: प्रतिक, काय झालं... ऑफिस मधून आल्यापासून बघतेय तू एकदम शांत शांत आहेस... काही झालं का ऑफिसमध्ये...?

आणि हे तुझ्या चेहऱ्याला काय झालं...?

प्रतिक: (चेहरा लपवत) काही तर नाही...

बाबा: (चेहरा हातात घेत) बघू दे... मारामारी केलीस का....कुठे...?  गाल लाल झाला आहे बघ जरा आरशात...

त्यांचं बोलणं ऐकून आई ही किचनमधून आली.

आई: काय झालं...

प्रतिक: काही नाही ग... तुम्ही उगाच सगळे over react होत आहात... म्हणत तो फ्रेश व्हायला त्याच्या रुममध्ये निघून गेला.

आजीने तिच्या रुममध्ये जाऊन प्रेरणाच्या मोबाईलवर कॉल केला पण तिने उचलला नाही. त्यावरुन चाणाक्ष आजीच्या त्या दोघांमध्येच काहीतरी झाल्याचं लक्षात आलं.

***

 

प्रतिक आज ऑफिसमध्ये आला पण ना प्रेरणाने त्याच्याकडे पाहिलं ना त्याने तिच्याकडे पाहिलं. पण त्याला मीना आणि समिधाचं प्रेरणाशी होत असलेलं बोलणं ऐकू आलं.... अग तुझ्या डाव्या हाताला काय झालं... काल तर काही नव्हतं... जास्त लागलं आहे का...?

प्रेरणा: नाही ग... फार काही नाही...

समिधा: फार काही नाही म्हणून कोणी असं बँडेज करतं का...?

प्रतिक तिच्याकडे न पाहताच केबिन मध्ये निघून गेला. समिधाने मीनाला पाहून कुछ तो गडबड है वाली reaction दिली. प्रेरणाने त्या दोघींकडे पाहिलं तसं त्या दोघी लगेच computer screen कडे पाहून काम करु लागल्या.

प्रतिक प्रेरणाला इग्नोर करुन केबिनमध्ये आला खरा पण तिच्या हाताला नक्की काय झालं ही गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती. तो खुर्चीवर डोकं टेकवून असाच बसून होता. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा कालची गोष्ट आली.... आणि लगेच त्याने खाडकन डोळे उघडले....प्रेरणाने मला मारलं म्हणून स्वतःला तर शिक्षा करुन घेतली नसेल ना....? त्याच्या मनात चटकन हा विचार आला. त्याने केबिनमधून प्रेरणाच्या डेस्ककडे पाहिलं. ती तिचा हात सांभाळत काम करत होती. प्रतिकने ही मग कामात स्वतःला व्यस्त केलं. अधून मधून तो तिच्या डेस्ककडे पाहतच होता. लंच ब्रेकची वेळ झाली तसं त्याने पुन्हा तिच्या डेस्ककडे पाहिलं. आता पण तोच कालचा कस्टमर तिच्याशी बोलत होता. त्याचा हात तिच्या बँडेजवाल्या हातावर होता... काय बोलतोय हा तिच्याशी ते ही असं हात पकडून... त्याने रागातच जोरात भिंतीवर हात मारला. आज काहीही करून मी या मुलाची खबर घेणार आहे... मनाशी रागातच पुटपुटत तो केबिनमधून बाहेर पडला.

***

 

प्रेरणाशी बोलणं झाल्यावर तो कस्टमर प्रेरणाला बाय म्हणत ऑफिस मधून निघाला. आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे प्रेरणा त्याला सोडायला ऑफिसच्या बाहेर नाही आली. तिने खूप काम असल्याचं कारण पुढे करुन त्याला डेस्कवरूनच बाय केलं. प्रतिक ऑफिस बिल्डिंगच्या खालीच थांबून त्या कस्टमरची वाट पाहत होता. त्याला बाहेर पडताना पाहून प्रतिकने त्याचं शर्ट पकडून लगेच त्याला एका कोपऱ्यात नेलं. अचानक असं काही घडल्यामुळे तो मुलगा घाबरलेला होता. 

मुलगा: हॅलो मि... काय करताय तुम्ही..? त्याने कसंबसं प्रतिकला विचारलं. प्रतिकने रागाने त्याची कॉलर हातात पकडली.

प्रतिक: मी काय करतोय...? तू का सतत तिच्या आजूबाजूला असतोस.... लांब रहायचं तिच्यापासून... तुझा हेतू काय आहे तो तिला समजत नसेल पण मला समजतोय... त्याने कॉलरवरची पकड अजून घट्ट केली.

मुलगा: कोणाबद्दल बोलताय तुम्ही... मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय...

प्रतिक: माझा गैरसमज होतोय... तू प्रेरणाकडेच का येतो मग सतत... इतरही आहेत ना तुझं काम करुन द्यायला...

हे ऐकून तो मुलगा ही चवताळून उठला. त्याने प्रतिकचा हात कॉलरवरचा सोडवला.

मुलगा: कोण तुम्ही, आणि मला विचारणारे तुम्ही कोण...

प्रतिक: काय बोललास मी कोण.... तिचा बॉस आहे मी... ती मला रिपोर्ट करते...

मुलगा: ती तुम्हाला रिपोर्ट करते याचा अर्थ हा होत नाही की तिने कोणत्या कस्टमरशी कसं बोलावं हे तुम्ही ठरवावं. 

त्याचं बोलणं प्रतिकच्या डोक्यात गेलं. त्याने पंच देण्यासाठी त्याचा हात उचललाच होता तोच कोणीतरी येऊन त्याचा हात पकडला. 

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...