Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व - एक संघर्ष भाग-५

Read Later
अस्तित्व - एक संघर्ष भाग-५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-५


केबिनमधून बाहेर आल्यावर मि जाधव आणि मि काळे दोघांनी प्रतिकला हात मिळवून त्याचा निरोप घेतला आणि डॉक्टरांशी बोलून ते हॉस्पिटलमधून निघाले. तसा प्रतिक प्रेरणाच्या फॅमिलीकडे गेला.  तेवढ्यात तिथे डॉ आले. तेव्हा प्रतिकने डॉक्टरांना प्रेरणाला बघता येईल का असं विचारलं.. तसे डॉ म्हणाले, आत तुम्हाला जाता येणार नाही... त्या काचेतूनच तुम्हाला बघता येईल...असं म्हणून ते प्रेरणाच्या फॅमिलीला म्हणाले, पेशंटच्या फॅमिली मध्ये फक्त एकच व्यक्ती इथे राहू शकते त्यामुळे कोणी राहणार आहे हे तुम्ही सिस्टरला सांगा... प्रेरणाच्या वडीलांच्या खांद्यावर हात ठेवून डॉ पुन्हा म्हणाले, मला समजत आहे तुम्हाला किती त्रास होतो आहे मुलीला असं बघून... मी ही एका मुलीचा बाप आहे पण असं राहून चालणार नाही आहे तुम्हाला... या परिस्थिती मध्ये तुम्ही स्ट्रॉंग राहिलात तर तिला स्ट्रॉंग बनवता येईल नाहीतर सगळंच अशक्य होऊन बसेल... तशी प्रेरणाची आई रडत रडत म्हणाली नाही नाही डॉक्टर असं नको व्हायला... आम्हाला आमची मुलगी पूर्वी सारखीच हवी आहे... तसे डॉ म्हणाले, मग मिस प्रेरणा शुद्धीवर आल्यावर कोणीही त्यांच्या समोर असं वागणार नाही आहे आणि नाही रडणार आहे...आम्ही तिला नक्की ठीक करु अगदी पूर्वी सारखीच.. ओके मि प्रधान असे म्हणून त्यांनी प्रेरणाच्या वडिलांना थोपटलं आणि ते निघून गेले. तसा प्रतिक प्रेरणाच्या बाबांना आणि आईला म्हणाला, तुम्ही घरी जाऊन आराम करा मी हवं तर थांबतो प्रेरणाबरोबर...तसे बाबा म्हणाले, नको नको तुम्ही आलात हेच पुरेसं आहे आम्हाला.. आणि ते प्रेरणाच्या आईला आणि भावाला उद्देशून म्हणाले, मी थांबतो इथे... तुम्ही दोघे घरी जावा आणि उद्या सकाळी या मग... तेवढ्यात नर्स  काही फॉर्म भरण्यासाठी घेऊन आली. प्रेरणाच्या बाबांनी फॉर्म भरायला घेतला तसा प्रतिक प्रेरणा ज्या रुममध्ये होती त्या दिशेने गेला...

बाहेरच्या दरवाज्याच्या काचेतूनच त्याने प्रेरणाला पाहिलं...प्रेरणाला असं कधी पहावं लागेल असं मनात सुद्धा वाटलं नव्हतं..तिला असं ऑक्सिजनवर पाहून त्याच्या नकळत डोळ्यातून पाणी आलं... तेवढ्यात एक नर्स  प्रेरणाच्या रुमच्या दिशेने आली आणि प्रतिकला बाहेर थांबायला सांगितलं. तसा तो पुन्हा प्रेरणाच्या फॅमिलीकडे आला. प्रेरणाची आई आणि भाऊ नुकतेच निघायच्या तयारीत होते.. तसा प्रतिक त्यांना म्हणाला, तुम्ही घरी जायला निघाला आहात...? तसं प्रेरणाचा भाऊ म्हणाला, हो 8 नंतर कोणाला इथे थांबता येत नाही.. तसा प्रतिक म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला घरी...! तसं प्रेरणाची आई म्हणाली, नको सर आम्ही जातो....तसा प्रतिक म्हणाला, काकू सर नका म्हणू मला...प्रतीकच म्हणा, चालेल मला. चला मी सोडतो तुम्हाला, तुम्ही नाही म्हणालात तरी मी ऐकणार नाही आहे. असं म्हणून प्रतिकने त्यांनी आणलेली पिशवी घेतली आणि त्यांना म्हणाला, तुम्ही माझं नाव ज्या कारच्या मागे लिहिलं आहे तिथे जाऊन थांबा मी लगेच येतो तसं प्रेरणाची आई आणि भाऊ हॉस्पिटलमधून कारच्या दिशेने जायला निघाले. तसा प्रतिक प्रेरणाच्या बाबांकडे जाऊन म्हणाला, काका काहीही मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे कॉल करा, हा माझा नंबर आहे असं म्हणून त्याने स्वतःच व्हिजिटिंग कार्ड त्यांना दिलं. आणि काका काळजी घ्या.... प्रेरणा नक्की येईल शुद्धीवर... मी येतो उद्या सकाळी... तसं प्रेरणाच्या वडिलांनी त्याचा हात हातात घेऊन त्याचे ओल्या डोळ्यांनी आभार मानले. प्रतिकने त्यांना पुन्हा डोळ्यांनीच आश्वासन दिलं आणि तो कारच्या दिशेने निघाला.

प्रेरणाची आई आणि भाऊ विवेक प्रतिकची वाट पाहत कारकडेच थांबले होते. तसं प्रतिकने लगेच चावीने कारचा दरवाजा उघडून त्यांना बसायला सांगितलं. ते दोघेही बसत असताना प्रतिकने त्यांना घरचा पत्ता विचारला. तसा विवेकने त्याला पत्ता सांगितला. तसा प्रतिक म्हणाला, तुला चालणार असेल तर तू माझ्या बरोबर पुढे बसशील का...? म्हणजे कुठे turn करायची असेल कार तर मग मी करेन. तसं विवेक मानेने हो म्हणाला आणि तो प्रतिक बरोबर पुढे येऊन बसला. तशी प्रतिकने कार सुरु केली...

अधून मधून विवेक त्याला रस्ता सांगू लागला. थोड्याच वेळात प्रतिकची कार त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आली तसं विवेकने कार थांबवायला सांगितली... आलो आपण असं विवेक प्रतिकला म्हणाला. त्याने मागे वळून पाहिलं तर दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबून थकल्यामुळे आईचा डोळा लागला होता. त्याने आईला हात लावून उठवले.... तोपर्यंत प्रतिक हातात बॅग घेऊन कार मधून चावी घेऊन उतरला. तशी आई सुध्दा उठून कार मधून उतरली.. सॉरी हां, मला कळलं नाही की कधी माझा डोळा लागला ते....! तसा प्रतिक म्हणाला, काकू सॉरी कशाला म्हणत आहात.... its ok.. मी निघू आता....? असं म्हणून त्याने हातात असलेली बॅग विवेककडे दिली. तशी प्रेरणाची आई म्हणाली, आमच्या बरोबर तुम्ही घरी नाही का येत आहात...? थोडं काहीतरी खाऊन निघा. आमच्यामुळे तुमची आज धावपळ झाली. तसा प्रतिक म्हणाला, काकू धावपळ कसली, फ्रेंडसाठी धावपळ काही नसते....मी माझ्या टीम मेंबरसना नेहमीच फ्रेंड्स मानत आलो आहे आणि प्रेरणा माझ्या टीमचाच एक मेंबर आहे....आणि मी येईन पुन्हा कधीतरी... पण आज शक्य नाही होणार... आणि काही काळजी करु नका सगळं ठीक होईल....असं म्हणून त्याने विवेकच्या खांद्यावर हात ठेऊन सांगितलं,  आईबाबांची काळजी घे आणि स्वतः ची सुद्धा.... तसं विवेकने मानेने हो म्हटले. चला निघतो मी....असं दोघांना म्हणून तो कारमध्ये बसला आणि त्यांना हात दाखवून कार सुरु करुन घरच्या दिशेने निघाला.

हायवेला सिग्नल लागला असताना त्याने घरी कॉल करण्यासाठी म्हणून मोबाईल खिशातून काढला. 8 मिस कॉलचं नोटिफिकेशन दाखवलं.... नक्कीच मम्मी नाहीतर पप्पा असणार... असं म्हणून त्याने कॉल ओपन केले. Rajiv-5 missed call, Pappa-1 missed call आणि Mummy-2 missed call दाखवत होतं... तसं त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने सिग्नल बघितला आता सुटेलचं हा...असं मनात म्हणून त्याने ब्लूटूथ लावून राजीवला कॉल केला...

दोनदा रिंग झाल्यावर राजीवने कॉल रिसिव्ह केला, काय राजे, आहात कुठे....? आज कोणीतरी शब्द दिला होता भेटण्याचा....! आणि त्याप्रमाणे मी 1 तासापूर्वी तुमच्या घरी सुध्दा आलेलो आहे...! काय आहेस कुठे तू....? इथे काकू, काका आणि मी सगळे तुला कॉल करुन थकलो....तसा प्रतिक म्हणाला, sorry rajiv.... actually, मी विसरलो होतो, मी येतोच आहे ऑन द वे आहे...येतोच 10 मिनिटात... मग बोलूया आपण सविस्तर.... असं म्हणून प्रतिकने कॉल ठेवला... म्हटल्याप्रमाणे प्रतिकची कार त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आली. प्रतिकने कार पार्क केली आणि घरी आला...प्रतिकने दारावरची बेल वाजवली तसा राजीवनेच दार उघडलं.... या राजे या....प्रतिक कसाबसा हसला.... त्याचं खोटं हास्य राजीवच्या नजरेतून सुटलं नाही... तसा राजीव विषय बदलून म्हणाला, तू फ्रेश होऊन ये, मग आपण जेऊया... काका काकू थांबलेच होते जेवायचे... मी म्हणालो त्यांना तुम्ही जेवून घ्या... मी आणि प्रतिक एकत्र जेऊ... तसा प्रतिक राजीवला थँक्स म्हणून बॅग टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला गेला. तोपर्यंत प्रतिकची आई रुम मधून आली....आणि राजीवला हसून म्हणाली, आला का तुझा जिगरी दोस्त....? तसा राजीव सुद्धा हसून म्हणाला, हो हो आला तो फ्रेश व्हायला गेला आहे...तशी आई म्हणाली, मी जेवण गरम करुन टेबलवर ठेवते मग...तेवढ्यात राजीव फ्रेश होऊन आला आणि आईला म्हणाला, आई नको राहूदे मी करतो गरम....तू झोप जाऊन....बाबा झोपले का...? आणि मेडिसिन घेतल्या ना आजीने....? तशी आई राजीवकडे बोट करुन म्हणाली, हा आहे ना माझा दुसरा प्रतिक.... त्यानेच तुझी आज ड्युटी केली आजीला मेडिसिन द्यायची.... आणि आम्हाला पण जेवून घ्या म्हणून सांगितलं...तसा प्रतिक म्हणाला, ठीक आहे झोप तू पण जाऊन, मी आणि राजीव जेवून झोपतो आरामात...तशी आई म्हणाली, हं ठीक आहे पण जास्त वेळ गप्पा मारत बसू नका.... दोघांना उद्या ऑफिस आहे लक्षात असू द्या....तसा प्रतिक म्हणाला, हो हो आई झोप तू आता... तशी आई रुम मध्ये झोपायला निघून गेली.... तसं प्रतिक आणि राजीव दोघांनी जेवण गरम करून डायनिंग टेबलवर बसले. 

खरं तर प्रतिकची बिलकुल जेवायची इच्छा नव्हती पण राजीव त्याच्यासाठी थांबला असल्यामुळे त्याने त्याच्या बरोबर जेवायला घेतलं होतं. राजीव त्याला इकडचे तिकडचे प्रश्न विचारत होता पण प्रतिक त्यावर हो किंवा नाही यातच उत्तर देत होता.... दोघांचं जेवून झालं तसा इतका वेळ प्रतिकला न्याहाळत असलेल्या राजीवने प्रतिकला विचारलंच. प्रतिक एक विचारु का तुला…तसा प्रतिक म्हणाला, हां विचार ना...आणि तू कधीपासून इतकी फॉर्मालिटी करु लागलास...? तसा राजीव म्हणाला, पण आज मला ही फॉर्मालिटी करावी अशी वाटते आहे...कारण मला तुझ्याकडून खरं उत्तर अपेक्षित आहे, तसा तू खोटं बोलण्याचा प्रयत्न ही करु शकतो पण हे या वकिलाच्या डोळ्यांतून सुटणार नाही हे लक्षात असू दे... तर मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांची उत्तरे मला अगदी खरी हवी आहेत...जमेल तुला...? तसं प्रतिकने मानेनेच होकार दिला...

तसा राजीव जणूकाही कोर्टातच असावा त्या सुरात म्हणाला, तर मला सांग तुझं माझ्याशी आज तुझ्या घरी भेटण्या संदर्भात जे बोलणं झालं होतं तर त्या दिवसापासून अगदी कालच्या दिवसापर्यंत सगळं काही चांगलं होतं मग आजच्या दिवसात असं नक्की काय घडलं आहे जे तुला तू ठरवलेला प्लॅन ही लक्षात नाही राहिला आणि कॉल करण्याचं ही भान नाही राहीलं....and dont give me excuses like your meeting, target and all that....असल्या कारणाने डिस्टर्ब होणाऱ्यातला माणूस तू नाही... जितका मी तुला ओळखतो ना तितकं कोणी तुला ओळखत नसावं....so tell me what happened today....? प्रतीक बराच वेळ शांतच होता... त्याचा त्याच्याच मनाशी सांगावं की न सांगावं याचा खेळ चालला होता... आणि राजीव त्याच्या सांगण्याची वाट पाहत होता.. 

 

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...