Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष भाग-४९

Read Later
अस्तित्व एक संघर्ष भाग-४९
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४९


प्रतिक घरी पोहचला. कधी एकदा प्रेरणा चा होकार आईबाबांना सांगतोय असं त्याला झालं होतं. तो फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसला.

प्रतिक: (आईचा उतरलेला चेहरा पाहून) काय झालं आई..? तू एवढी अपसेट का दिसतेस..? आणि बाबा, आजी कुठे आहेत...?

आई: बाबा आजीच्या रुममध्ये आहेत. आजीला ताप आला होता म्हणून ते काही लागलंच तर तिच्या बाजूला बसून आहेत. 

प्रतिक: (खाडकन सोफ्यावरून उठला) आता कशी आहे तब्येत आजीची... आणि डॉ चेकअप करुन गेले का...? आणि तुम्ही दोघांनी मला एकदा ही कॉल करुन का नाही सांगितलं... मी लगेच निघालो असतो...

आई: अरे, तू तिकडे फ्रेंड्स सोबत होतास तर अचानक आला असतास निघून तर त्यांना ही वाईट वाटलं असतं... आणि बाबा आणि मी होतोच की आजीची काळजी घ्यायला...!!

प्रतिक: (आईच्या डोळ्यात पाहत) आई, तू काही लपवत नाही आहेस ना माझ्यापासून...?

आई काही प्रतिकला सांगणार तोच आजीने आईला आवाज दिला. तसं आई मागोमाग प्रतिकही आजीच्या रुममध्ये गेला.

आजी: (प्रतिकला पाहून) तू कधी आलास प्रतिक...?

प्रतिक: (आजीच्या बाजूला बसत) अग आताच आलो... आणि माझ्या स्ट्रॉंग आजीची तब्येत कशी अचानक बिघडली... 

आजी: (आईबाबांकडे पाहून) जेव्हा आपण घरात महत्त्वाचे नाहीत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा कितीही काय ते तुझं स्ट्रॉंग की काय ते... ते असलं तरी माणूस कोलमडतोच की... आणि माझं ही आता वय झालंच आहे की आज ना उद्या वरच्याच बोलावणं आलं की जायचंच आहे...तिचं बोलणं ऐकून आईबाबा दोघांना वाईट वाटतं. पण आजीसमोर आता काही बोलायची त्यांची हिंमत होईना.

प्रतिक: (आजीचा हात हातात घेऊन) अशी ग काय बोलतेस... तुला ही माहीत आहे तुझा शब्द या घरातल्यांना किती महत्त्वाचा आहे ते... आणि तुला अजून बरंच जगायचं आहे... तुला तुझ्या नातीच्या बाळाला बघायचं आहे... तुझ्या प्रतिक नावाच्या नातवाच लग्न बघायचं आहे... मग त्याची ही पुढची पिढी बघायची आहे... सो सध्या तरी हे असं जायच्या गोष्टी करु नकोस...

आजी: प्रतिक, मी तुझ्याकडून काही मागितलं तर तू मला देशील का..?

प्रतिक: (तिच्या गालांना हात लावत) अग आजी सांगून तर बघ... तू मागितलं आणि मी दिलं नाही असं नाही होणार...

आजी आणि प्रतिकच्या बोलण्याने आईबाबा दोघेही काहीसे घाबरले होते... प्रतिकला माहीत नसलं तरी त्यांना आजीच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते माहीत होतं.

आजी: मला माझ्या नातवाचं लग्न पाहायचं आहे... आणि तुला न विचारताच मी माझ्या ओळखीच्या लोकांना मुली पण बघायला सांगितल्या आहेत... तर तू फक्त लग्नाला तयार हो बस... बाकी या म्हातारीचं काही मागणं नाही.

प्रतिक: आजी, मी लग्नासाठी तयार आहे पण मला आधीच एक मुलगी पसंत आहे आणि तिला ही मी पसंत आहे... आज मी तुम्हां सगळ्यांना हे सांगणारच होतो... (सांगताना प्रतिक खूप खुश झाला होता)

आजी: तिचं नाव नाही का सांगणार...?

आजीच्या आवाजातील गंभीरपणा खूश असलेल्या प्रतिकला जाणवला नसला तरी आईबाबांच्या लक्षात आला होता. बाबा पुढे विषय ताणला जाऊ नये म्हणून म्हणाले, अरे आईची तब्येत ठीक नाही आहे... उद्या बोलू आपण त्यावर..

आजी: (मिलिंद असं का बोलतोय हे लक्षात येऊन) काही नाही... माझ्या नातवाला पाहून मी ठीक झाले.  प्रतिक सांग रे तू मला तिचं नाव...!!

प्रतिक: (excited होऊन) अग आजी, फक्त नाव काय... मी तुला तिचा फोटो सुद्धा दाखवतो थांब...

आजी: बरं, जशी तुझी इच्छा...!!

प्रतिकने पटकन मोबाईल मधून प्रेरणाचा फोटो काढून आजीच्या समोर मोबाईल धरला... आजी, ही आहे प्रेरणा... आणि आम्ही दोघेही एकमेकांना पसंत करतो.. सांग कशी वाटली तुला...?

आजी: माझं मत तुला महत्त्वाचं वाटतं का...?

प्रतिक: हो आजी अर्थात...

आजी: मग ऐक तर... मला काय वाटतं ते... मला ही मुलगी माझी नातसून म्हणून पसंत नाही...

प्रतिक: (खाडकन बेडवरून उठत) पण आजी का...? तू एकदा प्रेरणाला भेटून तर बोलना... तुला नक्कीच आवडेल बघ ती... तिला नाही म्हणावं अशी ती बिलकुल नाही आहे.

आजी: प्रतिक, तुला माझं मत ऐकायचं होतं ना... ते मी सांगितलं... 

प्रतिक: (काहीसा रागाने पण तरीही संयम ठेवून) पण आजी का तुला ती पसंत नाही... काय कमी आहे तिच्यात... तू तिला न भेटताच कसं असं मत व्यक्त करु शकतेस.

आजी: काही गोष्टी मला सांगता येण्यासारख्या नाहीत...

प्रतिक: (पुन्हा रागाने) आजी, तुला सांगावच लागेल... मला तुझ्या नकारामागचं कारण जाणून घ्यायचं आहे.

नंदा: प्रतिक, विसरू नकोस, तू तुझ्या आजीशी बोलतोय... आवाजाची पातळी खाली ठेवून बोल...

आजी: बोलू दे त्याला... हे होणारच होतं...आज नाहीतर उद्या... माझ्या मुलाला, सुनेला माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवाव्या अशा वाटल्या... त्यात नेहमी प्रेमाने, आदराने बोलणारा माझा नातू, आज एका मुलीपायी असा बोलला... अजून गणेशा, काय काय पाहायला लावतोय काय माहिती...?

प्रतिक: आजी, माझं चुकलं... खरंच चुकलं...मी असं वरच्या आवाजाने तुझ्याशी बोलायला नको होतं. पण तू प्रेरणाला न भेटताच नकार नको देऊस... तू भेट तरी तिला... मग बघ तुझा नकार कसा होकार होतो ते... आणि आईबाबांनी काय लपवलं तुझ्यापासून...? 

आजी: तुला ऐकायचंच आहे का...? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं..?

प्रतिक: हो आजी...!!

त्यावर आजीने प्रेरणासाठी तिचा नकार का आहे ते सांगितलं आणि आईबाबांनी कसं सगळं लपवून ठेवलं हे ही सांगितलं.

प्रतिक: आजी, पण यात प्रेरणाचा काय दोष होता...? तिच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे तिला जगण्याचा अधिकार नाही आहे का..? आईबाबांनी माझ्यामुळेच तुला नाही सांगितलं... त्यांना हीच भीती होती... तू नाही म्हणालीस तर...

आजी: हो माझा नकारच आहे तिच्यासाठी...

प्रतिक: मग माझं पण ऐकून घे... मी लग्न करेन तर फक्त प्रेरणाशीच... नाहीतर मला लग्नच करायचं नाही असं म्हणत तो रागाने त्याच्या रुममध्ये निघून गेला.

मिलिंद: आई, त्याचं खूप प्रेम आहे ग प्रेरणावर... आणि तिचं ही... नको ना असा हट्ट करुस...

आजी: (प्रचंड रागाने) मला एकटीला सोडा...मला एकटं राहायचं आहे.. जा तुम्ही दोघेही इथून...

आजीचं बोलणं ऐकून दोघेही बाहेर जायला निघाले.

आजी: नंदा, मी आता जेवणार नाही आहे... अगदी जोपर्यंत प्रतिक प्रेरणाचा विचार सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार होत नाही तोपर्यंत.

दोघेही: (मागे वळून) आई... असं नको काही करु...

आजी: माझं एकदा ठरलं म्हणजे ठरलं.. आणि या विषयावर मला अजून वाद घालायचा नाही आहे...

यावर काय पुढे बोलावं हे दोघांनाही सुचेना. ते रूममधून बाहेर जायला निघाले.

***

 

प्रतिकने रागातच त्याच्या रुममध्ये येऊन बेडवर स्वतःला झोकून दिलं.

प्रतिक: ( स्वतःशीच) का आजी अशी वागतेय... प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं त्यात तिची काय चूक होती आणि असं झालं म्हणून तिने कोणावर प्रेम, लग्न ही करु नये का...? मी तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचारच नाही करु शकत.. मला तिची साथ आयुष्यभरासाठी हवी आहे... काहीही झालं तरी मला आजीचा प्रेरणासाठी होकार हा हवाच आहे.

तेवढ्यात त्याच्या रूमचा दरवाजा बाबांनी वाजवला.

प्रतिक: (दरवाजा उघडून) बाबा तुम्ही...

बाबा: हो प्रतिक, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे...

प्रतिक: बाबा, तुम्हाला सुद्धा आजीचं बोलणं पटतं आहे का..?

बाबा: नाही... तुझ्या आईला आणि मला आम्हा दोघांना ही प्रेरणा आधीही पसंत होती आणि आता ही आहे आमचा निर्णय आम्ही आजीच्या निर्णयामुळे बदलणार नाही पण मला वाटतं आपण आजीला थोडा वेळ द्यायला हवा... 

प्रतिक: हं बाबा...

बाबा: (पाठीवर थोपटत) चल नको काही जास्त विचार करुस... थोडा शांत झोप आता... थकला असशील ना... म्हणत बाबा रूममधून निघाले.

***

 

आई किचनमध्ये काम करत असताना तिचं अर्ध लक्ष आजीच्या बोलण्याकडेच होतं.

मावशी: ताई, काय झालं... तुमची तब्येत ठीक नाही का...?

आई: नाही हो मावशी... ते आजींना अचानक ताप आला त्यामुळेच माझं मन थाऱ्यावर नाही आहे. त्यात त्या जेवायला ही तयार नाहीत...

मावशी: होतं हे असं तापामुळे... तुम्ही प्रतिक दादांना का नाही सांगत... आजींचा त्यांच्यावर खूप जीव आहे... त्यांचं ऐकून तरी त्या दोन घास खातील..

आई: हं तुम्ही बोलतात ते बरोबर आहे... ही भाजी झाली की मी जातेच प्रतिक बरोबर बोलायला...

मावशी: ताई, मी बघते... आज मला घाई नाही आहे जायची... ते कुलकर्णी आहेत ना... त्यांच्याकडे आज जायचं नाही आहे... मग मी बघते भाजीकडे... तुम्ही प्रतिक दादांशी बोला जाऊन...

आई: (गॅस बारीक करत) बरं मी जाते लगेच येते... त्याला सांगून... तुम्ही चपात्या करत आहात ना... म्हणून गॅस कमी ठेवला आहे...

मावशी: हो हो ताई, बघते मी भाजीकडे... काळजी नका करू...

मावशींना भाजीकडे लक्ष द्यायला सांगून आई प्रतिकच्या रुममध्ये जायला निघाली.

***

 

प्रतिक बेडवर असाच झोपून मोबाईलमध्ये प्रेरणाचा आलेला मेसेज वाचत होता.

Image result for someone smiling at their phone

प्रेरणा: प्रतिक, खरं तर तुम्हाला सर म्हणायची इतकी सवय झाली आहे की... प्रतिक लिहिताना सुद्धा मी मनात सरच म्हणते अजूनही... ???? थोडा वेळ द्या मला... सवय मोडायला...

बस इतकंच नाही सांगायला मेसेज केला पण मी....????

समोर बोलायला शब्द माझे मला साथ देत नाहीत... तुम्ही समोर दिसलात की बोलायचं काय होतं हेच विसरुन जायला होतं.. ☺️ तुमच्या डोळ्यांत मी स्वतःला हरवूनच बसते...????

मला अजूनही अलिबागमधले तुमच्या बरोबरचे दिवस स्वप्नच असल्यासारखे वाटत आहेत... खरंच मी खूप लकी आहे जे मला तुमची आयुष्यभरासाठी साथ मिळाली...????

मी आज रात्री जेवण आटपलं की बोलणार आहे आईबाबांशी तुमच्या आणि माझ्याबद्दल... ते नक्कीच तयार होतील... उद्या रविवार आहे...सो आराम करा... खूप धावपळ झाली खरं तर तुमची आणि राजीव सरांचीही... तुम्ही फ्री झालात की बोलू आपण... miss you...

तिचा मेसेज वाचून प्रतिकच्या चेहऱ्यावरचा राग कुठच्या कुठे निघून गेला...त्यानेही मग तिला रिप्लाय दिला...

 

I am also lucky to have you in my life...???? I miss you too dear..Take care....

त्याने रिप्लाय दिला आणि पिकनिकचे मोबाईलवर काढलेले फोटोज पाहत बसला तोच आई बेडरूममध्ये येउन म्हणाली, प्रतिक तू बिझी तर नाही ना...?

प्रतिक: नाही ग आई बस ना...

आई: (बसत म्हणाली) प्रतिक, मला आजीबद्दल काही सांगायचं आहे... 

प्रतिक: आजीबद्दल...? हां बोलना...

आई: आईंनी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत तू दुसऱ्या कोणत्या मुलीशी लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत त्या जेवणार नाहीत...

प्रतिक: (खाडकन बेडवरुन उठत) what.... आजी अशी कशी वागू शकते... 

आई: त्या आमचं ऐकणार नाहीत... त्या तुझं ऐकतील म्हणून मी तुला सांगायला आले...

प्रतिक: आई, आजीला तिचा हट्ट सोडायचा नाही ना... मग ठीक आहे मी पण तिचाच नातू आहे... आजपर्यंत मी हट्टीपणा केला नाही पण मी यावेळी करणार... आजीला सांग जोपर्यंत ती प्रेरणासाठी तयार होत नाही तोपर्यंत मी ही जेवणार नाही...!!

आई: काय....? प्रतिक मला वाटलं होतं तू तरी समजावून सांगशील आजींना... पण तूही त्यांच्या सारखाच वागतोय...

प्रतिक: हो आई... आजीला तिचा हट्ट पुरवायचा आहे ना... मग मला पण तेच करावं लागेल प्रेरणासाठी तिचा होकार मिळवायला...

आई: प्रतिक, पण असं उपाशी राहणं कितपत योग्य...?

प्रतिक: आई, तू फक्त आजीला सांगून तर बघ... की प्रतिक जेवायला तयार नाही म्हणून... मग बघ ती तिचा हट्ट कसा मागे घेते ते...

आई: बरं... बघते काय बोलत आहेत आई...

आई रुममधून निघता निघता पुन्हा थांबली.

प्रतिक: आई काही बोलायचं होतं का अजून..?

आई: हो प्रतिक, तू प्रेरणाला यातलं काहीही सांगू नकोस... तिला हे सगळं कळल्यावर कुठेतरी पुन्हा त्याच गोष्टींचा त्रास होईल.. आताच कुठेतरी ती तिचं नॉर्मल आयुष्य जगायला शिकली आहे... त्यात पुन्हा तिला depression मध्ये जायला या गोष्टी जबाबदार होता कामा नये.

प्रतिक: (आईला मिठी मारून) हो आई मी नाही तिला काही कळू देणार...तुला खरं सांगू आई, प्रेरणा खरंच खूप लकी आहे जी तिला माझी आई सासू म्हणून भेटणार आहे.

आई: हो का... पण मला तिची सासू नाही व्हायचं आहे...

प्रतिक: (थोडं टेन्शनमध्ये) म्हणजे...

आई: अरे मला तिची सासू नाही, तिची आई व्हायचं आहे...तिला या घरात आल्यावर तिच्या माणसांची कमी जाणवता कामा नये..

प्रतिक: (पुन्हा मिठी मारून) ओह आई...तू खूप ग्रेट आहेस... love you आई

आई: चल आता जाऊदे मला...आईना जेवायला तयार करायचं आहे.

प्रतिक: (तिच्यापासून दूर होत) हो आई..

तशी आई प्रतिकच्या रूममधून बाहेर पडून पुन्हा किचनच्या दिशेने वळली.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...