अस्तित्व एक संघर्ष-भाग-४५

It is a story of a girl who faced such a situation where she was totally destroyed...and at one point she fights for her identity...

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४५


प्रेरणा, राहुल आपापल्या रूममध्ये जातात. राहुल-समिधा आणि प्रेरणा-प्रतिक एकमेकांना भेटून खूप छान मूड मध्ये होते. प्रेरणाने प्रतिकला ती फर्स्ट काय घालणार ते मेसेज केला. त्याच वेळी प्रतिकला प्रेरणाच्या डॉ. स्नेहा गोवेकर यांना त्याने प्रेरणाकडून लग्नासाठी होकार मिळाला असल्याच्या मेसेजचा reply आला.... Congratulations to both of you...I am happy after knowing that Prerna makes a decision of choosing you as a life partner.. Just take one precaution... Don't leave her alone in any place or even in a room also... Sometimes she faces the problem of monophobia...(fear of being alone) If you want any help from my end then don't hesitate to call or message me anytime. डॉ चा मेसेज वाचून प्रतिकने त्यांना रिप्लाय दिला...Thank you...and I will take care of her.. मेसेज करून प्रतिक ही तयारी करायला लागला. काही वेळाने राहुल प्रतिक तयार होऊन आळीपाळीने आरशात स्वतःला पाहत होते.

राहुल: प्रतिक, मी चांगला दिसतोय ना...?

प्रतिक: (राहुलकडे पाहत) एक नंबर... समिधा impress होईल...आता मी कसा दिसतोय ते सांग...? 

राहुल: वाह वाह...क्या बात... क्या बात... तसे दोघेही एकमेकांना हसत हसत गळाभेट करतात.

प्रतिक: चल निघूया... राजीव वाट पाहत असेल.

चौघेही आपापल्या रुम मधून निघाले. समिधा आणि प्रेरणा दोघींना one piece मध्ये बघून राहुल आणि प्रतिक दोघांच्या तोंडून एकदम शब्द निघाला...खूपच सुंदर... तशा दोघी ही त्यांच्या कडे पाहून लाजून हसल्या....मग pair ने ते चौघे ही राजीवने सांगितलेल्या ठिकाणी पोहचले. 

सोना: (चौघांना पाहून) oh my god... एकदम आज अलिबागला चाँद चाँदच लावायचं ठरवलं वाटतं...

जीजू: हो ना...(सोनाला कोपर मारत) पण माझी चांदणी माझ्या बरोबरच आहे...

सोना: (काहीशी लाजत) तू पण ना...बस पुरे आता...तुम्ही सगळ्यांनी बॅग आणली ना...? म्हणजे एक फोटो झाला की लगेच दुसरा फोटो काढण्यासाठी change करता येईल. 

प्रतिक: हो दीदी आणली आहे बॅग...पण राजीव कुठे आहे... आणि बाकी सगळे...?

सोना: तुमच्या चौघांचीच वाट पाहत आम्ही इथे थांबलो होतो..

राजीव आणि सगळे तिकडे कार कडे आहेत... चला आमच्या बरोबर...तसे चौघेही कारच्या दिशेला गेले.

सगळे सोना दीदी बरोबर कार असलेल्या जागी पोहचले. राजीव मीना आणि अभिच फोटोशूट करत होता. मीनाने blue color चा long gown घातला होता तर अभिने blazer...मीना कार मधून अभिचा हात पकडून उतरताना असा तो shot होता.

त्यांचा फोटो काढून झाला तेव्हा राजीव म्हणाला, all photos are excellent. तशी मीना अभि दोघेही त्याला thank you म्हणाले. 

मीना:(सगळ्यांना पाहून) वाह तुम्ही आलात सगळे...भारी दिसत आहात...(राजीवला उद्देशून) राजीव सर हे बघा सगळे आले...

प्रेरणा, समिधा: तू पण छान दिसते आहेस. 

मीना: thank you...

राजीव: (राहुल, प्रतिकला hug करून) चला चला आता नेक्स्ट नंबर...

प्रतिक: राहुल आणि समिधा... या दोघांचा... मी तोपर्यंत दीदी आणि जिजूंचे फोटोज काढतो...असं म्हणत त्याने त्याचा DSLR camera काढला. (प्रेरणाला उद्देशून) प्रेरणा तू रेखा आणि मीना बरोबर बसून घे...तोपर्यंत... ( दीदी जीजूला उद्देशून एका ठिकाणी दाखवत) दीदी, जीजू तिथे चला...तसे तिघेही त्या ठिकाणी गेले. सोना आणि जिजू दोघांनी गॉगल घातला होता. मागून झऱ्याच पाणी वाहत होतं. त्याने त्यांना पुढे उभं रहायला सांगितलं आणि त्यांचे काही वेगवेगळ्या angle ने फोटोज काढले.

प्रतिक: दीदी, जिजू आता तुम्ही कपडे चेंज करुन या तोपर्यंत.

सोना: हो चालेल, I guess समिधा आणि राहुलचा एक फोटोशूट झालं असेल...म्हणजे तूझं आणि प्रेरणाचं पण एक फोटोशूट होईपर्यंत आम्ही चेंज करुन येतो.

प्रतिक: हो चालेल... असं म्हणत तिघेही राजीव जिथे फोटोशूट करत होता तिथे गेले. विवेक, आशिष, प्रेरणा, मीना-अभि आणि रेखा यांचं कधी अभिच्या तर कधी आशिषच्या मोबाईलमध्ये फोटो काढणं चालू होतं.. नको आशिष तो angle चांगला आहे मध्येच रेखा त्याला सांगत होती तर मध्येच मीना त्याला सांगत होती. समिधा आणि राहुलचं ही first फोटोसेशन पूर्ण झालं होतं. राजीवने त्यांना ड्रेस चेंज करायला सांगून प्रेरणा आणि प्रतिकला बोलावलं. राजीवने प्रेरणाला एका झाडाखाली असणाऱ्या बाकड्यावर बसायला सांगून प्रतिकला झाडाची काही पाने तिच्या अंगावर टाकायला सांगितली.

Yes perfect तो कॅमेरामध्ये आलेला फोटो click करत म्हणाला. दुसऱ्या फोटो मध्ये एका रहदारी नसलेल्या रस्त्यावर त्याने प्रतिकला प्रेरणाला उचलून घ्यायला सांगितलं आणि एका हातात एक बॅग दिली. प्रतिकने तिला उचलून घेतलं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हसत होते... yes One more perfect click राजीव ओरडत म्हणाला.

पण राजीव काय बोलतोय याकडे दोघांचं लक्ष होतं कुठे... ते तर आपल्याच दुनियेत हरवले होते. शेवटी राजीवने प्रतिकला जाऊन हात लावला. तसे दोघेही भानावर आले. प्रेरणा तर लाजून मान वर घेईनाच.

राजीव: (प्रेरणाला चिडवण्याच्या उद्देशाने) सो मिसेस प्रतिक, तुमचं लाजून झालं असेल तर मी समिधा आणि राहुलचं पुढचं फोटोशूट करु का...? मान वर करुन हो हो म्हणत ती पुढच्या फोटोशूट साठी तयार व्हायला पळून निघून गेली. तिला असं लाजून पळताना बघून राजीवला हसू आवरेना. प्रतिक ही तोपर्यंत लगेच चेंज करुन आला आणि सोना आणि जिजूंच पुढचं फोटोसेशन करायला गेला.

समिधा आणि राहुलने यावेळी black theme follow केली होती. समिधाने black कलरचा long gown घातला होता तर राहुलने black कलर blazer. राजीवने दोघांना थोडी मोठी झाडे असलेल्या ठिकाणी dance स्टेप साठी जसे उभे राहतात तसं उभं राहायला सांगून विवेक आणि आशिषला बाजूने गुलाबाच्या पाकळ्या फेकायला सांगितल्या. त्या पाकळ्या जमिनीवर पडण्याच्या आधीच राजीवने त्यांचा फोटो कॅमेरामध्ये कैद केला. 

आता वेळ होती आपल्या धडाकेबाज आणि सर्वात खट्याळ couple ची...ओळखलं का...? मी कोणाबद्दल बोलतेय ते...? Yes राजीव आणि रेखा...

राजीव आणि रेखा दोघेही white theme मध्ये बीचवर आले.

प्रतिक: (दोघांना) Ready for photo...?

राजीव: yes ready म्हणत राजीवने खाली डोकं वर पाय केले आणि रेखाने त्याच्या एक पायाला हाताने पकडून ठेवला. सगळेजण राजीवच्या photoshoot कडे आ वासून बघत होते... बघणार का नाही... अशी भन्नाट रित्या फोटो काढायची कल्पना आपल्या वकील साहेबांच्याच डोक्यात येऊ शकते.

प्रतिक त्यांचा फोटो काढत म्हणाला, येस राजीव done... तसा राजीव नीट उभा राहिला. प्रतिकने मग त्यांचे वेगवेगळ्या angle ने फोटोज काढले. एक फोटो राजीव रेखाच्या मागे धावत असताना, 

एक फोटो राजीवने रेखाला पाठीवर उलट उचलून घेतलं असताना...

मग त्याने समिधा-राहुल आणि सोना-जिजूचे ही बीचवर फोटोज काढले. तोपर्यंत राजीवने रेखाला ड्रेस चेंज करुन यायला सांगितलं आणि त्याने ही बीचवर विवेक, आशिष यांचे सिंगल सिंगल फोटोज आणि मीना-अभि यांचे Heart shape बनवतानाचे कपल फोटोज काढले. 

राजीवने प्रतिकचा प्रेरणाला propose करताना आणि बाकीच्यांना हातात will you marry me चे board देऊन फोटो काढला.

प्रतिकने ही विवेककडून समिधा आणि राहुलचा wedding date चे board हातात घेऊन दोघांना jump करायला सांगून फोटो काढला.

राजीवला आता कुछ हटके फोटोज काढायची लहर आली होती. त्याने वाळूमध्ये विवेकला help लिहायला सांगून सोना दीदीला जिजूचे पाय ओढायला सांगून आणि नंतर मीनाला अभिचे पाय ओढायला सांगून दोन्ही फोटो आशिषला काढायला लावले. 

विवेक आणि आशिषने राजीवने रेखाला आणि प्रतिकने प्रेरणाला उचलून नेताना तिच्याकडे पाहताना फोटो काढले.

फोटोशूट झाल्यावर सगळेजण मस्तपैकी बीचवर पाण्यात खेळायला रमले. बराच वेळ झाला तसा सगळ्यांनी हॉटेलमध्ये आपल्या रुममध्ये जाऊन कपडे बदलून पुन्हा एकत्र जेवण जेवून घेतलं. जेवण झाल्यावर गप्पा मारायला सगळे बसलेच होते की राजीव म्हणाला, hey guys, गेम खेळायचा का..?

आशिष: कोणता सर..?

राजीव: हा गेम truth and dare आहे पण थोडा वेगळा बदल केला आहे त्यात... म्हणजे यात 2 बॉक्स असतील एक truth साठी आणि एक dare साठी... जर तुम्ही truth or dare select केलं तर बॉक्स मधली एक चिट्टी काढून त्यावर जे लिहिलं आहे ते करायचं... आणि suppose तुम्ही truth साठी जी चिट्टी काढली आहे ते सांगायला comfortable नसाल तर तुम्ही dare चा option choose करू शकता....

विवेक: पण सर मग त्यात काय मज्जा...असं जर आपण बदलू शकत असू तर...

राजीव: विवेक कसं आहे ना...कधी कधी आपण काही गोष्टी सगळ्यांशीच बोलू शकतो असं नसतं त्यावेळी तुला एक तर ती गोष्ट स्वतः पुरती तरी ठेवायची असते किंवा मग वेळ हवा असतो सगळ्यांशी शेअर करण्यासाठी... आणि तीच गोष्ट तुला truth मध्ये सांगण्याची वेळ आली तर काय करशील...? आणि आपण इथे कोणाला दुखवायला किंवा कोणाची personal space ढवळून काढायला नाही आलो आहोत...आपण इथे फक्त enjoy करायला आलोय... I hope तुला माझं म्हणणं पटलं असेल.

विवेकला त्याच म्हणणं काही प्रमाणात योग्य वाटलं त्याने मानेनेच हो म्हटलं. राजीवने truth and dare चे 2 बॉक्स बनवून सगळ्यांना काही ना काही चिठ्या त्यात टाकायला सांगितल्या. त्याने ते दोन्ही बॉक्स एका टेबलावर ठेवले आणि सगळेजण truth and dare चा गेम खेळायला सुसज्ज झाले. 

I hope so, तुम्हाला pre and post wedding photoshoot आवडलं असेल.. तुमच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडेल मला
 

क्रमशः

🎭 Series Post

View all