Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व - एक संघर्ष भाग-४

Read Later
अस्तित्व - एक संघर्ष भाग-४
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-४


प्रतिक मि. काळे यांनी बोलावल्यामुळे त्यांच्याकडे गेला. तुम्ही या फॅमिलीचे नातेवाईक आहात का....? मि. काळे यांनी प्रतिकला विचारलं.  तसा प्रतिक म्हणाला, नाही नाही सर, मी प्रतिक राजाध्यक्ष. त्यांची मुलगी प्रेरणा ती माझी टीम मेंबर आहे ऑफिसमध्ये. म्हणजे ऑफिस मध्ये ती आणि इतर सहकारी मला रिपोर्ट करतात. ओके, मग इथे मिस प्रेरणा या ऍडमिट आहेत हे कसं समजलं तुम्हाला...? मि काळे यांनी विचारलं.

सर, ऑफिस मध्ये एक अर्जंट फाईल हवी होती ती मिळत नव्हती म्हणून मी मिस प्रेरणा यांच्या दुसऱ्या alternate नंबरवर कॉल केला होता तो त्यांच्या भावाने उचलला तेव्हा त्याच्या कडून मला ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं समजलं... म्हणून मी इथे आलो. प्रतिकने प्रेरणाला कॉल करण्यासाठी जे कारण ठरवलं होतं ते सांगितलं... ओके ओके... मि काळे म्हणाले.

तोपर्यंत डॉ आणि पोलिस निरीक्षक जाधव मि. काळे यांच्याकडे आले... आणि डॉ त्या तिघांना म्हणाले, जोपर्यंत मिस प्रेरणा शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही... I will suggest you, please dont share her health issue with her family and also dont share this news with news & media also... otherwise her family get collapsed totally. Me and my  team members are available for providing 24 hours service to Miss Prerna...असं म्हणून डॉ दुसऱ्या पेशंटचं चेकअप करायला निघून गेले. तसं मि. जाधव यांनी इशाऱ्यानेच मि. काळे यांना प्रतिकबद्दल विचारलं. तेव्हा मि. काळे यांनी मि. जाधव यांना प्रतिकबद्दल माहिती दिली. तसं न राहवून प्रतिक मि. जाधव यांना म्हणाला, 2 व्हिलर ने accident झालं की कारने...? तसे मि. जाधव म्हणाले, आपण इथे नको बोलूया यावर... असं म्हणून ते डॉ च्या केबिन शेजारीच असलेल्या केबिन मध्ये गेले.

केबिन मध्ये गेल्यावर त्यांनी प्रतिकला बसायला सांगून त्यांनी केबिनचा दरवाजा बंद करून घेतला. मि जाधव प्रतिक यांच्या समोरच्या खुर्चीत बसून म्हणाले, ही कोणतीही accident case नाही आहे...तसा प्रतिक म्हणाला, तर मग सर...? तसे मि जाधव म्हणाले खरं तर आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगू  की  नको विचार करत होतो पण तुम्ही त्यांच्या फॅमिलीशी जसे मघाशी वागत होतात त्यामुळे आम्ही तुम्हाला हे खूप विश्वासपूर्वक सांगतो आहोत...  It is not accident case..It is a rape case.... आणि तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर आज काही वेगळं चित्र असतं...

हे ऐकून प्रतिकला काहीच बोलायचं सुधरेना... त्याने कसंबसं स्वतः ला सावरून विचारलं, पण हे सगळं कसं झालं... तसे मि जाधव म्हणाले, माझी आणि मि. काळे आमच्या दोघांची ड्युटी संपवून आम्ही दोघे मि.  काळे यांच्या बाईकने निघालो होतो... तर सिग्नलला मिस प्रेरणा या ज्या ऑटोमध्ये होत्या त्याच्या बाजूला एक मुलगी  scooty वर होती आणि तिचं लक्ष त्यांच्या ऑटोकडे होतं .. आणि ती दुरून काहीतरी त्या लोकांशी बोलताना आम्हाला दिसली नंतर ती खूप घाबरून इकडे तिकडे कोणी तिच्याकडे पाहत आहे का बघत होती. त्यांच्या आणि आमच्या बाईकमध्ये अंतर थोडं होतं पण सिग्नलमुळे गाड्यांची गर्दी जास्त होती आणि सिग्नल सुटल्यावर ऑटो निघून गेली. scooty वरची मुलगी इतकी घाबरलेली होती की सिग्नल सुटला तरी तिने scooty सुरु केली नव्हती. तिच्या आजूबाजूला असलेली माणसे तिला ओरडू लागली तसं आम्ही तिला बाजूला उभं राहायला सांगून सगळ्यांना जाऊ दिलं. तेव्हा आम्हाला पाहून तिला थोडं हायसं वाटलं. तिने ऑटो मध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत असलेली आणि तिच्या बरोबर एक माणूस वाईट कृत्य करत असल्याचं सांगितलं. ती जेव्हा त्यांना हे काय करत आहात पोलिसांना फोने करु  का म्हणू लागली तेव्हा तो माणूस तिला ही तुझी हीच अवस्था करू असं म्हणू लागला... त्या माणसाचं हे बोलणं ऐकून मी खूप घाबरले सर... ती बोलताना ही  खूप चाचरत बोलत होती. तसं ती स्वतःला सावरून म्हणाली, सर त्या उजव्या दिशेला वळले आहेत. सर वाचवा त्या मुलीला मला वाटतं ती बेशुद्धच होती. मि. जाधव यांनी त्या मुलीचा नंबर घेऊन ठेवला आणि घाबरू नकोस घरी जा सांभाळून असं तिला सांगितलं आणि ते बाईक घेऊन तिने सांगितलेल्या दिशेला वळले. 

ज्या दिशेने त्यांनी बाईक वळवली त्या रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती त्यामुळे आम्ही बाईकचा  वेग वाढवला आता आमची खात्री झाली की हा जबरदस्तीचाच प्रकार असावा आम्हाला एक पुढे ऑटो जात असलेली दिसली. आम्हाला खात्री नव्हती की ही तीच ऑटो असावी पण तरी सुद्धा आम्ही त्या ऑटोचा पाठलाग सुरु केला. शेवटी एका अंधाऱ्या गल्लीत त्यांनी त्यांची ऑटो फिरवली. आम्ही पोलिस स्टेशनला आणि ambulance मध्ये कॉल करुन त्या ठिकाणी यायला सांगितलं.. आणि ऑटो पाठोपाठ आम्हीपण त्या अंधाऱ्या गल्लीत गेलो त्या ऑटोवाल्याने थोडा वेग कमी करुन कोणाला तरी बाहेर फेकलं आणि पुन्हा ऑटो सुरु करणार तोपर्यंत आम्ही त्यांना गाठलं आणि त्या दोघांना अटक केली. ऑटोमधून बाहेर फेकलेल्या मिस प्रेरणा यांना ambulance मधून या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. त्या दोघांच्या चौकशी अंती आम्हाला कळलं की ऑटोमध्ये मिस प्रेरणा यांच्यावर त्या  2 जणांनी दारूच्या नशेत बलात्कार केला होता..त्यातला एक ऑटो ड्रायव्हर होता आणि एक त्याचा मित्र. त्यानंतर मिस प्रेरणा यांच्या मोबाईलच्या सिममधून त्यांच्या घरी कळवलं. त्यांच्या काही टेस्ट वरुन त्यांच्यावर त्या दोघांनी बलात्कार केला आहे हे निष्पन्न होईलच आणि ज्या ज्या ठिकाणी ही ऑटो फिरली होती त्या त्या ठिकाणचे पण आम्ही cctv फुटेज मागितले आहेत.. म्हणजे त्या दोघांना शिक्षा होणारच...फक्त मिस प्रेरणा शुद्धीवर यायला हव्या आहेत.

प्रतिकला शांत बसलेलं पाहून मि जाधव म्हणाले, मी समजू शकतो आपल्या सहकाऱ्यावर असा प्रसंग ओढवल्यावर तुम्हाला शॉक लागला आहे ते... पण एकदा तिच्या फॅमिलीला पण बघा त्यांची अवस्था तुम्ही मघाशीच पाहिली ना...! तर मिस प्रेरणा यांच्या फॅमिलीला मघाशी जे डॉ म्हणाले, त्यातलं काही कळता कामा नये.... याची काळजी घ्या. प्रतिक मानेने हो म्हणाला... तसे मि. जाधव पुन्हा म्हणाले, की त्यांच्या फॅमिलीमध्ये अजून कोणी आहे की नाही माहीत नाही.  तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधून मधून इथे या जेणेकरुन काही मदत त्यांना लागलीच तर तुम्ही करु शकता.... मी तुम्हाला हे रोज करायला सांगू शकत नाही कारण तुम्हाला ही तसं करणं शक्य होणार नाही... मघाशी तुम्ही त्यांच्या फॅमिलीला जेवणासाठी जसं समजावलं त्यावरून मला असं वाटतं की तुम्ही त्यांना अधून मधून येऊन भेटावं. चला जाऊ आपण आता बाहेर असं म्हणून मि जाधव यांनी केबिनचा दरवाजा उघडला आणि सगळे केबिनमधून बाहेर पडले. 

क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...