Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष भाग-३३

Read Later
अस्तित्व एक संघर्ष भाग-३३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३३


आई आणि काकू गेल्यावर अनू प्रेरणाला म्हणाली, काही झालं आहे का...? म्हणजे तू मला काहीशी अपसेट वाटते आहेस...
प्रेरणा: (बाळाला अनूच्या हातात देत) नाही ग तसं काही नाही...
अनू: हे बघ, आदीची बायको होण्यापूर्वी मी तुझी फ्रेंड होते आणि आता ही आहे...आणि तुला खोटं नाही बोलता येत... सो चुपचाप खरं काय ते सांग...
प्रेरणा: काय सांगू मी..काही नाहीच आहे तर...
अनू: खरं तर मला तुझं बोलणं पटत नाही आहे...कदाचित आता तुला काही सांगायचं नसेल पण नंतर कधी सांगावं असं वाटलं तर सांग तू..
प्रेरणा: (विषय बदलत) अग तुला ती माझ्या ऑफिसमधली समिधा माहीत आहे का.. जी आमच्या घरी आली होती....?
अनू: समिधा...(आठवत) म्हणजे ही तीच का जी तुझ्या सरांबरोबर आलेली आणि त्यावेळी तुझ्या सरांनी आदीच्या आईंना त्यांची चूक लक्षात आणून दिली होती...
प्रेरणा: हो हो तीच... तिचा या संडेला साखरपुडा आहे...
अनू: मस्त.. अरेंज की लव...?
प्रेरणा: अरेंज..
अनू: तू जाणार आहेस की नाही मग...
प्रेरणा: हो जाणार ना...!!
अनू: तुला खरं सांगू मला पण असं खूप मनापासून वाटत आहे तुझं पण लग्न ठराव मग मी पण अशी मस्त पैकी लेहेंगा घालून इकडून तिकडून माझ्या छोटीला घेऊन फिरेन... ते Mumma-Daughter combo dress असतात ना तसं करेन...
अनूच्या या बोलण्याने प्रेरणाच्या मनात अचानक प्रतिकचा विचार आला...तिला क्षणभर प्रतिक आणि ती एकत्र स्टेजवर दिसले...
अनू: ( प्रेरणाला हात लावत) कुठे हरवलीस तू...?
प्रेरणा: कुठे नाही...
अनू: का कोण जाणे पण तू मला इथे असूनही इथे नसल्या सारखी वाटतेस...
प्रेरणा: अं... तसं काही नाही ग...ते मी उद्या ऑफिस मध्ये जे महत्त्वाचं काम दिलं आहे त्याचा विचार करत होते..
अनू: (प्रेरणा जे सांगत होती, त्यावर अनूचा विश्वास बसत नव्हता.. तिला कळतं होतं की प्रेरणाच्या मनात याक्षणी खूप काही चाललं आहे...) तू मला विचारणार नाहीस का..की बेबीचं नाव काय ठेवायचं..?
प्रेरणा: ओह सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं ते...तुम्ही काही ठरवलं आहे का...?
अनू: नाही... आईंनी ती जबाबदारी तुझ्यावर दिली आहे विसरलीस की काय...? बाळाची आत्या नाव ठेवते ना...!!प्रेरणा: हं, मी आजच शोधायला सुरवात करुन तुला आणि आदी दादाला काही नाव suggest करते मग आपण त्यातून एक ठरवू.
अनू: हां चालेल, गुड आयडिया...
तेवढ्यात मालगुडे काकू डबा घेऊन आदी बरोबर आल्या. त्यांना पाहून प्रेरणाने उठून काकूंना बसायला दिलं आणि आदीची स्वारी बाळाकडे वळली. त्याने हळूच तिच्या नाजूक हातांना हात लावला....बाळाने झोपेतच हातांची हालचाल केली... जणू काही तिने आपल्या पप्पांना ओळखलं असावं..आदी ते पाहून गोड हसला...त्याने अनूकडे पाहिलं आणि डोळ्यांनीचं मला एका गोड परीचा बाबा बनवलं म्हणून तिचे आभार मानले. अनूनेही हसून त्याला त्याचं उत्तर दिलं. प्रेरणा त्या दोघांकडे पाहत होती. पुन्हा नकळत तिच्या मनात प्रतिकचा विचार आला. ती स्वतःला म्हणाली, प्रेरणा तू इथून लवकर निघ... तुझ्या मनात प्रतिक सरांचे सतत विचार येणं योग्य नाही...
प्रेरणा: काकू मी निघते आता, आदी दादा congratulation तू बाबा झालास त्याबद्दल...!!
आदी: thank you..अग पण थांब थोडा वेळ ना अजून...
मालगुडे: अग लगेच निघतेस... थांबायचं होतं ना अजून थोडा वेळ...
प्रेरणा: नाही काकू, दादा, परत येईन मी संध्याकाळी... अनू काळजी घे... दादा, काकू येते मी...असं म्हणून ती तिथून निघाली. प्रेरणाच्या लगेच निघण्याने अनूची खात्री झाली की जरुर कसला तरी विचार प्रेरणाच्या मनात चालू आहे त्यामुळेच ती इथून लवकर घरी गेली...
******

दुसऱ्या दिवशी प्रेरणा आणि समिधा ऑफिस मध्ये पोहचल्या. मागोमाग मीना पण आली. तिघीजणी फ्रेश होऊन डेस्कवर काम करायला बसल्या. प्रेरणाच्या मनात प्रतिकचाच विचार चालू होता. ती विचार करत करत काम करत असतानाच प्रतिक ऑफिस मध्ये आला. त्याने दुरुन प्रेरणाला पाहिलं आणि त्याला राजीवने सांगितलेली गोष्ट आठवली जी त्याला आता follow करायची होती. तो तसाच कोणाकडे ही न बघत त्याच्या केबिनच्या दिशेने निघाला. त्याला आलेलं पाहून समिधा, मीना आणि प्रेरणा गुड मॉर्निंग म्हणाल्या. तसं त्याने फक्त समिधा आणि मीनाकडे पाहून very good morning म्हटलं आणि तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. प्रेरणाला त्याने तिला असं इग्नोर केलं याचं वाईट वाटलं. तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. थोड्या वेळाने ती तिघींच्या कस्टमरच्या फाईल्स sign करुन घेण्यासाठी प्रतिकच्या केबिनमध्ये गेली. जेणेकरून ती प्रतिकला त्या निमित्ताने का होईना पण पाहू शकेल. 
प्रेरणा: मे आय कम इन सर...
प्रतिक: (प्रेरणाचा आवाज ओळखून लॅपटॉप मध्येच बघत) येस कम इन...
तशी प्रेरणा प्रतिक समोर जाऊन उभी राहिली. प्रतिकच्या ते लक्षात आलं की प्रेरणा आपण बोलावं म्हणून वाट पाहत आहे. त्याने तिच्याकडे न बघताच म्हटलं, येस मिस प्रेरणा....काही काम होतं का..?
प्रेरणा: (एकदा तरी आपल्याकडे प्रतिक पाहिलं या विचाराने) सर ते या फाइल्स वर sign हवी होती तुमची...
प्रतिक: (तिच्याकडे न पाहत) फाईल्स ठेवून जा...मी sign करुन नंतर peon कडे पाठवतो. असं ऐकताक्षणी प्रेरणाला काय बोलावं ते कळेना...ती तिथेच तशीच प्रतिककडे पाहत उभी राहिली. ती अजून गेलेली नाही आहे हे लक्षात येताच प्रतिकने तिच्याकडे पाहत विचारलं, मिस प्रेरणा अजून काही काम आहे का...?
प्रेरणा: (भानावर येत) नाही सर...
प्रतिक: मग फाईल्स ठेवून जा, मी नंतर peon कडे पाठवून देतो.
प्रेरणा: (फाईल्स ठेवत) चालेल सर...असं म्हणून ती प्रतिककडे पाहत केबिनमधून बाहेर डेस्कवर गेली. प्रतिक तिच्याकडे लक्ष न देता काम करत राहिला. ती गेल्यावर प्रतिक स्वतःशीच म्हणाला, अजून किती त्रास करून घेणार आहेस प्रेरणा तू स्वतःला...!! फक्त एकदाच... फक्त एकदाच बोल ग तुझं ही माझ्यावर तितकंच प्रेम आहे म्हणून...हा प्रतिक राजाध्यक्ष तुला आयुष्यभर जीवापाड प्रेम करेल...मला ही खूप त्रास होतो तुझ्याशी असं वागताना... पण तुला तुझ्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी मला हे करावं लागतं आहे...

दिवसभर प्रेरणाच्या डोक्यात प्रतिकचाच विचार चालू होता...सर माझ्याशी पुन्हा कधीच पूर्वी सारखं वागणार नाहीत का...? का मला त्यांच्या अशा वागण्याने त्रास होतो आहे... बॉस तर आहेत फक्त ते माझे...का ते मला इतके important वाटत आहेत...तिने कसंबसं ऑफिसच काम आटपलं आणि ती समिधा आणि विवेक बरोबर घरी जायला निघाली..समिधाच लग्न ठरल्यामुळे तिचं ट्रेनमध्ये सतत तिच्या होणाऱ्या नवऱ्याशीच बोलणं चालू होत...तर प्रेरणाच्या मनात पूर्ण दिवसात प्रतिक तिच्याशी कसा वागला हे आठवत होतं...नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं..त्याक्षणी समिधाच तिच्याकडे बोलता बोलता लक्ष गेलं. तसं तिने कॉल ठेवला आणि प्रेरणाच्या खांद्यावर हात टाकून म्हणाली, प्रेरणा काय होतं आहे....सकाळी म्हणाले नाही मी तुला......पण तू खूप अस्वस्थ वाटत आहेस मला.....कसला एवढा विचार करते आहेस.....is it everything all right ..?
प्रेरणा: हं...काही नाही ग...
समिधा: तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस...पण स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस...आणि तू कितीही लपवायचा प्रयत्न केलंस ना की तू ठीक आहेस म्हणून...तरी ते तुझ्या चेहऱ्यावर दिसून येत...
प्रेरणा: काही गोष्टी मला ही अजून नीट समजत नाही आहे...मग मी तरी तुला नक्की कसं आणि काय सांगू....?
समिधा: हं, तू comfortable असशील तर बोलू आपण चॅटवर रात्री...किंवा मग आता तुला जमणार असेल तर सांगू शकतेस...
प्रेरणा:( आजूबाजूला ट्रेनमध्ये कोणाचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे ना हे पाहत) मला बुके कोण पाठवायचं हे कळलं आहे मला...
समिधा: (खुश होतं) काय....कोण पाठवायचं...सांग ना....
प्रेरणा: आपले प्रतिक सर...
समिधा: व्हॉट...खरं की काय....पण मग हे तुला कधी कळलं...?
प्रेरणा: ज्या दिवशी आपण लेट पर्यंत ऑफिसमध्ये थांबलो होतो त्यादिवशी तू अर्ध्यावर उतरून मी पुढे त्यांच्या बरोबर गेले होते त्यादिवशी...
समिधा: ओके पण बुकेचा आणि तुझ्या अशा अस्वस्थ होण्याचा संबंध काय...?
प्रेरणा: सरांनी मला प्रोपोज केलं आहे....
समिधा: ( आनंदी होतं) ओह व्वा...अरे उलट तू तर खुश व्हायला हवं ना...अशी का मग तोंड पाडून बसली आहेस...?
प्रेरणा: जाऊदे...मला वाटलंच होतं...तू अशीच काहीशी बोलशील...म्हणून मी तुला काही सांगायला बघत नव्हते...
समिधा: ओके बाबा...सॉरी...आता नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांगशील का...?
प्रेरणा: सर माझ्याबद्दल त्यांची असलेली सहानभूती म्हणून मला लग्नासाठी विचारात आहेत....
समिधा: आणि असं तुला का वाटत आहे...असं ही असू शकत ना...की त्यांना तू खरंच आवडत असेल...त्यांचं खरंच तुझ्यावर प्रेम असेल...
प्रेरणा: नाही वाटत मला तसं काही...म्हणजे he deserve someone better than me...आणि यापूर्वी कधी ते मला असं काही म्हणाले नाहीत...आणि आता जेव्हा माझ्या बाबतीत काही घडलं त्यानंतर ते मला विचारत आहेत...म्हणजे ती खरंच माझ्यावर दाखवत असलेली सहानुभूती नाही का होतं आहे...?
समिधा: Prerna you are saying rubbish things ....हे बघ प्रेम ही भावना आहे ती एखाद्या बद्दल कधी ही आणि केव्हाही वाटू शकते...आणि इतकी वर्ष त्यांना तुझ्याबद्दल नक्की काय वाटत होतं हे त्यांना ही कळलं नसावं...किंवा त्याची जाणीव नसेल झाली असं ही असू शकत ना...?
प्रेरणाला त्यावर काय बोलावं कळेना...
समिधा: पण मग तुला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही...हे तू त्यांना सांगितलं का...?
प्रेरणा: अं..हो...म्हणजे त्यांना समजलं...मला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही ते...
समिधा: (मनात विचार करत...खरं तर तुलाच समजत नाही आहे प्रेरणा...की तू पण त्यांना पसंत करतेस ते..) ओके सांगितलं ना...मग एवढी डिस्टर्ब का आहेस आता...?
प्रेरणा: सर त्यादिवसापासून माझ्याशी नीट बोलत नाहीत ग...म्हणजे ते येणार नव्हते तेव्हा मला त्यांनी मेसेज नव्हता केला...मला तर ऑफिसमध्ये आल्यावर कळलं...त्यांना बरं नाही आहे ते...मी त्यांची तब्येत विचारायला कॉल केला तेव्हा त्यांचे फ्रेंड आहेत ना...राजीव.. त्यांनी कॉल उचलला होता...नंतर सरांनी माझा मेसेज वाचला पण काही रिप्लाय नाही दिला...आणि आज तर त्यांनी तुम्हा दोघीना गुड मॉर्निंग म्हंटल पण मला काहीच नाही म्हणाले...मी केबिनमध्ये फाईल्स घेऊन गेले होते...तेव्हा पण ते माझ्याशी नीट बोलले नाही...
समिधा: शांत हो...त्यांना थोडा वेळ दे...होईल सगळं नीट....
प्रेरणा: मला सहन होतं नाही ग...असं सरांचं वागणं...ते वागतील ना...माझ्याशी पूर्वीसारखंच...?
समिधा: (मनात काही ठरवून) हो ग...वागतील...नको काळजी करुस...बघ तुझं स्टेशन येईल आता...आणि विवेक असला बरोबर तरी घरी पोहचलीस की मला मेसेज कर..
प्रेरणा: ( जागेवरून उठत) हो करते मी मेसेज तुला...चल उद्या भेटू...असं म्हणून तिचं स्टेशन प्लॅटफॉर्म आल्यावर समिधाला बाय बोलत ट्रेन मधून उतरली. प्रेरणाला बाय केल्यावर ट्रेन चालू होते तोच समिधाच्या मोबाईलवर कॉल येतो...तो कॉल बघून समिधाच्या चेहऱ्यावर हास्य उमटते..क्रमशः
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...