Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष भाग-३०

Read Later
अस्तित्व एक संघर्ष भाग-३०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३०


प्रेरणा नेहमीप्रमाणे समिधा बरोबर ऑफिस मध्ये पोहचली. Security ने दोघींना गुड मॉर्निंग म्हणत बुके प्रेरणाला दिला. तसं प्रेरणा आणि समिधा security ला व्हेरी गुड मॉर्निंग म्हणत डेस्कवर गेल्या. प्रेरणाने सवयीप्रमाणे बुकेवरच ग्रीटिंग कार्ड ओपन केलं. आजचा ग्रीटिंग कार्डवरचा मेसेज वेगळाच होता. तिची नजर तो मेसेज वाचू लागली...मला माहीत आहे, तुला जाणून घ्यायचं कुतुहल असेल..या बुके मागे नक्की कोण असेल...आपली भेट ही लवकरच होईल...आशा आहे जो आनंद मला होईल तुला भेटून...तोच आनंद तुझ्या ही चेहऱ्यावर येईल मला भेटून...
---Yours Fan

कार्डवरचा मेसेज वाचून प्रेरणा नकळत हसली.
समिधा- (तिच्याकडे पाहत) काय झालं ग अशी का हसली...?
प्रेरणाने ते ग्रीटिंग कार्ड पर्स मध्ये ठेवत हळूच तिच्या कानात मेसेजबद्दल सांगितलं.
समिधा: ओह हो, म्हणून तू एवढी गोड हसली...मग कधी भेटणार ते नाही का सांगितलं...?
प्रेरणा: नाही ना, मला पण कळत नाही आहे की नक्की कोण असेल...? 
समिधा: एखादा handsome मुलगा असेल आणि त्याने तुला मागणी घातली तर...?
प्रेरणा: गप्प ग...काहीही काय बोलते....
समिधा: ओके बाई, सोड तो विषय...मला तुला काहीतरी सांगायचं आहे....
प्रेरणा: हा सांग ना...
समिधा: अग तू हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या मामांनी एक स्थळ सुचवलं होतं... आणि मी त्या मुलाला अधून मधून इतके दिवस समजून घेण्यासाठी भेटले ही...घरी आमच्या विचारुन...
प्रेरणा: मग...?
समिधा: मग काय आमचे विचार जुळतात, तो मला खूप समजून ही घेतो... आणि कालच त्याचे आईबाबा आमच्या घरी साखरपुड्याची तारीख ठरवायला आले होते...
प्रेरणा: (समिधाला मिठी मारुन) ओह हो, congrats dear....मग कधी आहे engagement...?
समिधा: या sunday ला...saturday ला सुट्टी घेईन मी एक दिवस..आज सरांना सांगणार आहे...तोच मीना ही ऑफिसमध्ये आली आणि ती डेस्कवर आली तसं समिधाने तिला ही आनंदाची बातमी दिली. तिनेही समिधाला शुभेच्छा दिल्या. थोड्या वेळाने प्रतिक ही ऑफिसमध्ये आला. त्याला पाहून तिघींनी त्याला गुड मॉर्निंग विश केलं. तसं प्रतिकने ही हसून त्यांना very good morning म्हंटलं आणि तो प्रेरणाकडे तिच्या नकळत पाहत काहीतरी ठरवत केबिनमध्ये गेला.

काही तास होऊन गेले असतील नसतील समिधा प्रतिकच्या केबिनमध्ये गेली. 
समिधा: मे आय कम इन सर
प्रतिक: येस समिधा...
समिधा: (आत जाऊन प्रतिकच्या समोर उभी राहिली, तसं प्रतिकने तिला खुर्चीत बसायला सांगितलं) सर, मला काही सांगायचं होतं.. असं म्हणून तिने तिच्या हातातला मिठाईचा बॉक्स उघडून प्रतिकच्या समोर केला.
प्रतिक: (मिठाई घेत) कशाबद्दल..?
समिधा: सर, माझी engagement ठरली आहे या संडेला आहे... तुम्ही यायला हवं... आणि सर माझं अजून एक तुमच्याकडे काम होतं...
प्रतिक: हां सांग ना...
समिधा: सर मला राजीव सरांचा पण नंबर हवा होता त्यांना पण invite करायचं आहे...
प्रतिक: एवढंच ना, मी तुला व्हॉटसप करतो... आणि मी काय म्हणतो, saturday ला सुट्टी घे म्हणजे तुझी धावपळ होणार नाही..
समिधा:(हसून) सर मला तेच म्हणायचं होतं... आता...! तसा प्रतिक ही हसला.
प्रतिक: समिधा, तू, प्रेरणा आणि मीना घरी कळवून ठेवा...आज घरी यायला थोडा उशीर होईल असं...कारण आज विवेक आणि अनिकेत दोघेही नाही आहेत त्यामुळे काम संपायला वेळ लागू शकतो... सो आधीच सांगून ठेवा म्हणजे घरातले काळजी करणार नाहीत.
समिधा: ओके चालेल सर...असं म्हणून ती तिच्या डेस्कवर गेली आणि तिने मीना आणि प्रेरणा दोघींना घरी कळवण्याबद्दल सांगितलं. तसं तिघींनी आपापल्या घरी फोन करुन तसं कळवलं. 
मीना: माझे मि म्हणाले, किती वाजता निघणार त्याचा अंदाज आला तर त्याच्या आधी थोडा कॉल कर म्हणजे मी घ्यायला येईन.
समिधा: मस्तच म्हणजे तुला नो ट्रेनची गर्दी...आणि प्रेरणा घरी कॉल केला ते बाबा काय म्हणाले...?
प्रेरणा: ते खूप काळजी करत होते... मी सांगितलं त्यांना की माझ्या बरोबर तू असशील ते...
समिधा: म्हणजे काय मी असणारच तुझ्या बरोबर...
मीना: कोणी कस्टमर अजून आले नाहीत म्हणून ठीक आहे यार...नाहीतर एक तासापूर्वी तर मला असं वाटलं होतं की आज ही लाईन संपते आहे की नाही ते...
समिधा: (प्रेरणाला फाईल देत) हो यार मला ही असंच वाटतं होतं... आता दुपारनंतर येतील वाटतं...तोपर्यंत आपण आपली बाकीची कामे आटपूया...
मीना: हो, अग तुझ्या मोबाईलची लाईट बघ blink होते आहे बहुतेक आमच्या होणाऱ्या जिजूचा मेसेज आला असणार....
समिधा: (मोबाईल हातात घेत) गप्प ग...किती छळशील मला...
मीना: सांग बघू, त्यांचाच मेसेज आहे ना...
समिधा: (मेसेज बघून लाजत हसली) हो...त्यांचाच आहे...
मीना: हे प्रेरणा बघ, कोणीतरी किती छान लाजत आहे...
प्रेरणा: हं, काय म्हणत आहेत आमचे जिजू...हे तू फोटो पण नाही दाखवला आम्हाला त्यांचा...
मीना: हां रे, (समिधाकडे पाहत ) बहुत ना इंसाफी है ठाकूर...तसं समिधाने दोघींना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो दाखवला...
समिधा: कसे वाटले..तुमचे जीजू मग?
मीना: खरं सांगू, बघ रागावू नकोस पण मुलाच नाक जरा छोटं हवं होतं...(प्रेरणाकडे पाहून डोळे मिचकावत) हो ना प्रेरणा...
प्रेरणा: हो ना, आणि एक डोळा पण छोटा वाटतो आहे ना...
मीना: अय्या हो का...(फोटोकडे पाहून) अरे हो की...समिधा अजून ही नीट विचार कर...
समिधा: अग तसा नाही दिसत तो...मी भेटले आहे ना त्याला नाक पण त्याच प्रॉपर आहे आणि तो फोटोमध्ये हसतो आहे ना म्हणून तो डोळा एक छोटा वाटत आहे...तिला असं सांगताना पाहून मीना आणि प्रेरणा दोघीही हसू लागल्या...
मीना: अग वेडाबाई, आम्ही तुझी मस्करी केली... तू काय बोलतेस तेच ऐकायचं होतं आम्हाला...अगदी खरं सांगू तर तुला perfect partner मिळाला आहे...त्याचा मेसेज पाहून तुझ्या चेहऱ्यावरची स्माईलच सगळं सांगत होती...तोच एक कस्टमर आला तसं तिघींनी आपापलं बोलणं थांबवत काम सुरु केलं.

लंच ब्रेकमध्ये समिधाने तिचा मोबाईल चेक केला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला होता, ऑफिसमधून निघाली की एकदा मेसेज कर...तिने ओके चालेल म्हणून रिप्लाय दिला आणि ती पुन्हा जेवून कामाला लागली. संध्याकाळचे 5 वाजले आणि कस्टमर यायचा टाइम संपला. तिघीनी फाईल वर्क सुरु केलं. 6 ला काम संपायला यायला लागलं तसं मीनाने नवऱ्याला कॉल करुन कळवलं. प्रतिकने महत्वाच्या फाईल सही करुन परत तिघींना दिल्या. 6.30 ला काम पूर्ण झालं तसं प्रतिक तिघींना आत बोलवून म्हणाला, काम झालं आहे ना आता सगळं...?

तिघी: हो सर...
प्रतिक: ओके, मी तुम्हाला तिघींना घरी सोडतोय...
मीना: सर, माझे मि येणार आहेत ऑफीसच्या खाली घ्यायला सो मी त्यांच्या बरोबर जाईन सर, म्हणजे आता पोहचतीलच ते थोड्या वेळात...
प्रतिक: हं हरकत नाही, ( समिधा आणि प्रेरणाकडे पाहत) मी तुम्हा दोघीना सोडतो मग घरी...आणि मीना तुझे मि येत नाहीत तोपर्यंत आम्ही थांबतो आणि ते आले की मग निघू...
मीना: ओके चालेल सर...
प्रतिक: ओके चला pack up करा मग...मी पण करतो...तशा तिघी ही आपापल्या डेस्कवर गेल्या आणि त्यांनी त्यांच्या पर्स बॅग पॅक केल्या तोपर्यंत प्रतिक ही केबिनमधून त्यांच्या डेस्ककडे येऊन म्हणाला, निघायचं का मग...
तिघी: हो सर...तसे सगळे लिफ्टने पार्किंग एरिया मध्ये गेले. तोच मीनाला तिच्या नवऱ्याचा कॉल आला. तो आधीच तिथे आला असलेला पाहून मीनाने प्रतिक आणि बाकीच्यांची त्याच्या बरोबर ओळख करून दिली. प्रतिकने त्याच्याशी हात मिळवत थोडं फार बोलून त्या दोघांना निरोप दिला.
प्रतिक: तुम्ही दोघी घरी कॉल करुन कळवा... मी तुम्हाला सोडतो आहे ते...
दोघी: हो सर सांगतो असं म्हणून दोघींनी आपापल्या घरी तसं कळवलं. समिधाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ही ऑफिसमधून निघत असल्याचा मेसेज केला आणि दोघीही प्रतिकच्या कारमध्ये बसल्या. थोड्या वेळाने समिधाला त्याचा रिप्लाय आला, त्याने तिला गोल्डी रेस्टॉरंटमध्ये भेट म्हणून मेसेज केला होता. मेसेज वाचून समिधाला कळेना नकार कसा देऊ ते...
प्रेरणा: काय झालं समिधा..?
समिधा: अग मला राहुलचा मेसेज आला, गोल्डीला भेट म्हणून... मला कळत नाही आहे त्याला नाही कसं सांगू ते....
प्रेरणा: अग मग जा ना तू, तो निघाला ही असेल आता...
समिधा: अग पण...
प्रतिक: काही प्रॉब्लेम झाला आहे का समिधा...?
समिधा: सर ते राहुल मला गोल्डीला भेटायला बोलवतो आहे..
प्रतिक: अग मग भेट ना...
समिधा: सर पण मग प्रेरणा...(तिला पुढे काय बोलावं ते सुचेना)
प्रतिक: मी सोडतो तिला घरी डोन्ट वरी...हवं तर मी तुला ती घरी पोहचली की मेसेज करतो...
समिधा: सर मला तसं नव्हतं म्हणायचं...I know तुम्ही तिला घरी सांभाळून न्याल...पण मला समजत नाही आहे मी काय करु ते...
प्रेरणा: अग सर म्हणाले ना तुला, कशाला एवढा विचार करते आहेस...मेसेजचा रिप्लाय दे आता ओके म्हणून...तसं समिधाने राहुलला ओके म्हणून रिप्लाय दिला. समिधाने घरी ही कॉल करुन राहुल बरोबर जात असल्याचं सांगितलं. प्रतिकने ऑन द वे असलेल्या गोल्डी रेस्टॉरंटला समिधाला ड्रॉप केलं. प्रेरणा आणि प्रतिकने तिला बाय केलं आणि त्याने कार सुरु केली. थोडं अंतर गेल्यावर प्रतिकने प्रेरणाला विचारलं, तुझी हरकत नसेल तर मी सॉंग्स लावू का...?
प्रेरणा: हो सर चालेल...मला ही आवडेल ऐकायला...
प्रतिकने Radio FM सुरु केलं अनपेक्षितरित्या रेडिओ वर नुकतंच सैफ अली खानचं एजन्ट विनोद मधलं सॉंग सुरु झालं..
कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में 
सभी के लिए किसी ना किसी को है बनाया 
हर किसी के लिए 
तेरा मिलना है उस रब का इशारा 
मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए...
प्रतिकच्या मनात आलं कधी कधी गाणी सुद्धा किती situation ला perfect अशी आपोआपच लागतात...त्याने कारच्या आरशातून प्रेरणाकडे पाहिलं...प्रेरणा सॉंग ऐकत ऐकत इकडे तिकडे बाहेर पाहत होती...तोच तिची नजर प्रतिककडे गेली...तसं प्रतिकने लगेच नजर दुसरीकडे वळवली.तिच्याही मनात त्याक्षणी प्रतिकने तिला उचलून कसं नेलं होत ते आठवू लागलं...दोघेही आपसात काहीच बोलत नव्हते...एकमेकांना एकमेकांच्या नकळत पाहत होते...बोलायचं त्यांना खूप काही होतं पण कोणालाच सुरवात करता येत नव्हती. तोपर्यंत रेडिओवरच गाणं संपलं...आणि रेडिओवरची अँकर म्हणाली, ये गाना था एजन्ट विनोद मूवी का....बहुत दिल को छू जानेवाला सॉंग था ये...जब लब्ज काम ना करे तो कभी कभी गाना अपना कमाल दिखा जाता है...पर मै यहा कहना चाहुंगी, कुछ बातें ऐसी भी होती है जिनके लिये वक्त पर बोलना भी जरुरी होता है...वरना कही देर ना हो जाये....पुढचे शब्द प्रतिकच्या कानातच गेले नाहीत...तो मनात म्हणाला, हां यार मला ही संधी दवडायची नाही आहे आणि तो प्रेरणाला म्हणाला, प्रेरणा तुझी हरकत नसेल तर मला माझ्या काही खास फ्रेंड्स बरोबर तुझी ओळख करून द्यायची आहे...तू पण त्यांना भेटून खूप खुश होशील....तुला चालेल का...?
प्रेरणा: ( थोडं नवल वाटत) हो चालेल सर...पण म्हणजे आपण कुठे जात आहोत आता...त्यांच्या घरी का...? 
प्रतिक: अग नाही ग.... ते गार्डन मध्ये असतील या वेळेत...तुला चालेल ना पण....?
प्रेरणा: हो सर, मला चालेल....तसं मी आधीच घरी सांगून ठेवलं आहे, तुम्ही घरी सोडणार आहात ते...त्यामुळे घरी कोणी काळजी नाही करणार...पण नक्की कोण फ्रेंड्स आहेत ते...ज्यांना मी फर्स्ट टाइम भेटून सुद्धा खुश होणार आहे ते...?
प्रतिक: (हसून) हं कळेल तुला लवकरच...असं म्हणून त्याने कार गार्डनच्या दिशेला वळवली.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...