अस्तित्व - एक संघर्ष भाग-३

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-३


पुन्हा समिधा म्हणाली, ..नेक्स्ट वीक मध्ये मीना जॉईन होईल तोपर्यंत मी आणि प्रेरणा आहोतच आपल्या कस्टमर्सना हँडल करायला.... आणि  तुम्हाला ही माहीत आहे सर... हट्टी कस्टमर्सना सुद्धा प्रेरणा किती छान हँडल करते ते....तसा बराच वेळ शांत असलेला प्रतिक म्हणाला, प्रेरणा माहीत नाही कधी जॉईन होईल ते....?

सर, माहीत नाही म्हणजे....? उद्या येईल ना ती सर.... समिधा म्हणाली... 
तसं प्रतिकने कार रोडवर एका साईडला थांबवली आणि त्याने तिच्या घरच्या नंबरवर कामानिमित्त कॉल केल्यावर त्याच आणि प्रेरणाच्या भावाचं झालेलं संभाषण सांगितलं.. म्हणून मी आज बोरीवलीला यायला निघालो... तुला सोडून आता मी तिथेच जाणार आहे...

तशी समिधा म्हणाली, सर मी सुध्दा येऊ का...? तुमची काही हरकत नसेल तर....? 

तसा प्रतिक म्हणाला, मला तरी वाटतं इतक्यात तू नको जाऊस मी आधी जाऊन येतो नक्की काय झालं आहे ते कळू दे अजून मला ही इतकंच माहीत आहे की ती हॉस्पिटलमध्ये आहे. मी जाऊन येतो आधी मग उद्या ठरवू आपण काय करायचं ते.... तसं समिधाने मानेनेच होकार दिला.  तसं प्रतिकने कारचा दरवाजा उघडून समिधाला खुणेनेच बसायला सांगितलं.... आणि त्याने कार चालू केली. समिधाला त्याने तिच्या एरियामध्ये सोडलं तसं ती  म्हणाली सर काही माझ्या एन्डने हेल्प हवी असेल तर कॉल करा मी येईन हॉस्पिटल जास्त दूर नाही माझ्या घरापासून... मी येईन उशीर झाला असला तरी.... तसं प्रतिकने मानेनेच हो म्हंटलं आणि तो तिथून हॉस्पिटलच्या दिशेने कार घेऊन निघाला.

हॉस्पिटलच्या खाली आल्यावर त्याने प्रेरणाच्या भावाला कॉल केला आणि त्याने सांगितल्या प्रमाणे तो हॉस्पिटलमध्ये आला. वरती आल्यावर एक 50 च्या आसपास वय असलेली बाई आणि साधारण 20 च्या आसपास असलेला एक मुलगा सोफ्यावर बसलेलं प्रतिकने पाहिलं.. त्यांच्या पासून काही अंतरावर एक व्यक्ती पोलिसांशी आणि डॉक्टरांशी काहीतरी बोलत असल्याचे त्याने पाहिले त्यावरुन त्याने अंदाज लावला की हीच प्रेरणाची फॅमिली असावी. तसा तो सोफ्यावर बसलेल्या त्या मुलाकडे गेला आणि त्याने त्याची ओळख सांगितली तसं त्या मुलाने तो प्रेरणाचा लहान भाऊ विवेक असल्याचे सांगितले.

तेवढ्यात पोलिसांबरोबर आणि डॉक्टरांबरोबर बोलत असलेली व्यक्ती चक्कर येऊन खाली पडणार तोच पोलिसांनी  त्यांना सावरलं. तसा विवेक बाबा, म्हणून त्या व्यक्तीच्या दिशेने धावला. तसं पोलिसांनी आणि विवेकने त्यांना सोफ्यावर बसवलं. डॉक्टरांनी लगेच नर्सला बोलवून त्यांना चेक केलं. तसे डॉक्टर म्हणाले तुम्ही सकाळी काही खाल्लं नव्हतं का...? असं म्हणून त्यांनी त्यांचा बीपी चेक केला.  तुमचा बीपी लो झाला आहे. मी तुमची मनस्थिती समजू शकतो पण असं तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर कसं चालेल. त्यांनी नर्सला त्यांच्यासाठी कॅन्टीन मधून खायला घेऊन यायला सांगितलं. आणि सक्तीने प्रेरणाच्या आईबाबांना खाऊन घ्या म्हणून सांगितलं. तशी प्रेरणाची आई डॉक्टरांना म्हणाली मुलगी समोर अशी दिसत असताना आम्हाला कसं जाणार जेवण.... तसे डॉक्टर प्रतिक कडे पाहून म्हणाले यांना समजवण्याचा प्रयत्न करा...असं वागून कसं चालेल यांनी...? We are trying our best... आणि ती आज नाहीतर उद्या शुद्धीवर सुद्धा येईल. प्लिज सांगा यांना... असं म्हणून डॉ पोलिसांना घेऊन त्यांच्या केबिन मध्ये गेले. 

इथे कॅन्टीनमधून जेवण आलं तसं प्रतिक प्रेरणाच्या फॅमिलीला म्हणाला, तुम्ही खाऊन घ्या बघू आधी...  प्रेरणा जेव्हा ठीक होईल आणि तिला जेव्हा कळेल की तुम्ही असे उपाशी होतात तर तिला वाईट नाही का वाटणार... असं म्हणून त्याने प्रेरणाच्या वडिलांना आणि भावाला खायला भाग पडलं. पण प्रेरणाची आई काही केल्या खायला तयार नव्हती. तसा प्रतिक म्हणाला, काकू तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी किती स्ट्रॉंग आहे ते.... ऑफिसमध्ये जे खूप हट्टी कस्टमर्स येतात ना ती फक्त 15 ते 20 मिनिट मध्ये convince करते मग ती अशी खूप दिवस तुम्हाला दिसणार नाही बघा ती कशी पूर्वीसारखीच ठीक होते की नाही ते...! तशी प्रेरणाची आई प्रतिकचे हात हातात घेऊन म्हणाली, खरंच होईल ना ती पूर्वी सारखी... असं विचारताना तिच्या डोळ्यांतले अश्रू अनावर झाले होते. हो हो नक्कीच होईल का नाही होणार आणि मी आहे ना तिला पूर्वी सारखंच करेन की नाही बघा.... असं म्हणून त्याने आईला ही खायला भाग पाडलं... दुरुन पोलीस उप निरीक्षक काळे प्रतिककडे पाहत होते. त्यांनी प्रतिकला खुणेनेच त्यांच्याकडे बोलवून घेतलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all