अस्तित्व एक संघर्ष भाग-२८

It is a story of a girl who faced such a situation where she was totally destroyed...and at one point she fights for her identity...

अस्तित्व एक संघर्ष

भाग-२८


बाबा आणि प्रेरणा आदीच्या scooty ने स्टेशनला पोहचले. 

प्रेरणा:( scooty वरुन उतरुन) बाय बाबा...

बाबा: मी काय म्हणतो, तुझी ती ऑफिस मधली फ्रेंड येईपर्यंत थांबू का मी प्लॅटफॉर्मला तुझ्या बरोबर...?

प्रेरणा: नको बाबा, येईल हो ती लगेच....!!! तुम्ही उगाच जास्त काळजी करत आहात...

बाबा: काळजी वाटणारच ना बेटा....

प्रेरणा: तरी सुध्दा बाबा, तुम्ही घरी जावा....हवं तर मी ती आली की लगेच तुम्हाला कॉल करते मग तर झालं....!!

बाबा: करशील ना कॉल नक्की...?? 

प्रेरणा: हो बाबा, नक्की करेन... पण तुम्ही कॉल उचलणार तेव्हा साईडला थांबून उचला.... किंवा मग घरी जाऊन कॉल करा....

बाबा: हो ग, मी साईडला थांबूनच कॉल करेन, चल निघतो मी.... सांभाळून जा आणि ऑफिसमध्ये पोहचली की परत कॉल कर...!!

प्रेरणा: हो बाबा, नक्की.

तसे बाबा scooty घेऊन घरच्या दिशेने निघाले. ते अर्ध्या रस्त्यावर पोहचले तोच प्रेरणाने त्यांना कॉल केला...तसं त्यांनी साईडला scooty थांबवून तिचा कॉल उचलला. समिधा आली आहे आता आम्ही दोघी पुढची ट्रेन आली की पकडू हे कळल्यावर ते निश्चिन्त झाले आणि ते घरच्या दिशेने निघाले.

प्रेरणाचा कॉल चालू असतानाच समिधाला प्रतिकने प्रेरणा तिच्याच बरोबर आहे का हे कन्फर्म केलं. प्रेरणा तिच्याच बरोबर आहे हे कळल्यावर तो ही निश्चिंत झाला आणि ऑफिसमध्ये जायला निघाला. थोड्या वेळाने दोघीही ट्रेनने स्टेशनला पोहचल्या. प्रेरणाला आजूबाजूला पाहत असताना सतत मनातून भिती वाटत होती मध्येच ती समिधाचा हात पकडून चालत होती. दोघीही ऑफिसमध्ये पोहचल्या तसं security guard ने दोघींना हसून गुड मॉर्निंग केलं आणि प्रेरणाला म्हणाला, मॅम आपको देख बहुत खुशी हुई, अब आप आए हो तो अभी आपका डेस्क अब खाली नहीं दिखेगा...असं म्हणत असतानाच त्याने प्रेरणाला एक सुंदर फुलांचा बुके दिला.

प्रेरणा: ये किसका है....?

Security: मॅम आपके लिए है अभी आप आने पहले ही कुरिअर वाला आके देके गया...

प्रेरणा: ( बुके हातात घेत) पण दिलं कोणी....?

समिधा: अग ते ग्रीटिंग कार्ड आहे ना स्टिक केलेलं त्याला त्यात असावं मे बी नाव....चल आधी आपण डेस्कवर जाऊन लॉगिन करु मग बघू आरामात...!!

प्रेरणा: हं, चालेल....

तशा दोघीही डेस्कवर आल्या. दोघींनी लॉगिन केलं... आणि बुकेवर कोणाचं नाव आहे का बघण्यासाठी त्यांनी कार्ड ओपन केलं....आत एक मेसेज लिहिला होता....

तुझ्या येण्याने आज खरंच सकाळ 

माझ्यासाठी खूप सुंदर वाटत आहे...

-Your fan & well wisher...

समिधा: अग नाव कुठे आहे यात...फॅन म्हणे...आता कसं कळणार कोणी पाठवलं ते...?

प्रेरणा: कोण असेल ग...म्हणजे पाठवलं आहे ते ऑफिसमध्ये डायरेक्ट...

समिधा: कशाला एवढी घाबरते, बघ किती सुंदर फुलं आहेत ती... खूप भारी वाटतो हा बुके... ठेव असाच त्या टेबलवर... आणि ते कार्ड काढून ठेव... म्हणजे प्रश्नच येत नाही कोणी विचारायचा... आणि आज तू जॉईन झाली आहेस ना म्हणून तुला कोणी तरी पाठवलं असेल...सो काळजी नको करूस उगाच...

प्रेरणा: (कार्ड काढून पर्समध्ये ठेवत) हं ठीक आहे...पण मला का कोण जाणे असं काही बघितलं की खूप भिती वाटते...

समिधा: (तिच्या खांद्यावर हात ठेवत) मै हूं ना...कशाला घाबरतेस... आणि फॅन लिहिलं आहे बाय द वे ते...उगाच घाबरतेस... चल आता फ्रेश होऊन काम करायला घेऊ...

तसं दोघीही फ्रेश होऊन काम करण्यासाठी पुन्हा डेस्कवर आल्या. तोपर्यंत मीना ही आली. प्रेरणाला बघून तिने हातातली बॅग तशीच खाली ठेवून तिला मिठी मारली.

मीना: we miss you dear, खूप खाली वाटतं होतं आम्हाला तू नव्हतीस तर..अब तू आई है ना, तो अभी हमारे टीम जान आई है....

कस्टमर: मॅडम, प्लिज माझा फॉर्म घ्या...मला ऑफिसमध्ये जायचं आहे माझ्या...

मीना: हां हां घेतो, घेतो, थोडा वेळ थांबा...!! 

प्रेरणा: अग थांब, मी त्याचा फॉर्म घेते लगेच तोपर्यंत तू फ्रेश होऊन ये...

मीना: (बॅग डेस्कवर ठेवत) ओके डिअर, मी येते लगेच...!! (कस्टमर कडे पाहत) या मॅडम, तुमचं काम करतील लगेच...

तसा कस्टमर उठून प्रेरणाच्या समोरच्या कस्टमर चेअरवर येऊन बसला. तसं तिने त्याचा फॉर्म घेऊन चेक करायला घेतला.

समिधाने ही तिचं दुसरं काम करायला सुरुवात केली. दोघीही कामात बिझी असताना प्रतिक ऑफिसमध्ये आला. सवयीप्रमाणे त्याचं लक्ष प्रेरणाच्या डेस्कवर गेलं. प्रेरणाला पाहून त्याचा चेहरा आनंदाने खुलला. त्याने security guard ला समोरुन गुड मॉर्निंग wish केलं आणि तो त्याच्या केबिनच्या दिशेने वळला. त्याच्या आवाजाने समिधा आणि प्रेरणा दोघींना प्रतिक आल्याचं लक्षात आलं. दोघी त्याला काम करता करता गुड मॉर्निंग म्हणाल्या, तसं त्याने ही खूप खुश होत दोघींना very good morning म्हटलं आणि त्याच्या केबिनमध्ये गेला. समिधाला प्रतिकच्या आज चांगल्या मूड मागचं कारण प्रेरणा आहे हे समजून आलं... तिने गालातल्या गालात हसत पुन्हा तिचं काम करायला घेतलं. थोड्या वेळाने मीना तिच्या डेस्कवर आली. प्रतिक आलेला आहे पाहून तिने मी जागेवर नाही हे बघून सर भडकले तर नाहीत ना असं खुणेने समिधाला विचारलं... तसं समिधाने ही खुणेने नाही म्हणून सांगितलं. तशी मीना रिलॅक्स होऊन कामाला लागली. एक दीड तासानंतर प्रतिकने प्रेरणाला कॉल करुन केबिनमध्ये बोलावून घेतलं तशी प्रेरणा प्रतिकच्या केबिनमध्ये गेली.

प्रेरणा: मे आय कम इन सर...

प्रतिक: (हाताने खुर्चीत बसायला सांगत) येस प्रेरणा...

तशी प्रेरणा खुर्चीत बसली.

प्रतिक: कशी आहे आता तुझी तब्येत, काही त्रास होत असेल तर सांग मला...आणि मेडिसिन घेऊन आली आहेस ना बरोबर...

प्रेरणा: हो सर....आणले आहेत बरोबर...पुन्हा ऑफिस जॉईन करुन मला खरंच खूप छान वाटतं आहे...

त्यांचं बोलणं चालू असतानाच समिधा, मीना आणि HR प्रतिकच्या केबिनमध्ये आले, तसा प्रतिकही उठून उभा राहिला. त्याला अचानक असं उभं राहिलेलं पाहून प्रेरणाला काही कळेना... ती सगळ्यांकडे पाहू लागली. तिला असं पाहताना पाहून HR तिच्याजवळ गेली आणि तिने आणि सगळ्यांनी मिळून घेतलेलं गिफ्ट प्रेरणाला दिलं. 

प्रेरणा: हे कशासाठी...

HR: तू आपल्या कंपनी च्या टीमचा अविभाज्य भाग आहे आणि तुझ्या परत जॉइनिंग नंतर आम्हाला सगळ्यांना खरंच खूप छान वाटत आहे...असं म्हणून तिने प्रेरणाला मिठी मारली... तिच्यानंतर समिधा आणि मीनाने सुद्धा प्रेरणाला मिठी मारली.

प्रतिक: (प्रेरणाला हात मिळवत) Welcome back to our office Miss Prerna....my team is incomplete withoout you...(आणि मनात म्हणाला...I am also incomplete without you)

प्रेरणा: thank you Sir....( HR, समिधा आणि मीना कडे पाहत) thank you to all of you....(डोळ्यातलं पाणी पुसत) तुम्ही सगळ्यांनी माझा आजचा दिवस खरंच खूप स्पेशल केला आहे...

HR: (तिच्या खांद्यावर हात ठेवत) Don't cry dear, we are always with you... your family, your team & me...everyone is with you. 

प्रेरणा: Yes Ma'am...

तशी HR प्रेरणाला हात मिळवत तिचं काम करायला प्रतिकच्या केबिनमधून बाहेर पडली. आता केबिनमध्ये समिधा, मीना, प्रेरणा आणि प्रतिक होते.

प्रतिक: तुम्हां दोघींना तर माहित आहे की आपल्या इथे 2 इंटर्न आपण घेतले...(प्रेरणाकडे पाहत) आणि तुला ही माहीत आहे प्रेरणा या बद्दल...तर माझं असं म्हणणं आहे की जे मी तुम्हां दोघींना इंटर्नच्या कामाकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं त्यांचं काम चेक करायला सांगितलं होतं ते यापुढे प्रेरणा करेल...म्हणजे आताच ती जॉईन झाली आहे सो तिला एकदम कामाच्या pressure मध्ये मला टाकणं योग्य वाटतं नाही... आणि तिला हे काम दिल्यामुळे तुमच्या दोघींचा ही तो वेळ वाचेल...कसं वाटतं तुम्हां तिघींना याबद्दल...?

समिधा, मीना: सर, चालेल आम्हाला....!!!

प्रेरणा: पण सर मी काम करु शकते म्हणजे मला करायचं आहे....आधी सारखंच काम...

प्रतिक: प्रेरणा, हे बघ तू आधी सारखंच काम करणार आहेस, फरक फक्त एवढाच असेल तुला काही दिवस त्यांचं काम after लंच ब्रेक चेक करावं लागेल... सकाळी तू तुझं काम करु शकते तुला जे करायचं असेल ते...पण after lunch break त्यांचं काम चेक करावं लागेल... आणि हे तुला सतत नाही काही करायचं आहे म्हणजे अधून मधून ते बरोबर करत आहेत की नाही तेवढंच बघायचं आहे... चालेल ना मग...?

प्रेरणा: हो सर, मी बघेन त्यांचं काम...

तिघी: सर, आम्ही जाऊ मग डेस्कवर...?

प्रतिक: हो हो चालेल... आणि प्रेरणा मेडिसिन वेळेवर घेत जा...

प्रेरणा: हो सर...

तशा तिघी ही आपआपल्या डेस्कवर आल्या आणि पुन्हा कामात बिझी झाल्या. दुपारची वेळ झाली तसे इंटर्नशिपला असलेले विवेक आणि अनिकेत दोघेही ऑफिसमध्ये आले. समिधाने अनिकेेेतची ओळख प्रेरणा बरोबर करुन दिली आणि प्रेरणा यापुढे त्यांचं काम बघणार असल्याचं सांगितलं.

प्रेरणाने प्रतिकने सांगितल्या प्रमाणे आफ्टर लंच विवेक आणि अनिकेतचं काम अधून मधून बघायला सुरवात केली. त्यांचं काम चेक करून तिने त्यांना त्या संबंधी इतर गोष्टी पण लक्षात आणून दिल्या. दोघांनी त्या गोष्टी नोट करुन ठेवल्या. प्रेरणाच अधून मधून टेबलवर ठेवलेल्या बुकेकडे लक्ष जात होतं. तिच्या सतत मनात एकच विचार येत होता की नक्की कोणी हा बुके पाठवला असेल....

सगळ्यांची ऑफिस ड्युटी संपली तसं मीना, अनिकेत सगळ्यांना बाय करून निघाले. समिधा, प्रेरणा आणि विवेक ऑफिसमधून एकसाथ घरी जायला निघाले. विवेक आणि समिधा प्रेरणा बरोबर आहेत म्हणून प्रतिक ही निश्चिंत होऊन ऑफिसमधून निघाला. 

असेच दिवसामागून दिवस जात होते. प्रतिकची आजी सुद्धा लेकीकडून पुन्हा मुलाच्या घरी राहायला आली होती. डॉ नी सांगितल्या प्रमाणे मेडिटेशन करुन प्रेरणामध्ये improvement दिसून येत होती. पण रोज बुके नक्की कोण पाठवत याचं उत्तर तिला अजूनही उलगडत नव्हतं...तिच्या मनातली भिती निघून आता बुके पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दल उत्सुकता लागून होती. 

क्रमशः

🎭 Series Post

View all