Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष भाग-२५

Read Later
अस्तित्व एक संघर्ष भाग-२५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-२५


प्रेरणा आणि सगळेजण घरी पोहचले, तसं लगेच थोड्या वेळाने मालगुडे काका आणि काकू त्यांच्याकडे आले.

मालगुडे काकू: (आईला उद्देशून) वहिनी, जेवण नका बनवू तुम्ही... आज आमच्याकडेच यायचं आहे जेवायला....!

प्रेरणाची आई: कशाला उगाच त्रास तुम्हाला.... मी बनवेन लगेच..

मालगुडे काका: अहो वहिनी, त्रास कसला त्यात...आज आमचा आदी पण येतोय घरी....आमच्या सूनबाई सोबत... तेव्हाच ठरवून टाकलं आम्ही दोघांनी आज तुम्हाला सुद्धा आमच्या आनंदात सहभागी करुन घ्यायचं...

प्रेरणाचे बाबा: अरे वाह, आदी येतोय....खरंच खूप आनंदाची बातमी दिली...( आईला उद्देशून) अग ताईंना काही मदत हवी असेल नसेल तर बघ.... आम्ही आहोत प्रेरणाबरोबर....

मालगुडे काका: अहो, आनंदाची बातमी फक्त आदी येतोय ही नाही आहे काही....आमच्या सूनबाईला सातवा महिना चालू आहे...आणि बाळंतपण आम्ही आमच्याच घरी करायचं ठरवलं आहे...

प्रेरणाचे बाबा: (मालगुडेंना मिठी मारून) वाह वाह म्हणजे लवकरच तुम्ही आजोबा होणार तर...

मालगुडे काकू: हो आणि मी आजी...तर मग या हां सगळ्यांनी जेवायला...

प्रेरणाची आई: मी पण येते तुमच्या बरोबर मदतीला...असं म्हणून आईने बाबांना प्रेरणा बरोबर थांबायला सांगून ती मालगुडे काकूंना मदत करायला निघून गेली.

 

थोड्या वेळाने आदित्य आणि त्याची बायको दोघेही घरी आले... मालगुडे काकूंनी सुनेची नजर काढून तिला आत घेतलं. अनन्या साठी तिच्या सासूच वागणं नवीन होतं... तिला आता आदी आणि तिच्या सासऱ्यांच्या बोलण्याची खात्री पटली... की खरंच आता आपल्या सासूबाई आता पूर्वी सारख्या नाही राहिल्या आहेत. ती मनात खूप खुश होती. तिला असं वाटतं होतं कधी एकदा तिची मैत्रिण प्रेरणाला जाऊन भेटून येते....सासूच्या वागण्यामुळे आदी आणि अनूने त्यांच्या बाळाची बातमी सगळ्यांपासूनच लपवून ठेवली होती. घरी आल्या आल्या लगेच कसं प्रेरणाला भेटायला जाणार याचाच ती विचार करत होती. तिला असं कसल्या तरी विचारात असलेलं पाहून मालगुडे काकू तिला म्हणाल्या, अग अनू इथे आम्ही काम करतोय, तू कंटाळशील बसून बसून... (आदीला उद्देशून) एक काम कर आदी अनूला प्रेरणाकडे नेऊन सोड... दोघी एकमेकींशी गप्पा तरी मारतील.... आपलं जेवण झालं की बोलवू मग आपण....!!

त्यांचं हे बोलणं ऐकून अनूला आपल्या मनासारखं होत असलेलं पाहून खूप आनंद झाला. ती आदीचा हात धरुन धरुन प्रेरणाला भेटायला गेली. दोघांना आलेलं पाहून प्रेरणाचे बाबा खूप खुश झाले. 

प्रेरणाचे बाबा: अरे आदी, अनू बसा बसा....!!

अनू: काका, मला प्रेरणाला भेटायचं आहे...

प्रेरणाचे बाबा: हो हो, ती बेडरूम मध्ये आहे....

अनू: काका, मी भेटून येते प्रेरणाला.... कधी एकदा भेटते असं झालं आहे मला...असं म्हणून ती हळूहळू चालत पबेडरूममध्ये प्रेरणाला भेटायला गेली.

तिला आलेलं पाहून विवेकने तिची विचारपूस केली आणि तिला प्रेरणाच्या बाजूला बसायला सांगून बाहेर आदी बरोबर बोलायला गेला.

अनू: कशी आहेस प्रेरणा...? खूप मिस केलंय मी तुला....!!

प्रेरणा: (अनूला हळूच मिठी मारत)....अभिनंदन.... तुम्हा दोघांना...खूप खुश आहे मी तुम्हा दोघांसाठी...

अनू: हं ही सगळी कमाल तुझ्या टीममधल्या प्रतिकची...माझ्या कडक सासूबाई आज त्याच्यामुळेच एकदम नरम झाल्या स्वभावाला... आता तर म्हणतात मला नातू नको नात हवी आणि बरं का प्रेरणा आतूने नाव ठेवायचं आहे बरं का...!! आमच्या सासूबाईंचा हुकूमच आहे तो..

तशा दोघीही हसल्या...

प्रेरणा: प्रतिक माझा टीम मेंबर नाही आहे....!!

अनू: मग....?

प्रेरणा: अग मी त्यांना रिपोर्ट करते ऑफिसमध्ये.... He is my boss....!!

अनू: अय्या... मी आपलं प्रतिक बद्दल कळल्यापासून स्वप्न रंगवत होते...मला वाटतं होतं की तुला त्याच्या सारखा जोडीदार मिळायला हवा असं....

प्रेरणा थोडा वेळ गप्पच झाली. तिला प्रतिकने तिला कसं उचलून कारमध्ये बसवलं होतं हे आठवू लागलं....

तिला असं विचार करताना पाहून अनूला तिची चूक लक्षात आली....

अनू: प्रेरणा सॉरी डिअर, माझ्यामुळे तू दुखावली गेली असशील तर....पण आम्हाला सगळ्यांना वाटतं ग, तुला समजून घेईल असा जोडीदार मिळावा असं...

प्रेरणा: अनू, माझ्या नशिबात ही गोष्ट नाही आहे ग....आणि मला ती लग्न संसार ही स्वप्न आता पहायची सुद्धा नाही आहेत...मला खरंच कोणाची सहानुभूती नको आहे..

तिला असं बोलताना पाहून अनूने तिचे हात हातात धरले.

अनू: प्रेरणा, प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस, यात तुझी काहीच चूक नव्हती.

तेवढ्यात मालगुडे काकू आणि प्रेरणाची आई अनू आणि प्रेरणासाठी जेवणाचं ताट घेऊन आल्या. 

अनू: (जागेवरुन उठत) आई मी आले असते...

मालगुडे काकू: अग बस ग, इथेच जेवायला...प्रेरणाला पण कंपनी होईल तुझी.... आणि काही हवं असेल तर तुझ्या नवऱ्याला हाक मार.....तो लगेच घेऊन येईल...(प्रेरणाला उद्देशून) प्रेरणा लवकर ठीक व्हायचं आहे बघ तुला कधीच नववा महिना लागेल आमच्या अनूला.... आणि बाळाच नाव तुलाच ठेवायचं आहे... आदीला तू दादा म्हणून राखी बांधतेस ना...मग त्या नात्याने तू आत्या नाही का होणार....मग आता लवकर ठीक हो... नंतर आपल्याला पळायचंच आहे बाळाच्या मागे...आता तुम्ही दोघी गप्पा मारत जेवा.... आणि आराम करा.... आम्ही दोघी बघू काय काय काम करायची आहेत ते...हो ना प्रेरणाची आई...

प्रेरणाची आई: हो हो, चला आपण जाऊ बाकीच्यांना पण वाढायचं आहे ना....असं म्हणून प्रेरणाची आई मालगुडे काकूंबरोबर त्यांच्या घरी निघून गेली.

 

प्रतिक घरी पोहचून फ्रेश होऊन आईबाबांना प्रेरणाबद्दल सांगणार तोच राजीवचा त्याला कॉल आला.

प्रतिक: हां बोल राजीव....

राजीव: Guess what काय सांगायला मी तुला कॉल केला...

प्रतिक: तू रेखाचा लग्नासाठी होकार मिळवलेला दिसतोय....

राजीव: आयला भारी ओळखलं रे....

प्रतिक: हां तो, मेरे जिगरी यार के दिल की बात मुझे नहीं क्या पता चलेगी....!! अब बता शादी कब कर रहा है....?

राजीव: मेरे दोस्त की और मेरी शादी एक ही मंडप में करने का इरादा है मेरा....

प्रतिक: (हसण्यावर नेत) मग तर तुला बरीच वर्षे वाट पहावी लागेल...

राजीव: (हसून) नाही होणार आहे तसं, बघ मी सांगतो तुला आजच्या तारखेपासून फक्त 10 महिन्याच्या आत... नाही आपल्या लग्नाची तारीख ठरली तर प्रोफेशनने वकील नाही मी...!! आणि प्रेरणा तुला नक्की लग्नाला तयार होणार.... खात्री आहे माझी...!! ते सोड एकदम महत्वाचं...आजी कधी येतेय....? मला यावं लागेल ना तुझ्या घरी पुन्हा...??

प्रतिक: डोन्ट वरी ती इतक्यात येत नाही आहे, तरी अजून एक महिना तरी राहायला लावल्याशिवाय आत्या पाठवणार नाही आहे...

राजीव: हं, चांगलं आहे..तोपर्यंत केसचा पण निकाल लागेल...प्रतिक मला तुला एक गोष्ट सांगायची आहे...

प्रतिक: कोणती गोष्ट...?

राजीव: अरे तो नरेश होता ना, त्याच्या बायकोबद्दल...तिला कुठे काम असेल तर बघा म्हणून मि जाधव म्हणाले होते...तर त्यांनी नंतर कॉल करुन मला त्याच्या बायकोबद्दल सविस्तर माहिती दिली... म्हणजे विश्वास ठेवू शकाल असं प्रामाणिकपणे काम करते...माझ्या ऑफिसमध्ये तशी एक मावशी होती लादी, कॉफी बनवायला, सफाईसाठी वगैरे काम करायला... पण आता त्यांचं वय झालं... मग मी तसं ही शोधत होतो तर तुला काय वाटतं मी हिला कामावर ठेवू का...?

प्रतिक: (काहीसा विचार करत) हो चालेल ना...!! हे बघ तशी ही तिला कामाची खूप गरज आहे.... आणि तिला तुझ्या ऑफिसमध्ये काम मिळत असेल तर चांगलंच आहे... म्हणजे इतर ठिकाणी तिच्या नवऱ्याबद्दल कळाल्यावर तिला तसं ही काम मिळेल का याची मला शंकाच आहे...तू ठेव तिला तुझ्या ऑफिसमध्ये मावशींच्या जागी कामाला.... पण फक्त नावापुरती तिची मुलाखत घे...

राजीव: हो हो चालेल तसंच करतो मग, उद्याच मि जाधव यांना सांगतो..चल मग काका काकूंना पण सांग माझी गुड न्यूज...आणि येईन मी मध्ये कधीतरी तुझ्या ऑफिसमध्ये... चल बाय.... असं म्हणून राजीवने कॉल ठेवला.

 

क्रमशः

 

( कथेचा भाग उशिरा पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व...पुढचा भाग लवकर पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेन.....)

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...