Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष- भाग-२४

Read Later
अस्तित्व एक संघर्ष- भाग-२४
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-२४


घरी आल्यावर रेखाला एवढं खुश पाहून आईबाबांनी उत्सुकतेने तिला पार्टी मध्ये काय काय झालं म्हणून विचारलं.

रेखा: हो हो सांगते मी सगळं...आले मी लगेच फ्रेश होऊन....

थोड्या वेळाने रेखा फ्रेश होऊन सोफ्यावर दोघांच्या मध्ये येऊन बसली. तोपर्यंत अभ्यास करत असलेला तिचा भाऊ अमित बाहेर आला. तसं तिने त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगितला. आईबाबा दोघेही ऐकून खूप खुश झाले. आनंदात रेखाने तिच्या बोटातील अंगठी आईबाबांना दाखवली.

अमित: (मस्करी करण्याच्या उद्देशाने) आईबाबा, तुम्हाला खूप काळजी होती ना दिदीची... तुला कसं कोण सांभाळून घेणार म्हणून.... तर बघ ब्रम्हदेवाने ही केस हँडल करायला वकीलच पाठवले...

आईबाबा: (हसू आवरत) गप्प बस....

रेखा: (त्याच्या मागे त्याला मारायला धावत) काय बोललास तू..?

बाबा: खरचं, मुलगी कधी लहानाची मोठी होऊन लग्नाची होते कळतं सुद्धा नाही....

आई: हो खरं आहे ते...पण मला याक्षणी खरंच खूप आनंद होतो आहे आपल्या मुलीला राजीव सारखा जोडीदार मिळाला त्याचा...

बाबा: ( आईच्या हातावर हात ठेवून) हो मला ही खूप आनंद होतो आहे..तोपर्यंत रेखा पुन्हा त्या दोघांकडे आली.

रेखा: चला झोपा आता, वाजले बघा किती... उद्याच नाही जायचं मला सासरी...तुम्ही दोघे असं विचार करत बसलात ते....

असं म्हणून तिने त्यांना झोपायला पाठवलं आणि राजीवला गुड नाईट बोलून स्वतः पण झोपी गेली.

 

दुसऱ्या दिवशी रेखाने तिचं whatsapp चेक केलं. राजीवचा मेसेज पाहून तिने तो लगेच ओपन केला.

राजीव: गुड मॉर्निंग डिअर.... तुझ्या इच्छेप्रमाणे तुझं गिफ्ट काल घरी आल्यावरच पाहिलं...घड्याळाची तुझी चॉईस आवडली बरं का....! आणि काल मला वाटलं होतं तू बोलशील ऑनलाइन पण तू लवकर झोपलीस....घरी ओरडले का....?

त्याचा मेसेज वाचून तिने त्याला लगेच कॉल करुन आईबाबांशी झालेलं बोलणं सांगितलं.... ऐकून राजीवही खूप खुश झाला.

राजीव: मग आता पुढच्या रविवारी तुझे सासू सासरे येणार आहेत बरं का...तुझ्या आईबाबांशी बोलायला....

रेखा: कोणी तरी गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहे वाटतं...

राजीव: छे छे, मला बिलकुल घाई नाही...ते आईबाबच मागे लागले आहेत तुझ्या आईबाबांना भेटण्यासाठी...

रेखा: हं, चालेल मग मी सांगते घरी...ओके बाय बाय... असं म्हणून दोघांनी कॉल ठेवला.

 

आज प्रेरणाला डिस्चार्ज मिळणार म्हणून प्रतिक रविवार असून सुध्दा लवकर उठला आणि अंघोळ करुन नाश्त्याला आला.

आई: अरे, आज लवकर उठलास...ऑफिस मध्ये काही काम आहे का...?

प्रतिक: नाही ग आई, आज प्रेरणाला डिस्चार्ज देणार आहेत.

बाबा: हं, सकाळी च देणार की संध्याकाळी....

प्रतिक: सकाळी च देणार आहेत... मी जातोय हॉस्पिटलमध्ये.... म्हणजे काही मदत हवी असेल तर करु शकेन..

बाबा: (त्याच्या पाठीवर हात थोपटून) ठीक आहे त्यांना घरापर्यंत सोड त्यांच्या... म्हणजे परत ola वगैरे त्यांना करावी लागणार नाही...

प्रतिक: (नाश्ता पूर्ण करत) हो बाबा....आई निघतो मी... असं म्हणून तो हॉस्पिटलमध्ये जायला निघाला.

 

प्रेरणाच्या आईबाबांनी मिळून प्रेरणाला व्हीलचेअरवर बसवलं.... आणि आईला तिथेच बसायला सांगून बाबा विवेक बरोबर conuter ला डिस्चार्ज चे फॉर्म भरायला निघून गेले. थोड्या वेळाने प्रतिक हॉस्पिटलमध्ये पोहचला... विवेक आणि बाबांना काउंटरकडे पाहून तो त्यांच्याकडे आला.

प्रतिक: काका काही मदत हवी आहे का....??

बाबा: नाही नाही सगळे फॉर्म झाले आहेत भरून.... आता फक्त ola बुक करायची आहे ती आली की मग निघणार...

प्रतिक: काका, मी कार आणली आहे, आपण तिच्याने जाऊ...ola नका बुक करा. 

बाबा: ठीक आहे आपण निघू मग...

तेवढ्यात नर्स प्रेरणाच्या बाबांकडे आली आणि तिने डॉ नी काही instruction सांगायला तुम्हाला बोलावलं आहे म्हणाली.

बाबा: (प्रतिककडे पाहत) तुमची हरकत नसेल तर मी आणि विवेक डॉ शी बोलून येईपर्यंत तुम्ही प्रेरणाला लिफ्ट मधून न्याल का...? तिची आई पण आहे तिच्याबरोबर...तिला ते पार्किंग लिफ्ट च काही समजत नाही तितकं...गोंधळून जाते ती...म्हणून न्याल का त्या दोघांना... कोणी नवीन पेशंट admit होणार आहे प्रेरणा ज्या बेडवर होती त्या बेडवर म्हणून जास्त वेळ तिथे थांबणं योग्य नाही वाटतं मला...त्यामुळे तुम्ही न्याल का...? मी आणि विवेक लगेच येतो डॉ शी बोलून...

प्रतिक: हो हो काका काही हरकत नाही, मे नेतो दोघांना सांभाळून... असं म्हणून प्रतिक प्रेरणाच्या रूममध्ये गेला आणि बाबा विवेक डॉ च्या केबिनमध्ये गेले.

 

प्रेरणाच्या रुममध्ये गेल्यावर आई आणि प्रतिक दोघेही लिफ्टने पार्किंग एरिया मध्ये आले. लिफ्टचा दरवाजा उघडताक्षणी त्यांना एक लेडी दिसली. समोर प्रेरणा wheel chair बसलेली पाहून ती लेडी म्हणाली, तुमची हरकत नसेल तर मला ही चेअर मिळेल का....(टॅक्सी मधल्या एका वयोवृद्ध बाईकडे हात दाखवत) माझ्या आईला ऍडमिट करायचं आहे आणि तिच्या दोन्ही पायांवर fracture असल्याने चालता येत नाही आहे...मी हॉस्पिटलमध्ये कॉल करत होते पण नंबर बिझी येत होता... त्या टॅक्सी ड्राईव्हरला पण दुसरं भाडं आहे तिथे पोहचायच आहे त्यामुळे मला तुम्ही चेअर देऊ शकतात का....??? तिची विनंती ऐकून प्रेरणा मानेने हो म्हणून आईचा हात धरुन उठली... आणि ती चेअर त्या लेडी ला घ्यायला सांगितली. तसं त्या लेडीने टॅक्सी ड्रायव्हर आणि प्रतिकच्या मदतीने तिच्या आईला चेअरवर बसवलं आणि ती सगळ्यांना thank you so much म्हणून लिफ्टने निघून गेली. ती गेल्यावर आई म्हणाली, प्रेरणा तुला जमणार आहे का कारपर्यंत चालायला....???

प्रेरणा: आई त्यांना माझ्यापेक्षा जास्त गरज होती....म्हणून मी चेअर दिली...

आई: अग पण...

(प्रतिकने आईला खुणेनेच प्रेरणाला उचलून नेतो असं सांगितलं.... आणि आईने सुद्धा खुणेने चालेल म्हणून सांगितलं.  तसं त्याने आईकडे चावी देऊन प्रेरणाला उचललं)

प्रेरणा:( अचानक उचलेलं पाहून) सर....सोडा मला...मी चालेन...

प्रतिक: एकदम चूप....आता जोपर्यंत कार मध्ये बसत नाही तोपर्यंत एकदम चूप....

प्रतिकला असं तिच्या बरोबर वागताना पाहून प्रेरणा त्याच्याकडे पाहतच राहिली...आणि आई सुद्धा प्रतिक आपल्या मुलीची किती काळजी घेतो आहे हे पाहून खूष झाली... तिघेही प्रतिकच्या कार पाशी आले तसं आईने कारचा दरवाजा उघडला आणि प्रतिकने प्रेरणाला सावकाश बसवलं. तिच्याबरोबर आई सुद्धा बसली. आईने प्रतिककडे कारची चावी देऊन बाबांना कॉल केला...तोच बाबा दुरुन येताना प्रतिकला दिसले.

प्रतिक: काकू, नका करु कॉल, ते बघा काका आणि विवेक येत आहेत. ते दोघेही कारपाशी आले तसं विवेक प्रेरणा आणि आई बरोबर मागे बसला आणि बाबा प्रतिक बरोबर पुढे बसले.प्रेरणा सगळ्यांच्या नकळत प्रतिककडे पाहत होती.... सगळेजण बसले तसे प्रतिकने कार सुरु करुन प्रेरणाच्या घरच्या दिशेने वळवली....

 

थोड्याच वेळात कार प्रेरणाच्या अपार्टमेंटकडे आली तसं प्रतिकने कार पार्क केली. बाबा आणि आईने हात धरुन प्रेरणाला कार मधून उतरवले.

बाबा: (प्रतिकला म्हणाले) तुम्ही पण येत आहात ना....?

प्रतिक: नाही नाही काका, पुन्हा कधीतरी...मी निघतो आता...

बाबा: चालेल पण नक्की या....

प्रतिक: हो हो...

प्रेरणाने तिच्याही नकळत प्रतिककडे पाहिलं.....तिला असं पाहताना बघून प्रतिकने तिला हसून बाय केलं.....तसं तिने ही त्याला डोळ्यांची उघडझाप करुन प्रतिसाद दिला आणि आईबाबांबरोबर लिफ्टच्या दिशेने हळूहळू एक पाय टेकवत गेली.

विवेकने कारमधून सगळं सामान घेतलं....प्रतिकने काही राहिलं ना ते चेक केलं...

विवेक: thank you sir, तुम्ही खूप मदत केली आम्हाला....

प्रतिक: अरे thank you काय.... (असं म्हणून त्याने विवेकच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला) काळजी घे, दिदीची... काहीही मदत हवी असली तर मला सांग....आणि उद्या पहिला दिवस आहे ना ऑफिसचा... तर मग उशीर नको करुस....तुला तुझा half de proper भरायचा आहे लक्षात ठेव....

विवेक: हो सर, चालेल मी वेळेत येईन....असं म्हणून विवेकने प्रतिकचा निरोप घेतला.

विवेक जाताक्षणी प्रतिकने ही कार त्याच्या घरच्या दिशेने वळवली.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...