Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष- भाग-२३

Read Later
अस्तित्व एक संघर्ष- भाग-२३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

 भाग-२३


राजीवने बाबांनी सांगितल्याप्रमाणे राज रेस्टॉरंट च्या मॅनेजर आकाशशी बोलून त्याला हवी असलेली अरेंजमेंट करायला सांगितली. मग त्याने लगेच रेखाला कॉल करुन संध्याकाळी मी तुला 7.30 ला घ्यायला येईन आणि रेड ऑर ब्लॅक असा ड्रेस कोड असल्याचं सांगितलं. राजीवशी बोलणं झाल्यावर रेखाने आपल्या आईबाबांना राजीव यांच्या केसच्या success party ला जात असल्याचे सांगितले.

आई: कशी जाणार आहेस तू...?

रेखा: अग ते राजीवच येतील घ्यायला...

बाबा: उशीर झाला तर कॉल कर ग...तुला तर तुझी आई माहीत आहे ना किती काळजी करते ती...!!

रेखा: हो बाबा...आणि राजीव आहेत ना ते सोडतील घरी... तरी मी कॉल करेन तिथून निघाले की...

बाबा: राजीव आहेत सोडायला म्हणजे काळजी नाही...तुझ्या कडून आणि टीव्ही वर ही इतकं ऐकलं आहे त्यांच्या बद्दल की तुला ते घरापर्यंत सोडतील याची खात्रीच आहे...

रेखा: मला ड्रेस काय घालू ते कळतं नाही आहे... रेड ऑर ब्लॅक ड्रेस कोड आहे म्हणाले...

आई: अग तो तू हल्ली घेतला तो रेड वाला one piece तो घालून जा ना...!!!

बाबा: हो हो, त्या ड्रेसला ही बरं वाटेल.... कपाटातून बाहेर पडलो मी एकदाचा म्हणेल.

रेखा: बाबा, तुमचं काहीतरीच असतं...हल्ली तर घेतला मी...आणि काहीतरी कारण तर हवं ना तो ड्रेस घालायला... kuthe पार्टी नव्हती की कोणतं function मग कसा घालणार...?

आई: अग म्हणून तर म्हणतेय तोच घाल...

रेखा: हा चालेल....तोच घालते मग... असं म्हणून रेखा संध्याकाळसाठी तयारी करु लागली. 

काही घाई होता कामा नये म्हणून तिने 6.30 ला तयारी करायला घेतली. राजीव साठी घेतलेलं गिफ्ट विसरून जाता कामा नये म्हणून तिच्या पर्स बरोबरच ठेवलं. थोड्या वेळाने आई तिच्या रूममध्ये आली. तिला त्या ड्रेसमध्ये पाहून आई तिची दृष्ट काढत म्हणाली, माझीच नजर लागायची तुला...खूप सुंदर दिसते आहे आज माझी लेक....लवकर ये हा घरी जास्त उशीर करु नकोस...

रेखा: हो ग आई, लवकर येईन मी... आणि आईची कधी नजर लागत नाही मुलीला...

आई: हं, किती वाजता निघणार आहेस मग...

रेखा: 7.30 ला येणार म्हणाले राजीव... आले की कॉल करतील ते...आहेत तशी अजून 10 मिनिटे...

तेवढ्यात राजीवचा कॉल आला...

राजीव: हा आलो आहे मी...खाली ये पार्किंगकडे आहे.

रेखा: हो हो, ठीक आहे.... निघते मी घरुन.... असं म्हणून तिने कॉल ठेवला.

आई: त्यांचाच कॉल होता ना...!

रेखा: हो आई, आले आहेत ते खाली मी निघते आता...चल बाय... असं म्हणून ती घरातून पार्किंगच्या दिशेने जायला निघाली.

दुरुन येणाऱ्या one piece मधल्या रेखाला पाहून राजीव पाहतच राहिला... त्याला असं तिच्याकडे पाहताना पाहून तिला त्यांची पहिली भेट आठवली. ती त्याच्या कारपाशी पोहचली.

रेखा: (लाजून हसत) निघायचं का आपण.

राजीव: (भानावर येत) हो हो... असं म्हणून त्याने दरवाजा उघडून बसायला सांगितलं आणि त्याने कार सुरू केली. 

रेखा: कुठे जात आहोत आपण...

राजीव: कळेल तुला...

रेखा: तुमची GF येणार होती ना....!!

राजीव: हो येणार आहे ना तिथेच येईल ती डायरेक्ट....

रेखाच हे ऐकून मूड खराब झाला होता पण तिने तसं दाखवलं नाही. थोड्या वेळाने दोघेही राज रेस्टॉरंटला पोहचले. राजीवने कार पार्किंगला लावून दोघांनी आत प्रवेश केला. रेस्टॉरंट मध्ये खास कपल साठी अरेंज केलेला एरिया मस्तच होता. छोटंस गार्डन, सेल्फी पॉईंट, आणि त्यात भर म्हणून आकर्षक पडदे.... हे सगळं पाहून रेखाने राजीवला विचारलं, हे खूप महाग होईल ना...

राजीव: तुला आवडलं की नाही.... तेवढंच सांग मला....आणि मला आजचा दिवस आपल्यासाठी यादगार करायचा आहे...

रेखा: खूप आवडलं... पण...

राजीव: पण बिन काही नाही चल आपल्या टेबलवर.

राजीवने सांगितल्याप्रमाणे त्या दोघांसाठी एक टेबल सगळ्या टेबलपासून दूर असं आधीच बुक करण्यात आलं होतं.... त्या टेबलवर दोघेही गेले. टेबलवर 2 मोठ्या candle च्या मध्ये फ्लॉवर पॉट त्यात गुलाब ठेवण्यात आले होते...राजीवने खुर्ची पुढे करून तिला बसायला सांगून तो ही बसला.

दोघेही बसल्यावर  तिने राजीवला न राहवून विचारलं, हे candle वगैरे का...?

राजीव: अग ती पण येणार आहे ना तिच्यासाठी.

रेखाचा चेहरा पुन्हा एकदा हे ऐकून उतरला. राजीवच्या ते लक्षात आलं त्याने तिच्याकडे मेनुकार्ड देत तिची आणि त्याची ऑर्डर करायला सांगितलं. तिने ऑर्डर देऊन वेटरला पाठवलं.

रेखा: तुम्ही ऑर्डर आपल्या दोघांची दिली. तुमच्या GF ला उपाशी ठेवणार का...?

राजीव: (रेखाच निरीक्षण करत) अग नाही ग तिला थोडा लेट होईल म्हणाली.

रेखा: ( त्याच्याकडे गिफ्ट देत) हे तुमच्यासाठी आहे....नंतर बघा निवांत... घरी गेल्यावर... उगाच तुमच्या GF ला माझं गिफ्ट देणं चुकीचं वाटता कामा नये...आणि तुम्ही मला तिच्याबद्दल काहीच का सांगत नाही.

राजीव: (मनात काही विचार करत) ठीक आहे मी तुला तिचा फोटो दाखवतो... तुझं wallet दे मला..मी त्यात फोटो ठेवतो मग बघ...

रेखा: (wallet देत) हा काय आता प्रकार आहे... सरळ पण दाखवू शकतात की...

राजीव: (wallet मध्ये काहीतरी ठेवत असल्याचं नाटक करत) हे घे आता बघ..असं म्हणून wallet चा आरसा तिला दाखवत म्हणाला, हीच आहे ती....

रेखा: (तिने wallet हातात घेतलं) यात तर..यात तर...मी आहे...म्हणजे..

तोपर्यंत राजीव हातात गुलाब घेऊन तिच्या समोर गुडघ्यात वाकून म्हणाला, हो तूच आहेस माझ्या आयुष्यात....माझी GF म्हणून..सांग मला..

आवडेल का तुला माझी आयुष्यभराची केस तुझ्या कोर्टात चालवायला..?

रेखा लाजून लाजून चूर झाली होती... तिने राजीवच्या हातातलं गुलाब घेत त्याच्या गालावर मारलं.

राजीव: (उठत) मग मी नकार समजू..का...?

रेखा: (राजीवच्या कानाकडे येत हळूच म्हणाली) मी तयार आहे सौ राजीव व्हायला.

राजीव हे ऐकून इतका खूश झाला की त्याने रेखाला आनंदाच्या भरात मिठीच मारली.

मॅनेजर आकाशने ठरल्याप्रमाणे हीच योग्य वेळ समजून दोघांच्या डोक्यावर confetti bomb फोडला.

तसे दोघेही एकमेकांच्या मिठीतून वेगळे झाले. दोघेजण एकमेकांना पाहत असतानाच ठरल्याप्रमाणे गाणं सुरु झालं,

 

दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके

सबको हो रही है, खबर चुपके चुपके..

 

ते दोघेही एकमेकांना हसून पाहत होते आणि सगळे कपल त्या दोघांनाच पाहत होते. तसं आकाशने announcement केली. Hello Everyone, डोन्ट वरी, मै आप सबका ज्यादा टाइम नहीं लुंगा. (त्यांच्याकडे हात करत) आज की शाम ये कपल के नाम है..Rajiv & Rekha are going to engaged very soon...तोच राजीवने खिशातून रिंग काढत गुडघ्यावर बसून रेखाकडे हात मागत तिच्या बोटात रिंग घातली. तसं मॅनेजर सकट सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तोपर्यंत वेटर त्यांच्यासाठी कट करायला केक घेऊन आले. तसं दोघांनी मिळून तो केक कट करुन एकमेकांना भरवला. पुन्हा सगळ्या कपल्सने उभं राहून टाळ्या वाजवल्या. तसा राजीव सगळ्यांना आणि आकाशला आजचा दिवस स्पेशल केल्या बद्दल thank you म्हणाला. आकाशने ही वेटरला केक distribute करण्यासाठी न्यायला सांगितलं आणि तो सगळ्यांना म्हणाला, thank you for giving your valuable time. तसं सगळेजण टाळ्या वाजवून पुन्हा आपआपल्या टेबलवर बिझी झाले. 

 

थोड्याच वेळात राजीवच्या टेबलवर वेटरने त्यांची ऑर्डर आणून serve करुन तो निघून गेला.. दोघेही एकमेकांना पाहत होते.

राजीव: काही बोलणार नाही.

रेखा: आजची रात्र खरंच माझ्यासाठी खूप खास ठरली...काल रात्री पासून माझ्या मनात नको नको ते विचार चालू होते...

राजीव: (हसून) माझी GF कशी दिसत असेल त्याचाच विचार करत होतीस ना..

रेखा: हो..म्हणजे..(पुन्हा लाजून) म्हणजे तसं नाही...

राजीव: (तिचा हात हातात घेऊन) तुझे ओठ जरी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असले तरी डोळ्यांना ते जमत नाही...

रेखा: (लाजून हात सोडवत) पुरे आता, डिश थंड होते आहे... खाऊन घेऊ...

राजीव: जो हुकूम मेरे सरकार.तसं दोघांनी एकमेकांना भरवत,  कधी हसत, कधी बोलत डिनर संपवला.

रेखा: मग घरी कधी सांगणार..

राजीव: कालच सांगितलं सुध्दा मी, you know what, तुला propose करण्याचं place पण बाबांनी suggest केलं.

रेखा: (आश्चर्य वाटून) काय.. खरं की काय..!!

राजीव: हो मग, बाबा मला त्यांचा मुलगा कमी फ्रेंड जास्त मानतात...आणि डोन्ट वरी तू पण लवकरच त्यांची फ्रेंड होशील.

रेखा: (लाजून हसली)

राजीव: (मस्करीत) मग तू कधी सांगते आहेस घरी की, डायरेक्ट माझ्या आईबाबांना तुझ्या घरी पाठवू..?

रेखा: (नाटकी रागात) राजीव.. तुम्ही पण ना...सांगेन मी आज किंवा उद्या.

राजीव: हं वाट पाहेन मी उद्या तुझ्या उत्तराची... निघायचं आता.

रेखा: हो चालेल.

तसं राजीवने बिल पे केलं. तोवर रेखाने घरी कॉल करुन निघत असल्याचं सांगितलं.

दोघेही आकाशला thank you म्हणून घरी जायला निघाले.

 

थोड्याच वेळात राजीवची कार रेखाच्या पार्किंग मध्ये पोहचली. तसे ते दोघेही कारमधून उतरले.

राजीव: (रेखाचा हात हातात घेऊन) तुला बाय म्हणायचं मन नाही करत आहे माझं....

रेखा: माझं ही...पण जावं तर लागेल ना, आईबाबा वाट पाहत असतील.

राजीव: (तिचा हात सोडत...आणि स्वतःच्या गालावर बोट दाखवून) तुझी गोड आठवण दे ना...

रेखा: (लाजून) राजीव....जावा तिकडे....बाय मी निघते.... असं म्हणून ती राजीवकडे flying kiss करून मागे वळून वळून पाहत घरी गेली. तसं राजीवनेही ती घरी गेल्यावर हसून पुन्हा कार सुरु करुन घरच्या दिशेला वळवली.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...