Login

अस्तित्व एक संघर्ष- भाग-२२

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व एक संघर्ष

भाग-२२


दुसऱ्या दिवशी राजीव सकाळी लवकरच उठला त्याने आईबाबांना नाश्ता करत असतानाच रात्री उशीर होईल बाहेरच जेवायला असेन म्हणून घोषित केलं..

आई : (बाबांना उद्देशून) तुम्ही पाहिलं का, कोणीतरी खूप लवकरच उठलं आहे आज...आणि स्वारी भलतीच खुशीत दिसतेय...

राजीव: आई तू पण ना....!! आई ती मला हो म्हणेल ना... म्हणजे मला थोडी भीतीचं वाटतं आहे.... 

बाबा: अरे जा तू बिनधास्त.... बघ ती नक्की हो म्हणेल आणि नाही म्हणाली तर मग आपण अरेंज मॅरेज करू तिच्या बरोबर तुझं...

आई: ( हसत हसत) काय तू तुझ्या बाबांचं ऐकत बसलाय... नाही देणार ती नकार तुला...

राजीव: कुठे नेऊ मी तिला...

बाबा: अरे ते राज रेस्टॉरंट आहे ना तिथे ने...तिथे स्पेशल कपल ऑपशन पण असतो...तो माझा मित्र आहे ना त्याचा मुलगा तिकडे मॅनेजर आहे... तुला हवी ती अरेंजमेंट सांग त्याला तो करुन देईल तुला....

राजीव: (बाबांना मिठी मारून) वाह बाबा, तुम्ही पहिले बाबा असाल जे मुलाच्या सेटिंगसाठी एवढी मदत करत आहात...

बाबा: (हसत हसत) असं म्हणतात की मुलाला बापाचे shoes होऊ लागले की बापाने त्याच्याशी मित्रासारखं वागावं आणि मी पण तेच करतोय...मग घरी येऊन जाणार की ऑफिस मधूनच...?

राजीव: अर्थात घरी येऊन जाणार...!! चला मी निघतो ऑफिसला जायला... म्हणजे लवकर निघता येईल..असं म्हणून तो आईबाबांना बाय करुन ऑफिसमध्ये जायला निघाला.

प्रेरणाच्या तब्येतीत इंजेक्शन दिल्यापासून सुधारणा दिसून येत होती...तिचं अचानक किंचाळत उठणं थांबलं होतं... आई तिच्या बाजूलाच बसून तिच्यासाठी फळं कापून देत होती. प्रेरणा कसला तरी विचार करत असलेला पाहून आईने विचारलं, काय झालं कसला एवढा विचार करतेय...?

प्रेरणा: आई, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास होतो आहे ना...मी त्या दिवशी जिवंत नसते राहिले तर आज तुम्हाला जो त्रास होतो आहे तो झाला नसता ना...??

आई: ( फळं कापायची थांबवत) हे बघ बाळा, आज तू हे बोललीस ते पहिलं आणि शेवटचं...यापुढे तू असा जगण्या मरण्याचा विचार नाही करायचा आहेस....आणि तुला काय वाटतं तुझ्या शिवाय आम्ही जगू शकलो असतो...? तुला असं बघून विवेकने तर कॉलेजमध्ये जाणं ही थांबवलं होतं.... एकटाच विचार करत बसायचा घरात....तुझ्या प्रतिक सरांनी त्यालाखूप  समजावलं....तेव्हा आता तो तुझ्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करून कॉलेज शिकणार आहे...तुझी आई ही तुझी अवस्था पाहून खूप तुटली होती ग....आज ती त्यांच्या मुळेच खंबीर झाली आहे. आता पुन्हा असं काही बोललीस तर याद राख....

प्रेरणा: (आईचा हात हातात घेऊन) नाही मी नाही बोलणार असं काही....

त्या दोघींचं बोलणं चालू असतानाच मि जाधव डॉ बरोबर प्रेरणाला भेटायला आले. 

मि जाधव: हॅलो मिस प्रेरणा, तुमची तब्येत कशी आहे आता...?

प्रेरणा: थोडी ठीक आहे आता, अजून चालता येत नाही पण... प्लॅस्टर मुळे

डॉ: तुझं fracture ठीक झालं की तू पूर्वी सारखीच चालायला आणि ऑफिसमध्ये जाऊ शकशील.... 

मि जाधव: मला तुझ्या जबाबावर आणि काही पेपर्स वर तुझी सही हवी होती....पूर्ण वाचून हवं तर सही कर.... असं म्हणून त्यांनी तिच्याकडे पॅड आणि पेन दिला. प्रेरणाने सगळं वाचून घेतलं.... ती वाचत असताना ती रिऍक्ट तर होत नाही ना यासाठी डॉ तिचं निरीक्षण करत होते...तिने वाचून सगळं मि जाधव यांना दिलं.

मि जाधव: ओके मिस प्रेरणा, काळजी घ्या तब्येतीची, लवकर ठीक व्हा आणि काहीही मदत लागली तर निःसंकोचपणे मला कॉल करा. असं म्हणून ते डॉ बरोबर प्रेरणाच्या रुम मधून निघाले. तिच्या रुम मधून बाहेर पडल्यावर डॉ नी मि जाधव यांना विचारलं, तो एक आरोपी होता हॉस्पिटलमध्ये त्याचं काय झालं...?

मि जाधव: त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो हे कबूल केलं. पण कबूल केल्यानंतर आम्ही निघालो तिथून आणि त्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉ नी प्रयत्न केला पण त्याला वाचवू नाही शकले.

डॉ: म्हणजेच काय मिस प्रेरणा यांच्या गुन्हेगारांना जणू काही देवाने अशीच शिक्षा होणं लिहिलं होतं वाटतं.

मि जाधव: (हसून) हो मला ही असंच काहीसं वाटतं आहे. Anyways, निघतो मी आता...असं म्हणून ते डॉ चा निरोप घेऊन हॉस्पिटलमधून निघाले.

विवेकने सांगितल्या प्रमाणे प्रेरणाच्या ऑफिस मध्ये जाऊन HR ला त्याच्या documents copy दिल्या. प्रतिकने त्याला त्याच्या बरोबरच select करण्यात आलेल्या अनिकेत बरोबर त्याची ओळख करून दिली. तोपर्यंत HR दोघांच्या ही original documents घेऊन आली. 

HR: (दोघांना त्यांच्या files देत) so both are you joining from Monday??

विवेक, अनिकेत: yes Ma'am

HR: ok see you on Monday... असं म्हणून ती तिचं काम करायला निघून गेली. प्रतिकने त्या दोघांची ओळख समिधा आणि मीनाशी करुन दिली. 

प्रतिक: (दोघांशी हात मिळवून झाल्यावर) ओके आता आपण Monday ला भेटू..तेव्हाचं तुमचं ट्रेनिंग सुरु होईल....असं म्हणून त्याने त्या दोघांना निरोप दिला आणि तो पुन्हा त्याच्या कामाला लागला.