Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष- भाग-२१

Read Later
अस्तित्व एक संघर्ष- भाग-२१
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-२१


राजीव त्याच कोर्टातलं आणि ऑफिसच काम करून प्रतिकच्या घरी न जात स्वतःच्या घरी गेला...त्याला असं अचानक आलेलं पाहून आईला आश्चर्य वाटलं..

आई: अरे, सांगितलं नाही तू...तू येतो आहेस ते....आणि बॅग कुठे आहे तुझी...?

राजीव: अग किती प्रश्न तुझे...मी जाणार आहे परत काही दिवसांनी....आजी आल्यावर...मला थोडा चहा देशील का...खूप थकलो आहे मी...

आई: हो हो देते, तू फ्रेश होऊन ये...

तसा राजीव फ्रेश होऊन आला...तो आला तसा लगेच आईने चहा उपमा आणून त्याच्या समोर ठेवला...

राजीव: वाह वाह, उपमा...मस्त...

आई: हो तुझी खूप आठवण येत होती..सकाळपासून का कोण जाणे मनात आलं की उपमा करावा...आणि मी नुकताच करून बाहेर बाबांची वाट पाहत बसले होते आणि तू आलास...

राजीव: (उपमा खात खात) बहुतेक या उपमामुळेच माझे पाय घराकडे वळले...

तशी आई हसू लागली...तेवढ्यात बाबा पार्कचा राउंड मारून घरी आले.

बाबा: (खुर्चीत बसत) काय चाललं आहे, आई मुलाचं..? आणि राजीव तू कधी आलास...कळवलं पण नाही...

आई: हो ना मी पण हेच म्हणत होते...

राजीव: अग मला खूप असं वाटत होत की एकदा घरी जाऊन येतो...तसं ही मुंबईमधल्या मुंबई मध्ये तर होतो मी...कुठे एकदम परदेशातून आल्यासारखं तुम्ही दोघे रिऍक्ट होत आहात... मला असं अचानक घरी येऊन तुम्हाला surprise द्यायचं होतं....

बाबा: surprise देणं छान आहे...पण असं कधी surprise देऊ नकोस आम्हा दोघांना...की ही बघा मी तुमची होणारी सून आणली आहे म्हणून....डायरेक्ट लग्न करून...(आणि आईबाबा दोघेही हसू लागले).

राजीव: (काहीसा नाटकी रागात) तुम्ही दोघे पण ना...मी असं न सांगता थोडीच करणार आहे...तुम्हाला सांगूनच करेन ना...!!

आई: (राजीवची चोरी पकडत) हम्म म्हणजे भेटलेली दिसते आहे वाटत आमची होणारी सून...जे सांगून करणार आहे म्हणतो ते...

तशी राजीवने जीभ चावली...

आई: (राजीवचा कान पकडत) सांग बघू कोण आहे ती..?

राजीव: बाबा, आईला सांगा...कान सोडायला....आई दुखतोय ग खूप...सोडना...!!

बाबा: (आईने कान सोडलेला पाहून, मस्करीमध्ये) मी कान पकडायच्या आधी सांग आम्हाला कोण आहे ती...??

राजीव: (उपमा खात खात) हो हो, घरी येताक्षणी तुम्ही दोघांनी रणगाडाच सुरु केला आहे...!! सांगतो सांगतो सगळं सांगतो...आणि तुम्हाला सांगितल्या शिवाय मी तिला लग्नासाठी विचारणार पण नाही आहे....म्हणून तर मी थांबलो आहे तिला विचारायला...!!

आई: (बाबांकडे बघत) आता तू म्हणतो आहेस तर खरं मानून चालतो आम्ही दोघे...हो ना ओ...!!

बाबा: हो हो, मी आलोच बरं कपडे बदलून....(राजीवच्या खांद्यावर हात ठेवत) तोपर्यंत तू पटकन खाऊन घे चल...

राजीवने तोपर्यंत उपमा खाऊन घेतला...आई बाबांच्यासाठी आणि तिच्यासाठी चहा आणि उपमा घेऊन आली..

तोपर्यंत बाबा बाहेर आले...हां हे बघ आलो मी...सुरु कर...

राजीव: काय आहे हे...? कोणी मला केसबद्दल काही विचारतच नाही आहे....

बाबा: हं, सांग मग काय झालं तुझ्या केसच...पण विषय बदलायचा नाही आहे हां....(आईकडे डोळे मिचकावत बघत) मी पण एका नामांकित वकिलाचा बाबा आहे हे लक्षात आहे ना...!!

राजीव: हो बाबा, तर मग केसची तारीख मी पुढची घेतली आज...तुम्ही टीव्हीवर ते सगळं बघितलंच असेल....आणि प्रतिकने कॉल केला होता मी घरी येत असताना...प्रेरणाची साक्ष घेतली म्हणून...रेकॉर्ड करून....आता केस लढणं जास्त सोपं जाईल...

आई: हां, आता आमच्या मुद्द्यावर ये...सांग आता कोण आहे ती...आणि तुझी तिची ओळख कशी झाली...?

तसं राजीवने आईबाबांना रेखा बद्दल सुरवातीपासूनच सगळं सांगितलं....

राजीव: आई, ती सेम तुझ्यासारखीच बोलते...म्हणजे मला कधी कधी वाटत...की तुझ्याकडेच ट्रेनिंग घेऊन येते की काय...?

बाबा: म्हणजे लग्नानंतर सासू आणि सुनेची युती होणार वाटतं...(राजीवला डोळा मारत) राजीव साहेब आपल्या दोघांचं काही खरं नाही तर मग....!!

आई: (जागेवरून उठत) हो खाते ना मी, तुम्हा दोघांना....माझी सून येणार म्हणून तुम्ही दोघे बोलतात ना मला...येऊ दे तिला मग बघा....

तसा राजीव हसत हसत आईला बिलगला...आई नाही ग आम्ही तुझी मस्करी करत होतो...तुला बाबांचा स्वभाव तर माहित आहे ना...!!

बाबा: हो ग पद्मा, उगाच नको ग रागावू... बघूया तरी आपल्या होणाऱ्या सुनबाईचा फोटो...??

तशी आई राजीवकडे आली. राजीवने दोघांना ही त्याच्या मोबाईलमधला whatsapp वरचा रेखाचा फोटो दाखवला.

बाबा: वाह वाह पसंत आहे बरं का राजीव साहेब तुमची चॉईस मला...

राजीव: आणि आई तुला...?

आई: अरे मला सुद्धा...मग कधी विचारतोय तिला...

राजीव: खरं तर आज तिला भेटायचं होत मला....म्हणजे ती म्हणत होती की आपण celebrate करू...तेव्हाच मी विचारणार होतो तिला...पण कोर्टातलं काम आटपून ऑफिसच काम आटपेपर्यंत उशीर झाला मग घरी येऊन तुम्हाला सांगून परत निघेपर्यंत उशीर झाला असता....आता विचार करतोय की उद्या भेटावं...

आई: अरे मग सांगितलं का, तू तिला तसं...

राजीव:(जीभ चावत) खरंच मी विसरलो....पूर्णपणे कामाच्या गडबडीत राहून गेलं...

बाबा: अरे सांग मग...तिला लवकर...

राजीव: हो हो बाबा, आलोच मी...असं म्हणून राजीव त्याच्या रूममध्ये गेला.

 

राजीवने लगेच रेखाला कॉल केला तर ती कॉल उचलत नव्हती. बहुतेक राग आला वाटतं हिला...पण मी तर म्हणालो होतो ना सांगेन म्हणून...(तो मनात म्हणाला) मग त्याला आठवलं आपण सकाळपासून whatsapp च बघितलं नाही...तिने नक्की तिथे काही ना काही मेसेज केला असेल...म्हणून त्याने whatsapp ओपन केलं...अपेक्षेप्रमाणे तिचे मेसेज आले होते....

रेखा: हाय बिझी आहात का...? भेटायचं आहे का मग संध्याकाळी...waiting for your valuable reply वकीलसाहेब...????

अरे लास्ट सीन तर १५ मिनिटे आधीच दाखवत आहे...मग नक्कीच हिला राग आला असणार...त्याने तिला मेसेज केला..

राजीव: Sorry आज ऑफिसमध्ये आणि कोर्टातलं काम आटपेपर्यंत खूप वेळ निघून गेला आणि त्या कामात माझं तुला मेसेज करायचं राहून गेलं...तुला चालणार असेल तर उद्या भेटूया का आपण...?????

तो तिच्या online यायची वाट बघत होता...सहज म्हणून त्याने whatsapp status window open केली..अरेच्चा रेखाने स्टेटसला काही तरी ठेवलं आहे...त्याने तिच्या स्टेटसवर क्लिक केलं...

पहिला फोटो तिने सकाळच्या न्यूजचा टाकला होता...I am happy after reading this news...????

second स्टेटस होत...का कळेना...कोणत्या क्षणी हरवते मन असे...????

third स्टेटस तिने एक quote लिहिला होता...

 

Who are you,

I don't know you very well,

but still my heart says,

I know you very well...

 

who are you...?

who make me feel lonely...

who are you..?

who make my day lovely...?

who are you..?

त्याने तिच्या या स्टेटसवर रिप्लाय दिला...सांगू मी कोण आहे ते....?? ????

त्याच्या या मेसेजवर तिचा रात्री खूप उशिरा रिप्लाय आला...

रेखा: हा मेसेज मी तुम्हाला उद्देशून लिहिला असं का वाटतं...??????

राजीव: मग सांग बघू कोणासाठी लिहिला ते...??????

रेखा: we are not friends ...that I share everything with you ...!!????

राजीव: हं, right हम आपके है कौन...????

रेखाने मेसेज रीड केला पण काहीच उत्तर दिलं नाही....राजीवला उत्तर अपेक्षित होतं...पण तिने काहीच उत्तर दिलं नाही..

रेखाने त्याच्या बिझी होतो या मेसेजचा रिप्लाय दिला, ओके काही हरकत नाही...I can understand...????

मग त्याच्या उद्या भेटूया का च्या मेसेज चा रिप्लाय दिला....मी बिझी आहे उद्या सांगेन तुम्हाला....????

राजीव: (राजीवच्या लक्षात आलं मॅडम तापलेल्या आहेत...कारण उद्या तर शनिवार आहे... आणि आता आपलाच dialogue आपल्याला मारत आहे...) त्याने सुद्धा ठीक आहे उशीर झाला तरी चालेल मी वाट पाहेन तुझ्या मेसेजची असा रिप्लाय दिला...

रेखा: ओके चालेल...मी झोपते आता...गुड नाईट म्हणून मेसेज केला...

पण खरं तर दोघांपैकी कोणाला ही झोप लागत नव्हती...दोघेही अधून मधून एकमेकांचं लास्ट सीन बघून मोबाईल बंद करत होते...पण मेसेज मात्र कोणीच कोणाला करत नव्हता...शेवटी न राहवून राजीवने तिला मेसेज केला...

राजीव: I am extremely sorry Rekha ????, मला कळत आहे तुला राग आला माझा...मी सांगतो ना आपण उद्या भेटूया celebration करायला....आणि मला तुला काहीतरी सांगायचं सुद्धा आहे...????

त्याचा मेसेज येताक्षणी रेखाला सुद्धा त्याचा रिप्लाय दिल्याशिवाय राहवेना...

रेखा: पण ज्याला खरंच मेसेज करायचा असतो तो असली कारणं देत नाही...???? समोरची व्यक्ती खूप आतुरतेने मेसेज ची वाट बघत असते...मग अशावेळी त्या व्यक्तीला नाही का वाईट वाटणार....???? तुम्ही फक्त मला शक्य नाही आपण उद्या भेटू असं लिहिलं असतं तरी मला राग नसता आला....????

राजीव: हो माझी चूकच झाली ती....????पण मला तुला भेटायचं होतं म्हणून मी तुला तसा मेसेज नाही केला... पण सगळं काम करेपर्यंत उशीर झाला.. ????फिरसे ये गलती हमसे ना होगी जानी.... अब तो हमे माफ कर दो दिलबर जानी....????

रेखा: दिलबर जानी...????

राजीव: लडकी हसी मतलब फसी....????

रेखा: हम फसनेवालों में नहीं आते जनाब....????

राजीव: अब तो माफ कर दो हमे....

रेखा: हं कर दिया माफ, लेकीन कल का फिक्स ना...?

राजीव: हां 100% ????

रेखा: आणि काय सांगायचं होतं तुम्हाला....

राजीव: प्रेरणाने तिचा जबाब दिला....

रेखा: ओह मस्तच, म्हणजे ती आता शॉक मधून बाहेर आली ना....?

राजीव: तसं म्हणायला हरकत नाही.... सुरवात तरी झाली आहे.

रेखा: हं... एक विचारु....?

राजीव: अरे बापरे, परवानगी वगैरे घेते आहे....हो विचार की...

रेखा: तुम्हाला GF आहे...?

राजीव: (राजीवच्या लक्षात आलं की रेखा आपल्याला असं का विचारतेय ते) हो आहे ना, सेम माझ्या आईसारखा स्वभाव आहे तिचा...

रेखा: तुम्ही कधी बोललात नाही...

राजीव: तूच म्हणतेस ना आपण फ्रेंड कुठे आहोत म्हणून मग...(राजीवने तिचाच  dialogue तिला ऐकवला)

रेखा: Sorry.... ते मी भडकून बोलले....नाव काय तिचं...?

राजीव:(काहीसा विचार करून) एक काम करतो ना, उद्या तिला सुदधा बोलावतो. मग तुझी आणि तिची भेट होईल...

रेखा: (राजीवची GF आहे हे ऐकून तिला वाईट वाटलं पण आता नाही भेटू शकत असं ही ती म्हणू शकत नव्हती) ओके चालेल. कुठे भेटायचं....

राजीव: उद्याचं सांगेन मी.... बुक करतो आपल्यासाठी टेबल आणि तुला सांगतो...

रेखा: हं ठीक आहे चालेल मी झोपते आता...खूप उशीर झाला आहे... उद्या मेसेज करा मग मी येईन. गुड नाईट

राजीव: हो चालेल...गुड नाईट.

राजीवला आता उद्या कधी एकदा रेखाला भेटतो आहे असं झालं होतं.... आणि रेखाला राजीवची GF आहे हे ऐकून वाईट वाटतं होतं. रेखाला याचा जराही अंदाज नव्हता की येणारी सकाळ नक्कीच काहीतरी चांगलं तिच्यासाठी घेऊन येणार होती. ती राजीवला GF आहे, आणि कोण असेल ती, कशी दिसत असेल ती... याच विचारात कशीबशी झोपी गेली.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...