अस्तित्व एक संघर्ष- भाग-२०

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व एक संघर्ष

भाग-२०


प्रेरणाचे आईबाबा हॉस्पिटलमध्ये मालगुडेंबरोबर पोहचले. प्रेरणाची आई तिला रूममध्ये झोपलेलं पाहून तिथेच तिच्या बाजूला बसून राहिली. आईला आलेलं पाहून विवेक बाहेर बाबांबरोबर सोफ्यावर येऊन बसला. विवेकला बाहेर आलेलं पाहून मालगुडे काका त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, घाबरु नकोस सगळं ठीक होईल, बाबांनी मला सांगितलं सगळं...गणपती बाप्पा आपल्या प्रेरणाला नक्की ठीक करेल.

मालगुडे: (प्रेरणाच्या बाबांना म्हणतात) मी निघतो आता, दुपारी जेवण घेऊन येतो तुम्हा सर्वांना....
बाबा: नको, नको उगाच तुम्हाला आमच्या मुळे त्रास नको...
मालगुडे: त्यात त्रास कसला... शेजारी मदतीला नाही धावणार तर कधी कामी येणार...आमच्या हिने तयारी पण सुरु केली असेल. येतो मी... नंतर डब्बा घेऊन...असं म्हणून ते दोघांचा निरोप घेऊन निघाले.

थोड्या वेळाने प्रतिकही तिथे आला. त्याला पाहून बाबा म्हणाले, तुम्ही इथे...?
प्रतिक: हो ते प्रेरणा बद्दल कळलं म्हणून आलो...
विवेक: बाबा, त्यांनी document submit करण्या संदर्भात कॉल केला होता... तेव्हा मी त्यांना दिदी बद्दल सांगितलं.
बाबा: अच्छा, बसा ना तुम्ही, उभे कशाला... तसा प्रतिक विवेकच्या बाजूला बसला.
तेवढ्यात डॉ गोवेकर आल्या आणि डॉ च्या केबिन मध्ये गेल्या. डॉ स्नेहा यांना डॉ प्रेरणाबद्दल सांगत असतानाच प्रेरणा शुध्दीवर येऊन जोरजोरात किंचाळू लागली. तिचा आवाज ऐकून विवेक, बाबा आणि प्रतिक सगळेजण तिच्या रुम मध्ये धावले. प्रतिक, विवेक, बाबा सगळे लांबून प्रेरणाला पाहत होते... प्रेरणाच्या चेहऱ्यावर भिती निर्माण झाली होती... ती सगळ्यांना कोणीही जवळ येऊ नका म्हणून खुणा करत होती. तोच डॉ स्नेहा नर्स आणि डॉ बरोबर तिच्या रूममध्ये आल्या. त्यांनी आई सोडून सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितलं. सगळेजण बाहेर गेल्यावर नर्सने रूमचा दरवाजा बंद करून घेतला. डॉ स्नेहा प्रेरणाजवळ आल्या, प्रेरणा अजूनही खूप घाबरलेली होती. त्या तिला हात लावायला पुढे गेल्या तशी ती मागे होऊ लागली.

डॉ स्नेहा: प्रेरणा हे बघ, घाबरु नकोस....बघ तू हॉस्पिटलमध्ये आहेस.तशी प्रेरणा आजूबाजूला पाहू लागली. आपण खरंच हॉस्पिटलमध्ये आहोत हे तिच्या लक्षात आलं. आता तिची भिती थोडी कमी झाली होती. 
डॉ स्नेहा: प्रेरणा मी डॉ स्नेहा आहे, तू मघाशी किंचाळून उठलीस....डॉ नी असं विचारल्यावर प्रेरणा बोलायचा प्रयत्न करू लागली... पण तिला ते सगळं आठवत असताना भितीने काही बोलायला सुचेना.... ती हातानेच फक्त नको नको अशा खाणाखुणा करु लागली.
डॉ स्नेहा: प्रेरणा हे बघ, तुझी आई आली आहे इथे, तिला पण नाही सांगणार का...? काय झालं ते...
आई हा शब्द ऐकताक्षणी प्रेरणाने आईकडे पाहिलं, आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिला असं रडताना पाहून आईने तिला जवळ घेतलं.
डॉ स्नेहा: प्रेरणा तुझ्या आईला जाणून घ्यायचं आहे, तू का किंचाळून उठलीस ते...?

डॉ च्या बोलण्याने प्रेरणा आईकडे पाहू लागली. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिचा हात हातात घेऊन म्हणाली, हो बाळा सांग, तुझी आई आहे आता तुझ्याबरोबर....आईचं हे वाक्य ऐकून प्रेरणाला थोडा धीर आला तिने तिच्या बाबतीत जे जे घडलं ते घाबरत घाबरत सांगायला सुरुवात केली. प्रेरणा हळूहळू त्यांना त्या रात्री जे जे घडलं ते सगळं सांगू लागली. तिच्या बाबतीत जे घडलं ते ऐकून आईच्या आणि डॉ स्नेहा यांच्या डोळ्यात पाणी आलं. डॉ स्नेहा यांनी स्वतःचे डोळे पुसून प्रेरणाच्या आईला हात लावून खुणेने स्वतःला सावरायला सांगितलं. मध्ये मध्ये प्रेरणा सांगायला घाबरत होती. मग पुन्हा आई तिला सावरत सांगायला भाग पाडत होती. डॉ आणि नर्स यांना पण सगळं ऐकून वाईट वाटलं. डॉ च्या सांगण्याप्रमाणे नर्स सगळं रेकॉर्ड करत होती. मध्येच डॉ स्नेहा यांनी डॉ ना टीव्ही चालू करुन न्यूज चॅनेल सुरु करायला सांगितलं...अपेक्षेप्रमाणे अजूनही चॅनेलवर तिच्या केस बद्दल बोलणं चालू होतं. डॉ स्नेहा यांनी टीव्हीकडे त्या दोघांच्या फोटोंकडे हात दाखवत प्रेरणाला विचारलं, प्रेरणा हेच ते दोघेजण होते का...? प्रेरणाने टीव्हीकडे पाहिलं... त्या दोघांचा फोटो बघून प्रेरणाने आईचा हात घट्ट पकडून ठेवला.... आणि दुसऱ्या हाताने त्या दोघांकडे बोट दाखवत ती स्वतः कडे बोट दाखवून रडू लागली आणि आईला पुन्हा बिलगली. डॉ नी लगेच टीव्ही बंद करुन प्रेरणाला विचारलं, हेच ते दोघे होते का, प्रेरणाने घाबरत घाबरतच मानेने हो म्हंटलं. डॉ स्नेहा यांनी नर्सला रेकॉर्डिंग बंद करायला सांगितलं आणि प्रेरणाला बेडवर चेकअप करण्यासाठी झोपायला सांगितलं. डॉ च न ऐकता प्रेरणा आईला बिलगूनच राहिली. डॉ स्नेहानी प्रेरणाच्या आईला तिच्याशी बोलायला सांगितलं.

आई: (प्रेरणाला मिठीतून सोडवत) बाळा, या डॉ आहेत ना त्या तुला आता चेक करणार आहेत....म्हणून तू झोप हा आता जरा. असं म्हणून आई तिथून उठली. तसं पुन्हा प्रेरणाने तिचा हात घट्ट पकडून ठेवला.

आई: अग मी कुठे नाही जात आहे हे बघ इथेच बसते आहे तुझ्या बाजूला. त्यावर प्रेरणाने आईचा घट्ट पकडलेला हात सोडला आणि बेडवर चेकअप साठी झोपली.

डॉ स्नेहा: (स्टेथोस्कोप लावून प्रेरणाला म्हणतात) दीर्घ श्वास घे. आणि तिचं चेकअप करुन तिला injection दिलं. इंजेक्शनच्या गुंगी मुळे प्रेरणा पुन्हा झोपी गेली.

डॉ स्नेहा: (आईला उद्देशून) आज जसं तुम्ही तिला हँडल केलं तसं अजून 2 दिवस तुम्हाला तिला हँडल करावं लागेल म्हणजे आज जशी ती अचानक झोपेतून किंचाळून उठली. तशी ती पुन्हा वागू शकते. तिच्या डोक्यातून आणि मनातून त्या गोष्टी जाऊन तिला सावरण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आता मी जे हे इंजेक्शन दिलं हे ती पुन्हा अशी घाबरुन न जाण्यासाठीच दिलं आहे. या injection चा इफेक्ट खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे आपल्याला पुन्हा तिला हे इंजेक्शन द्यावं नाही लागणार. 

आई: चालेल डॉ, मी आहे तिच्या बरोबर. डॉ प्रेरणाला कधी डिस्चार्ज देणार...

डॉ स्नेहा: हा 2 दिवसांचा मेडिसिन course झाला आणि प्रेरणा पुन्हा अशी घाबरुन उठली नाही की मग तिला डिस्चार्ज देऊ....आता काळजी घ्या... आणि काही लागलं की सांगा तातडीने... मी येते आता असं म्हणून डॉ स्नेहा, डॉ आणि नर्स यांच्या बरोबर रुममधून बाहेर पडल्या आणि पुन्हा केबिनच्या दिशेने गेल्या.

डॉ केबिनमध्ये गेलेले पाहून बाबा रुममध्ये गेले. त्यांनी प्रेरणाबद्दल विचारलं. आईने त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला.
बाबा: खरंच खूप त्रास होतो आहे प्रेरणाला असं बघून....!

आई: (बाबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून म्हणाली) तुम्हीच असं वागलात तर आपण प्रेरणाला कसं यातून बाहेर काढणार ना...! पुसा बघा ते डोळे....आणि पुन्हा त्या वाईट आठवणींनी तुम्ही डोळ्यांत पाणी आणू नका.... आपल्याला आपल्या लेकीला पुन्हा तिच्या पायावर उभं करायचं आहे.... तेव्हा आता आपल्याला रडून चालणार नाही.आईला इतकं खंबीरपणे बोलताना पाहून बाबांना सुखद धक्का लागला.

बाबा: (डोळे पुसत) तू म्हणते आहे असं...म्हणजे मला तू असं बोलते आहेस याचा आनंद ही होतो आहे आणि कुतूहल पण वाटत आहे....म्हणजे इतके दिवस मला तुला हे समजवावं लागत होतं आणि आज तू मला समजावते आहेस..!

आई: ही सगळी आपल्या प्रेरणाच्या प्रतिक सरांची कमाल आहे....! त्यांच्यामुळेच हा बदल घडला आहे.

बाबा: म्हणजे....?
तसं आईने त्यांना समिधा आणि प्रतिक घरी आल्यावर घडलेला सगळा प्रसंग सांगितला.

बाबा: खरंच खूप काळजी घेतात ते आपल्या सगळ्यांचीच... आणि मला खात्री आहे आपल्या प्रेरणाला पण ते खूप सुखात ठेवतील. 

आई: हो मालगुडे ताई पण आज त्यांच्यामुळेच बदलल्या आहेत...

त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच विवेक बाबांना डॉ स्नेहा यांनी बोलवलं आहे म्हणून सांगायला आला. तसे बाबा, विवेक आणि प्रतिक तिघे केबिनमध्ये गेले. डॉ स्नेहा यांनी त्यांना बसायला सांगितलं.

डॉ स्नेहा: मी तुम्हाला प्रेरणाच्या केसमधली प्रोग्रेस सांगायला बोलावलं आहे असं म्हणून त्यांनी डायरीवर काहीतरी draw केलं. हा diagram आहे ज्याने मला नक्की काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल.

बाबा: ओके

डॉ स्नेहा: प्रेरणा न्यूज बघून हसू का लागली, अचानक का किंचाळू लागली, अचानक का रडू लागली याचं उत्तर देते मी.(Diagram दाखवत) कसं असतं मि. प्रधान, आपलं माईंड असतं ना ते कधी कधी काही गोष्टी accept करायला घाबरतं... म्हणजे त्याला ती गोष्ट माहीत तर असतं पण ते त्याला accept करायची नसते. हाच प्रकार प्रेरणाच्या बाबतीत झाला होता.

विवेक: पण मग दिदी अचानक टाळ्या वाजवून का हसू लागली.

डॉ स्नेहा: जेव्हा तिने ती न्यूज पाहीली, तेव्हा तिच्या डोक्यात पहिल्यांदा ही गोष्ट आली की त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली... आणि तिला त्या गोष्टीचा आनंद झाला जो तिने टाळ्या वाजवून व्यक्त केला...मग तिला त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवू लागल्या ज्या ती accept करायला तयार होत नव्हती...आणि त्यामुळे कळत नकळत त्या शॉक मध्ये ती बोलत ही नव्हती.

बाबा: पण मग आता आमची प्रेरणा ठीक होईल ना...

डॉ स्नेहा: हो होईल नक्की, पण आपल्याला तिच्या कलाने गोष्टी घ्याव्या लागतील...आपल्याला शक्य होईल तितकं तिला बिझी ठेवावं लागेल म्हणजे काही काम देऊन बिझी करा असं नाही....तिच्याशी कोणत्याही विषयावर बोला, तिला मोकळ्या हवेत न्या...तिच्या आवडीच्या गोष्टी तिला करू द्या..ज्यात ती रमेल...म्हणजेच आपल्याला तिच्या मनात चाललेल्या गोष्टींना divert करायचं आहे... अर्थात सगळं असं लगेच शक्य नाही आहे...त्याला वेळ लागेल....तिचा २ दिवसांचा कोर्स झाल्यावर तिला डिस्चार्ज देतील डॉक्टर पण fracture काढायला अजून वेळ लागेल...म्हणजे अधून मधून तिला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल...मी घरीच येऊन चेकअप करत जाईन....प्रेरणाला क्लिनिक मध्ये येणं शक्य नसेल तर...

बाबा: चालेल डॉ..

डॉ स्नेहा: मि प्रधान एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते...म्हणजे अशा केसेसमध्ये बऱ्याचदा पेशंटच्या मनातून  कधी कधी या गोष्टी निघून जात नाही त्यावेळी तो कधी कधी स्वतःला एकटं समजू लागतो किंवा मग आपल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो आहे असा ही विचार करू लागतात..

प्रतिक: मग डॉ यावर काही उपाय तर असेल ना..?

डॉ स्नेहा: हो,नक्कीच आहे...मेडिटेशन करणं जास्त योग्य आहे..कारण प्रत्येक गोष्टीवर मेडिसिनच उपयोगी पडेल असं नाही...पण सध्या प्रेरणाची जशी कंडिशन आहे त्यात मी तिला हे करायला सांगू नाही शकत थोडा वेळ जाऊदे मग त्यानंतर आपण तिच्या मेडिटेशन बद्दल विचार करू शकतो...

प्रतिक: डॉ, प्रेरणा आता बोलते आहे ना...?

डॉ स्नेहा: हो, मघाशी तिने त्या रात्री जे झालं ते सगळं सांगितलं...खरं तर ते मिसेस प्रधान यांच्या मुळेच शक्य झालं...आईला बरोबर पाहून तिला धीर झाला....सगळं सांगायला...

बाबा: मग आता आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तसं सांगावं लागेल का...? म्हणजे प्रेरणाचा जबाब घ्या संदर्भात...

डॉ स्नेहा: नाही त्याची काही आवश्यकता नाही आहे...म्हणजे डॉ, माझं आणि मि जाधव यांचं या संदर्भात आधीच बोलणं झालं होतं...आणि त्यानुसार आम्ही प्रेरणाचा रेकॉर्ड केलेला जबाब त्यांना देणार आहोत...फक्त मि जाधव यांना जबाब संदर्भातच्या  काही पेपर्स वर तिची सही घ्यावी लागेल...त्यासाठी ते प्रेरणाला उद्या येऊन भेटतील...
त्यावेळी मी आणि डॉ ही असतील.

बाबा: चालेल डॉ...

डॉ स्नेहा: अजून काही विचारायचं आहे का, मि प्रधान...तुम्हाला...?

बाबा: नाही नाही डॉ...ते मेडिटेशनच कधी करावं लागेल हाच एक प्रश्न आहे मला...

डॉ स्नेहा: प्रेरणाच्या पायाच fracture काढलं की पुढे आपण ठरवू ते...मी सांगेन तुम्हाला डोन्ट वरी...

बाबा: ओके डॉ येतो आम्ही...

डॉ स्नेहा: हो हो चालेल, काही काळजी करू नका...प्रेरणा लवकर ठीक होईल....
तसे बाबा, प्रतिक आणि विवेक डॉ च्या केबिनमधून बाहेर आले. तेवढ्यात प्रतिकला ऑफिसमधून कॉल आला.

प्रतिक: काका, मला निघावं लागेल...ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मिटिंग आहे...

बाबा: काही हरकत नाही...तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होईल....
तसा प्रतिक तिथून त्यांचा निरोप घेऊन निघाला...आणि काहीतरी विचार करून पुन्हा मागे वळला.

प्रतिक: काका, दोन दिवसांनी प्रेरणाला डिस्चार्ज देणार आहेत तर मी तेव्हा आलो तर चालेल ना...? म्हणजे माझी काही गरज पडली तर मी तेव्हा मदत करू शकेन.

बाबांनी चमकून मागे वळून पाहिलं आणि काही तरी विचार करत त्यांनी प्रतिकला हो म्हणून सांगितलं...तसा प्रतिक हसला आणि त्यांचा आणि विवेकचा निरोप घेऊन निघाला. प्रतिकच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बाबा मनात म्हणाले, खरंच हा मुलगा माझ्या प्रेरणाची खूप काळजी घेतो, हा तिला खरंच खूप सुखात ठेवेल.

 

क्रमशः 

🎭 Series Post

View all