Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व - एक संघर्ष भाग-२

Read Later
अस्तित्व - एक संघर्ष भाग-२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-२


क्षणभर प्रतिकला प्रेरणाच आल्याचा भास झाला. पण समिधाच्या आवाजाने तो भानावर आला. 

सर या काही फाईल्स होत्या त्यावर तुमची सही हवी आहे, समिधा म्हणाली. प्रतीकने पेपर पटापट चेक करुन सही करुन फाईल्स तिच्या ताब्यात दिल्या. तशी समिधा म्हणाली सर माझं काम झालं आहे सगळं... अजून काही काम नसेल तर, मी निघू का...? तसं त्याने घड्याळाकडे पाहिलं अरे 6 झाले....तू इतका वेळ का थांबलीस प्रतीक म्हणाला.

सर आज प्रेरणा पण नव्हती आणि मीना सुद्धा नव्हती त्यामुळे थोडा उशीर झाला समिधा म्हणाली. तसा प्रतीक म्हणाला, कुठे राहतेस तू....? सर मी बोरीवलीला राहते समिधा म्हणाली.  तसं प्रतिकला आठवलं हॉस्पिटल बोरीवलीलाच आहे. ओके मी सोडतो तुला...मला पण तिथेच जायचं आहे, प्रतीक म्हणाला. सर ईट्स ओके, मी जाईन सर ट्रेनने, समिधा म्हणाली. तसा तो पुन्हा म्हणाला हे बघ, बॉसगिरी मला करायला भाग नको पाडू . तुला सोडतोय म्हणजे सोडतोय...हवं तर घरी कॉल करुन सांग, मग तर झालं... चल आता बॅग पॅक कर. ओके सर, समिधा म्हणाली आणि पर्स पॅक करायला डेस्कवर निघून गेली.

तसं प्रतिकने सुद्धा त्याचा लॅपटॉप बंद करुन बॅग पॅक केली आणि तो त्याच्या कॅबिनमधून समिधाच्या डेस्ककडे आला. Yes, Samidha done your packup? प्रतिकने समिधाला विचारलं. Yes, Sir almost done असं म्हणून समिधाने तिचा ड्रॉवर लॉक करुन चावी पर्समध्ये टाकली. चला निघूया सर..समिधा म्हणाली. समिधाला लिफ्टकडे थांबायला सांगून प्रतिकने सेक्युरिटी गार्डला काही सूचना दिल्या आणि तो लिफ्टकडे जायला निघाला. तोपर्यंत लिफ्ट त्यांच्या फ्लोअरपर्यंत आली. तसे दोघेही लिफ्टमधून खाली आले. समिधाला गेटकडे थांबायला सांगून प्रतीक कार घेऊन आला. Yes samidha, come असं म्हणून त्याने कारचा पुढचा दरवाजा उघडला. तशी समिधा कारमध्ये बसली आणि प्रतिकने कार पुन्हा सुरू केली. एरवी टीम बरोबर मित्रासारखा वागणारा प्रतीक आज मात्र शांतच होता.

बराच वेळ प्रतीक काहीच बोलत नाही आहे हे पाहून समिधा प्रतिकला म्हणाली सर मी songs लावू का...? प्रतिकने मानेनेच हो म्हटलं तसं समिधाने मोबाईल कारच्या कनेक्टरबरोबर कनेक्ट केला आणि गाणं सुरु झालं. 2- 3 गाणी झाल्यावर प्रतिकला आवडणार गाणं सुरु झालं..तशी समिधा प्रतिककडे पाहू लागली. तिच्या मनात विचार आला आपला बॉस आपल्या टीम बरोबर किती फ्रेंडली वागतो.. त्यांना हे ही माहीत होतं की मी बोरिवलीला राहते हे...पण मग आज त्यांनी मला असं का विचारलं की तू कुठे राहते..? काहीतरी आहे ज्यामुळे सर खूप डिस्टर्ब आहेत. 

प्रतिक गाण्यावर काहीही न बोलता शांतपणे कार चालवत होता. तसं तिने न राहवून त्याला विचारलं, सर तुमची आज तब्येत ठीक नाही आहे का? तसा प्रतिक म्हणाला, नाही असं काही नाही, असं का विचारलंस...? तशी समिधा पुन्हा म्हणाली, सर मी तुमच्या केबिन मध्ये आले होते तेव्हापासून मला तुम्ही खूप डिस्टर्ब वाटतं आहात any serious issue in today's meeting sir....? तसा प्रतिक म्हणाला, nothing serious samidha.... then sir why you are not reacted on your favourite song sir... आय मिन लास्ट टाइम जेव्हा तुम्ही मला आणि प्रेरणाला घरी सोडलं होतं ट्रेनचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा.... तेव्हा तुमचं फेवरेट सॉंग जेव्हा स्टार्ट झालं होतं तेव्हा तुम्ही किती एक्सायटेड झाला होतात आणि आवाज वाढवला होता तूम्ही त्यावेळी सॉंगचा.... पण आज मात्र तुम्ही असं काहीच केलं नाही आहे... सर सगळं ठीक आहे ना, your big boss again increase your target.....? Then its ok sir, we are ready to achieve our team target sir.. समिधा प्रतिकला बोलायला भाग पाडण्याचा प्रयत्न करत होती.

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...