Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष- भाग-१८

Read Later
अस्तित्व एक संघर्ष- भाग-१८
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-१८


प्रतिकने जेवून झाल्यावर सगळे एकत्र बसले असताना आईबाबा आणि राजीवला प्रेरणाच्या घरी घडलेला  प्रसंग सांगितला..आईला सगळं ऐकून प्रेरणाच्या शेजारी राहणाऱ्या मालगुडे बाईंचा राग आला.

आई: असं कसं कोण वागू शकत....?

बाबा: हो ना, एक बाई असून एका बाईला समजून घेऊ शकत नाही...

आई: मग प्रेरणाची आई त्यांना काही म्हणाल्या नाहीत का..?

प्रतिक: आई, त्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या...मग मी आणि समिधा त्यांना खूप काही बोललो... मी त्यांच्या समोरच डॉक्टरांशी कॉलवर बोललो, त्यांच्या भावाची complaint केली. आणि त्या तिथून आम्हाला बडबडत निघून गेल्या....त्या गेल्यावर मी पुन्हा डॉ ना कॉल केला. डॉ त्यांच्या भावाला नोकरीवरून काढून टाकणार होते...म्हणजे त्यांनी त्याला तोपर्यंत कॉल करून सुनावलं सुद्धा होतं. त्यांना म्हणालो, की त्याला नोकरीवरून काढून टाकू नका हवं तर काही महिने घरी बसवा...without salary... त्यांना पण माझं म्हणणं पटलं...कारण त्याच घर म्हणे त्याच्या सॅलरीवरच चालतं असा तो त्यांचा भाऊ डॉ ना म्हणत होता आणि नोकरीवरून काढू नका म्हणून विनवण्या करत होता..  

राजीव: पण त्याने हे सांगता कामा नये होतं...म्हणजे जर त्याला हॉस्पिटलमधून हे सांगण्यात आलं होतं की कोणाशीही याबद्दल बोलू नका म्हणून... तर मग त्याने सांगायला नको होतं..असं माझं तरी मत आहे.

प्रतिक: मी त्या मालगुडेंशी बोललो, त्यावरून मला तरी असंच वाटतं की त्यांनीच त्यांच्या भावाला गोड बोलून सांगायला भाग पाडलं असणार...आईबाबा, मी हे खरंतर तुम्हाला सांगून करायला हवं होतं म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी मी तुमच्या कानावर ही गोष्ट घालायला हवी होती...पण त्यावेळी घडलंच तसं की त्यांना मी शब्द दिला...म्हणजे मला हा निर्णय तुम्हा दोघांना सांगून घ्यायचा होता...पण...

आईबाबा: कोणता निर्णय..? जरा समजेल असं सांगशील का...??

प्रतिक: आईबाबा, मी प्रेरणाच्या आईला म्हणालो, की मला प्रेरणाशी लग्न करायचं आहे म्हणून...असं सांगून प्रतिक दोघांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला...त्याला समजत नव्हतं की आईबाबा आता कसे रिऍक्ट होतील. आईबाबा दोघेही शांत झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले....राजीवला ही समजेना की काकाकाकू आता काय बोलतील ते..तसा प्रतिक पुन्हा म्हणाला, माझं चुकलंच आईबाबा मी तुम्हा दोघांना असं त्यांना बोलण्यापूर्वी सांगायला हवं होतं...

बाबा: (प्रतिकची मस्करी करण्याच्या हेतूने थोडा राग आल्याचा आव आणत) हो खरंच चुकलं तुझं...तू आधी आम्हाला याबद्दल विचारायला हवं होतं...तू आम्हाला आधी विचारलं असतं तर आम्ही नकार दिला असता का...? पण नाहीच तुला आम्हाला हे विचारणं महत्वाचं वाटलं नाही...आम्ही दोघेही तुझ्या या अशा वागण्याने दुखावलो गेलो आहोत..

प्रतिक: (त्यांच्या या बोलण्याने हळवा झाला) माझं खरंच चुकलं म्हणजे मला हे तुम्हाला खूप आधीच सांगायचं होतं की मला प्रेरणाबरोबर लग्न करायचं आहे म्हणून...पण हे सगळं मला तिचा होकार आल्यावर सांगायचं होतं...ते त्यांच्या घरी जे घडलं त्यावेळी मी हे बोलून बसलो....आईबाबा खरंच चुकलं माझं...मी आधी तुम्हाला सांगायला हवं होतं..

आईबाबा दोघेही हसू लागले. राजीव आणि प्रतिकला ते का हसत आहेत ते कळेना...

आई: (बाबांना उद्देशून म्हणाली) अहो, आता सांगाल का त्याला...?

प्रतिक: काय ते..? 

बाबा: अरे आम्ही दोघं तुझी मस्करी करत होतो...आणि आईबाबा मुलाच्या मनात काय चाललं आहे ते सर्वात आधी ओळखतात...तू इतकी दिवस जी प्रेरणासाठी धावपळ करतो आहेस त्यावरून आम्हाला समजत नाही का..? की आमच्या मुलाचं तिच्यावर किती प्रेम आहे ते...

आई: हो ना....बाबा म्हणतात ते खरं आहे....आणि आमची दोघांची ही तुझ्या पसंतीला मंजूरी आहे...

तसा प्रतिक लाजला... त्याला असं लाजताना पाहून राजीव म्हणाला, वाह वाह मेरा दोस्त तो शरमाना भी जानता है...अभी मेरा ऐसे शरमाने का टाइम कब आयेगा...!!

बाबा: (हसत हसत राजीवच्या पाठीवर हाताने थोपटत म्हणाले) बेटा तेरा भी टाइम जरूर और जल्दी आयेगा...तसे सगळे हसायला लागले...

राजीव: इसी बहाने कुछ ice cream पार्टी होनी चाहिये...

आई: हो हो, नक्की...मैं यूं गयी और यूं आयी..!! असं म्हणून आई आईसक्रीम आणायला गेली.

प्रतिक: म्हणजे बाबा तुम्हाला आईला तुम्हा दोघांना माहित होतं की मी आज हे असं काही सांगणार आहे ते...? आईने आईस्क्रीम आणून ठेवलं आहे ते...

बाबा: अरे आज तिने तिच्या कूकिंग क्लास मध्ये ice cream बनवायला शिकवलं...तर तुला तर माहित आहेच की तुझी आई जे शिकवते ते ती घरच्यांसाठी सुद्धा बनवते...

तोपर्यंत आई ice cream घेऊन हजर झाली. सगळ्यांनी प्लेटमधून आईस्क्रीम घेतलं.

बाबा:( आईस्क्रीम खाता खाता म्हणाले) मग राजीव तुझी गाडी कुठपर्यंत वळली...

राजीव: छे हो काका, तिचं मला काही समजतच नाही...म्हणजे आम्ही रोज गप्पा मारतो कधी चॅटवर कधी कॉलवर, मी तिला भेटलो सुद्धा आहे..कधी केस निमित्ताने कधी असंच...कधी तिला गिफ्ट घ्यायचं होतं भावाला बर्थडेसाठी म्हणून सुद्धा...पण मला तिच्या मनातलं काही कळतही नाही...म्हणजे जे काही सांगते ते सगळं हक्काने सांगते...आणि विचारते सुद्धा हक्काने...म्हणजे मला ओरडण्याइतपत...

प्रतिक: मग विचारून टाक ना...एक तो आर या पार...हो ना बाबा...

बाबा: थोडं सांगणं कठीण आहे....जाऊदे काही दिवस अजून...कारण तुझी तिची ओळख होऊन फार वेळ नाही झाला आहे...आणि लगेच असं विचारणं म्हणजे कधी कधी एखाद्या मुलीला आपण फक्त फ्रेंड म्हणून आवडत असू आणि त्यात जर असं काही विचारलं तर त्या फ्रेंड म्हणून पण बोलणं अव्हॉइड करतात...so wait for the right time...

आई: हो बरोबर बोलत आहेत काका तुझे...आता केस संदर्भात तुझं तिच्याशी बोलणं होतच आहे अजून काही दिवस जाऊदे मग विचार कधीतरी...आणि हो आईबाबांना पण सांग बरं का...रेखाबद्दल.

राजीव: हो काकू, आता उद्या कोर्टात केस आहे त्यानंतर मी परवा घरी जायचा विचार करतोय...तेव्हा विचार करतोय घरी सांगावं आईबाबांना रेखाबद्दल....आणि बरेच दिवस झाले इथे राहून सुद्धा.

प्रतिक: हां झालं तुझं जायचं चालू सुरु....मी येतो तुझ्या घरी तेव्हा...तू पाठवतोस का मला लगेच...

आई: अरे त्याला जावंस वाटत असेल तर जाऊदे ना...पण परत ये नक्की आजी येण्याच्या आधी...आजी काय सांगून गेल्या होत्या आठवत ना तुला...

राजीव: हो हो, नक्की येईन...उद्या कोर्टात केस आहे....prepare तर मी आहे केस साठी पण तरी थोडं दडपण आलं आहे...

बाबा: अरे नको काळजी करुस...आम्हाला खात्री आहे तू नक्कीच छान लढशील. चला आता झोपायला...उद्या जायचं आहे ना...असं म्हणून दोघांना काकांनी झोपायला पाठवलं आणि आईबाबा ही झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी सगळे मीडिया पोलीस स्टेशनच्या बाहेर कधी एकदा आरोपी येत आहेत म्हणून तयार होते... मनोज आणि नरेश पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनमधून कोर्टात जाण्यासाठी बाहेर पडले....तसे सगळ्यांनी कॅमेरा त्यांच्या दिशेने रोखून धरले. मि जाधव सगळ्यांना काही सूचना देत असतानाच ठरल्याप्रमाणे मनोजने मि काळे यांना जोरात धक्का दिला...आणि नरेशने हातात बेड्या असूनही शिताफीने त्यांच्या खिशातून त्यांची गन काढून घेतली... आणि सगळ्यांसमोर गन दाखवून एकाबाजूला राहायला सांगितलं. मनोज आपला प्लॅन successful झाला म्हणून नरेशजवळ हसत हसत आला. तोच नरेशने त्याला सुुुध्दा गन दाखवली. सगळे न्युज चॅनेल आपापले camera घेऊन जिथे मिळेल तिथे लपून शूटींग करत होते. 

मनोज: (त्याला असं गन स्वतः कडे रोखलेलं पाहून म्हणाला) नरेश काय करतोय तू, मी तुझा मित्र आहे ना...आणि तू मलाच गन दाखवत आहेस..

नरेश: आज हा दिवस माझ्या आयुष्यात तुझ्यामुळेच आला आहे... तुझ्या मैत्रीमुळेच मी माझ्या संसाराची राखरांगोळी केली. त्या दिवशी किती विश्वासाने ती मुलगी माझ्या रिक्षेत बसली होती... आणि तू आणि मी....तिला आयुष्यातुनच उठवलं रे...

मि जाधव आणि काळे नरेश बोलत असताना काही करता येईल या प्रयत्नात होते... तोच नरेशने पुन्हा त्यांना गन दाखवून काहीही हालचाल करु नका असं सांगितलं. तो त्यांना असं सांगत असतानाच मनोज तिथून पळू लागला... तोच नरेशने त्याच्या पायावर गोळी झाडली.... मनोजने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं... तर त्याने पुन्हा एक गोळी त्याच्या छातीवर मारली. तोच मनोज रस्त्यावर पडला. पोलिस मनोजच्या दिशेने जाणार असं दिसतं असतानाच पुन्हा नरेशने त्यांना गन दाखवून जागेवरुन हलू नका म्हणून सांगितलं आणि सगळ्यांना म्हणाला, हा मनोज आहे ना याने आज इथून पळून जायचा प्लॅन केला होता... याला त्याच्या वागण्याचा जराही पश्चाताप नाही...मी म्हणत नाही फक्त तोच गुन्हेगार होता असं... मी सुध्दा खरंच खूप चुकलो जो प्रत्येक गोष्ट याच्या सारखीच करु लागलो. मि जाधव त्याला समजवण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळ यायचा प्रयत्न करु लागले.. तोच नरेशने स्वतःच्या डोक्यावर गन ठेवली आणि म्हणाला, साहेब येऊ नका माझ्याजवळ नाहीतर मी स्वतःला गोळी झाडेन.. त्याचं हे बोलणं ऐकून मि जाधव म्हणाले, हे बघ नरेश तू असं काहीही करणार नाही आहे... बघ मी जातो हवं तर मागे... असं म्हणून ते पुन्हा मागे गेले. 

तसा नरेश पुन्हा बोलू लागला... आजपर्यंत माझ्या बायकोने मला कितीदा समजावलं मला, दूर रहा या मनोज पासून.... कधीतरी घात करेल तो तुमचा... मी नाही ऐकलं माझ्या बायकोचं... मला माफ कर ग....खरंच मला माफ कर...असं म्हणून तो रडत रडत धाडकन खालीच बसला....आणि सगळया पोलिसांना पाहून हसत त्याने गन स्वतःच्या डोक्यावर ठेवून स्वतःला गोळी झाडून घेतली....लगेच मि जाधव नरेशकडे धावले...नरेश on the spot गेला होता. तोच मि काळे यांनी जाधव यांना मनोज अजून जिवंत असल्याचं सांगितलं. जाधव यांनी तातडीने ambulance ने मनोज आणि नरेशला हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. 

आता सगळ्या चॅनेलवर ही बातमी दाखवयला सुरवात झाली....नरेशची बायको आपल्या आईबरोबर घरातलं काम करत होती...टीव्ही वर सांगत असलेली नरेशची बातमी कानावर पडताक्षणी त्याची बायको तिथेच चक्कर येऊन पडली.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...