Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष- भाग-१७

Read Later
अस्तित्व एक संघर्ष- भाग-१७
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

 भाग-१७


प्रतिक आणि समिधा दोघेही कार मधून ऑफिसच्या अर्ध्या रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये अडकले. तसं प्रतिकने समिधाला विचारलं, मी प्रेरणाच्या घरापासून कार चालवत होतो तेव्हापासून बघतो आहे तू सतत माझ्याकडे बघतेय काय आणि एकटीच गालात हसतेय काय...!! मला पण कळू दे जरा, तुझ्या मनात काय विचार चालल आहे ते...??

समिधा: नाही सर, काही नाही..., तुम्ही समजतात तसं काही नाही...

प्रतिक: म्हणजे नक्कीच काहीतरी आहे, सांग बघू... अजून ट्रॅफिक खूप आहे... त्यामुळे तुला सांगण्याशिवाय पर्याय नाही...

समिधा: ओके सर सांगते मी...!! ते तुम्ही प्रेरणाच्या आईला म्हणालात ते अगदी मनापासून म्हणालात की, त्या टेन्शनमध्ये होत्या म्हणून म्हणालात...?

प्रतिक: हं, तुला काय वाटतं...?

समिधा: मला वाटतं तुम्ही seriously बोललात...

प्रतिक: हो मी serious होतो...आणि प्रेरणाला मी पसंत असेन तर, मी लग्न करेन तिच्याबरोबर...

समिधा: मग ती होकारच देईल बघा...माझं मन सांगत आहे मला...

प्रतिक: (हसून) तुझ्या मनातलं खरं ठरु दे मग...पण मग तू हसत का होतीस...?

समिधा: सर ते मला मॅग्गी वाला incident आठवला... तोच incident जो मी प्रेरणाला सांगितला तेव्हा ती हसत होती.

प्रतिक: हां हसली होती खरी, पण नक्की मॅग्गी काय चिडवत होती तिला...? ज्या मुळे प्रेरणाला खूप राग आला होता तिच्यावर...?

समिधा: सर, तुम्ही रागावणार नाहीत ना...?? 

प्रतिक: नाही ग बोल...

समिधा: सर त्या दिवशी ट्रॅडिशनल डे ला मॅग्गीने पाहिलं होतं तुम्हाला बऱ्याच वेळा प्रेरणाला एकटक पाहताना तर ती तुमच्या नावाने प्रेरणाला चिडवत होती..म्हणत होती, की देख देख तेरा बॉस तेरे उपर कैसे लट्टू हुआ है... तेरे उपरसे नजर उसकी हट ही नहीं रही है... तेव्हा प्रेरणा जाम भडकली होती तिच्यावर...पण तिने कंट्रोल केलं स्वतःला...आणि नेमकं मॅग्गी पाय घसरुन पडली... सर, एक विचारु, रागावणार नसाल तर...

प्रतिक: हां विचार...

समिधा: तुम्ही खरंच त्या दिवशी म्हणजे ट्रॅडिशनल डे ला प्रेरणाला एकटक पाहत होतात...??

प्रतिक: ( फक्त हसला आणि विषय बदलत म्हणाला) अरे सिग्नल सुटला बघ...

समिधाला त्याच्या हसण्यावरून जे समजायचं होतं ते समजलं आणि ती गालातल्या गालात हसली.

 

थोड्या वेळाने दोघेही ऑफिस मध्ये पोहचले. मीनाने प्रतिकला गुड मॉर्निंग म्हंटल आणि ती पुन्हा कस्टमर च्या फाईल्स चेक करु लागली. प्रतिक तिला good मॉर्निंग म्हणून त्याच्या केबिनमध्ये गेला. समिधाने तिची बॅग ठेवली आणि ती सुद्धा कामाला लागली. मीनाची सुट्टी संपून तिने आज जॉईन केल्यामुळे समिधाचं काम कमी होणार होतं. 

 

थोडया वेळाने प्रतिकने दोघींना आत बोलावलं. त्या आल्यावर प्रतिकने त्यांना बसायला सांगितलं.

प्रतिक: इंटर्नशिप साठी उद्या interview arrange करत आहे. तुमच्या दोघींच्या reference ने कोणी suggest करायचं असेल तर सांगा. फर्स्ट राऊंड HR घेईल मग मी घेईन. आपण दोन जण घेणार आहोत तर Details तुम्ही HR ला send करून मला cc मध्ये ठेवा.

दोघी: ओके सर

प्रतिक: त्या दोघांना तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं आहे after selection...

समिधा: सर, म्हणजे नक्की कोणतं कोणतं ट्रेनिंग द्यायचं?

प्रतिक: कस्टमर चा डेटा system मध्ये कसा add करावा अपडेट करावा. बाकी कस्टमर च्या सगळ्या queries तुम्हीच हँडल करायचं आहे after 3 months त्यांना वेगळं काम द्यायचं ते सांगेन मी नंतर.

मीना: म्हणजे सर new कस्टमर आहे loan la apply करतोय त्या वेळी तो form fill करणार ti प्रोसेस आम्ही हँडल करणार की इंटर्न ला सांगायची....?

प्रतिक: इंटर्नला तुम्ही ट्रेनिंग द्या... जर दोन्ही इंटर्न काम चांगलं करत असतील तर त्यांचा period वाढवून 1 year करायचा आहे आपल्याला..आणि चुका खूप करत असतील तर त्यांना 6 months नंतर continue नाही करायचं. आणि त्यांच काम त्यांना एकमेकांना चेक करायला द्यावं किंवा मग तुम्हा दोघींना जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही त्यांचं काम चेक करा. असं फक्त तुम्हाला एक महिना द्यायचं आहे ट्रेनिंग त्यानंतर त्यांचं त्यांना करु द्यायचं आहे.

दोघी: ओके चालेल सर...

प्रतिक: मीना, तुला समिधाने सांगितलं ना प्रेरणा बद्दल...?

मीना: हो सर, तिने मला सुट्टीवर असताना कॉल करुन सांगितलं.

काही चॅनेलमध्ये काल असं ही सांगितलं आहे की त्या आरोपींना दोन दिवसांनी कोर्टात हजर करणार आहेत म्हणून ... 

प्रतिक: हो, दोन दिवसांनी आहे केस कोर्टात... केसमध्ये media ला काही restrictions ठेवले आहेत.

मीना: हो सर, समिधा म्हणाली मला त्याबद्दल...

प्रतिक: anyways, कोणी असेल internship ला इंटरेस्टड तर मेल करा.

दोघी: ओके सर...असं म्हणून दोघी ही आपापल्या डेस्ककडे गेल्या.

 

दुसऱ्या दिवशी ठरवल्या प्रमाणे interview सुरु झाला... HR ने 12 resume सिलेक्ट केले होते.... त्यातून तिने 5 जणांना थांबायला सांगून प्रतिकला त्यांचा राउंड घ्यायला सांगितला. चार जणांचे interview झाले...प्रेरणाच्या भावाचा म्हणजे विवेकचा नंबर शेवटचा होता... HR ने सांगितल्या प्रमाणे तो प्रतिकच्या केबिन मध्ये गेला... भले तो प्रतिकच्या refernce तिथे आला होता तरीही प्रतिकने त्याला सोपे प्रश्न नाही विचारले.... त्याने विवेकला बरेच सारे कस्टमर desk साठी लागणाऱ्या position साठी फिरवून प्रश्न विचारले..... एक दोन प्रश्न वगळता विवेकने सगळ्या प्रश्नांची उत्तरे छान दिली...त्याच्या उत्तरातून त्याला बरीच माहिती असल्याचं दिसून येत होतं...प्रतिकने त्याचा interview संपवून त्याला HR selection झालं की नाही हे कॉल करून सांगेल म्हणून सांगून जायला सांगितलं. तसा विवेक ही तिथून घरी जायला निघाला.

दुपारी विवेकला प्रेरणाच्या ऑफिसमधून त्याचं selection झाल्याचा HR चा कॉल आला. त्याने ही आनंदाची बातमी आईला आणि हॉस्पिटलमध्ये प्रेरणा बरोबर असलेल्या बाबांना पण कॉल करुन ही बातमी सांगितली. आई बाबा दोघेही हे ऐकून खुश झाले. आईने देवासमोर साखर ठेवली आणि म्हणाली, आता फक्त माझ्या प्रेरणाला ठीक कर बाकी माझं काही मागणं नाही तुझ्याकडे...तिच्या बरोबर विवेकने सुद्धा देवाकडे दीदी ला लवकर ठीक कर म्हणून प्रार्थना केली.

खरी खबर चॅनेल मध्ये उद्या आरोपींना कोर्टात नेणार तेव्हा  यासाठी news चे rules सर सगळयांना सांगत होते त्यांना आता कोणतीही कारवाई  चॅनेल वर होणार नाही अशी काळजी घ्यायची होती. त्यांनी खास करुन मोनिकाला या संदर्भात सूचना दिल्या आणि तिने सुद्धा तिच्या कडून पुन्हा अशी चूक होणार नाही याची खात्री दिली.

जेलमध्ये नरेशच्या मनात बायकोचा आणि मुलीचा विचार येत होता. आपण आपला संसार कसा बरबाद केला याचं त्याला खूप वाईट वाटतं होतं....पण आता त्याला चूक समजून सुदधा आता त्याच्या हातात काहीच नव्हतं.... मनोज त्याला अधून मधून उद्या त्याला काय करायचं आहे त्याची आठवण करुन देत होता....आपण असं केलं तर इथून लवकर सुटू असं वारंवार सांगत होता. पण नरेशच्या मनात वेगळाच विचार चालू होता.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...