Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व - एक संघर्ष भाग-१५

Read Later
अस्तित्व - एक संघर्ष भाग-१५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-१५


बऱ्याच वेळाने डॉ बाहेर आल्या आणि प्रतिककडे येऊन म्हणाल्या, मी आता प्रेरणाला चेकअप करुन इंजेक्शन दिलं आहे त्यामुळे ती झोपली आहे... तुम्ही तिच्या बरोबरच थांबा म्हणजे जेव्हा ती शुध्दीवर येईल तेव्हा पुन्हा घाबरुन जाता कामा नये... आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला केव्हाही कॉल करा... असं म्हणून डॉ गोवेकर डॉ ना भेटायला केबिनमध्ये निघून गेल्या. तसा प्रतिक पुन्हा प्रेरणाच्या बाजूला जाऊन बसला.

रिपोर्टर मोनिका आणि संजय दोघेही प्रेरणा ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहचले आणि रिसेप्शन सेंटरला गेले. संजयने ठरल्याप्रमाणे त्याच्या मित्राचं नाव आणि रूम नंबर सांगितला. तसं रिसेप्शनिस्टने त्यांना कुठून जायचं, आणि कोणत्या मजल्यावर जायचं आहे ते सांगितलं तसे त्यांनी थँक्स म्हणून तिथून ते पुढे निघाले. मोनिकाला कॉल आल्यामुळे तिने खिशातून मोबाईल काढला. तोच तिचं icard पडलं आणि ते तिच्या लक्षात नाही आलं. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टचं तिथे लक्ष गेलं. तोपर्यंत ते दोघेही पुढे निघून गेले होते. तिने बघितलं तर icard वर खरी खबर रिपोर्टर म्हणून लिहिलं होतं. तिच्या सगळा प्रकार लक्षात आला आणि तिने लगेच प्रेरणाच्या मजल्यावर डॉक्टरांना त्याबद्दल सांगितलं. डॉ नी कॉलवर झालेलं बोलणं डॉ गोवेकर यांना सांगितलं. तसं डॉ स्नेहा म्हणाल्या, या लोकांना फक्त न्यूज दिसते का...तिची अवस्था काय असेल हा विचार नाही का करता येत यांना...डॉ ते दोघे आले की तुम्ही केबिन बाहेर पडून त्यांना थांबवा...काहीही करुन ते प्रेरणाच्या रूममध्ये जाता कामा नये. तसं लगेच डॉ नी नर्सला प्रेरणाला त्यांच्या केबिनच्या बाजूलाच असलेल्या रूम मध्ये तातडीने शिफ्ट करायला सांगितलं. डॉ कडून ऑर्डर मिळाल्या प्रमाणे नर्स लगेच प्रेरणाच्या रूम मध्ये गेली. तिने डॉ नी सांगितलेला सगळा प्रकार प्रतिकला सांगितला. तसा प्रतिक तिला म्हणाला, सिस्टर, पण आपण शिफ्ट कसं करायचं..त्यावर नर्स म्हणाल्या मला ही समजत नाही आहे  मी बेड चेअर अरेंज केली असती आणि आपण त्यावरून प्रेरणाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं असतं पण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे..म्हणजे ते दोघं कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतात. तसा प्रतिकने मनात काही ठरवलं आणि तो म्हणाला, ठीक आहे तुम्ही प्रेरणाची औषधे घ्या.. आणि त्या रूम मध्ये चला मी येतो प्रेरणाला घेऊन लगेच... तसं नर्सने प्रेरणाची औषधे घेतली. प्रतिकने प्रेरणाला हळूवार उचललं, जेणेकरून तिला कोणताही त्रास होणार नाही. तिला उचलून रूममध्ये नेत असताना त्याच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती... जणू त्याला त्याचं हृदय काहीतरी सांगू पाहत होतं. त्याने सावकाश प्रेरणाला बेडवर ठेवलं. नर्सने प्रतिकला म्हटलं, thank you तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात... आणि please तुम्ही इथेच थांबा कुठे जाऊ नका असं म्हणून ती रूमचा दरवाजा बंद करुन डॉ ना सांगायला निघून गेली. प्रतिकचं हृदय अजूनही खूप धडधडत होतं... मला अचानक असं का झालं प्रेरणाला उचलल्यावर...मी असं करण्याशिवाय दुसरा काही पर्याय ही नव्हता. काय होतं आहे मला नक्की.. तो प्रेरणाकडे पाहत विचार करु लागला.

रिपोर्टर मोनिका आणि संजय प्रेरणाच्या मजल्यावर आले आणि प्रेरणा कुठे असू शकेल याचा अंदाज घेऊ लागले. कोणीतरी फिरत आहे हे नर्सच्या लक्षात आलं आणि तिने डॉ ना लगेच त्याबद्दल सांगितलं. मोनिका आणि संजय डॉ च्या केबिनपर्यंत पोहचताक्षणी डॉ केबिनच्या बाहेर आले आणि त्यांनी दोघांना अडवलं... आणि म्हणाले, कोणाला भेटायचं आहे तुम्हाला, तसं संजयने त्याच्या मित्राचा रूम नंबर सांगितला. तसे डॉ मोनिकाला म्हणाले, तो रूम पहिल्या मजल्यावर आहे... तुम्ही रिसेप्शन सेंटरला विचारलं होतं ना रिपोर्टर मोनिका... फ्रॉम खरी खबर न्यूज चॅनल..तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमचा प्लॅन काय आहे ते ओळखणार नाही का...? आणि तुम्हाला कोर्टाचे आदेश माहीत नाही का....? की तुम्हाला त्याच पालन करायचं नाही आहे... मी आताच्या आता पोलिस स्टेशनमध्ये कॉल करुन तुम्ही केलेला हा प्रकार कळवू शकतो... मी काही action घ्यायच्या आधी तुम्ही स्वतःहून इथून गेलात तर बरं होईल...असं म्हणून डॉ नी त्या दोघांना तिथून निघून जायला सांगितलं. त्यावर मोनिका डॉ ना म्हणाली, सॉरी डॉ, आमच्याकडून चूक झाली पुन्हा ही चूक होणार नाही... तसे डॉ म्हणाले, ठरवून केलेली गोष्ट चूक होत नसते मिस मोनिका...I Hope so, you never repeat it... otherwise I also know, how to handle it and please collect your id from reception counter. त्यावर मोनिका आणि संजय दोघेही तिथून पुन्हा सॉरी म्हणून निघाले. मोनिकाने तिचं icard घेतलं आणि ते दोघेही त्यांच्या ऑफिसमध्ये आले. डॉ नी आधीच पोलिसांकडून मोनिकाच्या सरांना सांगून पुन्हा असा प्रकार घडता कामा नये म्हणून ऑफिस स्टाफला वॉर्निंग द्यायला सांगितले. मोनिका आणि संजय ऑफिसमध्ये पोहचताक्षणी त्यांच्या सरांनी त्या दोघांना यावरून झापलं आणि ते मोनिकाला म्हणाले, मला हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं, आता यापुढे कोणतीही गोष्ट तू मला विचारल्या शिवाय करणार नाही... आणि मला हे सगळं मेल करून हवं आहे तुम्हा दोघांकडून...आज आपल्या ऑफिसवर कोर्टाकडून तुमच्या अशा मुर्खपणामुळे action घेतली गेली असती..आता तुम्ही दोघे निघा आणि तुमच्या कामाला लागा...तसे ते दोघेही त्यांच्या सरांना पुन्हा असं होणार नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुम्हाला याबद्दल विचारूनच करू असं म्हणून आपल्या डेस्कवर गेले.

ते दोघेही गेल्यानंतर डॉ स्नेहा यांनी डॉ ना प्रेरणाच्या केसमधली प्रोग्रेस सांगितली आणि कोणत्या मेडिसिन आणि इंजेकशन्स द्यावी लागतील हे लिहून दिले आणि त्या हॉस्पिटलमधून निघाल्या. त्या गेल्यावर डॉ प्रेरणाच्या रूममध्ये गेले. प्रतिक तिच्याच बाजूला ऑफिसचे मेल मोबाईलवर चेक करत बसला होता...डॉ त्याच्यापाशी गेले आणि म्हणाले, मि राजाध्यक्ष, आज खरंच तुम्ही जे काही केलं ते तारीफ करण्यासारखंच केलं आहे. म्हणजे डॉ मी समजलो नाही...प्रतिक म्हणाला. तसे डॉ म्हणाले, मिस प्रेरणांची आधीची रूम लगेच भेटू शकेल अशी होती... म्हणजे खरी खबरवाल्यांना ती रूम लगेच भेटली असती...त्यांच्याकडे त्याक्षणी कॅमेरा नव्हता पण सध्याच्या काळात मोबाईलवरही विडिओ काढता येतो...म्हणून मी नर्सला लगेच शिफ्ट करायला सांगितलं. you are really nice person , म्हणजे काल मला मि प्रधान म्हणाले, की त्यांना आज ऑफिसमध्ये जावं लागणार आहे म्हणून...त्यामुळे मिस प्रेरणाबरोबर कोण थांबणार म्हणून ते थोडे टेन्शनमध्ये होते...तेव्हा मी तुमच्याकडे हेल्प मागा म्हणून त्यांना सजेस्ट केलं होत...त्यांना तुम्ही तिचे बॉस म्हणून कसं बोलावं याचं टेन्शन आलं होतं पण मी म्हणालो त्यांना, की मि राजाध्यक्ष तसे नाहीत...ते नक्की तुम्हाला मदत करतील...तशी आपली फार ओळख नाही...पण आम्हा डॉ लोकांना माणसे ओळखता येतात ते देवाने आम्हाला दिलेलं एक देणं समजा हवं तर...पण तुम्ही स्वतःच इथे आज मिस प्रेरणा यांच्या बरोबर थांबलात आणि मघाशी ते रूममध्ये त्यांना शिफ्ट करणं हे खरंच खूप कमी लोक करतात...असं म्हणून डॉक्टरांनी प्रतिकच्या खांदयावर हात ठेवून थोपटलं. तसा प्रतिक म्हणाला, डॉ मी फक्त माझ्या परीने जितकी होईल तितकी मदत केली.  तसे डॉ म्हणाले, हो यालाच तर चांगुलपणा म्हणतात....anyways मि राजाध्यक्ष, डॉ स्नेहा यांनी काही मेडिसिन्स वेगळे दिले आहेत म्हणजे या मेडिसिन आपल्याला आफ्टर २ डेज नंतर स्टार्ट करायच्या आहेत...आणि इंजेकशन्स तर नर्स देतीलच त्यांना जसे लिहून दिले आहेत त्याप्रमाणे...सो मिस प्रेरणा लवकर ठीक होतील...अजून त्या उठल्या नाहीत म्हणजे इंजेकशनचा इफेक्ट अजून उतरला नाही वाटत...तुम्ही बसा, मी येतो बाकीच्या पेशन्टना चेक करून...मिस प्रेरणा उठल्या की त्यांचं पण चेकअप करायला येईन..असं म्हणून डॉ रूममधून बाहेर पडले आणि प्रतिक पुन्हा ऑफिसचे मेल चेक करत बसला.

थोड्या वेळाने प्रेरणाला जाग आली ती पुन्हा तशीच घाबरून उठून इकडे तिकडे पाहू लागली...तिने बाजूला प्रतिकला पाहिलं तशी ती नॉर्मल झाली...प्रतिक मेलचे रिप्लाय देण्यात इतका बिझी होता की त्याला प्रेरणा उठल्याच लक्षात आलं नाही. प्रेरणाला तहान लागली असल्यामुळे तिने बाजूचा तांब्या उचलण्याचा प्रयत्न केला...पण तो लांब असल्यामुळे तिला घेता आलं नाही पण टेबलचा आवाज आल्यामुळे प्रतिकच प्रेरणाकडे लक्ष गेलं...तसा तो म्हणाला, सॉरी प्रेरणा मी मेल चेक करत होतो म्हणून माझ्या लक्षात नाही आलं...तुला काय हवं होतं...तो प्रेरणा काही बोलेल म्हणून तिच्याकडे पाहत होता...पण ती काही नाही बोलली...मग त्याने अंदाज लावून विचारलं तुला पाणी हवं आहे का...थांब मी देतो...असं म्हणून त्याने पाणी तिला एका ग्लास मधून दिलं...तिने हातात ग्लास घेतला खरा पण तिचा हात थरथरत होता तसं प्रतिकने तो ग्लास स्वतःच्या हातात धरला आणि तिला पाणी प्यायला दिलं. तिचं पाणी पिऊन झाल्यावर प्रतिक पुन्हा तिच्या बाजूला बसला...आता तिच्या बरोबर काय बोलावं हा त्याला प्रश्नच पडला होता...मग त्याने विचार केला की आपण तिला आपल्या ऑफिसच्या function चे फोटोज दाखवूया...असा विचार करून तो उठला आणि प्रेरणाला मोबाईल दाखवत म्हणाला, हे बघ प्रेरणा आपल्या ऑफिसमध्ये दिवाळीला सेलिब्रेशन होतं ना तेव्हाचे फोटोज...तो एक एक फोटो तिला दाखवत होता आणि ती बघत होती...एका फोटोवर तो आल्यावर ती थोडी हसली...तो फोटो त्यांच्या टीमचा होता जेव्हा ते अंताक्षरीमध्ये जिंकले होते...तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल प्रतिकच्या नजरेतून सुटली नाही...त्याने लगेच मोबाईलमधून अंताक्षरीचे फोटोज शोधायला सुरवात केली...पण त्याला अजून फोटोज नाही मिळाले...फोटोज पाहून प्रेरणाच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले होते...तिच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा मिळाला होता. तोपर्यंत प्रेरणाची आई नर्सबरोबर रूममध्ये आली. तसं नर्सने प्रेरणाला आवाज दिला, प्रेरणा ताई बघा कोण आलं आहे, प्रेरणाने आवाजाच्या दिशेने पाहिलं. आईला पाहून प्रेरणा थोडी हसली. तिला हसलेलं पाहून आईला खूप आनंद झाला, ती नर्सला म्हणाली, पाहिलं सिस्टर तुम्ही, प्रेरणा माझी माझ्याकडे पाहून हसली. तसं नर्स म्हणाली, हो हो...मी पाहिलं, तुम्ही तिला आता जेवायला द्या, आता ती पोटभर जेवेल बघा आपल्या आईच्या हातून... मी थोड्या वेळाने नंतर मेडिसिन द्यायला येईन...असं म्हणून नर्स रूममधून निघून गेली. तसं लगेच आईने हात धुवून जेवणाचा डब्बा बाहेर काढला आणि एक डब्बा प्रतिककडे देत म्हणाली, हे तुमच्यासाठी तुम्ही पण जेवून घ्या...तसा प्रतिक म्हणाला, मी जेवलो असतो नंतर....काकू तुम्ही जेवलात का...तशी आई म्हणाली, खरतर मी न जेवताच येत होते...कारण सकाळपासून तुम्ही आमच्यामुळे इथे थांबला आहात..पण विवेक कॉलेजवरून आला आणि तो मला जेवल्याशिवाय पाठवायला तयार नव्हता...म्हणायला लागला तू नाही जेवणार, जेवेन म्हणशील आणि...मग मी थोडंफार खाल्लं आणि निघाले. तुम्ही जेवून घ्या आधी असं म्हणून तिने प्रतिकला जेवायला सांगितलं. तसा प्रतिक हात धुवून आला आणि जेवायला बसला. आई डब्बा उघडत प्रेरणाला म्हणाली, बाळा आता आपल्याला जेवायचं आहे...बघ मी तुझ्या आवडीचं सगळं आणलं आहे...असं म्हणून तिने हळूहळू काही ना काही सांगून प्रेरणाला स्वतःच्या हाताने भरवायला सुरवात केली..प्रतिकच जेवून झालं तसा प्रतिक हात धुवून आला. तोपर्यंत प्रेरणाचं जेवून झालं होतं. तसं आई हात धुवून आली..आणि तिने प्रेरणाचं तोंड टॉवेलने पुसून घेतलं. तसा प्रतिक म्हणाला, काकू मी निघतो मग आता... तशी आई म्हणाली, तुम्ही आज प्रेरणाबरोबर थांबून खरच खूप उपकार केले आहेत. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तसा प्रतिक म्हणाला, काकू आभार मानून मला शरमिंदा करू नका...पुन्हा कोणतीही मदत लागली तर मला सांगा मी करेन...आणि प्रेरणाच्या वागण्यात होतं असेलेले बदल डॉ ना सांगा...जेणेकरून त्यांना तिच्या मेडिसिन तशा बदलता येतील. हो हो चालेल, तुम्ही सांगतात त्याप्रमाणे आम्ही सांगत जाऊ...आई म्हणाली. तसा प्रतिक प्रेरणाकडे पाहत म्हणाला, प्रेरणा मी येतो...लवकर ठीक हो आपल्याला ऑफिस जॉईन करायचं आहे...आणि प्रेरणाच्या आईला म्हणाला, ठीक आहे काकू मी येतो. प्रेरणाने त्याच्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तोपर्यंत प्रतिक रूम मधून निघून गेला होता.

हॉस्पिटलमधून प्रतिक तडक राजीवला कॉल करून त्याच्या ऑफिसमध्ये गेला. प्रतिक ऑफिसमध्ये पोहचला तसं रिसेपशिनिस्टने राजीवला प्रतिक आल्याचं सांगितलं आणि प्रतिकला केबिनमध्ये जायला सांगितलं...तसा प्रतिक राजीवच्या केबिनमध्ये गेला...ये प्रतिक बस, काय झालं अचानक घरी न जाता इथे डायरेक्ट...राजीव प्रतिककडे येत म्हणाला. तसा प्रतिक म्हणाला, काही नाही असाच आलो...थोडं बैचैन वाटत होतं म्हणून...तसा राजीव म्हणाला, ओके सांग काय चाललं मनात तुझ्या विचार....जो तुला इतका बैचैन करतो आहे ते...तसं प्रतिकने चमकून राजीवकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला कसं कळलं, माझ्या मनात काहीतरी विचार चालला आहे ते....तसा राजीव हसून म्हणाला, मी प्रोफेशनने वकील आणि त्यातही तुझा बेस्ट फ्रेंड आहे सो तुझ्या मनात काही चाललं असेल हे मला नक्की कळणार ना...फक्त ते काय चाललं आहे ते तुझं तुला सांगावं लागेल...म्हणजे अजून मी त्या लेवलला पोहचलो नाही आहे की आपके मन मे खयाल आए और आप बिना बोले हम जान जायें... वाह वाह बहुत खूब राजीव....राजीव स्वतःलाच थोपटत म्हणाला. ओह राजे तुमची तारीफ करून झाली असेल तर बोलूया का आपण...प्रतिक राजीवला म्हणाला. हो हो..जरूर जरूर...सांग तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे ते...राजीवने विचारलं. तसं प्रतिकने प्रेरणाला बेडवरुन उचलल्यावर त्याच हृदय खूप धडधडत होतं हे सांगितलं आणि ते बराच वेळ असच होतं होतं म्हणजे मला असं सतत वाटतं होतं की ते मला काहीतरी सांगू पाहत आहे...पण नक्की काय...? तसा राजीव हसला आणि म्हणाला, मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे तुझ्या मनात त्यावेळी काय येत तेच सांगून तुला द्यायची आहेत...देशील का..? तसा प्रतिक म्हणाला, हो देईन. ओके ठीक आहे मी विचारतो राजीव म्हणाला.

राजीव : तू ऑफिसमध्ये जायचा तेव्हा नेहमी प्रेरणाला बघायचास का...?
प्रतिक : म्हणजे हो, म्हणजे तिला पाहिलं की माझा दिवस खूप छान जायचा..
राजीव: कधी न बघता गेला आहेस का तुझ्या डायरेक्ट केबिनमध्ये...?
प्रतिक: (काहीसा आठवून) हल्लीच काही दिवस तिने सांगून सुट्टी घेतली होती काही काम होतं तिचं तेव्हा...
राजीव:  त्यावेळी तुझा दिवस कसा होता...? आय मिन नेहमी सारखाच होता का...
प्रतिक: ओके ओके होता...पण मला आठवत मी त्यादिवशी सुद्धा सवयीप्रमाणे तिच्या डेस्ककडे पाहिलं होतं...
राजीव: ऑफिसमध्ये एखादं सेलिब्रेशन असायचं तेव्हा तुझं लक्ष प्रेरणाकडे जायचं का..?
प्रतिक: हो म्हणजे ती त्यावेळी खूप छान दिसायची त्यामुळे तिच्याकडून नजर हटायची नाही माझी...
राजीव: प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं त्यावेळी त्या पोलिसांच्या जागी तू असतास तर तू काय केलं असतं..
प्रतिक: मी त्या दोघांना जिवंत सोडलं नसतं..(प्रतिक थोडा भडकून म्हणाला)
राजीव: जेव्हा हे कळलं तेव्हा तू रात्री झोपलास का..?
प्रतिक: नाही मला झोप नाही लागली, मी खूप प्रयत्न केला पण मला प्रेरणाचं आठवत होती...
राजीव: प्रेरणाला हॉस्पिटलमध्ये पाहून तुला कसं वाटलं होतं त्याक्षणी..?
प्रतिक: मला तिला पाहायची ही हिम्मत होतं नव्हती...
राजीव: जेव्हा रिपोर्टर येत आहेत हे तुला कळलं तेव्हा तुझ्या डोक्यात काय विचार आला..
प्रतिक: मला प्रेरणाला फक्त आणि फक्त त्यांच्या पासून जमेल तसं लांब ठेवायचं होतं..
राजीव: जर या घटनेनंतर आजूबाजूची लोकं प्रेरणाला टोचून बोलले तर तू काय करशील...
प्रतिक: मी त्या लोकांना उत्तर देईन आणि तिला अशा लोकांपासून नेहमीच लांब ठेवेन..
तसा राजीव आनंदी होऊन हसला आणि म्हणाला, म्हणजे मी केस आधीच solve केली तर.... तसा प्रतिक आश्चर्यचकित होऊन म्हणाला, कोणती केस...? तसा राजीव म्हणाला, तुझ्या मनात जे चाललं आहे ती केस...तुला अजून ही समजत नाही आहे का प्रतिक तुला असं का होतं आहे ते...!! तसा राजीव प्रतिकच्या छातीवर हात ठेवत म्हणाला, हे हृदय आहे ना तुझं प्रेरणासाठी धडकत आहे...म्हणजे तू तिच्यावर खूप आधीपासून प्रेम करतो आहे म्हणजे ती जॉईन झाली तेव्हा पासून ही म्हणू शकतोस तू...आणि हळूहळू तुला ती जास्तच आवडू लागली आहे... म्हणजे इतकी की तिच्या बाबतीत काही घडलं की तुला झोप नीट लागत नाही...आता समजलं का तुला...का तुला असं होतं होतं ते...तसा प्रतिक खुर्चीवरून उठला आणि राजीवला मिठी मारत म्हणाला, हो राजीव माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे...प्रेरणावर.. आणि मी तिच्या शिवाय नाही रे जगू शकत. तिला नाही पाहवत मला असं...
तसा राजीव त्याला खुर्चीवर बसवत म्हणाला, हे बघ होईल सगळं ठीक, आणि ती पडेल यातून बाहेर पण तुझं तुला ठरवावं लागेल की तूला खरंच प्रेरणा तुझ्या आयुष्यात हवी आहे का ते...? कारण प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर तुझ्या घरातले सगळे तयार होतील का तिला सून करून घ्यायला...? आणि तुझं उत्तर हो असेल तर तुला तुझ्या घरातल्याना तिच्यासाठी राजी करावं लागेल...तिच्यासाठी तुला हा स्टॅन्ड घ्यावा लागेल...जमेल ना तुला... तसा प्रतिक म्हणाला, मला समजत आहे रे...तू म्हणतो आहे ते...पण मला वाटत नाही आईबाबा माझ्या मनाविरुद्ध वागतील असे...तसा राजीव त्याला मध्येच थांबवत म्हणाला, आणि आजी तयार होईल का..? तसा प्रतिक म्हणाला, मी करेन तिला तयार...तसा राजीव हसून प्रतिकला थोपटत म्हणाला, अब हुई ना बात...अब दुनिया की कोई भी ताकद तुम दोनो को अलग होने से नहीं रोक सकती...तसा प्रतिक राजीवला म्हणाला, हां और तुम दोनो को भी...त्यावर राजीव म्हणाला, हम दोनो को भी म्हणजे मी आणि कोण...? तसा प्रतिक म्हणाला, रेखा और तू और कौन....मी माझ्या मित्राला आतापर्यंत कोणत्या मुलीला असं एकटक पाहताना पाहिलं नव्हत जसं पार्किंगमध्ये तू तिला पाहत होता. राजीव थोडासा लाजून म्हणाला, हो ती पण मला त्यादिवशी हेच म्हणत होती...की तुम्ही माझ्याकडेच सतत पाहत होता. तसा प्रतिक जोरजोरात हसला आणि म्हणाला, म्हणजे तिला पण कळलं बहुतेक...की ये तो गया काम से गया. मी काय म्हणतो प्रतिक आपण आपल्या साइडने तर क्लिअर आहोत पण त्यांच्या साईडने पण आपल्याला हो हवं ना...मग काहीतरी पुढे घडेल आपलं नाहीतर काय हम दोनो देवदास बन जायेंगे....राजीव म्हणाला. हा ते तर आहेच म्हणा, प्रेरणा ठीक होईल तेव्हाच मी तिच्या घरातल्यांशी आणि तिच्याशी बोलेन या विषयावर...आणि मला तिला लागेल तेवढा वेळ घेऊ द्यायचा आहे...यातून बाहेर पडायला...मी तिच्यावर इतकं प्रेम करेन की तिच्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं ती विसरून जाईल...आणि पूर्वी सारखीच माझी वाली प्रेरणा म्हणून जगायला लागेल...प्रतिक म्हणाला. तेवढ्यात रिसेप्शनमधून कॉल आला...तसा राजीवने कॉल उचलला...हो हो, ५ मिनिटांनी त्यांना पाठव...असं म्हणून त्याने कॉल ठेवला..सॉरी यार, थोडा वेळ तुला बाहेर थांबावं लागेल एक क्लायंट आला आहे. तसा प्रतिक म्हणाला, ओके नको थांबत ठेवू त्यांना..मी निघतो तू कर काम पूर्ण तुझं... बोलू आपण घरी आरामात...तसा राजीव ही म्हणाला, चालेल मी येतो लवकर आटपून माझं सगळं काम...चल बाय...असं म्हणून प्रतिक राजीवच्या केबिनमधून घरी जायला निघाला. 

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...