Login

अस्तित्व - एक संघर्ष  भाग-१३

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-१३


प्रतिक प्रेरणाचाच मनात विचार करत घरी पोहचला. कधी एकदा प्रतिक येतोय आणि प्रतिकला काय काय घडलं ते सांगतोय याचीच राजीव वाट पाहत होता. त्याला घरी आलेलं पाहून तो खूप खुश झाला.. अरे प्रतिक मी तुझीच वाट पाहत होतो...राजीव म्हणाला. त्याच्या मागोमाग आई पण आली. राजीवला असं खुश पाहून प्रतिकने विचार केला आपण प्रेरणाबद्दल नंतर सांगू सगळ्यांना... थांब हां राजीव मी पटकन आलो फ्रेश होऊन असं म्हणून प्रतिक बॅग आणि टिफिन ठेवून फ्रेश व्हायला गेला. तो फ्रेश होऊन आला तसं आई आणि बाबा सगळ्यांना चहा आणि स्नॅक्स घेऊन आले... प्रतिक आल्याशिवाय मी काहीच सांगणार नाही असं राजीवने घोषितच केल्यामुळे आईबाबा पण काय झालं हे ऐकायला उत्सुक होते... सगळेजण बसले तसं राजीवने सांगायला सुरुवात केली. मी पोहचलो त्याच्या आधीच ती तिथे हजर होती. ती म्हणजे रेखा....आधी मला वाटलं, मला उशीरच झाला की काय ...म्हणून मी घड्याळात पाहिलं...तसं मी काय विचार करुन घड्याळात पाहिलं हे तिच्या लक्षात आलं तशी ती गोड हसून म्हणाली, सर तुम्ही घड्याळ नका बघू... तुम्ही वेळेत आला आहात... मी लवकर येऊन थांबले होते...तसा मी ही हसलो... ऐकलं का हो...गोड हसली म्हणे ती....प्रतिकची आई मध्येच प्रतिकच्या बाबांना म्हणू लागली... तसा राजीव म्हणाला, हां याचमुळे मी सांगत नव्हतो काकी काका तुम्हाला...मला माहित होतं तुम्ही माझी अशीच मस्करी करणार....तसे बाबा आईला थांबवत म्हणाले, अगं सांगू दे त्याला सगळं मग काय आपल्याला तेच तर करायचं आहे...सांग रे बाबा तू...बाबा पुन्हा हसून म्हणाले. तसा राजीव पुन्हा सांगू लागला..मग आम्ही दोघेही त्या कॉफीशॉप मध्ये गेलो... तिने बहुतेक आधीच टेबल बुक करुन ठेवलं होतं...आम्ही जाऊन बसलो तसा लगेच वेटर आला...त्याने कार्ड माझ्या समोर ठेवलं..तसं मी मला हवं असलेलं सांगितलं आणि तिला ही काय ऑर्डर करायचं आहे हे कार्ड तिच्या समोर देऊन विचारलं. तिने तिची ऑर्डर सांगून त्याला जायला सांगितलं. एरवी कोर्टात मी एकेकाला प्रश्न विचारून गार करायचो पण तिला समोर बघून मला काहीच सुचत नव्हतं. आणि मला गप्प राहिलेलं बघून ती म्हणाली, सर तुम्ही मला माफ केलं ना.... म्हणजे तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून विचारलं.. तसं मी म्हणालो, नाही नाही तसं काही नाही, म्हणजे बोलण्यासाठी आपण एकमेकांना तितकं ओळखत ही नाही त्यामुळे मला काय बोलू ते सुचत नव्हतं. तशी ती हसली, आणि तिनेच बोलायला सुरुवात केली. तिने तिच्याबद्दल आणि तिच्या फॅमिलीबद्द्ल सांगितलं मला... तसं मी पण तिला सांगितलं.. नंतर ती बरंच काही सांगत होती.. आणि मी फक्त ऐकत होतो...बोलण्याच्या नादात तिला कॉफी कधी थंड झाली हे ही समजलं नाही. तिच्याशी बोलता बोलता एक गोष्ट मला समजली की तिचा अजून कोणी BF नाही आहे ते....काकू तुम्ही म्हणत होतात ते खरं ठरलं...राजीव प्रतीकच्या आईला म्हणाला. मग बिल पे करायचा टाइम झाला तसं मला म्हणाली, सर मी तुम्हाला म्हणाले होते ना की माझी पण एक अट असेल म्हणून. तर मग कोणती अट सांगितली तिने...काकांनी उत्सुकतेने विचारलं. तसा राजीव हसून म्हणाला, ती म्हणाली, बिल ती पे करेल म्हणून...मग मी पण फार आढेवेढे नाही घेतले आणि तिला पे करू दिलं... तिथून निघालो तसं तिने मला प्रेरणाच्या केसबद्दल अजून तुम्हाला काही बोलायचं असेल विचारायचं असेल काही... तर बोलू आपण म्हणाली...आणि मग मी पण तिला म्हणालो मला सर म्हणून नकोस फक्त राजीव म्हणालीस तरी चालेल मला...तशी हसली आणि म्हणाली, छान वाटलं तुम्हाला भेटून. तसा मग मी ही म्हणालो, भेटू आपण पुन्हा नक्की...तुला चालणार असेल तर...तशी फक्त ती हसून मानेने हो म्हणाली...आणि मला बाय राजीव म्हणून scooty  वरून निघून गेली. तसे प्रतिकचे आईबाबा दोघेही म्हणाले, वाह वाह, म्हणजे लवकरच आमच्या राजीवच्या डोक्यावर अक्षता पडणार तर...काकीकाका तुम्ही पण ना....तुम्ही दोघे ना लगेच सुरु करतात...मी अजून तिला तितकं ओळखत ही नाही...हो ना प्रतिक..? असं म्हणून राजीवने प्रतिकला प्रश्न केला...तसा प्रतिक भानावर येऊन म्हणाला, हो हो तू बरोबर म्हणतो आहेस...तिने तुला सर बोलायला नको...त्याच्या या बोलण्याने तिघांच्या लक्षात आलं काय बोलणं झालं त्याकडे प्रतिकचं लक्ष नव्हत ते...तसं राजीवने त्याला विचारलं...प्रेरणा शुद्धीवर आली ते तिची साक्ष घ्यावी लागेल ना...आणि डॉ काय म्हणाले, कधी डिस्चार्ज देणार म्हणाले...? त्यावर प्रतिकने घडलेला सगळा प्रकार तिघांना सांगितला. तसं राजीव म्हणाला, अरे तू मला मघाशी का नाही सांगितलं हे सगळं मी आपलं माझंच सांगत बसलो...त्यावर प्रतिक म्हणाला, सगळेच खूप excited होते आणि मला थोडा वेळ हवा होता सगळं सांगायला...मला खरंच खूप असं असह्य होत आहे...म्हणजे मी त्यावेळी तिला बघितलं ना....त्यावेळी मला तिच्या समोर पण जाता येत नव्हतं...तिला तर जाणवत ही नव्हतं की मी होतो तिथे....प्रतिकला सगळं सांगताना खूप भरून आलं होतं. आईने त्याला पाणी प्यायला दिलं...आणि म्हणाली, प्रतिक डॉ स्नेहा गोवेकर खरंच खूप चांगल्या डॉ आहेत...प्रेरणा ठीक होईल त्यांच्याकडे...तू आधी स्वतःला सावर...आईने प्रतिकच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं. आई तू कशी ओळखते डॉ गोवेकर यांना...? प्रतिकने आईला विचारलं. तसे बाबा म्हणाले, तुझ्या आईच्या कॉलेज मध्ये एकदा डॉ आल्या होत्या...त्यांचं एक guidance lecture होतं...हो ना ग...तशी आई म्हणाली, हो त्यांनी बऱ्याच मुलींना त्यावेळी counseling केलं होतं. तुला माहीत नाही आहे प्रतिक... पण मी सुद्धा त्यांच्याकडे counseling ला गेले होते. माझ्याच वयाच्या आसपास त्यांचं वय आहे. काही गोष्टींनी मी सुद्धा डिप्रेशनमध्ये गेले होते, तेव्हा त्यांच्याकडे गेले होते. आई तू डिप्रेशनमध्ये impossible ...प्रतिक म्हणाला. हो तुझी आई गेली होती डिप्रेशनमध्ये... आणि डॉ च्या  counseling ने आणि तिचं तिला स्वतःला कळल्यामुळे ती डिप्रेशन मधून बाहेर आली..बाबा म्हणाले. प्रतिक तू काळजी करू नकोस....डॉ गोवेकर खूप चांगल्या डॉ आहेत. त्यांच्याकडे प्रेरणा नक्की ठीक होणार. पण तुला सर्वात आधी तर आता स्ट्रॉंग व्हावं लागेल जर तुला प्रेरणाच्या फॅमिलीला तिचा बॉस म्हणून सपोर्ट करायचं असेल तर... आई प्रतिकला म्हणाली. हो आई, तू म्हणते त्याप्रमाणे वागेन मी आता...मी उद्या जाऊ का हॉस्पिटलमध्ये म्हणजे उद्या डॉ येणार आहेत प्रेरणाच चेकअप करायला.. प्रतिक म्हणाला. तसे आईबाबा म्हणाले, अरे हो नक्की जा...आणि आम्हाला पण सांग. त्यावर प्रतिकने हो म्हटलं आणि राजीवला मघाशी त्याच लक्ष नव्हत म्हणून सॉरी म्हणाला. तसा राजीव म्हणाला, अबे यार अभी रुला मत मुझे...आणि झालं ना तुझं मिस्ड, मी सांगितलं ते...सगळं...मग काय मी परत सांगेन...त्यात काय...हो ना काका...तसे काका हसून म्हणाले, हो हो, तुझी ड्रीम गर्ल आहे रेखा शेवटी....तू किती ही वेळ तिच्याबद्दल बोलू शकतोस...तसे चौघे ही हसू लागले..

दुसऱ्या दिवशी प्रतिक हॉस्पिटल मध्ये जायचं म्हणून लवकर उठला...त्याला लवकर उठलेलं पाहून राजीव पण डोळे चोळत चोळत उठला...मी पण येऊ का...राजीवने विचारलं. अरे नको, तू आराम कर...मी जाऊन येतो...आणि काही गरज तशी लागली तर कॉल करतो तुला....प्रतिक म्हणाला. तसा राजीव उठून बाहेर लिविंग रूममध्ये गेला...बाहेर सोफ्यावर काका पेपर वाचत बसले होते...राजीवही त्यांच्याबरोबर पेपर वाचत बसला. पेपरमधल्या एका बातमीकडे लक्ष गेल्यावर राजीवने ती सगळी बातमी वाचून प्रतिकला हाक मारली...प्रतिक लवकर ये...हे बघ काय....त्याने काकांना ती बातमी वाचायला दिली. त्याने अचानक आवाज दिल्यामुळे काकू आणि प्रतिक दोघेही बाहेर आले...काय झालं राजीव...? प्रतिक म्हणाला. तसं राजीवने प्रतिकच्या हातात पेपर देऊन ती बातमी वाचायला सांगितली, जी बातमी वाचून प्रतिकला त्याने हाक मारली होती..  हे तर सगळं प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं तेच आहे ना....पण जर पोलीस सांगणार नव्हते असं असताना मग ही बातमी आली कशी पेपरमध्ये...? प्रतिक थोडा रागातच येत बोलू लागला...तसं राजीवने त्याला शांत केलं आणि म्हणाला, हे बघ प्रतिक, बातमी मीडियामध्ये पोहचतेच पोहचते. त्यांना इथून ना तिथून कुठून तरी कळतेच कळते..आणि तू नीट बातमी वाचली असशील तर त्यात कुठे ही प्रेरणा किंवा त्या दोन आरोपींच्या नावाचा उल्लेख नाही आहे...कारण कोर्टातून रेप केसचे काही नियम असतात जे सगळ्याच प्रिंट-मीडियाला follow करावे लागतात...आणि हे नियम अगदी काटेकोर आहेत आणि कोणताही चॅनेल किंवा रिपोर्टर प्रेरणा किंवा तिच्या फॅमिलीशी बोलू शकत नाही असं मी आधीच legally करून घेतलं आहे. मी तुला फक्त याकरता हे सगळं दाखवलं म्हणजे तुला त्यांच्यापासून या गोष्टी शक्यतो लांब ठेवाव्या लागतील किंवा मग तुला त्यांना या बातमीबद्दल सांगावं लागेल...जे योग्य वाटेल तुला ते तू कर. तशी आई म्हणाली, तुला जर त्यांना सांगायचंच असेल तर शक्यतो त्यांना कोणताही या बातमीमुळे मानसिकरित्या त्रास होणार नाही याची काळजी घे...मला वाटत तू त्यांना न सांगणं जास्त योग्य आहे. चालेल आई मी तेच करेन मग....प्रतिक म्हणाला आणि तो हॉस्पिटलला जायच्या तयारीला लागला.

आईने थोड्या वेळाने प्रतिकला नाश्ता आणून खायला भाग पाडले आणि मगच हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून सांगितलं. तसं प्रतिकने नाश्ता केला आणि तो हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. प्रतिक हॉस्पिटलमध्ये प्रेरणा ज्या मजल्यावर होती तिथे पोहचला आणि तिच्या रूममध्ये न जाता सोफ्यावर बसून राहिला. थोड्यावेळाने डॉ तिथे आले. ओह राजाध्यक्ष, तुम्ही पण आला आहात...छान केलं...थोड्या वेळाने डॉ गोवेकर येतील तोपर्यंत आहात ना तुम्ही... म्हणजे तुम्ही असलात की, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात डॉ गोवेकर यांना...शेवटी कसं आहे मिस प्रेरणा तुमची ऑफिसमधली टीम मेंबर सो तुम्हाला या केसबद्दल माहीत असायला हवं...म्हणून तुम्ही थांबणार आहात ना...? त्यावर प्रतिक म्हणाला, हो डॉ मी आहे इथेच...तसे डॉ प्रतिकच्या खांद्याला हाताने थोपटत प्रेरणाच्या रूममध्ये गेले. प्रेरणाला आय सी यु मधून दुसऱ्या रूममध्ये ठेवलं होतं. आता कोणीही तिला भेटायला जाऊ शकत होतं. प्रतिकला प्रेरणाला पाहायचं होतं पण त्याची अजूनही हिम्मत होतं नव्हती. तो तसाच तिथे बसून राहिला. साधारण एक दीड तासाने डॉ स्नेहा गोवेकर आल्या....खरं तर प्रतिकने त्यांना कधी पाहिलं नव्हतं पण डॉ च्या केबिनमध्ये डॉ बरोबर गेलेल्या डॉ म्हणजे स्नेहा गोवेकरच असणार असा त्याने अंदाज बांधला. आता प्रतिकबरोबर प्रेरणाचे बाबा ही सोफ्यावर बसून होते..थोड्या वेळाने डॉ, आणि डॉ स्नेहा गोवेकर एका nurse  बरोबर प्रेरणाच्या रूममध्ये गेले.. त्यांनी प्रेरणाच्या आईला बाहेरच थांबायला सांगितलं.

थोड्या वेळाने तिघेही प्रेरणाच्या रूममधून बाहेर आले..nurse ने आत जाऊ शकता म्हणून आईला इशाऱ्याने सांगितलं..तशी प्रेरणाची आई  प्रेरणाच्या रूममध्ये गेली. प्रेरणा शांत झोपलेली होती म्हणून ती बाजूलाच बसून राहिली. थोड्यावेळाने डॉ नी प्रेरणाच्या बाबांना आणि प्रतिकला केबिनमध्ये बोलावून बसायला सांगितलं. या डॉ स्नेहा गोवेकर, या प्रेरणाची केस हॅन्डल करणार आहेत...सो तुम्ही यापुढे त्यांना ते सांगतील तसं सहकार्य करायचं आहे...तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही डॉ तुम्हाला प्रेरणाच्या केस बद्दल सांगतील त्यानंतर विचारू शकतात..असं म्हणून डॉ नी प्रतिक आणि प्रेरणाच्या वडिलांची ओळख करून दिली. तसं डॉ स्नेहा म्हणाल्या, मी प्रेरणाला चेक केलं, तिला जे काही घडलं तिच्या बाबतीत त्याचा खूप मानसिकरीत्या धक्का बसला आहे म्हणजे तिला आपण यातून बाहेर काढायला मदत केली पाहिजे. मी इथे प्रेरणा असेपर्यंत रोज सकाळी चेकअप करून जाईन आणि काही मेडिसिन्स असतील तर लिहून देत जाईन...मेडिसिन्स ने ती थोडी फार रिस्पॉन्स द्यायला सुरवात करेल पण काही गोष्ट आपण शक्य तितक्या टाळायच्या आहेत. आणि काही गोष्टी आपण follow करायच्या आहेत...एक तिच्या बरोबर सतत कोणी ना कोणी असलं पाहिजे कारण ती ज्या धक्क्यातून गेली आहे त्यात बऱ्याचदा काही पेशंट डिप्रेशनमध्ये आत्महत्या करू शकतात...दुसरी गोष्ट तिच्या बरोबर शक्य तितकं चांगल्या आठवणी सांगून बोला...एखादी दुःखी करणारी गोष्ट तिच्या समोर बोलू नका....आणि गोळ्यांचे डोस अजिबात चुकता कामा नये...इंजेकशन्स इथे असेपर्यंत नर्स देतील तिला वेळेवर...पण डिस्चार्ज दिल्यावर मी घरी येऊन देत जाईन किंवा मग माझ्या क्लिनिकमध्ये बोलवेन. बस हे सगळं follow करा...मग ती लवकर ठीक होईल...तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकतात....तसे प्रेरणाचे बाबा म्हणाले, म्हणजे प्रेरणा मेडिसिनने आम्हा सगळ्यांशी लगेच बोलू लागेल ना डॉ...? त्यावर डॉ म्हणाल्या, नाही हे लगेच नाही होणार..तिला आपल्याला वेळ द्यावा लागेल...आपण फक्त डिप्रेशनमधून तिला बाहेर यायला मदत करणार आहोत...आपण जितकं तिच्याबरोबर बोलू चांगल्या आठवणी सांगून किंवा एखादी positive गोष्ट शेअर करू तितकं ती लवकर रिस्पॉन्स देणार ट्रीटमेंटला...आता चेकअप करताना आम्ही तिच्याशी सतत २० मिनिटे बोलत होतो...तेव्हा तिने एकदा फक्त मानेने हो म्हटलं....म्हणजे आपल्याला हे रोज करावं लागेल जोपर्यंत ती स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत...त्यानंतर आपण आपली ट्रीटमेंट बदलू शकतो तोपर्यंत आपल्याला हेच सगळं follow करायचं आहे. त्यावर चालेल डॉ तसंच करू मग आम्ही... प्रेरणाचे बाबा म्हणाले. पण मग डॉ प्रेरणाला साधारण किती वेळ लागेल लवकर ठीक व्हायला....आणि तिची साक्ष कोर्टातून घेता येऊ शकेल का...? प्रतिकने डॉ ना विचारलं. त्यावर डॉ म्हणाल्या, प्रेरणाच्या केसमध्ये जसं मी आधी म्हणाले, आपल्याला तिच्या बरोबर सतत चांगल्या गोष्टी बोलायच्या आहेत...आणि आपल्याला तिला हे ही पटवून द्यायचं आहे की आपल्या सगळ्यांना तिचं असणं हवं आहे....जेणेकरून ती स्वतःला यातून बाहेर काढायला बघेल...ती ज्या phase मधून जाते आहे त्या phase मध्ये तिला याक्षणी असं वाटत असणार की ती कोणासाठीही महत्त्वाची नाही आहे...तिच्या असण्याने फक्त आणि फक्त त्रास होऊ शकतो...सो तिच्या माईंड मध्ये निगेटिव्ह विचार घर करू लागले आहेत....आणि आपल्या त्याच विचारांना बाहेर काढायचं आहे...म्हणून आपण फक्त तिच्याशी positively बोलायच आहे. बोलता बोलता डॉ ने prescription वर काही मेडिसिन्स आणि इंजेकशन्स लिहून दिले...हे तुम्ही आणून नर्स कडे द्या...त्या बरोबर त्या त्या वेळेत औषध आणि इंजेकशन्स येऊन देतील....असं म्हणून त्यांनी तो कागद प्रेरणाच्या बाबांकडे दिला.. अजून काही प्रश्न आहेत का...? डॉ गोवेकर यांनी विचारलं. तसे प्रेरणाचे बाबा आणि प्रतिक दोघेही नाही म्हणाले.  प्रेरणाच्या संदर्भांत कोणतीही गोष्ट जाणवली की मला लगेच कळवा...म्हणजे तसं आपल्याला मेडिसिन्स ही बदलता येतील..डॉ प्रेरणाच्या बाबांना आणि प्रतिकला म्हणाल्या. ओके मी निघते आता डॉ... असं म्हणून त्यांनी डॉक्टरांबरोबर हात मिळवला...आणि त्या केबिनमधून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायला निघाल्या.



क्रमशः 

🎭 Series Post

View all