अस्तित्व - एक संघर्ष भाग-१२

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-१२


प्रतिकने तिथून निघताक्षणी राजीवला कॉल केला...त्याचा नंबर बिझी येत होता..त्याने लगेच आईच्या नंबरवर कॉल केला. आईने कॉल उचलताक्षणी प्रतिकने तिला प्रेरणा शुद्धीवर आल्याची बातमी दिली...आणि म्हणाला, आई ही बातमी ऐकल्यापासून मी खरंच खूप खुश आहे...त्याला असं आनंदी झालेलं पाहून आईला सुद्धा खूप आनंद झाला...तिने त्याला डॉक्टरांना कॉल करून बोलून घे म्हणून सांगितलं किंवा मग शक्य असेल तर प्रत्यक्ष भेट म्हणून सांगितलं. त्यावर प्रतिक म्हणाला, हो हो आई...मी जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये...तू बाबांना पण सांग हां...चल ठेवतो मी कॉल....असं म्हणून प्रतिकने कॉल ठेवला. तोच राजीवचा कॉल आला..अरे आहेस कुठे तू....तुझा कॉल बिझी येत होता...बाय द वे ते जाऊदे...गेस व्हॉट...प्रेरणा शुद्धीवर आली आहे....प्रतिक म्हणाला. तसा राजीव म्हणाला,oh that's great news...I am so happy to hear that ... आणि तुला कॉल बिझी आला तो...कारण ती रेखा आहे ना तिने कॉल केला होता. ती पार्किंगमधली.... तिने आज तिला शक्य आहे भेटायला म्हणून सांगितलं...सो मी तिथे जातो आहे... ओह हो, तो गाडी आगे जा रही है....सांग मला तुझी पर्सनल मीटिंग...आय मिन कॉफी विथ रेखा कशी झाली ते....प्रतिक हसत हसत म्हणाला. तू पण ना प्रतिक, एक चान्स सोडू नकोस, माझी मस्करी करायला....आणि तुला सांगणार नाहीतर कोणाला सांगणार....तेरे जैसा यार कहा....राजीव गाण्याच्या मूडमध्ये जात म्हणाला. अरे बाबा, मी कॉल ठेवतो....तू ड्राइव्ह वर लक्ष ठेव...चल बाय भेटू आपण घरीच डायरेक्ट...असं म्हणून प्रतिकने कॉल ठेवला. आणि त्याने कार हॉस्पिटलच्या दिशेला वळवली.

प्रतिक आनंदातच हॉस्पिटलमध्ये गेला.. कधी एकदा प्रेरणाला बघतो आहे असं त्याला झालं होतं. तो प्रेरणा असलेल्या मजल्यावर पोहचला. डॉ प्रेरणाच्या बाबांशी काही बोलत होते... प्रेरणाचे बाबा त्याला चिंतेत दिसले.. प्रेरणाची आई दुरुन त्या दोघांना पाहत होती. प्रतिक डॉक्टरांच्यापाशी पोहचला. तसे डॉ त्याला बघून म्हणाले, मि राजाध्यक्ष...तुम्ही आलात इथे चांगलं केलं...थोड्यावेळाने बोलू आपण सविस्तर... तोपर्यंत बसा तुम्ही... मी तोपर्यंत patients ना regular visit देऊन देतो असं म्हणून डॉ. दुसऱ्या वॉर्डमध्ये गेले.
डॉक्टर जाताक्षणी प्रतिक प्रेरणाच्या आईबाबांच्या बाजूला बसला. प्रेरणाची आई बाबांना म्हणू लागली, अहो आपली प्रेरणा कधी ठीक होणार म्हणतायत डॉ...?  तसे बाबा म्हणाले, अगं ते म्हणाले ना, ती शुध्दीवर आली म्हणून...!! तशी आई म्हणाली, पण मग ती माझ्याशी का बोलली नाही...? प्रेरणाच्या बाबांनी तिला शांत केलं... अगं डॉ बोलणार म्हणाले ना परत...आपल्याबरोबर...प्रतिकच्या कानावर त्या दोघांचं बोलणं पडत होतं... त्याला आता काळजी वाटू लागली डॉ नक्की काय सांगत आहेत त्याची...!!

थोडया वेळाने डॉक्टरांनी तिघांना ही त्यांच्या केबिनमध्ये यायला सांगितलं.. प्रेरणाच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर जशी काळजी वाढली होती तशीच काळजी प्रतिकला ही वाटू लागली होती.. या बसा... डॉक्टरांनी त्या तिघांना बसायला सांगितलं. डॉक्टर, तुम्हाला आम्हाला काय सांगायचं आहे... प्रतिकने विचारलं. तसं डॉ म्हणाले, हो मि राजाध्यक्ष, मला प्रेरणाची केस तुम्हाला explain करायची आहे... म्हणजे प्रेरणा जरी शुध्दीवर आलेली असली तरी ती अजून त्या धक्क्यातून सावरलेली नाही...म्हणजे तिला हा शॉक इतका जबरदस्त बसला आहे की ती कोणाशीही बोलत नाही आहे...मघाशी मिसेस प्रधान होत्या तिच्या बरोबर आत... त्यांनी तिच्याशी वेगवेगळ्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न केला पण ती बोलली नाही... पण मग डॉ कधी बोलणार आमची प्रेरणा आमच्याशी...?प्रेरणाच्या आईने डॉक्टरांना विचारलं. मी तुम्हाला एक डॉ refer करतो आपल्याला त्यांची ट्रीटमेंट घ्यावी लागेल... डॉ म्हणाले. डॉ. नी एक कार्ड प्रतिककडे दिलं आणि म्हणाले मि राजाध्यक्ष आणि मि प्रधान, मी तुम्हाला या डॉक्टरांचं कार्ड यासाठी रेफर करतोय की आतापर्यंत यांच्याकडे गेलेला कोणताही डिप्रेशन मधला पेशन्ट ठिक होऊनच परतला आहे...आणि या डॉक्टर मिस प्रेरणा यांना नक्की ठीक करतील अगदी पूर्वीसारखंच...!! प्रतिकने कार्ड बघितलं, कार्डवर नावं होतं डॉ स्नेहा गोवेकर..(Psychiatrist ). त्याने कार्डचा फोटो काढून ते कार्ड प्रेरणाच्या बाबांकडे दिलं.  बाबांनी कार्ड घेतलं आणि बघून खिशात ठेवलं. मी उद्याच डॉ स्नेहा यांना इथे बोलावलं आहे प्रेरणाला त्या भेटून ठरवणार आणि सांगितलं मग पुढे कसं करायचं ते...डॉ पुन्हा म्हणाले. म्हणजे डॉ स्नेहा नेहमी इथे येणार का प्रेरणाचं चेकअप करायला की कसं...? प्रतिकने प्रश्न केला..तसे डॉ म्हणाले, नाही नाही...अजून एक आठवडा मिस प्रेरणाला आम्ही ऑबसेर्व्हशन खाली ठेवू त्यांचे काही सलाईन बाकी आहेत आणि काही मेडिसिन कोर्स असेल तो पूर्ण करून त्यांना एक आठवड्याने डिस्चार्ज देऊ त्यानंतर डॉ स्नेहा त्यांना घरीच येऊन चेक करतील...किंवा मग कधीतरी त्यांच्या क्लिनिकमध्ये प्रेरणाला जावं लागेल...पण शक्यतो घरीच येतील...म्हणजे मी त्यांना आधीच प्रेरणाची केस सांगितली आहे. आणि विश्वास ठेवा मि प्रधान आणि राजाध्यक्ष डॉ स्नेहा यांचे पेशंट हमखास ठीक होतात...आणि मिस प्रेरणा ही लवकर ठीक होतील...फक्त तुम्हाला डॉ जे काही सांगतील तसं follow करावं लागेल...जेणेकरून आपल्याला हवा असलेला रिझल्ट आपल्याला लवकर मिळेल. तसं प्रेरणाचे आईबाबा म्हणाले, हो हो डॉ आम्ही डॉ सांगतील ते सगळं follow करू फक्त आम्हाला आमची लेक लवकर ठीक झालेली पाहायची आहे. हो हो ती नक्की ठीक होईल तुम्ही काळजी करू नका...फक्त आता सतत इथे तोपर्यंत तुम्हाला तिच्या सोबत राहावं लागेल...आमच्या नर्सेस असतील पण तुम्हा दोघांपैकी एकाला सतत तिच्याबरोबर राहावं लागेल...चला तर मग आपण पुन्हा एकदा मिस प्रेरणा यांचं चेकअप करूया असं म्हणून डॉ तिघांना घेऊन केबिन मधून बाहेर पडले.

त्या दिवशी दुरून पाहिल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रतिक प्रेरणाच्या समोर जाणार होता...खरंतर त्याची हिम्मत होत नव्हती पण तिला पाहिल्याशिवाय त्याला चैन ही मिळत नव्हत. शेवटी त्याने आज जायचंच तिला पाहायला असं ठरवलं आणि तो सुद्धा त्या सगळ्यांबरोबर प्रेरणांच्या वॉर्डमध्ये गेला.. त्याने समोर पाहिलं प्रेरणा बसून होती...तिचे केस आता पूर्वी सारखे लांब नव्हते त्यांची लांबी आता तिच्या डोक्याच्या मागच्या भागाला झालेल्या मारामुळे छोटी झाली होती. तिची नजर जणूकाही शून्यात होती...तिला आजूबाजूला कोणी आलं आहे हे सुद्धा जाणवत नव्हत. तिच्या चेहऱ्यावर, हातावर काहीशा खरचटलेल्या जखमा होत्या.. तिला असं पाहून तो पुढे गेलाच नाही...त्याने डॉ ना आणि प्रेरणाच्या आईबाबांना तो बाहेरच थांबतो असं सांगितलं. प्रतिक वॉर्डमधून बाहेर आला आणि तडक हॉस्पिटलच्या गच्चीवर गेला. त्याने स्वतःच्या डोळ्यांना तिथे मोकळं केलं...का देवा असं घडलं...प्रेरणाबरोबर तिची काय चूकी होती...कोणत्या गुन्ह्याची तिला तू अशी मोठी शिक्षा दिलीस...? तो देवाशी भांडू लागला...तोच त्याचा मोबाईल वाजला. त्याने खिशातून मोबाईल काढला...आईचा कॉल बघून त्याने त्याचे डोळे पुसले... आणि कॉल उचलला, हां आई बोल...प्रतिक म्हणाला. त्याचा आवाज रडवलेला आईला जाणवला आई म्हणाली, प्रतिक तू रडतो आहेस का...? नाही आई, नाही मी ठीक आहे....ते अचानक खोकला आला ना त्यामुळे ते डोळ्यात पाणी आलं. खरंतर आईला त्याच म्हणणं पटलं नाही पण ती म्हणाली, ओके पाणी पिऊन घे बाळा, बरं वाटेल... हो आई, मी पितो पाणी, थांब मी बोलतो थोड्या वेळाने, पाणी पिऊन येतो...असं म्हणून प्रतिकने कॉल ठेवला. कॉल ठेवून त्याने त्याचा चेहरा रुमालाने पुसून घेतला...आणि तो पुन्हा प्रेरणा ज्या मजल्यावर होती त्या मजल्यावर आला आणि सोफ्यावर बसून राहिला. थोड्या वेळात डॉ आणि प्रेरणाचे आईबाबा वॉर्डमधून बाहेर आले. तर मग उद्या आम्ही प्रेरणाला जनरल वॉर्डमध्ये ठेवू तर तुम्हाला सतत तिच्याबरोबर कोणी ना कोणी थांबावं लागेल. म्हणजे जर औषध वगैरे काही आणायचं असेल तर आपल्या हेल्पलाईन वर कॉल करा मग तिथून कोणी ना कोणी येऊन तुम्हाला आणून देईल. म्हणजे हल्ली आम्ही ती सर्विस सुरु केली आहे...फक्त त्याच बिल नंतर आफ्टर डिस्चार्ज बिलमध्ये ऍड होऊन देतो आम्ही....डॉ प्रेरणाच्या आईबाबांना सूचना देत होते. त्यांच्याशी बोलून झाल्यावर डॉ प्रतिककडे वळले आणि म्हणाले, तुम्ही बाहेर आलात अचानक मि राजाध्यक्ष..? तसा प्रतिक म्हणाला, हां ते ऑफिस मधून एक कॉल येणार होता सरांचा म्हणून मला यावं लागलं बाहेर...मग कॉल झाला तसा बाहेरच थांबलो... ओके ओके नो प्रॉब्लेम, डोन्ट वरी, प्रेरणा लवकर ठीक होणार..काळजी करू नका तुम्ही आता सगळ्यांनी..धीराने सगळं हॅन्डल करायचं आहे आपल्याला...असं म्हणून डॉ त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. तसा प्रतिकने ही प्रेरणाच्या आईबाबांना काही हवं असेल नसेल तर निसंकोच कॉन्टॅक्ट करा असं सांगितलं...आणि तो ही घरी यायला निघाला.

क्रमशः

🎭 Series Post

View all