अस्तित्व - एक संघर्ष भाग-११

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-११


प्रतिकचे आईबाबा रूममध्ये गेल्यावर राजीव आणि प्रतिक दोघेही जेवायला बसले..राजीवने त्याला लवकरच केस कोर्टात सुरु होईल म्हणून सांगितलं.. तसा प्रतिक म्हणाला, हां, पण प्रेरणा अजून शुद्धीवर नाही आली आहे...तर मग...तसा राजीव म्हणाला, हे बघ कोर्टात केस गेली म्हणजे निकाल लगेच लागतो असं काही नसतं...आपल्या देशात जज किती आहेत आणि केसेस किती आहेत सो लगेच निकाल लागत नसतो...आणि आज ना उद्या प्रेरणा शुद्धीवर येईलच मग तिचा जबाब पोलीस घेतीलच...पण मग म्हणजे तिला कोर्टात जावं लागेल का...? त्यासाठी...प्रतिकने काळजीने विचारलं...तसा राजीव म्हणाला, हे  बघ या केसमध्ये प्रेरणा हॉस्पिटलमध्ये आहे सो अशा वेळेला पोलीस तिचा जबाब लिहून घेणार किंवा मग रेकॉर्ड करतील...जसं शक्य असेल तसं...तिला कोर्टात जावं नाही लागणार मग. बोलता बोलता दोघांचं ही जेवण उरकलं. तसं दोघांनी टेबल आणि सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत आईबाबा दोघेही पुन्हा लिविंग रूममध्ये आले. झालं तुमचं जेवून बाबांनी सोफ्यावर बसत राजीव आणि प्रतिकला विचारलं. त्यावर राजीव हो म्हणाला. प्रतिक मात्र काहीतरी विचार करत होता...त्यामुळे त्याचं बाबा काय म्हणाले त्याकडे लक्ष नव्हतं. प्रतिक कसला विचार करतो आहेस एवढा...? आई म्हणाली. तसा प्रतिक भानावर येत म्हणाला, नाही आई काही नाही ते मला तुम्हा दोघांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि आजी नाही आहे घरी ते ही एका अर्थाने चांगलं झालं...कदाचित मी नसतो बोललो मग...त्यावर आई म्हणाली, अरे सांगशील का काय सांगायचं आहे ते...!! तसा प्रतिक दोघांच्या बाजूला बसला आणि त्याने प्रेरणाच्या बाबतीत जे काही घडलं ते सांगायला सुरवात केली.. बाबा त्याचं सगळं बोलणं ऐकत होते पण आई त्याचं बोलणं ऐकता ऐकता त्याच्या मनात नक्की चाललं आहे त्याचा थांग घेत होती... प्रतिकच्या बोलण्यात राजीवने सांगितलेली प्रेरणा बद्दलची प्रेम भावना तिलाही जाणवू लागली होती..आणि तिला आता त्यामुळे काळजीही वाटू लागली होती. बोलता बोलता अचानक तो खूप हळवा झाला आणि त्याच्या ही नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला तसं पाहून आईने उठून त्याच्या डोक्यावरुन हात फिरवून शांत केलं आणि म्हणाली, हे बघ आपण सगळे आहोत ना...आपण सगळ्यांनी मिळून प्रेरणाला ठीक करुया अगदी पूर्वीसारखंच...तसा प्रतिक म्हणाला, खरंच आई माझी प्रेरणा होईल ना ठीक....भावनेच्या भरात तो त्याच्या मनात असलेलं तिच्याबद्दलचं प्रेम शब्दांत बोलून गेला...आईने त्याच्या हातावर हात ठेवत म्हटलं हो नक्की होणार ती ठीक... चला आता तुम्ही दोघांनी झोपायला..आणि उद्या तुला हाफ डे आहे ना...! मग तिथूनच तिला भेटून ये...काही हवं असेल नसेल तर बघ... आईने नेमकं उद्या तो काय करणार होता ते जाणूनच त्याला असं सांगून राजीव आणि प्रतिकला झोपायला पाठवलं.
ते दोघेही झोपायला गेले तसे आईबाबा ही झोपायला गेले... आई बाबांना म्हणाली, आपल्याला आता प्रतिकला थोडं सांभाळायला हवं... या सगळ्या घटनेने तो खूप हळवा झाला आहे... त्याचं प्रेम आहे प्रेरणावर ते त्याच्या बोलण्यातून सतत जाणवत होतं... तुम्हाला ही जाणवलं ना...? तसे बाबा म्हणाले, हो म्हणूनच मी घरी आल्यावर लगेच तुला हे सगळं सांगितलं कारण तू याच्यातून नक्की काहीतरी मार्ग काढशील. चल आता झोप....असं म्हणून बाबांनी आईला झोपायला सांगून ते सुद्धा झोपले. तिथे प्रतिक ही आदल्या दिवशी न झोपल्यामुळे शांत झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी राजीव प्रतिकला उठवू लागला, अरे प्रतिक...उठ बघ किती वाजले...तुला जायचं नाही का ऑफिसला...? तसा प्रतिक डोळे चोळत उठत म्हणाला, अरे बापरे 7 वाजले...खरंच मला उशीर झाला उठायला... त्यावर राजीव म्हणाला, चल पटकन आवर, काकूंनी नाश्ता पण बनवायला घेतला...तसा प्रतिक ब्रश घेऊन आंघोळीला गेला. तोवर राजीव तयार होऊन लिविंग रूममध्ये जाऊन प्रतिकच्या बाबांच्या बाजूला गप्पा मारत बसला. तोपर्यंत प्रतिक तयार होऊन लिविंग रूममध्ये आला. तसे बाबा म्हणाले, तू जाणार आहेस ना आज तिथूनच हॉस्पिटलमध्ये...? तसा प्रतिक म्हणाला, हो बाबा...पण त्याच्या आधी तिच्या घरी जाणार आहे तिच्या भावाला थोडं समजवायचं आहे...तो खूप बिथरला आहे असं सगळं घडल्याने...तसे बाबा म्हणाले, ठीक आहे माझी किंवा आईची काही मदत हवी असेल तर सांग. हो बाबा...प्रतिक म्हणाला. दोघांचं बोलणं सुरु असतानाच आई नाश्ता घेऊन आली. चला सगळ्यानी नाश्ता करायला बसा... असं म्हणून आईने प्लेट्स टेबलवर ठेवल्या. तसे आईसकट सगळेजण नाश्त्याला बसले. नाश्ता करता करता आई म्हणाली, प्रतिक अधूनमधून डॉक्टरांना कॉल करुन प्रेरणाची तब्येत विचारत जा..आणि तुमच्या ऑफिसमधून तिचं इन्शुरन्स मंजूर झालं ना...? तसा प्रतिक म्हणाला, हो आई,  ती प्रोसेस मी ऑलरेडी केली आहे आणि आमच्या office through ते लगेच मंजूर होतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कसं होतं की तुम्ही आधी भरा पैसे मग काही फॉर्म भरा मग पैसे मिळतात तसा प्रकार या policy मध्ये होतं नाही... म्हणजे फक्त ऍडमिट करण्याच्या वेळेला जे पैसे भरावे लागतात तेवढेच...आपल्याला आधी भरावे लागतात अचानक ऍडमिट झालो तर...पण ते पण नंतर मिळून जातात....तुला माहिती आहे का आई, policy ची अशी scheme ठेवायला प्रेरणानेच मुद्दा मांडला होता...आणि त्यामुळेच कंपनीच्या policy बऱ्याच जणांनी विकत घेतल्या...कारण हॉस्पिटलचा खर्च हा नेहमीच परवडेल असा नसतो...म्हणून....प्रेरणाच नाव काढल्यावर तो एकदम हळवा झाला होता...तसं विषय बदलण्याच्या हेतूने राजीव म्हणाला, चल निघायचं नाही का तुला ऑफिसमध्ये जायला...तसं प्रतिकने पटकन नाश्ता पूर्ण केला...आणि तो ऑफिस बॅग घेऊन आईबाबांना, राजीवला बाय बोलून निघाला. प्रतिक ऑफिसला गेला तसं राजीव ही ऑफिसला जाण्याच्या तयारीला लागला...एकदा मोबाईल चेक करावा म्हणून त्याने मोबाईलच चॅट ओपन केला. तर त्यात त्याला रेखाचा मेसेज मिळाला...हॅल्लो सर, मला समजत आहे,  त्या दिवशी मी असं तुम्हाला पार्किंगमध्ये बोलायला नको होतं...मी ऑलरेडी लेट होते त्यामुळे खूप हायपर झाले...अगेन एक्सट्रीमली सॉरी फॉर दॅट.....तुम्ही मला म्हणाला होतात ना माफ एकाच शर्थवर करेन...म्हणून...तर मग आज कॉफीसाठी भेटायचं का...आय मिन आज सॅटर्डे आहे सो मे बी कोर्ट वर्क नसावं तुम्हाला...म्हणजे मी मूवी मध्ये तसं पाहिलं आहे...की सॅटर्डेला कोर्ट नसतं म्हणून...रिऍलिटीमध्ये काही आयडिया नाही...तर तुम्ही फ्री असाल तर आपण आज भेटू...आणि माझी पण एक शर्थ आहे सर, ती मी तुम्हाला भेटल्यावरच सांगेन...तुम्हाला जो टाइम पोसीबल असेल तो मला सांगा...मला तशी ही आज सुट्टी आहे..सो मी येऊ शकते..तिचा मेसेज वाचून राजीव गालातल्या गालात हसला. त्याने तिला रिप्लाय दिला, ओके संध्याकाळी ४.३० ला...तुला शक्य आहे का...? आणि तो काका काकींना बाय बोलून ऑफिसमध्ये जायला निघाला.

तिथे प्रतिक ऑफिसमध्ये पोहचला आणि थोडंफार काम करून त्याने त्याच्या ठरलेल्या मिटींग्स सुरु केल्या...त्याने मीटिंगमध्ये राजीवने सांगितलेला इंटर्नशिपवाला पण मुद्दा मांडला..आणि तो सगळ्यांना पसंत सुद्धा पडला...कारण त्यात खरंच कंपनीचा फायदा होणार होता..मीटिंग आटोपल्यावर त्याने आपल्या बॉसला सुरेश सामंत यांना प्रेरणाच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला...त्यांना सुद्धा प्रेरणाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं त्यांनी प्रतिकला जमेल तितकं त्यांना मदत कर.. अजून मंत्री किंवा अजून कोणी डॉक्टर रेफर करायचा असेल किंवा पैसे कमी पडत असतील तर मला सांग म्हणत ते दुसऱ्या मीटिंगसाठी ऑफिसमधून निघाले...आता अल्मोस्ट सगळ्या मिटींग्स प्रतिकच्या पूर्ण झाल्या होत्या...आता फक्त टीमबरोबर एक मीटिंग घ्यायची होती...म्हणायला टीम मध्ये फक्त सध्या समिधाच होती...म्हणजे मीटिंग फक्त त्या दोघांची होणार होती....आणि बाकी सगळ्या लोकेशन चे online mode वर भेटणार होते..त्याने समिधाला कॉल करून केबिनमध्ये बोलावलं..आणि तो presentation ओपन करून बसला.

समिधाने दरवाजा ठकठक केला...मे आय कम इन सर....तसा प्रतिक म्हणाला, हा समिधा ये आत...आणि त्याने तिला खुर्चीवर बसायला सांगून तिच्या समोर लॅपटॉप केला...हे  presentation आहे फक्त एकदा बघून घे...आता थोड्या वेळाने आपली मीटिंग स्टार्ट होईल...तेव्हा कदाचित तुला सुद्धा अधून मधून हे पॉईंट्स सांगावे लागतील... सर पण लगेच कसं मी prepare करू...? आपल्याकडे फक्त १० मिनिटे आहेत मीटिंगला... समिधा म्हणाली. तसं  प्रतिक म्हणाला, अग तुला नाही काही मी प्रेझेन्ट करायला सांगणार आहे...तुला फक्त ते मुद्दे सांगायचे आहेत...म्हणजे मी presentation स्क्रीनकडे असेन आणि तू लॅपटॉपच्या समोर...जेणेकरून आपल्याला easy होईल सांगणं.....ओके सर...म्हणत समिधाने presentation बघून घेतलं...१० मिनिटांनी त्यांची मीटिंग सुरु झाली...प्रतिकने सांगितल्याप्रमाणे मीटिंग लवकर संपली...आणि सगळ्यांना ते समजायला सोपे ही गेलं. मीटिंग झाल्यावर प्रतिक म्हणाला, आता कोणी क्लायंट नाही आहे ना...तर मग जेवून घे आणि घरी जा. तसाही आपला हाल्फ डे होईल तुझं जेवून होईपर्यंत.. तशी समिधा म्हणाली, हो सर आता कोणी नाही आहे क्लायंट...सर, तुम्ही पण जेवून घ्या. माझं अजून काही काम आहे का सर...तसा प्रतिक म्हणाला, हो घेतो जेवून...मी पण...आणि हो...तुला एक न्यूज द्यायची होती...आपल्या इथे इंटर्नशिपला हो म्हणाले. म्हणजे आता आपण दोनजण घेऊ शकतो...तुमच्याबरोबर काम करायला जेणेकरून तुमचं काम पण हलकं होईल...तशी समिधा म्हणाली, सर मस्त न्यूज सांगितली पण मला एक सेकंड वाटलं तुम्ही मला प्रेरणा शुद्धीवर आली ही न्यूज देत आहेत...म्हणजे सध्या माझ्यासाठी ही जास्त मोठी गुड न्यूज असेल सर... तसा प्रतिक म्हणाला, हो आपल्या सगळ्यांसाठीच ही गुड न्यूज असेल...आणि मला आशा आहे आपण ती न्यूज लवकरच ऐकू.. चल मग तू जेवून घे आणि लवकर घरी जा...आधीच २ दिवस झाले तुझ्यावर वर्कलोड खूप होता...तर मग लवकर जा आणि आराम कर.. हो सर...म्हणत समिधा केबिनमधून बाहेर पडली. तसं प्रतिकने ही आईने दिलेला जेवणाचा डब्बा बाहेर काढला ....आणि जेवून घेतलं.

तिकडे राजीवचं सगळं त्या दिवसाचं काम वेळेच्या आधीच पूर्ण झालं. रेखाच्या हो चालेल, मला हा टाइम...या मेसेजने तो खूप खुश होता. त्याने काम आटोपून घरीच जेवायला येत असल्याचं प्रतिकच्या आईला आधीच सांगून टाकलं. त्याने पटकन सगळं काम केलं आणि त्याच्या सेक्रेटरी आणि रिसेपशनिस्टला पण त्याने काम लवकर आटपून घरी जायला सांगितलं. त्याच्या अशा अचानक वागण्याने त्या दोघी पण खुश झाल्या आणि तो १२ वाजताच ऑफिस मधून घरी जायला निघाला.

राजीव लवकर घरी आलेला पाहून प्रतिकच्या बाबांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले, तू पण जाणार होतास का हॉस्पिटलमध्ये...? तेवढ्यात प्रतिकची आई पण आली. त्यांना पण त्याच्या लवकर येण्याचं अप्रूप वाटलं...तसा तो म्हणाला, तुम्ही दोघे जेवलात का...? तशी आई म्हणाली, नाही रे...तुझीच वाट पाहत होतो...!! ओके काकू, मी लगेच आलो फ्रेश होऊन आणि मग सांगतो काय झालं ते...राजीव असं म्हणत फ्रेश व्हायला गेला...आई-बाबा दोघेही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते...राजीव येईपर्यंत दोघांनी टेबलवर जेवण आणून ठेवलं...राजीवला असं सगळं त्यांनी केलेलं पाहून एकदम संकोचल्यासारखं झालं...त्याला तसं पाहून आई म्हणाली, अरे तू माझ्या मुलासारखाच आहेस...आणि तुझे आईबाबा पण आमच्या प्रतिकची अशीच काळजी घेतात मग आम्ही तुझी घेतली म्हणून काही बिघडतं का...? चल बस जेवायला...असं म्हणून आईने राजीवला जेवायला बसायला सांगितलं...हां आता सांग तुझं लवकर येण्यामागचं कारण...म्हणजे तू लवकर आलास त्याच आश्चर्य नाही वाटत आहे आम्हाला, पण तुझा मूड खूप छान दिसतो आहे...तुला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही आमची...असे बाबा म्हणाले. तसा राजीवने जेवता जेवता त्यांना रेखाला कसे भेटलो आणि काय काय झालं ते सगळं सांगितलं...तशी आई म्हणाली, ओह म्हणजे, आमच्या राजीवच्या हातात लवकर बेडी पडणार तर...तसा राजीव गालातल्या गालात हसत म्हणाला, काकू मला अजून माहित ही नाही आहे की, तिचा BF आहे की नाही ते...किंवा ती ऑलरेडी एंगेज असेल  तर....तसे बाबा हसून म्हणाले, आम्हाला नाही वाटतं तुला वाटतं त्यातलं काही असावं...असं...हो ना ग...तशी प्रतिकची आई म्हणाली, हो, हो, मला ही हेच वाटतं....भेट तर तू आज जाऊन...आणि ओव्हर रिऍक्ट होऊ नको...मुलींना तसं वागलेलं नाही आवडत...हो काकू जशी आपली आज्ञा...तसे तिघेही हसू लागले पुन्हा गप्पा मारत जेऊ लागले.

तिथे प्रतिकने ऑफिसमधून निघण्यापूर्वी प्रेरणाचा भाऊ विवेक त्याला कॉल करून घरी येऊ का विचारलं...त्याने हो म्हटल्यावर प्रतिक ऑफिसमधून प्रेरणाच्या घरी जायला निघाला. दुपारचं ट्रॅफिक नसल्यामुळे तो लवकर प्रेरणाच्या घरी पोहचला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे विवेक एकटाच घरात होता..विवेकने त्याला पाणी देऊन बसायला सांगितलं आणि तो ही प्रतिकच्या बरोबर बसला.. तसं प्रतिकने त्याच्याबरोबर बोलायला सुरवात केली...विवेक मला तुझ्याशी  थोडं बोलायचं आहे म्हणून मी आज इथे आलो. तसा विवेक म्हणाला, हो सर बोला. त्यावर प्रतिक म्हणाला, मला समजत आहे तूझ्या दीदीच्या बाबतीत जे काही झालं त्याने तू खूप आतून बिथरला आहे...पण आपल्याला असं वागून नाही चालणार आहे...म्हणजे प्रेरणाची अशी अवस्था असताना तुला याक्षणी स्वतःला खंबीर होऊन आईबाबांबाना आधार द्यायचा आहे...हे बघ, आज ना उद्या ती शुद्धीवर येईल ही...तेव्हा तू असा जाणार आहेस का तिच्यासमोर...आणि तू आईबाबांना आधार द्यायला हवा ना...तू त्यांना समजवायला हवं ना...तसा विवेक रडू लागला...प्रतिकने त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला सांगितलं..हे बघ आज माझ्या समोर जे प्रेरणासाठी रडतो आहेस ते शेवटचं...पुन्हा कधीही तू या घटनेसाठी रडायचं नाही आहेस...आता आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे....कारण प्रेरणा शुद्धीवर येईल त्यानंतर आपल्याला तिला जास्त सांभाळावं लागेल कदाचित....तसा विवेक डोळे पुसत म्हणाला, हो सर तुम्ही बरोबर बोलत आहात...मला दीदी नेहमी सांगायची कोणत्याही प्रॉब्लेमला सामोरे जायला शिक...ती नेहमी माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमला मला मदत करायची...पण आज मी असा घाबरून गेलो आहे...माझं चुकलं सर...तसा प्रतिक म्हणाला, हे बघ, तुझं चुकलं नाही....असं होतं आपल्या माणसाला असं बघून...पण आता तुला स्ट्रॉंग व्हायचं आहे...आणि तुझ्या जॉबच काय झालं...तू पार्ट टाइम करत होतास त्याचं..? तसा विवेक म्हणाला, मी गेलो नाही...आणि त्यांनी मला काल सांगितलं की त्यांना दुसरा मुलगा फुल टाइमसाठी मिळाला आहे म्हणून. तसा प्रतिक विवेकच्या पाठीवर हात थोपटत म्हणाला, विवेक तुला आमच्या ऑफिसमध्ये काम करायला आवडेल का...? त्यावर विवेक आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण सर मला अनुभव नाही आहे...म्हणजे दीदीच्या कामापेक्षा माझं हे काम खूप वेगळं होतं...आणि तो ही जॉब मी फार महिने नाही केला. तसा प्रतिक म्हणाला, अरे नाही आम्हाला, अनुभव नसला तरी चालणार आहे...आम्ही इंटर्नशिप ठेवली आहे...म्हणजे फुल्ल टाइम आणि पार्ट टाइम असं दोन्ही ठेवलं आहे..तुला शक्य जी असेल ती तू करू शकतोस आणि तुला पूर्ण ट्रेनिंग दिलं जाईल टीम मधून...आणि काही अडलं तर मी आहेच सांगायला...आणि त्याची सॅलरी आणि एक्सपेरियन्स लेटर ही कंपनीमधून तुला मिळेल...म्हणजे तुझं शिक्षण होईपर्यंत तुझ्याकडे अनुभव पण असेल. तसा विवेक म्हणाला, हां सर, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे...मी तयार आहे करायला पण आईबाबांशी एकदा बोलून घेऊन सांगेन तुम्हाला. तसा प्रतिक म्हणाला, काही हरकत नाही. तेवढ्यात विवेकच्या मोबाईलची रिंग वाजली त्याने कॉल बघितला तर बाबांचा कॉल होता...त्याने कॉल उचलला...हां बाबा, बोला, काय खरंच....हो हो...ठीक आहे...असं म्हणत त्याने आनंदाने कॉल ठेवला. त्याला असं आनंदी पाहून प्रतिकला कळेना नक्की काय झालं ते...त्याने न राहवून त्याला विचारलं कोणाचा कॉल होता...तसा विवेक म्हणाला, बाबांचा कॉल होता...ते म्हणाले, प्रेरणा शुद्धीवर आली आहे...म्हणून...म्हणजे तिने हातांची हालचाल केली आणि डोळे उघडले..आणि पुन्हा बेशुद्ध झाली...डॉक्टर म्हणाले, आता ती पूर्णतः शुद्धीवर आली आहे फक्त इंजेकशनचा इफेक्ट असल्यामुळे पुन्हा बेशुद्ध झाली आहे. तिला उद्या सकाळी नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करणार म्हणाले आहेत. प्रतिकला हे सगळं ऐकून खूप आनंद झाला, त्याने आनंदाच्या भरात विवेकला मिठीच मारली.. तसा विवेक म्हणाला, सर तुम्ही आज माझ्याबरोबर जे बोललात त्याने मला खरंच खूप चांगलं वाटतं आहे...आणि मी आता जॉब करणार...दीदी सारखच मन लावून...तसा प्रतिक त्याला म्हणाला, that's the spirit... बघ प्रेरणा आता लवकर ठीक होईल...सगळं ठीक होईल... तू आईबाबांशी बोलून मग सांग मला काय डिसाईड केलंस ते...आणि देवासमोर साखर ठेव...प्रेरणाला शुद्ध आली म्हणून... चल मी आता निघतो असं म्हणून प्रतिक विवेकच्या पाठीवर थोपटत त्यांच्या घरून निघाला.

क्रमशः

🎭 Series Post

View all