Aug 09, 2022
प्रेम

अस्तित्व - एक संघर्ष भाग-१०

Read Later
अस्तित्व - एक संघर्ष भाग-१०

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-१०


 

राजीव त्याच्या ऑफिसमध्ये पोहचला आणि तडक त्याच्या केबिनमध्ये घुसला..आणि लगेच कामाला लागला. त्याने त्याच्या २-३ केसेसचे पेपर्स चेक केले...काही नोट्स काढल्या...त्याने त्याच्या असिस्टंट नेहाला कॉल करून बोलावलं. तशी नेहा तिची डायरी आणि पेन घेऊन केबिनमध्ये आली. राजीवने त्याच्या नोट्स तिच्याकडे देत एक एक पॉईंट नोट डाउन करायला सांगितलं...मग त्याने तिला प्रेरणाची केस सांगायला सुरवात केली. तो तिला एक एक प्रश्न विचारू लागला आणि ती तिला येत असलेली उत्तरे देत होती...आणि तिला न येणारे काही प्रश्न तिला तो समजावून सांगत होता. तेवढ्यात त्याला रिसेपशनिस्टचा कॉल आला...सर कोणीतरी मि. राजाध्यक्ष म्हणून आले आहेत...तसा राजीव म्हणाला, अग पाठव त्यांना आत आणि दोन कॉफी साठी पण ऑर्डर देऊन ठेव आणि थोड्या वेळाने पाठव केबिनमध्ये असं म्हणून त्याने कॉल ठेवला. नेहा, हे नोट्स दिले आहेत ते आणि तूला सांगितलं ते सगळं डिटेल मध्ये टाईप करून मला सेंड कर नंतर... म्हणजे आपण पुढच्या कामाला लागू...आणि लवकरच आपली ही केस पण सुरु होईल कोर्टात. ओके सर, मी कामाला लागते...असं म्हणून नेहा केबिनमधून बाहेर गेली. तोच प्रतीकच्या बाबांनी दरवाजा उघडून आत येऊ का विचारलं..तसा राजीव काहीसा संकोचून म्हणाला, काय काका, मुलाच्या केबिनमध्ये येताना कसली परवानगी..तसे काका आत येत म्हणाले, तसं नसतं रे, शेवटी तू कामात असणार, आणि नेमकं मी डिस्टर्ब करणं बरोबर दिसत नाही म्हणून मी विचारून आलो. तसा राजीव म्हणाला, बसा ना काका. तसे प्रतिकचे बाबा समोरच्या खुर्चीमध्ये बसले. पाठोपाठ कॉफी घेऊन ऑफिस बॉय आला आणि कॉफी डेस्कवर ठेवून गेला.

ऑफिस बॉय जाताक्षणी काका म्हणाले, तू काय सांगणार होतास सकाळी...असं म्हणून त्यांनी लगेच मुद्द्यावरच बोलायला घेतलं...त्यावर राजीव म्हणाला, हो काका, सांगतो, आधी तुम्ही कॉफी घ्या मग आपण बोलू त्यावर सविस्तर...असं म्हणून त्याने कॉफीचा कप त्यांच्या पुढे केला तसं त्यांनी तो घेतला.. त्यांच्याबरोबरच राजीवने ही कॉफी घेतली..दोघांची कॉफी पिऊन झाल्यावर राजीव म्हणाला, काका तुम्ही प्रतिकच्या टीम मधल्याना ओळखता का...? त्यावर काका काहीसे विचार करून म्हणाले, तसं मी फार कोणाला ओळखत नाही फक्त त्याला ज्या रिपोर्ट करतात त्या ३ मुलींना मी ओळखतो.. आणि त्याचा बॉस,आणि अजून एक तो ऑफिस बॉय आहे जो घरी आला होता एकदा फाईल न्यायला त्याला ओळखतो..पण काय झालं...तू असं का विचारलंस...तसा राजीव म्हणाला, काका त्याच्या ऑफिसमध्ये प्रेरणा नावाची टीम मेंबर आहे...तिच्याबद्दलच मला तुम्हाला सांगायचं आहे...तसे काका पुन्हा आठवून म्हणाले, प्रेरणा.....!! हां हां...ही तीच ती जिच्या बरोबर माझी आई पूजेच्या दिवशी बोलत होती..अगदी जणू काही तिची मैत्रीणच असावी असं ती तिला काहीना काही सांगत होती..पण मग तिचं काय झालं...? काकांनी पुन्हा राजीवला विचारलं...त्यावर राजीवने घडलेला सगळा प्रकार सांगितला...तसे काका म्हणाले, ओह माय गॉड, खूप वाईट झालं रे...मग आता ती शुद्धीवर कधी येणार...आणि तिचे आईबाबा...?? ते ठीक आहेत ना..? तसा राजीव म्हणाला, ती शुद्धीवर यायचीच डॉ वाट पाहत आहेत...आणि तिची अशी अवस्था झाल्यापासून तिच्या घरात कोणाचीही मनस्थिती ठीक नाही. हां ते ही खरं आहे म्हणा, कोणाची मनस्थिती ठीक असेल स्वतःची मुलगी अशा अवस्थेत दिसत असेल तर...ओके म्हणून आपला प्रतिक खूप डिस्टर्ब होता तर...पण मग हे तू घरी सुद्धा सांगू शकत होतास ना...?? काकांनी पुन्हा राजीवला प्रश्न केला...त्याक्षणी काकांना सांगू की नको असा विचार राजीवच्या मनात चालला होता... अरे कसला एवढा विचार करतो आहेस...काका पुन्हा म्हणाले.

तसा राजीव म्हणाला, काका तुम्ही प्रतिकचे बाबा आहात, सो तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रतिकला ओळखता... तुमच्याही ती गोष्ट लक्षात येईल जी माझ्या लक्षात आली आहे ती...आणि जी अजून प्रतिकला नीट समजली नाही आहे ती... तसे बाबा अचानक म्हणाले, म्हणजे.... त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी राजीव समजून गेला की त्यांना कळलं त्याला काय म्हणायचं होतं ते...हो काका, तुम्हाला जे वाटलं ना...तेच कारण आहे प्रतिकच्या जास्त डिस्टर्ब होण्यामागे...आणि मी हेच सांगायला तुम्हाला इथे बोलावलं...कारण समजा..फक्त समजा...काका असं होऊ नये पण...जर प्रेरणा शुद्धीवर आलीच नाही...किंवा मग तिचं काही बरं वाईट झालं तर प्रतिक हे सगळं सहन करू शकणार नाही...आणि आपल्याला त्यासाठी सुद्धा तयार राहावं लागेल...मला जेव्हा तो हे सगळं सांगत होता ना तेव्हा मला त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेरणाच जाणवत होती...तिच्याबद्दलची काळजी ही एक टीम मेंबर म्हणून नाही आहे....तर त्याच तिच्यावर खरं प्रेम आहे म्हणून आहे...आणि हे स्पष्ट जाणवते जेव्हा तो तिच्या बद्दल काहीही बोलत असतो तेव्हा...मी जाऊन आलो हॉस्पिटलमध्ये.. डॉ म्हणाले, की शुद्धीवर आल्याशिवाय काही सांगू शकत नाही आणि अशा केसेस मध्ये काही सांगता ही येत नाही...म्हणून मला प्रतिकची खूप काळजी वाटते आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला इथे बोलावलं...कारण कदाचित हा विषय आजींना खटकला असता..म्हणजे असं मला वाटतं आहे..तसे काका म्हणाले, हो तू बरोबर म्हणतो आहेस...आईला नसतं पटलं हे सगळं कदाचित ती रागावली ही असती प्रतिकवर आणि नंतर आमच्यावर सुद्धा...पण मग आता नक्की काय करावं आपण... मी माझ्या मुलाला ओळखतो...तो तिला कधीच विसरू शकत नाही..तो त्याच्या आईवरच गेला आहे...तिची सुद्धा एक आवडती विद्यार्थिनी होती दिशा नाव होतं तिचं...काही कारणांमुळे १८ वर्ष होताक्षणी तिच्या आईबाबांनी तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं...अर्थात तुझ्या काकीला हे सगळं माहित नव्हत..बरेच दिवस झाले ती कॉलेज मध्ये नाही आली तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलीला तिने विचारलं तेव्हा तिला कळलं की तिचं लग्न लावून दिलं ते...त्यानंतर सुद्धा तुझ्या काकीने तिचा खूप शोध घेतला मग एकदा अचानक तिला कुठून तरी कळलं की तिच्या विद्यार्थिनीला सासरी खूप छळू लागले तेव्हा ती घर सोडून कुठे तरी निघून गेली...की आत्महत्या केली...तिला काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी कानावर येऊ लागल्या...तुझ्या काकीचा खूप जीव होता तिच्यावर...म्हणजे घरी आली ना की तेव्हा सुद्धा ती तिच्याबद्दलच काही ना काही सांगायची...त्यावेळी आमचं नुकतंच लग्न झालं होतं...तर म्हणायची कशी, मला ना दिशा सारखीच मुलगी झाली पाहिजे...आणि हे सगळं घडल्यावर तर ती खूप कमी बोलू लागली...मी खूप समजावून सांगितलं होतं तिला पण तिला खूप वाईट वाटतं होतं दिशाबद्दल...नंतर त्यातच तिला दिवस गेले...मग म्हणाली की मला कॉलेजमध्ये आता नाही शिकवायचं आहे...मग मी सुद्धा तिला फोर्स नाही केला...नंतर तिने मुलांकडेच मन गुंतवलं....नंतर तिचं तिलाच जाणवलं...की तिला यातून बाहेर पडलं पाहिजे...मग स्वतःला तिने सावरलं.. मग तिने घरातच कोचिंग सुरु केलं आणि बेकिंग प्रॉडक्टचे पण क्लासेस सुरु केले...पण मला प्रतिकची खूप काळजी वाटते...तुझी काकी Psychology प्रोफेसर... म्हणून तिला स्वतःला बाहेर काढता आलं..तिला तिच्या मनाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवता आलं. पण प्रतिक तसा नाही आहे...म्हणजे आता तो तुझ्या बरोबर राहून राहून तरी बराच बदलला आहे पण तरी सुद्धा तो काही बाबतीत अजून ही त्याच्या आईवरच गेला आहे..तो त्याला काय वाटतं हे पटकन कधीच कोणाला सांगत नाही...तुला सांगू प्रतिकची दीदी आहे ना म्हणजे आमची सोना...तर प्रतिक लहानपणी सगळं तिच्याशी शेअर करायचा म्हणजे त्याला करावंच लागायचं कारण सोना सेम तिच्या आजीवर गेली आहे...जसं तिच्या आजीपासून काही लपवू शकत नाही तसंच सोनपासून सुद्धा काही लपवू शकत नाही..तर सोना जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला गेली...त्यानंतर आमचा प्रतिक खूप एकटा एकटा राहायचा...काही दिवसातच त्याच्या आईच्या ते लक्षात आलं...की आता त्याच्या बरोबर बोलणार कोणी नाही...त्याला जे शेअर करायचं आहे त्यासाठी कोणी नाही म्हणून तो तसा वागतो आहे...मग ती त्याला कुठे ना कुठे खेळायला फिरायला घेऊन जाऊ लागली...आजूबाजूच्या मुलांमध्ये तो मिक्स व्हायचा पण तरी सुद्धा तो घरी आल्यावर एकटा एकटाच राहायचा...पण त्याने त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर कधीच होऊ दिला नाही. आम्हा दोघांना ही कळत नव्हत की नक्की काय करावं ते...मग तुझे आईबाबा राहायला आले आमच्या शेजारी...आणि तू तुझ्या बोलक्या स्वभावामुळे लगेच प्रतिक बरोबर बोलायला आला...आणि हळूहळू तुझ्याबरोबर तो सगळं शेअर करू लागला...आता त्यात जो काही बदल झाला आहे ना तो तुझ्यामुळेच झाला आहे...पण मला आता प्रेरणाबद्दल सारं काही ऐकून प्रतिकची काळजी वाटतं आहे..तसा राजीव म्हणाला, काका काळजी करू नका...डॉ प्रयत्न करत आहेत ना...ती येईल शुद्धीवर...आणि आपण ही गोष्ट देवावर सोडूया...तो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल तसंच काही घडलं तर...तसे काका पाणी पित म्हणाले, हो तू म्हणतो आहेस ते खरं आहे.

पुन्हा राजीव काहीसा विचार करून म्हणाला, काका मी तुम्हाला, एक विचारू, म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर...त्यावर काका म्हणाले, हो विचार ना...!! तसा राजीव म्हणाला, म्हणजे काका, प्रेरणा शुद्धीवर आली आणि प्रतिकला ही आज ना उद्या त्याला काय वाटतं तिच्याबद्दल ते जाणवेल. तर मग तुमची आणि काकूंची तिला सून म्हणून पसंती असेल का..? तसे काका म्हणाले, हे बघ, प्रतिकच्या मनाविरुद्ध आम्ही दोघेही कधीही वागणार नाही...आणि राहिला प्रश्न प्रेरणाच्या बाबतीत जे काही झालं त्याचा..तर त्यात तिच्या बिचारीची तरी काय चूक होती..जी तिने भोगावी...म्हणजे या कारणामुळे मी तिला सून म्हणून नकार नाही देऊ शकत. तसा राजीव म्हणाला, आणि आजी.....? त्या तयार होतील का...? तसे काका शांत झाले आणि म्हणाले, आई कशी वागेल हे मी सांगू शकत नाही. तिचा तिच्या दोन्ही नातवांवर खूप जीव आहे पण मी नाही सांगू शकत तिच्या या निर्णयावर. त्यावर विषय बदलत राजीव म्हणाला, काका मग तुम्ही आता इथे आलात ते आजींनी नाही का विचारलं तुम्हाला...? तसे काका हसून म्हणाले, अरे ती सकाळीच प्रतिकच्या आत्येकडे राहायला गेली आहे...ती इतक्यात नाही येणार आहे...आता.. म्हणजे ताई मला तेच म्हणाली, मी आईला इतक्यात पाठवणार नाही आहे म्हणून...मग मी ही विचार केला ठीक आहे तेवढीच तिला हवापालट. तसा राजीव हसून म्हणाला, मग ठीक आहे. पण काका मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे प्रतिकला कळता कामा नये...तुमच्या कानावर घालणं मला योग्य वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं...पण त्याला हे सांगू नका...तो तुम्हाला आज ना उद्या हे सगळं सांगेल...स्वतःहून समोरून. तसे काका म्हणाले, हो रे, मी नाही सांगणार त्याला काही यातलं...आणि त्याने मला हे सगळं सांगितल्यावर ही नाही सांगणार की मला आधी पासून माहित होतं हे..चल मग मी आता येऊ का...?? बराच वेळ झाला..असे म्हणून काका खुर्चीवरून उठले...तसा राजीवही त्यांना सोडायला म्हणून केबिनच्या बाहेर पडला आणि त्यांना ऑटोमध्ये बसवून पुन्हा कामाला लागला.

तिकडे प्रतिकने त्याच सगळं काम पूर्ण केलं...समिधा ही तोपर्यंत घरी निघून गेली होती. त्याने घड्याळात बघितलं...८.३० झाले होते..उद्या शनिवार आहे...ऑफिसला हाल्फ डे.. मग आपण उद्या मीटिंग ठेवल्या आहेत त्या...तसं त्याने लॅपटॉपवर मीटिंगचे टाइम चेक केले... हां सगळ्या सकाळीच आहेत मग ठीक आहे मनात विचार करत त्याने लॅपटॉप बंद केला आणि बॅग पॅक करून ऑफिसमधून घरी यायला निघाला.

ड्राइव्ह करताना त्याच्या मनात विचार आला, प्रेरणाला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून यायचं का...? मग त्याने स्वतःला समजावलं...नको आपण उद्याच तिच्या घरी जाऊ आणि तिच्या भावाला थोडं समजावू...आपण तसे म्हणालो होतो तिच्या बाबांना...असं म्हणून त्याने पुन्हा ड्राइव्ह वर कॉन्सन्ट्रेट केलं..काही वेळानं तो घरी पोहचला...बेलच्या आवाजाने आईने दरवाजा उघडला...घरात सगळे त्याचीच वाट पाहत होते...तसं तो सोफ्यावर बसत म्हणाला, आजी झोपली का...? त्यावर बाबा म्हणाले, अरे नाही...ती तुझ्या आत्येकडे गेली आहे राहायला...तुझी आत्या आली होती ना सकाळी...तर ती म्हणाली, आमच्याकडे राहू दे तिला काही दिवस म्हणजे थोडी हवापालट सुद्धा होईल तिला...तसं प्रतिक म्हणाला, ओके...चांगलं आहे.. तुम्ही सगळे जेवलात का...? तशी आई म्हणाली, आम्ही थांबत होतो पण राजीवने आम्हाला, जेवून घ्या म्हणून सांगितलं. थांब तू फ्रेश होऊन ये मी जेवण वाढते तुम्हा दोघांना. तसा प्रतिक म्हणाला, नको आई आम्ही घेतो.. तुम्ही दोघे झोपा..तसं ही माझ्यामुळे तूला खूप लवकर उठाव लागलं आज. तशी आई म्हणाली, अरे काय घेऊन बसलास...मुलांसाठी आईला काही नाही वाटतं त्याच. चल मी गरम करते तू फ्रेश होऊन ये...तसा प्रतिक फ्रेश व्हायला निघून गेला...आईने सगळं जेवण गरम केलं आणि बाबांनी आणि राजीवने ते टेबलवर आणून ठेवलं. थोड्या वेळाने प्रतिक फ्रेश होऊन टेबलवर आला आणि खुर्चीवर बसत म्हणाला, आईबाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे...तसे बाबा समजून गेले...प्रतिकला नक्की काय बोलायचं आहे ते..त्यांनी आईला त्यासंदर्भांत आधीच सांगून ठेवलं होतं. तशी आई म्हणाली, अरे तुम्ही दोघांनी जेवून घ्या आम्ही आहोत रूममध्ये तुमचं झालं की आपण निवांत बोलू...असं म्हणून आईने दोघांना ही जेवण वाढून जेवायला सांगितलं आणि आईबाबा दोघेही रूममध्ये गेले.

 

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...