अस्तित्व - एक संघर्ष भाग-१

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष 

भाग-१


तिची त्याची पहिली ओळख ऑफिस मध्येच झाली. तिच्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानेच... तिचा त्याक्षणीचा हजरजबाबीपणा मस्तच होता..तिच्या त्या गुणामुळेच तिची त्याने सर्विस डेस्कसाठी निवड केली होती...तशी दिसायला ती साधारणच... पण तिची प्रत्येक कृती अफलातूनच. तिच्या हास्यात नक्की काय होतं ठाऊक नाही. पण तिला हसताना पाहून त्याचा सारा तणाव निघून जाई...एका निस्वार्थी बाळाचं असावं असंच हास्य तिचं होतं...जणू ते तिला मिळालेलं देणं होतं. तिचं ते गोड आवाजात समजावून सांगणं आणि समोरच्याने ही तितक्याच नम्रतेने घेणं. बहुधा म्हणूनच ती क्लायंट सर्विस डेस्क साठी योग्य होती...

नेहमी ऑफिसमध्ये आल्या आल्या तिच्या गोड हास्याने त्याची सकाळ छान सुरु होत असे.. आज सकाळी तो आला तेव्हा मात्र ती जागेवर दिसलीच नाही. त्याच्या मनात आलं अरे सुट्टीसाठी पण काही अर्ज नाही

मग आज का आली नसावी....ते ही न कळवता... क्षणभर त्याच्यातला बॉस जागा झाला....तिच्या या वागण्याचा त्याला खरंच खूप राग आला होता. आणि त्याच्यातला बॉस त्याला मात्र स्वस्थ बसू देत नव्हता...

रागारागाने त्याने तिला कॉल केला... आपण डायल केलेला नंबर सध्या बंद आहे.... आता तर त्याला खरंच खूप राग येत होता...

त्याने स्वतःच व्हॉटसअप बघितलं....

अरे काय मुलगी आहे ही, मेसेज ही नाही केला आहे.... कोण समजते कोण ही स्वतः ला डायरेक्ट न सांगता सुट्टी.... आता राग त्याला अनावर होत होता...

त्याने तिच्याच टीम मेंबरला केबिन मध्ये बोलावलं...

मे आय कम इन सर....

तसा तो रागाने म्हणाला, तुमची ती सहकारी कुठे आहे असं न सांगता कोणी सुट्टी घेत का....?

मी बॉस म्हणून तुम्हा कोणाबरोबर कधी वागलो नाही याचा तुम्ही असा गैरफायदा घ्यायचा आहे का...?

तशी समिधा म्हणाली, सर मला नाही माहीत प्रेरणा का नाही आली ते.... ती एरवी न येण्यापूर्वी मेसेज करते सर.... पण आज तिचा काही मेसेज नाही आला आहे.... सर तिचं लास्ट सीन पण कालचं दाखवत आहे....

तसा तो थोडा सावरुन म्हणाला, ओके ठीक आहे... तू जा तुझ्या डेस्कवर आणि तिला काल दिलेला रिपोर्ट पूर्ण कर....

सर, पण तिने तो रिपोर्ट कालच पूर्ण करुन तुम्हाला मेल केला आहे....समिधा म्हणाली.

काय, कालच तर दिला होता मी आफ्टर 3 नंतर आणि तिने तो पूर्ण केला पण....तो म्हणाला...

हां सर, ती काल थांबली होती रिपोर्ट बनवत....मी म्हणाले तिला अग उद्या येऊन कर....तर म्हणाली अग डेटा खूप मोठा आहे त्यामुळे अर्धवट सोडून जाता येणार नाही.... मी जाईन लवकर हवं तर तुला कॉल करते ऑफिस मधून निघाल्यावर.... तिने तिचं आणि प्रेरणाचं आदल्या दिवशी झालेलं बोलणं सांगितलं...

तसा तो आता काळजीपूर्वक विचारु लागला मग तिने कधी केला तुला कॉल....? ती निघाली किती वाजता ऑफिस मधून...?

सर, तिने मला 8- 8.30 च्या आसपास कॉल केला होता....समिधा काहीशी आठवून म्हणाली.

ओके, ठीक आहे मी मेल चेक करतो आणि काही चेंजेस असले तर तुला फॉरवर्ड करतो मग तू चेंजेस करुन मला बिफोर लंचटाइम पूर्ण करुन दे....आणि मेल करताना cc मध्ये प्रेरणाला सुद्धा ठेव....म्हणजे तुमच्या दोघींकडे ती फाईल राहील..

ओके सर, मी जाऊ आता....समिधा म्हणाली.

हां, चालेल....तो म्हणाला.

समिधा केबिनमधून डेस्कवर गेली तसा त्याने त्याचा मेल चेक केला....मेलमध्ये खरंच प्रेरणाचा मेल होता.... त्याने मेलचा टाइम बघितला.... yesterday 8.10 pm.

त्याने फाईल डाउनलोड करुन चेक केली.... फाईल पूर्णपणे परफेक्ट केली होती without any error....

तो मनात म्हणाला, काम करावं तर असं पुन्हा कोणाला सांगायची गरज पडता कामा नये...

त्याने लगेच समिधाला मेल केला आणि cc मध्ये प्रेरणाला सुद्धा ठेवलं आणि मेल मध्ये लिहिलं.... No changes are required in the report. Just Keep this mail copy with you. 

आणि तो आलेल्या कामात गुंतून गेला. लंच ब्रेक झाल्याचं त्याला कळलं ही नाही.. पण पोटात लागलेल्या भुकेने त्याची जाणीव करून दिली. त्याने घड्याळाकडे पाहिलं....2.30 pm.... अरे बापरे आज कळलंच नाही कसा वेळ निघून गेला ते. त्याने कॅन्टीनमध्ये कॉल करुन जेवण ऑर्डर केलं. जेवण येईपर्यंत मोबाईल चेक करावा म्हणून ते व्हॉटसऍप खोललं... आणि तो प्रेरणाच्या चॅटवर गेला.... अरे खरंच हिचं लास्ट सीन कालच दाखवत आहे. का नसेल आली ती आज....? पण कळवायच तरी होतं न येण्यामागच कारण....तेवढ्यात मे आय कम इन सर म्हणून ऑफिस बॉय जेवण घेऊन आला.. आणि टेबलवर ठेवून निघून गेला. खूप भूक लागली असताना ही प्रेरणाचा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. कसंबसं त्याने जेवण आटोपलं..

बराच वेळ विचार केल्यावर त्याने ऑफिस ची साईट ओपन करून तिच्या जॉइनिंग च्या वेळी भरलेल्या फॉर्म डिटेल शोधून काढल्या. त्याला वाटलं होतं त्याप्रमाणे त्याला तिचा घरचा नंबर त्यात मिळाला. त्याने घरचे दोन्ही नंबर स्वतः च्या मोबाईल मध्ये सेव्ह करुन घेतले. आता कॉल करु का मी...? पण काय विचारु....? का बरं कॉल केला, असं समोरुन विचारलं तर काय सांगू.... शेवटी मी बॉस आहे तिचा....पुन्हा त्याचा बॉस जागा झाला. त्याच्या स्वतःच्याच विचारांशी त्याचे मतभेद सुरु झाले. शेवटी त्याने ठरवलं आपण तिला कॉल करायचा आणि काही फाईल मधल्या मिस्टेक्स मुळे कॉल केला म्हणून सांगायचं असं ठरवलं.

त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं, अरे 4.30 झाले सुद्धा. आता यावेळी तिला घरी कॉल करायला हरकत नाही म्हणून त्याने नंबर डायल केला. मोबाईलची रिंग होऊन होऊन मोबाईल बंद झाला. त्याने विचार केला परत एकदा लावून बघावं... आणि पुन्हा रिडायल केला. समोरुन एका मुलाने कॉल उचलला होता हॅलो हा कोण बोलतंय... तसं तो म्हणाला, हॅलो मी, प्रतिक बोलतोय, प्रेरणा आहे का, थोडं ऑफिसमधलं अर्जंट काम होतं. तसा समोरुन बोलणारा मुलगा काहीसा रडवलेल्या आवाजात म्हणाला, मी तिचा भाऊ बोलतोय दीदी हॉस्पिटलमध्ये आहे आम्ही सगळे तिथेच आहोत. हे ऐकून प्रतीकला काहीच सुचेना. त्याला हे अनएक्सपेकटेड होतं. त्याने कसंबसं हिंमत करुन हॉस्पिटलचा पत्ता विचारला आणि त्याला काळजी करु नको म्हणून सांगून कॉल ठेवला. सगळं असं ऐकून त्याला डोक्यात मुंग्या आल्या सारखं होऊ लागलं. काय झालं असावं तिला... मी विचारलं का नाही त्याला, काय झालं ते...अर्थात तो ही त्याच्या आवाजवरून काही सांगण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता. प्रतीक ग्लास मधील पाणी पिऊन असाच थोडा वेळ डोळे मिटून राहिला. असा तो बराच वेळ पडून होता तेवढ्यात कोणीतरी दरवाजा उघडला, सर मे आय कम इन...तसे त्याने डोळे उघडून आत यायला सांगितलं...

क्रमशः

🎭 Series Post

View all