Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-७८

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-७८
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७८


चौघांनी मुंबईला घरी आल्यावर प्रत्येकाला गिफ्ट देऊन आनंदित केलं. रेखा-प्रेरणा त्यांच्या माहेरी २-३ दिवसांसाठी राहून आल्या. त्यांच्या घरी ही लेकीला खूश पाहून सगळे आनंदित झाले. चौघांचा संसार आता ऑफिस रुटीन बरोबर खऱ्या अर्थाने सुरु झाला होता. असेच काही महिने निघून गेले आणि सोनाने अचानक एका रात्री व्हिडिओ कॉल केला.

 

सोना: प्रतिक, कसा आहेस... आणि मिसेस प्रतिक कशा आहेत.

प्रतिक: मी मस्त... तू कशी आहेस डबलडेकर, आणि प्रेरणा ही काय बाजूलाच आहे...

समीर: हॅलो, मला पण विचारा...

प्रेरणा: हां जिजू, कसे आहात तुम्ही... पुन्हा या तुम्ही दोघे कधीतरी... खूप मिस करतोय आम्ही...

समीर: (सोनाच्या खांद्यावर हात ठेवत) आता आम्ही नाही, तुम्ही यायचं आहे इथे...

नंदा: म्हणजे...

सोना: थांब थांब सांगतो, माझ्या डार्लिंग आजीला पण विडिओ कॉल मध्ये बोलवा... आणि प्रतिक राजीवला आणि सगळ्यांना कॉल मध्ये घ्या...

प्रतिक: येस घेतो कॉल मध्ये... म्हणत राजीवला ही व्हिडिओ कॉल मध्ये कनेक्ट करतो.

राजीव: हे सोना दीदी, जीजू कसे आहात... आणि आमचा भाचा-भाची कसे आहेत...

सोना: जुळे नाही आहेत रे...

राजीव: हां दीदी, पण girl झाली तर भाची असेल आणि boy झाला तर भाचा होईल ना... म्हणून मी दोन्ही म्हणालो...

रेखा: दीदी, लक्ष देऊ नका या मामाकडे... या मामाचं डोकं नेहमी एक पाऊल पुढे असतं.

सोना: (हसत हसत) हे मात्र अगदी खरं... काकी काका कुठे आहेत दिसत नाहीत ते.

तसे राजीवच्या आईबाबांनी पण सोना-समीरची विचारपूस केली. तोपर्यंत आजीही देवघरातून विडिओ कॉलवर आली.

समीर: सोना, आईबाबा, आजी, काकीकाका, आणि माझे मेहुणे आणि त्यांच्या wife सगळे ऑनलाइन आले आहेत तर मग एकदाची अनाऊन्समेंट करुन दे...

सोना: येस समीर... तर ऐका, नेक्स्ट मंथ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला यायचं आहे.

रेखा: डोहाळे जेवण... वाह... दीदी, म्हणजे तू ते धनुष्यबाण वगैरे पण घेऊन फोटो काढणार...?

सोना: (हसून) हो हो सगळं करणार... आणि आपण सगळे खूप धमाल करु...

प्रतिक: दीदी, आईबाबा, आजी नक्की येतील पण माझं आणि प्रेरणाचं सांगणं कठीण आहे.

राजीव: सेम हिअर... कोर्टाच्या तारखा आहेत काही महिने... सो सांगणं कठीण आहे.

आजी: सोना, मला नाही जमायचं ते... विमानात बसायला... मला भीती वाटते त्याची...

समीर: आजी, तुम्ही पण नाही बोलताय... प्लीज या ना... माझ्या घरचे पण सगळे येणार आहेत. सोनाला तिथे आणणं शक्य नाही म्हणून आम्ही तुम्हां सगळ्यांना इथेच बोलवायचं ठरवलं.

प्रतिक: दीदी, आम्ही बाळाचं नाव ठेवताना नक्की येऊ पण सध्या शक्य नाही.

नंदा, मिलिंद: आम्ही आणि काकी काका पण येऊ.

तसं राजीवच्या आईबाबांनीही त्यांना हो म्हणत दुजोरा दिला.

सोना: चला, ठीक आहे पण यायचं बरं का... आणि तुम्ही चौघांनी रे... नंतर नाही आलात ना तर माझ्याशी गाठ आहे.... आणि आजी कर ना थोडं डेरिंग...

चौघे: हो दीदी, जीजू आम्ही नक्की येऊ नंतर..

आजी: नाही नाही सोना, मला विमान बघितलं तरी पोटात गोळा येतो... मी आपलं यातूनच बघेन...

सोना: बरं बाई, मी येईन ना जेव्हा तिकडे काही महिने राहायला तेव्हा तुझ्याकडेच देईन बाळाला...

आजी: (आनंदात) हो चालेल चालेल... काळजी घे.

सोना: हो आजी.

सोना-समीर: चला मग एव्हरीबडी... गुड नाईट... बाय म्हणत तिने व्हिडिओ कॉल ठेवला.

***

 

एक महिन्यानंतर...

आजी: अरे प्रतिक, मिलिंदा कधी फोन करणार आहे... संध्याकाळी 6 वाजता करेल म्हणाला होता ना...

प्रतिक: आजी, व्हिडिओ कॉल म्हणतात ग त्याला... आणि अजून 15 मिनिटे बाकी आहेत.

आजी: हां, तुला कळलं ना मग झालं तर... आणि या दोन्ही नातसूना काय करतायात किचनमध्ये...

राजीव: आजी, आईस्क्रीम आणत आहेत... या काय आल्याच...

आजी: अरे, इतक्या सकाळी सकाळी आईस्क्रीम कोणी खात का...?

प्रतिक: आजी, तुझ्या आवडीचं आणलं आहे... हे घे...

आजी: (आईस्क्रीम प्लेट हातात घेत) प्रेरणा, तुझ्यामुळे फरक पडला बरं का आमच्या प्रतिक मध्ये... आवडलं मला...

प्रेरणा आजीचं बोलणं ऐकून लाजली.

राजीव: (आजींचा हात हातात घेऊन) आजी, रेखामुळे माझ्यात काय फरक पडला सांग ना...?

आजी: (राजीवचा कान ओढत) थोडा जबाबदारीने वागू लागला आहेस... 

रेखा आजीचं बोलणं ऐकून हसू लागली.

प्रतिक: आजी, बाबांचा कॉल आला... या सगळ्यांनी...

प्रेरणा: वाव सोना दीदी, किती सुंदर दिसतेय...

रेखा: हो ना...(मग आजीकडे विचारत) आजी, ते काय आहे दोन्ही वाटीमध्ये...

आजी: अग एकात बर्फी असते एकात पेढा... न बघता उचलायचा...

रेखा: म्हणजे बर्फी उचलली तर मुलगी आणि पेढा उचलला तर मुलगा असं ना...

आजी: हो असंच...

प्रेरणा: आजी, जे उचललं तेच होतं का...?

आजी: छे ग, तसं काही नसतं... ते आपलं असंच असतं ते... काही जणांच्या बाबतीत होतं तसं पण सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं काही नाही... फक्त एक खेळ म्हणून खेळायचा.

सोना समीर सगळ्यांशी थोडा वेळ ऑनलाइन बोलले. सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडला तसा मिलिंद यांनी व्हिडिओ कॉल ठेवला.

रेखा- राजीव त्यांच्या घरी जायला निघतच होते तेवढ्यात रेखाला अचानक चक्कर आल्यासारखं झालं. राजीवने तिला जबरदस्तीने बसायला लावलं. प्रेरणा तिच्यासाठी पाणी घेऊन आली.

आजी: काय ग रेखा, काय होतयं...?

रेखा: माहीत नाही आजी, कसंतरीच होत होतं. आता थोडं ठीक वाटतंय.

आजी: आपण बोलवूया का डॉ ना...?

रेखा: इतक्या सकाळी नको, नंतर जाईन मी.

आजी: राजीव, घेऊन जा रे आठवणीने तिला... नाहीतर तुला कोर्टात जायचं असेल तर प्रेरणाला सांगते मी न्यायला.

प्रेरणा: हो, मी नेईन रेखाला...

राजीव: Thank you प्रेरणा.

प्रेरणा: thank you नका म्हणू, रेखा मला अनू सारखीच क्लोज आहे. राजीवला प्रेरणाचं बोलणं ऐकून बरं वाटलं.

 

१०-११ च्या आसपास दोघी डॉ कडे जाऊन आल्या. डॉ नी रेखाला काही टेस्ट करायला सांगितल्या. रेखाने त्याचे रिपोर्ट संध्याकाळी येताना राजीवलाच आणायला सांगितले. रेखा आज तब्येत ठीक वाटत नसल्याने प्रतिकच्याच घरी आजी आणि प्रेरणा बरोबर थांबली होती. संध्याकाळी आजी, रेखा आणि प्रेरणा प्रतिक-राजीवच्या येण्याचीच वाट पाहत होते. दोघेही घरी आले ते एकदम शांतच सोफ्यावर येऊन बसले.

आजी: काय रे राजीव, काय म्हणाले डॉ...?

राजीव सोफ्यावरून उठला आणि आजीचे हात पकडून तिला गोल फिरवून म्हणाला, आजी, मी बाबा होणार आहे...

राजीवच बोलणं ऐकून प्रेरणाने आनंदाने रेखाला मिठी मारली. प्रतिकनेही राजीवला मिठी मारत अभिनंदन केलं. आजीने रेखाला राजीवने आणलेली मिठाई भरवत तिचं तोंड गोड केलं. 

प्रतिकने रेखाला ही अभिनंदन केलं.

आजी: राजीव, जपायचं बरं का आता रेखाला... तुला आता खूप जबाबदारी पडणार आहे.

राजीव: (रेखाकडे बघत) हो आजी.

आजी: सगळे रिपोर्ट्स ठीक आहेत म्हणाले ना डॉ...?

राजीव: हो, पण अजून काही आठवड्यांनी ultrasound Scan टेस्ट होणार आहे.

आजी: ते काय असतं आणखीन...?

प्रेरणा: आजी, म्हणजे जुळे आहेत का, हे बघायला ही टेस्ट केली जाते.

आजी: अच्छा.

रेखा: तुला कसं एवढं माहीत प्रेरणा...? म्हणजे मला यातलं काहीच माहीत नाही.

प्रेरणा: अग अनूने मला सांगितलं होतं... याबद्दल... तिच्या या सगळ्या टेस्ट झाल्या होत्या ना... आणि तू अजिबात या टेस्ट बद्दल आतापासून इतका विचार करु. माहीत आहे ना, लीना-टीना दोघींचं लग्न आहे पुढच्या महिन्यात ते...!

प्रतिक: अरे हो, विसरुनच गेलो मी... काय गिफ्ट द्यायचं दोन्ही couple ला ते...!!

राजीव: माझ्या पण पार डोक्यातून निघून गेलं. आपण एक काम करुया... या रविवारी जाऊ दोघे मिळून शॉपिंगला... आणि ठरवू काय ते...

रेखा: वाव शॉपिंग... मी आणि प्रेरणा पण येणार...!

आजी: नाही हां रेखा, आता धावपळ जरा कमीच कर... आणि लग्नाला पण जास्त धावपळ नको करुस.

प्रेरणा: (रेखाच्या खांद्यावर हात ठेवून) हो रेखा, आजी बोलत आहेत ते बरोबर आहे... त्या दोघांना जाऊन काय ते करु दे शॉपिंग... आपण कधीतरी आरामात जाऊ... पुढे तर आपल्याला बरीच कारणं असतील शॉपिंग साठी.

प्रेरणाचं रेखाला समजावणं, आजीसकट सगळयांना छान वाटलं. राजीवने तर फक्त प्रतिक आणि तोच शॉपिंगला जाणार हे ऐकूनच मनात हुश्श केलं.

***

 

एक महिन्यानंतर टीना-लीना दोघी बहिणींचं लग्न राजन आणि सुमितशी छानरीत्या पार पडलं. त्यांचं लग्न बघून रेखा-प्रेरणाला ही त्यांच्या लग्नाचा दिवस आठवू लागला. वर आणि वधू दोन्ही पक्षांकडून रेखाला ओळखत असल्याने आणि अधून मधून कोणी ना कोणी नातेवाईक तिच्याशी बोलायला येत असल्यामुळे रेखाने प्रेरणाला तिच्याबरोबरच थांबायला लावलं होतं. मावशी-काकांना दोन्ही मुलींचं लग्न बघून आनंदाश्रू अनावर झाले होते. टीना-लीनाच्या लग्नाच्या निमित्ताने रेखा-प्रेरणाही आपल्या आईबाबांना भेटल्या. घरचंच लग्न असल्याने आणि प्रतिक-राजीव दोघांचेही आईबाबा सोनाकडे गेले असल्यामुळे आजी, रेखा-राजीव आणि प्रतिक-प्रेरणा हॉलमधून घरी यायला उशीराच निघाले.

***

 

एक आठवड्यांनंतर सोनाकडून प्रतिक-राजीवचे आईबाबा घरी आले आणि रेखाकडे गोड बातमी आहे हे कळल्यावर दोन्ही घरात पुन्हा एकदा आनंदीआनंद झाला होता. त्यात ultrasound scan चा रिपोर्ट ऐकून तर त्यात आणखीनच भर पडली होती. सगळे गप्पा मारत राजीवच्या घरी जमले होते. रेखाला मात्र जुळी मुलं आहेत हे ऐकून टेन्शनचं आलं होतं. तिला टीना-लीनांचं लहानपणीचं वागणं, मावशीला दोघी कशा नाकीनऊ आणायच्या हे सगळं आठवून आपण कसं सगळं सांभाळणार याचीच काळजी वाटू लागली होती. तिच्या चेहऱ्यावरची काळजी प्रेरणाच्या लक्षात आली आणि काहीतरी कारण पुढे करत ती रेखाला त्यांच्या रुममध्ये घेऊन आली.

प्रेरणा: काय झालं रेखा, तू खूप काळजी मध्ये दिसतेय?

रेखा: अग मला twins आहेत हे कळल्यापासून टेन्शनचं आलं आहे. दोन्ही मुलांचा स्वभाव वेगळा असणार, वेगळी आवड... त्यात दिसायला सेम असले आमच्या टीना-लीना सारखे म्हणजे एकाच बाळाला दोनदा अंघोळ घालणं होणार.

प्रेरणा: अग त्यात काळजी करण्यासारखं काय आहे, काकी-काका, राजीव आहेत तुला मदत करायला... तुला एकटीला थोडी ना सगळं करावं लागणार आहे. आणि आम्ही  सगळे आहोत. मी पण मदत करेन तुला... माझ्याकडे एक आयडिया आहे, बघ तुला आवडली तर...

रेखा: कसली आयडिया...?

प्रेरणा: आपण twins collection आणू ना... आणि अजून तुला हे ही माहिती नाही आहे की दोन्ही मुली असतील की दोन्ही मुलं... मग आता पासून का एवढा विचार करतेय...? अशावेळी तर आईने खूप छान छान ऐकायचं असतं, वाचायचं असतं.

रेखा: हो, आई पण मला कॉल केला की हेच सांगत असते. शक्य तितकं शांत रहा. उगाच भांडत बसू नकोस जावईबापूंबरोबर. जसं की यांचे जावईबापू एकदम शांतच बसतात. मुद्दाम कळ काढण्यात एक नंबर. (थोडंस लाजून) तसं वकिलसाहेब काळजी पण खूप घेतात.

प्रेरणा: वाह वाह काय सुंदर लाजल्या वकिलीनबाई... चला जाऊ आता आपण बाहेर... सगळे विचारात पडले असतील काय करत आहेत आत दोघी म्हणून..

रेखा: हो हो चल... म्हणत दोघी लिविंग रुममध्ये यायला निघाल्या.

***

 

रात्री सगळं काम आटपल्यावर प्रेरणा तिच्या रुममध्ये झोपायला आली. प्रतिक तिचीच वाट पाहत पुस्तक वाचत बसला होता. ती येताक्षणी त्याने पुस्तक बाजूला ठेवून तिचा हात हातात घेतला.

प्रतिक: खूप काम पडतं का तुला...?

प्रेरणा: छे, आई असतात की मदतीला... आणि मावशी पण असतात की...

प्रतिक: हं, ऐकना तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे.

प्रेरणा: गंमत ती काय...?

प्रतिक: डोळे बंद कर बघू.

प्रेरणा: बरं करते बंद... म्हणत तिने डोळे बंद केले.

प्रतिकने तिच्या हातात एक ४ पानी brochure ठेवलं. आता उघड डोळे. प्रतिकच्या म्हणण्याप्रमाणे तिने डोळे उघडून पाहिलं.

प्रेरणा: हे काय आहे.

प्रतिक: बघ काय आहे...!

प्रेरणाने brochure उघडून नीट बघितलं आणि प्रतिककडे आश्चर्याने पाहत म्हणाली, हे तर कॉलेजचं brochure आहे.

प्रतिक: हो तुला Psychology मध्ये post graduation करायचं आहे ना...!! तुझ्यासाठीच आणलं आहे हे.

प्रेरणा: तुम्हाला कसं माहिती...

प्रतिक: बायकोची आवड निवड नवरा म्हणून मला माहित नको का...? आता तू पुढे शिकायचं... तू तुझं स्वप्न पूर्ण करायचं.

प्रेरणा: पण प्रतिक, मला असं परस्पर निर्णय घेणं योग्य वाटत नाही.

प्रतिक: म्हणजे...?

प्रेरणा: म्हणजे, आईबाबा आणि आजींना पण याबाबत विचारायला नको का...?

प्रतिक: (तिला जवळ घेत) इतकंच ना... ते काय उद्याच विचारु...

मग राजीनामा कधी देतेय.

प्रेरणा: राजीनामा कशाला...?

प्रतिक: अरे... कॉलेजला जावं लागेल ना तुला... फुल टाईम आहे कॉलेज.

प्रेरणा: काय फुल टाईम...? जमेल का मला...?

प्रतिक: (तिचा चेहरा जवळ घेत) का नाही जमणार... तुझं स्वप्न आहे ते आणि आता आपल्या दोघांचं स्वप्न आहे ते. मग शिकणार ना पुढे...?

प्रेरणा: हो.

प्रतिक: फक्त हो...? (त्याच्या ओठांवर बोट ठेवत) मी इतकं छान गिफ्ट दिलं मग मला रिटर्न गिफ्ट नको का...? म्हणत प्रतिकने प्रेरणाला जवळ घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवले.

***

 

दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी नाश्ता करत असताना प्रतिकने प्रेरणाच्या पुढच्या शिक्षणाचा विषय काढला.

प्रतिक: (सगळ्यांना) मला तुम्हां सगळ्यांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.

मिलिंद: अरे विचारतोय काय... बोल की...

प्रतिक: प्रेरणाचं स्वप्न होत पुढे शिकायचं... तर मला असं वाटतं की तिने ते पूर्ण करावं.

नंदा: खूप छान... (आजींना) आई, तुमचं काय म्हणणं यावर..?

आजी: माझी काय हरकत असणार आहे. माझं तर नेहमीच हे सांगणं आहे की माणसाने सतत काहीतरी शिकत रहावं.

मिलिंद: मला पण हा निर्णय आवडला. पण तिला पुढे काय शिकायचं आहे.

प्रतिक: (प्रेरणाकडे पाहत) सांग ना..

प्रेरणा: मला Psychology मध्ये post graduation करायचं आहे.

तिचं बोलणं ऐकून मिलिंद यांनी नंदाकडे पाहिलं. नंदाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. आजींच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. कोणी काहीच बोलत नाही आहे हे पाहून प्रेरणाला वाटलं तिचा निर्णय त्यांना पटला नसावा.

प्रेरणा: आईबाबा, आजी तुम्हाला चालेल ना...?

आजी: अग न चालायला काय झालं. पण माझं एकच म्हणणं आहे. एकदा शिकायचं ठरवलं की मध्येच अभ्यास जड झाला म्हणत सोडून द्यायचा नाही. कबूल असेल तरच माझी परवानगी.

प्रेरणा: हो आजी, मी तयार आहे.

नंदा: प्रेरणा, तू खरंच शिक... आणि घरच्या कामाचा जास्त ताण घ्यायचा नाही. पहिला फोकस अभ्यासावर ठेव.

प्रेरणा: हो आई.

मिलिंद: ऑल द बेस्ट बेटा.

नंदा: thank you बाबा.... म्हणत तिने आनंदाने तिघांचा ही आशीर्वाद घेतला. 

 

(प्रेरणा तिच्या आयुष्याचं अधुर स्वप्न प्रतिकच्या साथीने पूर्ण करु शकेल का...? की पुन्हा एक नवीन वादळ तिच्या आयुष्यात येईल...? हे वादळ नक्की काय असेल... जे पुन्हा तिच्या अस्तित्वाची परीक्षा घेईल. जाणून घ्यायला वाचायला विसरु नका पुढचा भाग लवकरच...)

 

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...