अस्तित्व एक संघर्ष-भाग-७७

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७७


प्रेरणाने कोणी डोळे बंद केले म्हणून तिचे हात त्या हातांना लावून ओळखण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. डोळ्यांवरच्या हातांना हात लावत ती म्हणाली, "रेखा, ओळखलं मी तुला...!"

रेखाने तिच्या डोळ्यांवरचा हात लगेच बाजूला केला. प्रेरणाने डोळे उघडून समोर पाहिलं.

"Happy Birthday to you... Happy Birthday to you Dear Prerna... Happy Birthday to you...!!"

टेबलवर तिच्यासमोर केक होता आणि प्रतिक, राजीव-रेखा तिघेही तिला टाळ्या वाजवून विश करत होते. ती अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती. ती उभी राहून दोन्ही हात तोंडावर ठेवून त्या तिघांना पाहत होती. प्रतिकने तिच्याकडे सूरी देत केक कापायला सांगितलं. तिने केक कापताक्षणी पुन्हा तिघांनी तिला टाळ्या वाजवत विश केलं. तिने प्रतिकला केकचा तुकडा भरवला. मग प्रतिकने ही तिला भरवला. राजीवने त्यांचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. प्रेरणाने मग रेखा-राजीवला ही केकचा तुकडा भरवला. रेखाने ही तिला केक भरवत hug केलं.

प्रतिक: So my dear wife, you like this surprise...?

प्रेरणाने मानेनेच हो म्हणत प्रतिकच्या मिठीत गेली. त्या दोघांना असं रोमँटिक होताना पाहून मग राजीवने ही रेखाला मिठीत घेतलं. राजीव-रेखाला पाहून झालेला आनंद प्रेरणाच्या चेहऱ्यावर दिसत होता. चौघांनी मिळून मग डिनरचा आनंद घेतला.

प्रेरणा: (जेवता जेवता) पण हे कसं केलं तुम्ही...? प्रतिक, म्हणजे हा तुम्हा तिघांचा प्लॅन होता तर...?

प्रतिक: अर्थात...

रेखा: प्रतिक, राजीव, मी सांगते हा... आपला प्लॅन...

दोघे: हां...

रेखा: आम्ही तुम्हाला दोघांना एअरपोर्ट वर सोडायला आलो right...

प्रेरणा: right...

रेखा: तर तुमच्या बॅग्स कारच्या डिक्कीत ठेवण्याच्या आधीच आम्ही आमच्या बॅग्स डिक्कीत ठेवल्या होत्या आणि तुमच्या flight नंतरची flight आमचीच होती. 

प्रेरणा: काय...!! (प्रेरणाला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला)

रेखा: आणखीन एक गंमत...

प्रेरणा: ती कोणती...

रेखा: आम्ही तुमच्याच हॉटेल मध्ये आहोत...

प्रेरणा: ओह माय गॉड... किती आश्चर्याचे धक्के देत आहात तुम्ही तिघे ही मला...

रेखा: (तिचा हात हातात घेऊन) मग करायची ना आता धमाल... आणि शॉपिंग सुद्धा...

या दोघी मिळून शॉपिंग करणार हे ऐकूनच राजीव-प्रतिकला लग्नाची शॉपिंग आठवून त्या थंड हवेतही घाम फुटला.

***

दुसऱ्या दिवशी चौघांचा ही आयफेल टॉवरला जायचा प्लॅन असल्याने प्रतिक-प्रेरणा दोघेही लवकर उठून तयारीला लागले. राजीव-रेखा मात्र शांतपणे त्यांच्या रुममध्ये झोपले होते. दोघांनी तयारी केली की नाही हे एकदा चेक करायला प्रतिकने राजीवच्या मोबाईलवर कॉल केला. 

रेखा: (झोपेत) राजीव, तुमचा मोबाईल वाजतोय... उचला ना...

राजीव: तू उचल ना... तुझ्याच बाजूला आहे...

रेखा: (झोपेतून वैतागून उठत) कोणी केला कॉल इतक्या सकाळी सकाळी... तिने डोळे कसेबसे चोळत मोबाईल उचलला.

प्रतिक: अरे राजीव, तयार झालात का...?

रेखा: (झोपेतच) प्रतिक, मी रेखा बोलतेय... 

प्रतिक: तयार झालात का तुम्ही दोघे...? निघायचं आहे ना आपल्याला...

रेखा: (झोपेतून खडबडून जागी होत) ओह नो... ओह नो... हो हो होतोच आम्ही तयार... तिने घाई घाईने मोबाईल ठेवला. मग राजीवला उठवण्याचा ती प्रयत्न करु लागली, "राजीव, उठा लवकर... जायचं आहे आपल्याला...."

राजीव: काय यार, झोपू दे ना.... म्हणत तो या कुशीवरून त्या कुशीवर वळाला.

रेखा: तुम्ही असं नाही ऐकणार... थांबाच आता बघा कसं उठवते... म्हणत तिने थोडंस जार मधलं पाणी राजीवच्या चेहऱ्यावर टाकलं. तसा राजीव खडबडून जागा झाला.

राजीव: (वैतागत) काय आहे रेखा, असं कोणी उठवतं का...?

रेखा: (रागातच) ठीक आहे झोपा तुम्ही... माझी माझी मी जाते आयफेल टॉवर बघायला... राजीवला लक्षात आलं आज आपल्याला आयफेल टॉवरला जायचं आहे. तसं त्याला त्याची चूक कळाली पण सॉरी बोलायला मॅडम होत्या कुठे... ती कधीच रागातच बाथरूम मध्ये निघून गेली होती. 

रेखा अंघोळ करुन बाहेर आली. तसा राजीव ही तिच्या मागोमाग पटकन अंघोळ उरकून बाहेर आला. बाहेर येऊन बघतो तर काय... मॅडम टेबलवर त्याच्यासाठी चिट्टी ठेवून गेल्या होत्या...

"वकिलसाहेब, मघाशी बोलल्याप्रमाणे माझी माझी मी जाते आहे आयफेल टॉवर बघायला... तुम्हाला हवी असलेली निवांत झोप घेऊन तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे फिरुन घ्या..."

त्याने डोक्यावर हात मारला आणि लगेच तयारी करून त्याने प्रतिकला कॉल केला. 

प्रेरणा-प्रतिक, रेखा तिघेही हॉटेल लाँज मध्ये राजीवची वाट बघत थांबले होते. प्रतिकचा मोबाईल वाजला तसा त्याने थोडा बाजूला होत कॉल उचलला.

प्रतिक: हां बोल राजीव...

राजीव: रेखा आहे का तुमच्या बरोबर...

प्रतिक: हो आहे ना... आम्ही बाहेरच तुझी वाट बघत आहोत.

राजीव: तिचा मूड ठीक आहे का...?

प्रतिक: डोन्ट टेल मी, पुन्हा तुम्ही दोघे भांडलात...?

राजीव: actually हो, माझीच चूक होती... तिने मला कालच अलार्म लाव म्हणून सांगितलं होतं. पण माझा स्वतःवर खूप विश्वास होता आणि सकाळी पण तिने उठवल्यावर मी थोडा भडकलो तिच्यावर...

प्रतिक: वाह धन्य आहात तुम्ही राजे... anyway लवकर ये... निघायचंय आपल्याला...

राजीव: हो हो आलो लगेच...

थोड्या वेळात राजीव लाँज मध्ये पोहचला. त्याला आलेलं बघून रेखा प्रेरणाला सोफ्यावरुन उठवत म्हणाली, "चल प्रेरणा आपण जाऊया...." प्रेरणाने प्रतिककडे पाहिलं पण प्रतिक काही बोलायच्या आधीच रेखा म्हणाली, "प्रतिक, मी आणि प्रेरणा तिथे जाईपर्यंत एकत्र असलो तर तुम्हाला चालेल का...?"

बिचारा प्रतिक काय बोलणार होता त्याने काही बोलायच्या आधीच प्रेरणाला ती पुढे घेऊन गेली आणि दोघी कार मध्ये जाऊन बसल्या. प्रतिकने राजीवकडे रागाने बघितलं आणि तो ही कारच्या दिशेने जायला निघाला. रेखा, प्रेरणा आणि प्रतिक तिघेही मागच्या सीटवर बसले. राजीव चूपचाप येऊन ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. कार सुरु झाली तसे रेखा मागे बसून प्रतिक-प्रेरणाचे कारमध्ये फोटो काढू लागली. राजीव तिला मिरर मधून न्याहाळत होता पण ती त्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नव्हती. 

रेखा: प्रेरणा, प्रतिक यांच्याकडे बघ जरा... आणि प्रतिक तुम्ही प्रेरणाकडे बघा... येस परफेक्ट... म्हणत तिने त्यांचा अजून एक फोटो काढत त्यांना दाखवला.

प्रेरणा: वाव यार मस्त काढला... बघा ना प्रतिक... प्रतिकनेही फोटो पाहत त्याची तारीफ केली.

राजीव बोलण्यासाठी काही कारण मिळत आहे का पाहतच होता. त्याने प्रतिककडे पाहत म्हंटल, दाखव फोटो... प्रतिकने मोबाईल त्याच्याकडे द्यायच्या आधीच रेखाने तिचा मोबाईल प्रतिककडून मागून घेतला. पुन्हा राजीव हिरमुसलेला चेहरा घेऊन बाहेर पाहू लागला. रेखा ही तिच्या बाजूच्या विंडो मधून डोळ्यांतलं पाणी पुसत बाहेर पाहू लागली. प्रेरणाने प्रतिकला हात लावून खुणेनेच या दोघांचं झालं तरी काय म्हणून विचारलं. प्रतिकने तिला जवळ ओढत हळूच कानात म्हटलं, "कळेलच तुला तिथे गेल्यावर...!!"

***

चौघेही कारमधून आयफेल टॉवरजवळ पोहोचले. Guide त्या चौघांची वाट पाहत थांबलाच होता. प्रतिक प्रेरणाचा हात हातात घेऊन त्याच्यापाशी पोहचला. राजीवने रेखाकडे पाहिलं पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्या दोघांच्या मागोमाग गेली. मग तो ही मान खाली घालून तिच्या मागे गेला. Guide त्यांना आयफेल टॉवर बद्दल माहिती सांगू लागला. चौघेही मान वर करून त्या तीन मजली उंच इमारतीकडे पाहू लागले. Guide त्यांना घेऊन टॉवरमध्ये एकदम वरच्या मजल्यावर गेला. वरचा मजला पूर्णतः चारही बाजूंनी काचेने बंद होता. तिथे ठेवलेल्या दुर्बिणीतून पॅरिसचं सौंदर्य पाहण्यासारखं होतं. प्रेरणा-रेखा दोघीही दुर्बिणीतून सुंदर पॅरिसचा अनुभव घेत होत्या. प्रेरणा आणि रेखा दोघींनी दुर्बिणीतून बघून झाल्यावर मागे वळून पाहिलं. ना तिथे त्यांना प्रतिक दिसला नाही राजीव दिसला. त्यांच्या बरोबर असलेला गाईड ही तिथे नव्हता. दोघीही वेगवेगळ्या दिशेने त्या अनोळखी लोकांच्या घोळक्यात त्या दोघांना शोधू लागल्या. प्रतिकला स्वतःच्याच दिशेने येताना पाहून प्रेरणा त्याच्याकडे धावत गेली आणि त्याच्याजवळ जाणार तोच प्रतिक तिच्यासमोर खाली वाकून स्वतःचा हात तिच्या पुढे करत म्हणाला, Prerna, will you be mine, now and forever... प्रेरणाने रडतरडतच तिचे दोन्ही हात त्याच्या हातात देत मानेनेच हो म्हंटलं. तसं त्याने उठून उभं राहून तिला जवळ घेत तिच्या डोक्यावर किस केलं. प्रतिकने प्लॅन केल्याप्रमाणे गाईडने त्यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करुन प्रतिककडे दिला. प्रेरणाने सगळा विडिओ पाहिला. तिच्या चेहऱ्यावर लाजू आणि हसू दोन्हीही दिसत होतं आणि अचानक तिला रेखा ही राजीवला शोधत असल्याचं आठवलं.

प्रेरणा: प्रतिक, राजीव कुठे आहेत. रेखा त्यांना शोधतेय...

प्रतिकने तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता गाईडला त्यांच्या प्लॅन प्रमाणे राजीव असलेल्या ठिकाणी जायला सांगितलं.

प्रेरणा: प्रतिक, सांगाल का मला... रेखा एकटी पडली असेल. आपल्याला जावं लागेल तिच्या बरोबर राजीवना शोधायला...

प्रेरणा निघणार तेवढ्यात प्रतिकने तिला मागे खेचत म्हटलं, "तुला अजूनही लक्षात नाही आलं... हे सगळं आम्ही ठरवून केलं आहे...!" ती यावर पुढे काही बोलणार या आधीच प्रतिकने तिच्या ओठांना बंदिस्त केलं.

***

राजीवला कुठेही न पाहून रेखा कावरीबावरी झाली होती. आता तर तिला नाही प्रेरणा दिसत होती नाही प्रतिक... ती डोळ्यातल्या अश्रूंना रोखत राजीवला पाहू लागली. दूरवर तिला राजीव सारखीच दिसणारी एक पाठमोरी व्यक्ती दिसली. ती त्या व्यक्तीपर्यंत पोहचली आणि तिने कसंबसं हिंमत करत राजीव म्हणून आवाज दिला. राजीवने मागे वळून पाहिलं. राजीवला पाहून ती त्याला बिलगून रडू लागली.

रेखा: असं कोणी वागतं का...? रडत रडत ती अस्पष्ट बोलू लागली. राजीवने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत तिच्याकडे पाहिलं. रडून रडून तिच्या डोळ्याचं काजळ निघून गेलं होतं. लिपस्टिक ही रडत असताना राजीवच्या शर्टाला लागली होती.

राजीव: (तिचे डोळे पुसत म्हणाला) तुझीच इच्छा होती ना, एकटं फिरायची... म्हणून मी निघून इथे आलो.

तसं ती रागावून त्याला मारत त्याच्याशी भांडू लागली, "हे सगळं मी तुमच्यामुळेच म्हणाले... तुमचीच सगळी चूक होती... ना तुम्ही मला तसं बोलला असतात, ना मग मी असे वागले असते... आणि सॉरी बोलणं तर दूरची गोष्ट तुम्ही मलाच ब्लेम करत आहात...!" 

राजीवने तिचे त्याला मारणारे हात त्याच्या हातात घट्ट पकडले आणि तिच्या बडबड करणाऱ्या ओठांवर त्याचे ओठ टेकवत त्यांना शांत केलं. बऱ्याच वेळाने दोघेही एकमेकांपासून दूर झाले तसा तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, सॉरी रेखा, खरं तर माझं चुकलंच... मी तुझं ऐकून अलार्म लावायला हवा होता आणि जे सकाळी झालं त्यासाठी ही खूप सॉरी... पुन्हा मी तुझ्याशी असं कधीच नाही वागणार... I promise...

रेखाने हसून त्याच्याकडे पाहिलं आणि अचानक तिला प्रतिक-प्रेरणाची आठवण झाली.

रेखा: राजीव, प्रतिकही मघाशी दिसले नाहीत. प्रेरणा शोधत होती त्यांना... आणि आपला गाईड ही कुठे दिसला नाही.

राजीव: प्रतिक-प्रेरणा एकत्रच आहेत आता... आणि राहिला आपला गाईड... हा काय... म्हणत त्याने बाजूला उभ्या असलेल्या गाईडकडे हात केला.

रेखा: म्हणजे, हे सगळं...

राजीव: yes its planned... तू माझं ऐकत नव्हती... आणि मला तुला सॉरी बोलायचं होतं... आणि आपल्या दोघांच्या अशा वागण्याने प्रतिक-प्रेरणाला ही हवी तशी privacy मिळत नव्हती. सो मग मी आणि प्रतिकने हा प्लॅन केला.

रेखा: हं, माझं इथे थोडं चुकलं... आपल्या भांडणात मी त्यांचा टाईम खराब करत होते.. सॉरी...

राजीव: (तिला जवळ घेत) its ok... या भांडणाच्या निमित्ताने एक आठवण तर आपल्याकडे आली.

रेखा: आठवण कसली...

राजीवने लगेच गाईडने शूट केलेला विडिओ तिला दाखवला. विडिओ पाहून रेखाच्या चेहऱ्यावर हसू आलं.

रेखा: कशी दिसतेय ना मी रडताना...

राजीव: एकदम natural expression... मग आवडला का हा सॉरी बोलायचा प्लॅन...

रेखा: हो खूप... पण म्हणून नेक्स्ट टाईम पुन्हा असं वागू नका... 

नाहीतर या रेखाशी गाठ आहे.

राजीव: (हसत हसत) हो आता ही गाठ पुढचे सात जन्म या रेखाशीच असेल... चला निघायचं आता...

रेखा: आता कुठे...?

राजीव: मॅडम, इतकं रडून भूक लागली असेल ना... चला खायला जाऊ काहीतरी आणि थोडी शॉपिंग ही करु... आणि या गाईड भाईला पण काहीतरी खाऊ दे... नाहीतर बिचारा आपल्याला पुढे कसं काय सांगेल...

रेखा: (हसत) चला तर...

दोघेही हातात हात घालून गाईड बरोबर दुसऱ्या मजल्यावर आले.

***

दुसऱ्या मजल्यावर कॅफेटेरिया आणि शॉपिंग करण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी होत्या. प्रतिक-प्रेरणा दोघेही त्यांची वाट पाहत थांबलेच होते. राजीव-रेखाला खुश बघून दोघां मध्ये समेट झाल्याचं प्रतिक-प्रेरणाच्या लक्षात आलं. सगळ्यांनी मिळून मग जेवणावर ताव मारला त्यानंतर रेखा-प्रेरणाने शॉपिंगचा आनंद तर राजीव-प्रतिकने मनात नसताना ही शॉपिंग बॅग्स उचलण्याचा आनंद लुटला.

***

सगळे थकून भागून शॉपिंग करुन आपापल्या रुमवर आले. रुमवर येताक्षणी प्रतिकने बॅगा तशाच बाजूला ठेवल्या. क्षणाचा ही विलंब न लावत प्रेरणाला उचलून घेऊन तो बाथरुम मध्ये गेला. तिच्या बरोबर त्याने शॉवरचा आनंद घेतला. शॉवरच्या पाण्यात दोघेही एकमेकांचा सहवास जवळून अनुभवत होते. काही वेळाने बाथसूट मधल्या प्रेरणाला त्याने आधीसारखंच उचलून आणून बेडवर झोपवलं. लाजेची लाली प्रेरणाच्या चेहऱ्यावर झळकू लागली होती. आता ओढ लागली होती दोघांनाही मिलनाची. प्रतिकने तिच्या जवळ जात तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करत तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. दोघांमधलं ही अंतर हळूहळू कमी होत गेलं. जसजसे ते एकमेकांच्या जवळ येत गेले तसतसे त्या बेधुंद रात्रीत त्यांच्या मिलनाचे रंग मिसळत गेले. 

दुसऱ्या दिवशी प्रेरणाला सूर्य किरणांनी जाग आली. बाजूला झोपलेल्या प्रतिककडे पाहून तिला आदल्या दिवशीची रात्र आठवली. त्याने अजूनही त्याच्या हातांच्या मिठीत तिला कैद करून ठेवले होते. उठावं तर कसं बेडवरुन उठावं यासाठी तिची चुळबूळ चालू झाली. तिच्या चूळबुळीने प्रतिकला जाग आली. उठण्यासाठी तिचा चाललेला खटाटोप पाहून त्याला हसू आलं... तो हळूच तिच्या कानांवरचे केस बाजूला करत म्हणाला, प्रतिक राजाध्यक्षच्या मिठीतून सुटणं इतकं सोपं काम नाही.

प्रेरणा: प्रतिक, कोणी सर्व्हिस साठी आलं तर...

प्रतिक: (तिच्याकडे पाहत) नाही येणार... do not disturb चा board लावून आलोय मी... आजचा दिवस आणि रात्र फक्त आणि फक्त माझ्या wife साठी आहे. त्याचं बोलणं ऐकून प्रेरणाने लाजून स्वतःच्या चेहऱ्यावरुन ब्लँकेट ओढून घेतलं. 

***

चौघांनी मिळून पुढचे काही दिवस पॅरिसच्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळाना भेट दिली... स्वतःसाठी, फॅमिलीसाठी वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग केली आणि एका नव्या जोशात, उल्हासात चौघे मुंबईला यायला रवाना झाले.

क्रमशः

🎭 Series Post

View all