Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-७६

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-७६
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७६


प्रतिक-प्रेरणा, राजीव-रेखा दोन्ही जोडप्यांचं त्यांच्या त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन घेऊन झालं होतं. लग्नानंतरचे सगळे रीतीरिवाज खूप छान रित्या पार पडले होते. घरी आलेले सगळे नातेवाईक नवीन जोडप्यांना आशीर्वाद देऊन आपापल्या घरी मार्गस्थ झाले होते. सोना-समिरही तिच्या फॅमिली बरोबर काही दिवस राहून US च्या त्यांच्या घरी निघून गेले होते.

 

लग्न होऊन एक आठवडा होऊन गेला होता. दोन्हीही सूना सासरच्या घरी हळूहळू रुळू लागल्या होत्या. एकाच महिन्यात फार सुट्ट्या घेणं शक्य नसल्याने चौघांनी त्यांचं ऑफिस आजपासून जॉईन करायचं ठरवलं होतं. दोन्ही घरात ऑफिसला आज जायचं म्हणून सकाळीच सासू-सुनेची किचनमध्ये कामाची लगबग चालू होती. सासू-सुनांनी मिळून टिफिन तयार केला. आता फक्त नाश्त्याला काहीतरी बनवणं बाकी होतं.

नंदा: प्रेरणा, तू ऑफिसची तयारी करायला घे, मी बघते नाश्त्याचं काय ते...! आणि हा प्रतिक उठला आहे की नाही देव जाणे...

प्रेरणा: हो आई बघते... म्हणत ती तिच्या रुममध्ये निघून गेली.

प्रतिक अजूनही झोपलाच होता. आता यांना कसं उठवू प्रेरणा विचार करु लागली. ती विचारात असतानाच प्रतिकने तिला त्याच्या बरोबर बेडवर ओढून घेतलं.

प्रेरणा: प्रतिक, सोडा ना... ऑफिसमध्ये नाही का जायचंय..?

प्रतिक: जायचं आहे ना पण मला माझं मॉर्निंग गिफ्ट हवं... म्हणत त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले मग दोन्ही गालांवर किस केलं आणि तो ओठांवर येणार तेवढ्यात प्रेरणा त्याला ढकलून बाजूला झाली.

प्रेरणा: चला लवकर तयार व्हा... आपल्याला ऑफिसला जायचं आहे...

प्रतिक चेहरा केविलवाणा करत बेडवरुन उठला आणि तसाच मूड ऑफ घेऊन ब्रश करत अंघोळीला गेला. तोपर्यंत प्रेरणा जांभळ्या रंगाची साडी नेसून तयार झाली. आणि आरशात बघत ती गळ्यातलं मंगळसूत्र नीट करु लागली. तिने मंगळसूत्राला प्रतिकचा विचार करत किस केलं तोच प्रतिकने मागून येऊन तिला तिच्या कमरेला पकडून स्वतः जवळ ओढलं. तिला त्याने स्वतःच्या दिशेने वळवलं.

प्रतिक: आता कशी सुटणार तू माझ्या हातून....? 

प्रेरणाने लाजून मान खाली घातली. प्रतिकने तिचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत घेत विचारलं, मग मघासंच माझं मॉर्निंग गिफ्ट घेऊ ना.... तिने डोळे बंद करून घेतले. प्रतिक हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला... तेवढ्यात नंदाने त्यांचा रूमचा दरवाजा ठकठकवला.

नंदा: प्रतिक, प्रेरणा चला नाश्ता करायला...

आईच्या आवाजाने दोघेही एकमेकांपासून दूर झाले. प्रेरणा प्रतिकला अंगठा दाखवत कसा एका माणसाचा पचका झाला म्हणत हसत हसत रूममधून बाहेर पडली. प्रतिक शर्ट घालत घालत मनात म्हणाला, रात्री तर नक्कीच भेटशील मग बघतो तुला... तो ही तयारी करून बाहेर नाश्त्याला गेला.

***

 

दोघेही नाश्ता करायला एकमेकांच्या बाजूलाच बसले होते. नेहमीप्रमाणे मिलिंद पेपर वाचत वाचत, पोहे खात चहाचा घोट घेत होते. प्रतिकने कोणालाही कळणार नाही असा प्रेरणाचा उजवा हात टेबलाखालून पकडून ठेवला आणि काही झालंच नाही अशा रीतीने नाश्ता करु लागला. प्रेरणाने कसाबसा डाव्या हातात चमचा पकडून आपला नाश्ता संपवला.  प्रतिकने स्वतःचा नाश्ता संपवला तसा तिचा हात सोडला. 

प्रतिक: (हसत हसत) प्रेरणा, निघूया ना ऑफिसला जायला...

प्रेरणा: (तिने मघासच्या गोष्टीसाठी रागातच उत्तर दिलं) हो निघूया... तसे दोघेही आजी, आईबाबा यांचा निरोप घेऊन घरुन निघाले. त्याचवेळी समोरच्या फ्लॅटमधून राजीव-रेखा ही ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडले. रेखाने सुद्धा आज ऑफिसचा लग्नानंतरचा पहिला दिवस म्हणून पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. प्रतिक-प्रेरणा दोघांना बघून राजीव-रेखा ही खूश झाले.

प्रतिक: (राजीवला) कसा जाणार आहेस...?

राजीव: (as usual bike ने...

प्रतिक: रेखाला जमेल का साडीमध्ये बाईकवर बसायला...

रेखा: हेच तर ना सकाळपासून मी यांना हेच सांगते आहे आज आपण कारने जाऊ... आणि तुम्हाला जर बाईकने जायचं असेल तर मी कॅब बुक करते. पण हे ऐकतील तर शपथ... तसं दोघेही पुन्हा भांडू लागले.

प्रतिक: अरे ए, काय भांडताय लहान मुलांसारखं... मी तर म्हणत होतो आपण चौघांनी एकत्र जाऊया... what say...

रेखा: मला चालेल पण तुमच्या एकदा फ्रेंडना पण विचारा ज्यांना सतत माझी सवतचं हवी असते ते...

प्रतिक: सवत...?

राजीव: अरे तिच्याकडे लक्ष नको देऊस ती बाईकबद्दल बोलतेय... चल जाऊ आपण एकत्र... म्हणत चौघेही ऑफिसमध्ये एकत्र जायला निघाले. वाटेत त्याने रेखाला तिच्या ऑफिसजवळ सोडलं नंतर त्याच्या ऑफिसपासून जवळ असलेल्या राजीवच्या ऑफिसजवळ राजीवला सोडलं. संध्याकाळी पुन्हा एकत्र जाऊ म्हणत त्याने कार त्यांच्या ऑफिसच्या दिशेने वळवली. प्रतिक-प्रेरणा दोघेही ऑफिसमध्ये आले तसं समिधा, मीना आणि ऑफिसमधले सगळेजण त्यांच्याकडे येऊन त्यांना congratulate करु लागले. सगळ्यांचा अभिनंदन सोहळा पार पडला तसा प्रतिक सगळ्यांचे आभार मानत त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. प्रतिक केबिन मध्ये जाताक्षणी समिधा आणि मीना प्रेरणाला चिडवू लागल्या.

समिधा: बघ बघ, मीना आज कोणीतरी खूपच सुंदर दिसत आहे..

मीना: ए असं चिडवू नकोस तिला... आपल्या बॉसने ऐकलं ना तर आजच resign करावं लागेल.

प्रेरणा: काय ग तुम्ही दोघी... आणि प्रतिक असं काही नाही करणार...

मीना: ओह माय गॉड, वाह वाह आतापासून नवऱ्याची साईड घेऊ लागली.

प्रेरणा: (लाजत) गप्प ना यार किती छळणार...

तसं समिधा, मीना दोघीही तिला ग्रुप हग करत म्हणाल्या, आम्ही खूश आहोत तुला असं आनंदी बघून... प्रेरणा ही त्यांच्या बोलण्याने इमोशनल झाली. तिघींनी मग गप्पा मारत कामाला सुरुवात केली.

***

 

रात्री जेवण आटपलं तसं रेखा रुममध्ये आली आणि सरळ तोंड दुसरीकडे वळवून झोपायला लागली. तेव्हा इतका वेळ तिला सकाळसाठी सॉरी बोलायला थांबलेला राजीव तिचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी काही ना काही करामती करु लागला. मध्येच मोबाईलवर एखादं गाणं लावू लागला तर मध्येच एखादा विडिओ... शेवटी वैतागून ती उठलीच.... आणि तिने रागानेच त्याचा मोबाईल हातात घेऊन बाजूला ठेवला.

रेखा: काय चाललं आहे तुमचं... स्वतः ही झोपत नाही आणि दुसऱ्याला ही शांत झोपू देत नाहीत.

राजीव: ते रेखा... I am sorry...

रेखा: (रागातच) हे बरं आहे तुमचं वकीलसाहेब... आधी त्रास द्यायचा मग सॉरी बोलायचं...

राजीवने तसे त्याचे दोन्ही कान पकडले. सॉरी ना रेखा... मला तुला सकाळसाठीच सॉरी बोलायचं होतं पण तू बेडरूममध्ये आलीच ते माझ्याकडे लक्ष ही दिलं नाही.

रेखा: मग असं कोणी वागत का...? तुम्हाला माहीत होतं, मी साडी मध्ये बाईकवर बसू नाही शकणार तरी तुम्ही बाईकनेच जाऊया म्हणून हट्ट करत होतात... मग का बोलू मी तुमच्याशी...?

राजीव: actually रेखा, मला तुला चिडवायला जाम मज्जा येते... मी खरं तर तुला कारनेच नेणार होतो पण तुझे असे रागात गाल जे लाल लाल होतात ना मला जाम वेड लावतात... म्हणत तो तिच्या जवळ जाऊ लागला. रेखाने लगेच त्याच्यावर जोरात उशी मारली. तरी राजीव तिने फेकलेल्या उशीचा मार झेलत तिच्या जवळ आलाच... आणि तिला जवळ ओढत म्हणाला, अजूनही माझा angry bird माझ्यावर रागावला आहे का...?

रेखाने त्याला जोरात एक पोटात फाईट दिली.

राजीव: (पोटावरुन हात फिरवत) हे ट्रेनिंग कधी घेतलं...

रेखा: प्रेरणाला त्या दिवशी तसं पाहिलं आणि तेव्हाच मनाशी ठरवलं... आणि सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग घेतलं आणि प्रेरणा ठीक झाल्यावर तिला पण जॉईन करायला लावलं.

राजीवने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, I am proud of you Rekha... हीच गोष्ट मला तुझी खूप आवडते.

रेखा: चला आता खूप झालं बोलणं झोपूया...

राजीव: असं कसं, अजून तू मला सांगितलं कुठे, तुझा राग गेला की नाही ते...?

रेखा: (हसत हसत) तो तर मघाशीच गेला एक फाईट दिल्यावर...

राजीव: (तिच्या ओठांवर हात ठेवत म्हणाला) अच्छा, मग मी आता मला हवं ते करु शकतो तर... ती पुढे काही बोलणार त्या आधीच त्याने लाईट बंद करत तिला स्वतः जवळ ओढलं.

***

 

प्रेरणा रुममध्ये आली तसा लगेच प्रतिक झोपण्याच्या तयारीला लागला.

प्रेरणा: प्रतिक, तुम्ही झोपताय...?

प्रतिक काहीच नाही बोलला. ती त्याच्या दिशेने वळली.

प्रेरणा: प्रतिक, इकडे बघा ना... सकाळी जे झालं त्यामुळे राग आला का माझा...

प्रतिकने तिला त्रास देण्यासाठी अजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं. 

प्रेरणा: प्रतिक...प्लीज काहीतरी बोला ना... बोलता बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तिचा रडतानाचा आवाज ऐकून प्रतिक लगेच झोपेतून उठून तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या डोळ्यातला अश्रूचा एक थेंब हातात घेत म्हंटलं... किती नशीबवान आहेत ना हे अश्रू सुद्धा... ज्यांना तुझ्या जवळ स्थान आहे. नाहीतर मी आपला गरीब माणूस... जो आपल्या बायकोच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आणि बायको कडून त्याची हकालपट्टी होते. त्याचं ते असं डोक्यावर हात घेऊन बोलणं ऐकून ती खुदकन हसली.

प्रेरणा: प्रतिक, तुम्ही एक नंबरचे नाटकी आहात...

प्रतिक: मग, काय करणार... गरीब नवरा बिचारा मी...

प्रेरणा: जावा बघू तिकडे... तिने हाताने प्रतिकला ढकललं. पण प्रतिकने लगेच तिचा हात त्याच्या हातात पकडून तिला त्याच्याकडे ओढलं. तिचा चेहरा तो त्याच्या डोळ्यांत सामावून घेत होता.

प्रेरणा: असं का बघताय...

प्रतिक: बघतोय माझी बायको किती सुंदर दिसते ती.

तिने उठण्याचा प्रयत्न केला पण प्रतिकने त्याची पकड मजबूत केली. तो हळूच तिच्या कानाजवळ येत म्हणाला, त्या ड्रॉवरमध्ये तुझ्यासाठी एक surprise आहे...

प्रेरणा: सोडा ना मला, मला बघायचंय काय आहे ते...

प्रतिक: असं नाही आधी कबूल कर... surprise बघून झाल्यावर मला माझं आता मॉर्निंग गिफ्ट देशील...

प्रेरणा: (लाजत) अं बघेन...

प्रतिक: बघेन नाही... हो च म्हण.. त्याशिवाय मी तुला सोडणार नाही आहे.

प्रेरणा: बरं बाबा, कबूल.. आता तरी जाऊदे मला..

तसं प्रतिकने तिचा हात सोडला. लगेच तिने ड्रॉवरमधलं envelope उघडलं आणि envelope घेऊनच ती प्रतिकच्या मिठीत गेली.

प्रतिक: मग आवडलं का surprise...

प्रेरणा: हो खूप आवडलं... मी खूप excited आहे eiffel tower ला जायला... तिने पुन्हा बोलता बोलता प्रतिकला बिलगली.

प्रतिक: मग आता माझं गिफ्ट हवं आहे मला...

त्याचं बोलणं ऐकून तिने चेहरा लाजून झाकला. लगेच प्रतिकने तिला स्वतःच्या जवळ ओढत हळूच तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करत तिच्या नाजूक ओठांवर त्याचे ओठ टेकवले.

***

 

अखेर तो दिवस आला ज्या दिवशी प्रतिक आणि प्रेरणा पॅरिसला जायला निघाले.

प्रतिक: प्रेरणा, एकदा सगळं बघून घे... काही राहिलं नाही ना...?

प्रेरणा: हो हो, सगळं चेक केलं मी...

तेवढ्यात आजी त्यांच्या रुममध्ये आली.

आजी: झाली का दोघांची सगळी तयारी...

दोघे: हो आजी.

आजी: बरं, हा प्रसाद घ्या... आपल्या इकडच्या गणपती मंदिरातला आहे... म्हणत आजीने दोघांना प्रसाद खायला दिला. तसे दोघेही तिच्या पाया पडले आणि आजीला घेऊन लिविंग रुममध्ये आले. प्रेरणा आणि प्रतिकने नंदा-मिलिंदच्या ही पाया पडून आशीर्वाद घेतला.

दोघे: आजी, आईबाबा येतो आम्ही.. काळजी घ्या.

मिलिंद: नका इथली काळजी करु... मस्त पैकी सुट्टी एन्जॉय करा...

नंदा: बरं सांभाळून जावा रे... आणि पोहचलात की फोन करा...

दोघे: हो आई... त्यांना बाय बाय करायला राजीव-रेखा आणि राजीवचे आईबाबा ही आले होते. दोघांनी राजीवच्या आईबाबांचा पण आशीर्वाद घेतला.

प्रतिक: राजीव, रेखा चला तुम्ही दोघे आम्हाला एअरपोर्ट वर सोडायला...

राजीव: हो आलोच... तुम्ही व्हा पुढे... मी आणि रेखा आलोच...

प्रतिक-प्रेरणा दोघेही राजीवच्या कारपाशी येऊन त्यांची वाट पाहू

लागले.

प्रेरणा: प्रतिक, राजीव-रेखा ही यायला हवे होते ना आपल्या बरोबर... मस्त मज्जा केली असती आपण मिळून...

प्रतिक: हं... बहुतेक दोघांचा दुसरीकडे जायचा प्लॅन असावा... हे बघ दोघे आलेच... त्याने त्यांच्या दिशेने येणाऱ्या राजीव रेखाकडे बघत म्हटलं.

राजीवने लगेच कारच्या मागच्या डिक्कीत त्यांच्या बॅग्ज टाकल्या आणि कारचा दरवाजा उघडत त्यांना बसायला सांगितलं आणि कार एअरपोर्टच्या दिशेने वळवली. काही वेळाने चौघेही एअरपोर्ट वर आले. प्रधान फॅमिली ही त्या दोघांची वाट पाहत थांबले होते. आपल्या आईबाबांना पाहून प्रेरणाने धावत जाऊन त्यांना मिठी मारली. प्रतिकने ही विवेकला गळाभेट दिली.

प्रेरणा: आईबाबा, विवेक तुम्हा सगळ्यांना पाहून तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद झाला ते...!!

विवेक: (मुद्दाम तिला चिडवण्यासाठी) राहूदे हां दीदी, आयफेल टॉवर बघायचं म्हणून तू इतकी excited आहेस की जाणार कधी हे ही आम्हाला सांगितलं नाही. Thanks to Pratik jiju... त्यांनी आम्हाला आधीच सांगून ठेवलं होतं.

प्रेरणा: राहू दे हां... तुझे जीजू ते नंतर आधी ते माझे husband आहेत.. आणि राहून गेलं माझं पण तू तरी कुठे विचारलंसं...?

तसे सगळे हसू लागले. प्रधान फॅमिलीने दोघांना happy journey wish केलं. रेखाने प्रेरणाला आणि राजीवने प्रतिकला hug करुन happy journey wish केलं.

प्रेरणा: (रेखाला) तुम्ही दोघेही यायचं होतं ना... आपण मस्त मज्जा केली असती मिळून...

रेखा: पुन्हा एकत्र कधीतरी नक्की जाऊ... सध्या वकिलसाहेबांच्या dates मुळे शक्य नाही ना ते...

प्रेरणा: (पुन्हा तिला hug करत) मी मिस करेन तुला...

रेखा: (हळूच तिच्या कानात म्हणाली) तिथे मला जाऊन मिस करत बसण्यात वेळ नको घालवू... जिथे टाईम द्यायला हवा तिथे टाईम दे... तिचं बोलणं ऐकून प्रेरणाच्या चेहऱ्यावर लाजेने लाली चढली. नेमकं प्रतिकचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याने डोळ्यांच्या इशाराने प्रेरणाला त्याचं कारण विचारलं. तिने मानेनेच काही नाही म्हणत नजर दुसरीकडे वळवली. एअरपोर्टवर flight ची अनाऊन्समेंट झाली तसा सगळ्यांनी त्यांना बाय बाय म्हणत निरोप दिला.

***

 

Paris Charles de Gaulle Airport वर प्रतिक प्रेरणाचा हात हातात घेऊन उतरला. त्यांच्यासाठी अरेंज केलेल्या कारने ते दोघे Four Seasons Hotel George V, Paris luxurious hotel मध्ये आले. प्रतिकने रिसेप्शनला कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांना त्यांच्या रुमपर्यंत नेण्याची सोय करण्यात आली. प्रेरणा प्रतिकचा हात पकडून हॉटेलचं इंटेरिअर जेवढं जमेल तेवढं सगळं डोळ्यांत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही त्यांच्या रुमपाशी आले. हॉटेलस्टाफ ने त्यांना तिकडच्या service ची थोडक्यात काही माहिती दिली आणि त्यांचं सामान त्यांच्या रुममध्ये ठेवून तो निघून गेला. तो निघून जाताक्षणी प्रतिकने रूमचा दरवाजा बंद करुन घेतला. त्याने प्रेरणाकडे पाहिलं, ती शांतपणे डोळे बंद करून तिच्या हातांची घडी घालून त्या रूमचा फील घेऊ पाहत होती. तिला असं पाहून प्रतिकला तिची शांतता भंग करायचं मन होईना. तो असाच तिच्यासमोर बसून तिला पाहत राहिला. काही वेळाने ती भानावर आली आणि प्रतिकला असं तिला बघताना पाहून लाजली. प्रतिकने तिला त्याच्या मिठीत घेत हळूच कानामध्ये विचारलं, "आवडली का रुम...?" त्याच्या मिठीत प्रेरणा स्वतःला विसरुन गेली तिने फक्त हं म्हणून प्रतिसाद दिला.

प्रतिक: मग आजची रात्र अशीच माझ्या मिठीत घालवायचा विचार आहे का तुझा...? तसं काही तुझा इरादा असेल तर चालेल मला...!!

प्रतिकचं बोलणं ऐकून ती भानावर आली आणि त्याच्या मिठीतून दूर होत लगेच लाजत म्हणाली, चला मी फ्रेश होऊन येते. त्याच्याकडे न पाहत तिचे कपडे घेऊन ती बाथरुम मध्ये निघून गेली. प्रतिक तिला असं लाजून जाताना पाहून मनातल्या मनात हसला. दोघांनी room service झाल्यावर रुममध्येच जेवणावर ताव मारला आणि मस्तपैकी बेडवर ताणून दिलं.

***

 

सकाळी खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाने प्रेरणाला जाग आली. तिने बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला पण प्रतिक तिला जवळ घेऊन झोपला असल्याने तिला उठता येईना. "किती शांत झोपलेत प्रतिक..." ती त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करु लागली. तिने हळूच तिचे ओठ त्याच्या गालांवर टेकवले. तो झोपेतही हळूच हसला. तिने हळूच बाजूला ठेवलेला मोबाईल बघितला... तारीख बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली... आज आपला birthday आहे... बघूया प्रतिक कसं wish करतात ते.. तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि हळूच प्रतिकचा हात बाजूला करत ती बेडवरून उठली तरी तिच्या हालचालींनी प्रतिकची झोपमोड झालीच. त्याने जबरदस्तीने तिला स्वतः जवळ ओढलं आणि तिच्या दोन्ही गालांवर किस करत म्हणाला, आवडलं बरं मला तुझं असं वागणं... त्याचं बोलणं ऐकून ती लाजून त्याच्या मिठीत गेली.

प्रतिक: आज आपण मस्तपैकी Louvre Museum ला जाऊ त्यानंतर थोडं शॉपिंग करु मग dinner पण बाहेर करु चालेल ना...?

प्रेरणाने मानेनेच हो म्हंटलं आणि प्रतिकला काही कळायच्या आधीच त्याच्या ओठांवर किस करुन टुणकन बेडवरुन पळत बाथरुममध्ये निघून गेली. प्रतिकला जे घडलं ते स्वप्न की सत्य होतं हे काही समजेपर्यंत प्रेरणा बाथरूममध्ये निघून ही गेली होती.

***

 

दोघेही मस्तपैकी तयार होऊन tourist guide बरोबर Louvre Museum ला भेट देऊन आले. तिथून कारने Palace of Versailles ला जायला निघाले. त्या एक तासाच्या प्रवासात प्रेरणा प्रतिकच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपी गेली होती. ते तिथे पोहचले तसं प्रतिकने तिला झोपेतून जागं केलं. दोघेही guide बरोबर Palace of Versailles मध्ये गेले. Guide त्यांना तिकडच्या गोष्टींबद्दल माहिती देत होता. दोघेही ते मन लावून ऐकत होते. त्या राजवाड्याचं अंतर्बाह्य सौंदर्य पाहून आपण तिथेच हरवून जातो की काय असं प्रेरणाला वाटू लागलं. तिने घाबरुन प्रतिकचा हात घट्ट पकडून धरला. प्रतिकने तिच्या स्पर्शात तिची भीती ओळखली. त्याने guide ला थोडा वेळ त्यांना मोकळा द्यायला सांगितला. तसा guide त्यांना बाहेर भेटायचं ठिकाण सांगून निघून गेला. Guide निघून गेल्यावर प्रतिकने तिचा चेहरा स्वतःच्या दिशेने वळवला.

प्रतिक: प्रेरणा, तू ठीक आहेस ना...

प्रेरणा लगेच त्याच्या मिठीत जात म्हणाली, मला खूप भीती वाटते आहे... इकडंच सौंदर्य पाहून मी इकडेच अडकून पडेन की काय असं वाटतं आहे.

प्रतिक: (तिची हनुवटी वर करत म्हणाला) ए वेडाबाई, असं वास्तू सौंदर्य बघून कोणी हरवून जात नसतं आणि हा तुझा प्रतिक आहे ना तुझ्या बरोबर मग असं घाबरुन जायचं कारण काय..? त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला जवळ घेत तिच्या मनातून भीती दूर केली. त्याच्या आश्वस्त मिठीत तिच्या मनातली भीती निघून गेली.

प्रतिक: (तिचा चेहरा स्वतःच्या हातांच्या ओंजळीत घेत) निघूया का आपण आता...

तिने मानेनेच होकार देत त्याचा हात पकडला. त्याने ही मग तिच्या हातावरची त्याची पकड मजबूत केली. ती त्याच्याकडेच पाहत guide ने सांगितलेल्या ठिकाणी त्याच्या बरोबर जायला निघाली.

***

 

रात्री ठरल्याप्रमाणे दोघेही डिनरसाठी डायनिंग लाँच मध्ये आले. प्रेरणाने सुंदर असा वेस्टर्न स्टाईल मध्ये गाऊन घातला होता. प्रतिक ही तिला साजेशी टक्कर द्यायला पार्टी लूक मध्ये आला होता. त्याने चेअर मागे घेत तिला बसायची खूण केली. ती बसल्यावर तो ही चेअरवर बसला. सुंदर थंड वातावरण आणि त्याला साथ देत असलेलं शांत पाश्चिमात्य संगीत. प्रेरणाचा हात हातात घेऊन प्रतिक कितीतरी वेळ तिच्याकडे पाहत होता. तर प्रेरणा प्रतिक आपला वाढदिवस विसरला की काय याचा विचार करु लागली. तिचं प्रतिकवरचं प्रेम इतकं जास्त होतं की तो तिचा वाढदिवस विसरला या गोष्टी साठी सुद्धा तिला त्याच्यावर रागावता आलं नसतं. प्रतिकने हळूच तिची बोटे त्याच्या ओठांकडे नेत त्यांना किस केलं. त्याच्या अशा वागण्याने तिला नकळत आपण खूप काही त्याच्यासाठी आहोत याची जाणीव झाली. ती त्याला पाहत होती. आज त्याच्यावरची नजर हटूच नये असं तिला वाटत होतं. पण मोबाईलच्या रिंगने नेमकी त्यांची शांतता भंग केली. प्रतिकने सरांचा whatsapp call आलेला पाहून प्रेरणाला जेवणाची ऑर्डर द्यायला सांगून तो कॉल receive करत एका कोपऱ्याच्या दिशेने निघून गेला.  प्रेरणाने त्याला आणि तिला आवडणाऱ्या अशा dishes ची ऑर्डर दिली आणि फोनवर बोलणाऱ्या प्रतिककडे पाहत राहिली. ती अशीच त्याच्याकडे एकटक पाहत असताना अचानक मागून कोणीतरी येऊन तिच्या डोळ्यांवर हात ठेवत तिचे डोळे बंद केले.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...