Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-७२

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-७२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७२


अग उठतेस का...? ऑफिसला नाही जायचं का..? प्रेरणाच्या आईने प्रेरणाला झोपेतून उठवण्यासाठी किचन मधून आवाज दिला.

प्रेरणा: (डोक्यावरून चादर ओढत) झोपू दे ना ग... एकतर गेला आठवडा धावपळ धावपळ करुन थकले आहे मी...

आई: (चपाती तव्यावरून काढत) अग दोन दिवस तर जायचं आहे आता ऑफिसमध्ये... मग तर सुट्टीचं घेतली आहेस ना...!!

प्रेरणाचा आवाज येईना तसा आईने गॅस शेगडीची आच बंद केली आणि तिला उठवायला रुममध्ये गेली.

आई: (तिला हात लावून उठवत) प्रेरणा, उठ... चल बघ किती वाजले... आता यापुढे तुला स्वतःहून सकाळी उठायला शिकायला हवं... तिकडे नवऱ्याच्या घरी आई उठवायला येणार नाही आहे... तुझे आई बाबा नसणार तिकडे...

आईबाबा माझ्या बरोबर नसणार... आईचे हे शब्द प्रेरणाच्या मनात उमटले. ती खाडकन झोपेतून उठली आणि आईला बिलगली.

आई: काय झालं... स्वप्न बघितलं का काही...

प्रेरणा: (आईवरची हातांची पकड घट्ट करत) आई, मला नाही जायचं आहे ग कुठे... तुम्हां दोघांना सोडून... बोलताना तिचा आवाज रडवलेला झालेला.

आई: ए वेडाबाई, अग लग्नानंतर मुलीला सासरी जावंच लागतं... मी पण आलेच ना तुझ्या बाबांच्या घरी...

प्रेरणा: पण आई, मुलीनेच का जावं... मुलगा येऊ शकत नाही का ग... म्हणजे मुलीने तिच्या आईबाबांपासून दूर व्हावं हे किती योग्य आहे. बोलताना प्रेरणाच्या अश्रूंचा बांध फुटला.

आई: (तिचे डोळे पुसत) प्रेरणा, तू म्हणतेस ना, मुलीनेच का जावं सासरी... तर ऐक... स्त्री ही जन्मतःच खूप समजूतदार असते. घरातल्याबद्दल प्रेम, आपुलकी तिच्या मनात असतेच पण अनोळखी कुटुंबाला, त्या घरातल्या व्यक्तींना ही तितकंच समजून घेते. आणि म्हणूनच लग्नानंतर ती तिच्या आणि सासरच्या घरांना एकत्र जोडण्याचा दुवा ठरते.

प्रेरणा: पण मग आई असं मुलगा नाही का करु शकत...?

आई: (हसून) प्रेरणा, आता तू तुझ्या बाबांचंच उदाहरण घे ना... आता इतकी वर्ष झाली तुझ्या आत्येच्या लग्नाला, तरी किती वेळा ते तिच्याशी छोट्या छोट्या कारणांनी अबोला धरतात... मग मलाच मध्ये पडून त्यांचा आणि ताईंचा अबोला दूर करावा लागतो.

प्रेरणा: पण आई... पण मग तुला नाही का आठवण यायची लग्नानंतर तुझ्या आईबाबांची...

आई: हं, यायची ना... पण तुझे आजी आजोबा माझ्या लग्नानंतर गावी रहायचे.. कितीही वाटलं तरी असं लगेच जाणं शक्य नसायचं. मग मी त्यांची आठवण आली. त्यांच्याशी बोलावसं वाटलं की, त्यांना फोन करायची. आतासारखा मोबाईल नव्हता तेव्हा...गावी फोन ही खूप कमी जणांच्या घरी होते. तुझ्या मामाने आजी आजोबा गावी राहायला जायचं म्हणत होते तेव्हा लगेच फोन, टीव्ही, घरात पाणी अशी सगळी सोय केली. कधी कधी खूप पावसामुळे गावी फोन लागायचा नाही. मग मात्र मला तो पुन्हा कधी एकदा ठीक होतोय याची वाट पाहत लागायची.

तुला तर माहेर फार दूर नाही आहे.. त्यामुळे तुला माझी, बाबांची, विवेकची आठवण आली तर तू केव्हाही तुझ्या घरी येऊ शकते. पण फक्त येताना सासरच्या मंडळीची परवानगी घेऊनच यावं... चल आता उठ, वाजले बघ किती...? आईने चादर घडी करत करत म्हंटलं.

प्रेरणा बेडवरुन उठत काहीच न बोलता बाथरुममध्ये निघून गेली. आईने कितीही समजावून सांगितलं असलं तरी आईबाबांपासून दूर व्हावं लागणार हेच तिच्या मनात सल करुन होतं.

***

 

ऑफिसमध्ये आल्यापासून प्रेरणाचं कामात लक्षचं नव्हतं. प्रतिक कधी ऑफिसमध्ये आला हे ही तिच्या लक्षात आलं नाही. प्रेरणाचं नक्की काहीतरी बिनसलं आहे प्रतिक केबिनमध्ये बसून विचार करत होता. विचारात असतानाच सोनाने त्याला whatsapp voice call केला.

सोना: हे प्रतिक, काय मग काय चालू आहे...? मी येते आहे उद्या... लक्षात आहे ना...? की होणाऱ्या बायकोकडे बघता बघता तुझ्या दीदीला विसरुन गेलास...?

प्रतिक: दीदी, काहीही काय... तुला विसरेन का मी कधी... आणि प्रेरणाच मला विसरुन गेली आहे. सकाळी मी आलेलो ही कळलं नाही तिला. स्वतः मध्येच हरवून गेल्यासारखी वाटली मला...

सोना: अरे होतं रे असं... आपल्या आईबाबांपासून दूर व्हावं लागणार या कल्पनेनेच ती शांत शांत असेल.. मी पण झालीच होती की इमोशनल... if you remember...

प्रतिक: पण दीदी, आता मी कसं समजावू तिला... मला नाही ग तिला असं बघवत... डोळे पण तिचे रडून सुजल्यासारखे वाटले मला...

सोना: बोल एकदा तिच्याशी... तिच्या मनात तिच्या parents पासून दूर व्हायची जी भीती आहे ना... ती काढ... and I know my bro, he can handle it very well... आता कॉल ठेवते मी... बोलून घे एकदा तिच्याशी... 

प्रतिक: yes दीदी... 

सोनाने कॉल ठेवला तसं प्रतिकने लगेच प्रेरणाच्या लँडलाईन वर कॉल करुन तिला केबिन मध्ये यायला सांगितलं.

***

 

प्रेरणा: (केबिन मध्ये येऊन) सर तुम्ही बोलावलं...

प्रतिक: (खुर्चीत बसायची खूण करत) हो

प्रेरणा प्रतिकच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली. प्रतिक तिच्याजवळ येऊन तिच्या बाजूच्या खुर्चीत बसला.

प्रतिक: (तिचा हात हातात घेऊन) काय झालं प्रेरणा, सकाळपासून बघतोय तू खूप शांत शांत आहेस...

प्रेरणा: (स्वतःचे हात सोडवत) कुठे काय... काही नाही... बोलताना प्रतिकच्या नजरेला नजर द्यायला ती घाबरत होती.

प्रतिक: (तिची हनुवटी वर करून) बघ माझ्याकडे... हे बघ... I know तुला भीती वाटते आहे ना... आईबाबांपासून दूर व्हायची.

प्रेरणाने चमकून प्रतिककडे पाहिलं.

प्रतिक: (तिला हसवण्यासाठी) तुला हवं असेल तर तुझ्या ऐवजी मी तुमच्या घरी येऊन राहायला तयार आहे...

प्रतिकचं बोलणं ऐकून प्रेरणाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

प्रतिक: चला सकाळपासून जी स्माईल पाहायला मी आतूर होतो ती स्माईल मला पाहायला मिळाली. (पुन्हा तिचा हात हातात घेऊन) हे बघ प्रेरणा, माझं घर तुझं सासर जरी असलं तरी तुला सांगतो आईबाबा, आजी तुझ्यावर सोना दीदी इतकंच प्रेम करतील.... आणि राहिला प्रश्न तुला तुझ्या आईबाबांची आठवण आली तर... तू हवं तेव्हा अगदी रात्री उशिरा ही त्यांना भेटू शकते.... तुला हवं तितके दिवस राहू ही शकतेस...

प्रेरणा: (त्याचा हात घट्ट पकडून) खरंच प्रतिक...

प्रतिक: हो अगदी खरं... आता पुन्हा एकदा हस पाहू...

प्रेरणा त्यावर हसली. तिला हसलेलं पाहून प्रतिकने तिच्या कपाळावर किस केलं.

***

 

प्रतिक त्याच्या घरच्या फ्लोअरवर पोहचला तोच त्याला शेजारच्या घरात पाहुण्यांची वर्दळ दिसली. त्याला पाच-सहा दिवसांपूर्वीच कळलं होतं तो फ्लॅट कोणीतरी विकत घेतला आहे ते... गेले काही दिवस नेमकं तो ऑफीसचं काम, प्रेरणा बरोबर शॉपिंग यामुळे घरी उशिरा येत असल्याने नक्की हा फ्लॅट कोणी विकत घेतला हे ही त्याला कळलं नव्हतं. बघू नंतर कळेलच कोणी विकत घेतला आहे ते... आधी कळलं असतं हा फ्लॅट विकणार आहेत ते तर, राजीवलाच हा घ्यायला सांगितलं असतं तसं ही तो फ्लॅट घ्यायचा विचार करतच होता. (पुन्हा त्या फ्लॅटकडे पाहत) बहुतेक गणेशपूजन असावं आज... म्हणून इतके पाहुणे दिसत आहेत. प्रतिकने विचार करता करता स्वतःच्या घरची बेल वाजवली. आजीने दरवाजा उघडला.

आजी: आलास... तुझीच वाट बघत होते.

प्रतिक: (बॅग ठेवत) आई बाबा कुठे आहेत...

आजी: अरे, समोरची रुम काही दिवसांपूर्वी विकली गेली ना... त्यांच्या घरी गणेशपूजन आहे तिथेच गेले आहेत.

प्रतिक: पण फ्लॅट कोणी घेतला तो विकत...?

आजी काही बोलणार इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली. आजीने दार उघडलं. मिलिंद आणि नंदा दोघेही दारातून आत आले आणि सोफ्यावर बसले.

प्रतिक: कसे आहेत नवे शेजारी...

नंदा: अगदी घरच्या सारखेच...

मिलिंद: हो ना... तुझ्या आईच्या मागे लागलो तेव्हा कुठे ती घरी आली. नाहीतर अजून एक तास काही उठणार नव्हती.

नंदा: तुमचं आपलं काहीतरीच असतं..?

मिलिंद: माझं काहीतरीच काय... बरं..

नंदा: (आजीला) आई, तुम्ही कधी येत आहात म्हणून विचारत होते त्यांच्या घरी...

आजी: मग तू सांगितलं ना... माझ्या नातवाबरोबर येईन म्हणून...

प्रतिक: आजी, मी नाही कुठे येत आहे... थकलोय मी खूप...

आजी: ठीक आहे तर मग... मी पण नाही जात...

प्रतिक: आजी, काय लहान मुलांसारखी वागतेस... चल येतो मी.... फ्रेश होऊन...

आजी: हां आता कसं... हे बघ प्रतिक, शेजारधर्म हा पाळायलाच हवा...

प्रतिक: हो ग आजी म्हणत तो फ्रेश व्हायला निघून गेला.

***

 

आजी आणि प्रतिक दोघेही समोरच्या फ्लॅट मध्ये गेले. पाहुण्यांची बरीच वर्दळ होती. आजीने दर्शन घेतलं आणि वळणार तोच तिला आजी प्रसाद घ्या म्हणून कोणीतरी आवाज दिला. आजीने हसून त्या मुलाकडून प्रसाद घेतला. प्रतिक ही दर्शन घेऊन वळाला आणि समोर त्याला पाहून प्रतिकला सुखद धक्काच बसला.

प्रतिक: राजीव तू....?

राजीव: (हसून) प्रसाद घे बघू आधी...

प्रतिकने राजीव कडून प्रसाद घेऊन खाल्ला आणि लगेच त्याला कडकडून मिठी मारली.

प्रतिक: साल्या तू, सांगितलं नाहीस मला... हा फ्लॅट तू घेतला ते...

राजीव: तुला surprise जे द्यायचं होतं... 

प्रतिक: ओह म्हणूनच तू हल्ली मला, प्रेरणाला आणि रेखाला शॉपिंग करायला जायला सांगत होतास तर...

राजीव त्यावर हसला.

आजी: मग प्रतिक, कसे वाटले आपले नवीन शेजारी...

प्रतिक: म्हणजे आजी तुला माहीत होतं...?

आजी: फक्त मलाच नाही तर मिलिंद-नंदाला पण माहीत होतं.

प्रतिक: (राजीवला) नक्कीच तूच सांगितलं असशील यांना नका सांगा म्हणून...

राजीव: अर्थात... कोई शक...

तसे तिघेही हसले. प्रतिक, आजी राजीवच्या आईबाबांना ही भेटला. राजीवच्या आई बाबांनी आजीच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राजाध्यक्ष फॅमिलीच्या रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम त्यांच्या नव्या शेजाऱ्यांच्या घरी हसत खेळत पार पडला.

***

 

सोना समीर संध्याकाळी flight ने आले. प्रतिक, राजीव त्यांची एअरपोर्टवर वाट पाहत होते. सोना, समीरला पाहून प्रतिक, राजीव दोघांनी त्यांना hug केलं. चौघेही मग प्रतिकच्या घरी जायला निघाले. घरी आल्यावर राजीव त्यांचा नवीन शेजारी आहे हे कळल्यावर सोना आनंदाने उड्याच मारु लागली. शेवटी आजीला तिला थांबवावं लागलं.

सोना: आता खऱ्या अर्थाने धमाल करता येणार...

समीर: हो हो, you know what Rajiv... अगदी कालपर्यंत मॅडमचा मूड खराब होता म्हणत होती, एका भावाचं function attend करताना दुसऱ्याच मिस होणार... and now look at her, कशी नाचत होती future mumma...

आजी: सोना, तुला आधीच सांगून ठेवते... जास्त दगदग करु नकोस...

सोना: (आजीला hug करुन मग गालावर किस करत) yes my darling...

आजीने ही तिला मग मायेने जवळ घेतलं.

***

 

आज रेखा आणि प्रेरणाच्या मेहेंदीचा कार्यक्रम होता. रेखाच्या आईबाबांनी प्रेरणाच्या आईबाबांना त्यांच्या घरी दोघांच्या मेहेंदीचा कार्यक्रम व्हावा म्हणून प्रेमळ विनंती केली होती. रेखाच्या काही मेहेंदी expert मैत्रिणी त्या दोघींच्या हातावर मेहेंदी काढण्यासाठी आल्या होत्या. दोघांच्या हातावर मेहेंदी काढणं चालू असतानाच विवेक आणि रेखाचा भाऊ अमितने गाण्यावर नाचायला सुरवात केली आणि त्या दोघांना साथ द्यायला समिधा, मीना आणि रेखाच्या cousin बहिणभावानी पण साथ दिली...

 

ये कुड़ियाँ नशे दियाँ पुड़ियाँ

ये मुंडे गली के गुंडे

ये कुड़ियाँ नशे दियाँ पुड़ियाँ

ये मुंडे गली के गुंडे

नशे दियाँ पुड़ियाँ

गली के गुंडे

 

हो, हो

    महंदी लगाके रखना, डोली सजाके रखना

    महंदी लगाके रखना, डोली सजाके रखना

    लेने तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना

    महंदी लगाके रखना, डोली सजाके रखना, ओ हो, ओ हो

 

मध्येच समिधा, मीनाने रेखा आणि प्रेरणाला ही त्यांच्या सोबत नाचायला घेतलं. दोघींनी पण मग Desi Girl गाण्यावर एक ठुमका दिला आणि पुन्हा आपापल्या जागेवर मेहेंदी काढायला बसल्या. समिधा, मीना यांना घरी जायला उशीर होत असल्याने त्यांनी दोघींना बाय बाय करुन 8.30 लाच स्वतःच्या घरच्या रस्ता धरला. दोघींच्या हातांवर मेहेंदी काढून पूर्ण होईपर्यंत रात्रीचे 9.30 वाजले. रेखा आणि प्रेरणाच्या आईने त्या दोघींना मग स्वतःच्या हाताने भरवलं. अमित आणि विवेकने त्या चौघांना इमोशनल झालेलं पाहून तो फोटो कॅमेरात कैद केला. आई प्रमाणेच दोघांचेही बाबा इमोशनल झाले होते. पण स्वतःला लेकी पासून दूर ठेवत ते कोणाला काही हवं नको ते पाहत होते. रात्र खूपच झाल्यामुळे प्रेरणाच्या फॅमिलीला रेखाच्या आईबाबांनी त्यांच्याकडेच थांबायला सांगितलं. पण त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांची आपल्या मुळे गैरसोय होऊ नये म्हणून आणि त्यांच्या शब्दाचा मान राखावा म्हणून त्यांनी विवेक आणि प्रेरणाला त्यांच्या घरी राहून दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि ते दोघे रेखाच्या आईबाबांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी जायला निघाले.

    

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...