Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-७१

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-७१
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७१


आज ऑफिस मध्ये आल्यापासून प्रेरणा शिंकतच होती.

मीना: काय ग काय झालं, तब्येत तर ठीक आहे ना...?

प्रेरणा: ते... आं...छी...

मीना: (डोक्याला हात लावून) ताप तर नाही आहे, काय ग भिजली वगैरे होते की काय काल... अशी शिंकते आहेस ते...

प्रेरणा काही बोलायच्या आधीच ऑफिसच्या दरवाजाच्या दिशेतून शिंकण्याचा आवाज आला. मीना आणि प्रेरणा दोघींनी कोण शिंकत आहे म्हणून त्या दिशेने पाहिलं.

मीना: (प्रतिकला शिंकताना पाहून) ओह प्रतिक सर शिंकत आहेत... कळलं मला... बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में... ती प्रेरणाकडे पाहून गाऊ लागली.

प्रेरणा: गप्प ग... एकतर मी शिंकून शिंकून हैराण झाले आहे... त्यात तू चिडवून त्रास नको देऊस...

मीना: ओह, हा विचार काल भिजताना करायचा होता ना... नक्कीच तूच सरांना जबरदस्तीने भिजायला घेऊन गेली असणार...

तोपर्यंत प्रतिक त्यांच्या डेस्ककडे आला.

मीना: गुड मॉर्निंग सर...

प्रेरणा: गुड मॉर्निंग सर...

प्रतिक: वेरी गुड मॉर्निंग... आं...छी...

मीना: (मुद्दाम प्रतिक, प्रेरणाला चिडवण्यासाठी) सर तुम्हाला पण सर्दी झाली. प्रेरणाला पण झाली आहे...

प्रतिक: अं... हं...

मीनाच्या बोलण्यावर प्रतिक प्रेरणाकडे हसून बघत फार काही रिऍकशन न देता केबिन मध्ये निघून गेला.

प्रेरणा: काय गरज होती तुला असं मुद्दामून बोलायची...

मीना: हे भगवान, अभी हमें सच बोलना भी पाप है...

प्रेरणा: नौटंकी पुरे कर तुझी... आं...छी...

मीना: तू चल कॅन्टीनमध्ये कोणी कस्टमर आला नाही आहे तोपर्यंत गरम आल्याचा चहा घेऊ... तुला फरक पडेल थोडा...

प्रेरणा: हं चल..

दोघी चहा प्यायला कॅन्टीनमध्ये निघून गेल्या. प्रेरणाने peon ला प्रतिकच्याही केबिनमध्ये चहा न्यायला सांगितली.

***

 

प्रतिक केबिन मध्ये काम करण्याचा प्रयत्न करत होता. शिंका येऊन येऊन तो खरंच खूप हैराण झाला होता. पण प्रेरणाच्या कालच्या आनंदापुढे आज त्याला त्याचा त्रास काहीच वाटत नव्हता. तेवढ्यात peon ने त्याच्या केबिनच डोअर knock केलं.

Peon: May I come in Sir...

प्रतिक: Yes come in

Peon: (टेबलवर चहा ठेवत) सर, तुमची चहा...

प्रतिक: पण मी चहा नाही मागवली.

Peon: मला प्रेरणा मॅडम म्हणाल्या, प्रतिक सरांना आल्याचा चहा हवा आहे म्हणून...

प्रतिक: (मनात- ओह प्रेरणा म्हणाली) अरे हो विसरलोच होतो मी...आं...छी...

Peon: सर, सर्दी झाली आहे तुम्हाला... हा कडक आल्याचा चहा प्या मग लगेच... बघा फरक पडतो की नाही ते...

प्रतिक: हो हो घेतो.

Peon: अजून काही हवं आहे का सर...

प्रतिक: नाही अजून काही नको... फक्त प्रेरणा मॅडमना सांग की मी माझ्या केबिन मध्ये बोलावलं आहे.

Peon: चालेल सर... म्हणत Peon केबिन मधून निघून गेला.

प्रेरणा आणि मीना दोघीही चहा पिऊन पुन्हा त्यांच्या डेस्कवर काम करत होत्या.

Peon: ते प्रेरणा मॅम, तुम्हाला प्रतिक सरांनी केबिन मध्ये बोलावलं आहे.

प्रेरणा: ओके काका, मी जाते थोड्या वेळात.

प्रेरणाने तिचं हातातलं काम आटपलं आणि प्रतिकच्या केबिनमध्ये गेली.

प्रेरणा: (डोअर knock करत) May I come in Sir..

आतून काहीही आवाज आला नाही. ती डोअर ओपन करुन आत गेली. तिला कुठेही प्रतिक दिसला नाही. परत डेस्कवर जाण्यासाठी ती मागे वळाली तोच प्रतिक समोर येऊन उभा राहिला. प्रेरणा त्याला अचानक समोर पाहून थोडं दचकली.

प्रेरणा: घाबरले ना मी प्रतिक..

प्रतिक: ओह घाबरली म्हणतेय... असं म्हणतात घाबरल्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मिठीत जावं... मग भीती निघून जाते...

प्रेरणा: (लाजून) प्रतिक काहीही काय... मी जाते डेस्कवर म्हणत ती जायला निघाली. प्रतिकने लगेच तिचा हात पकडून तिला मागे खेचलं. अचानक असं ओढण्याने ती त्याला येऊन धडकली.

प्रतिक: मिस प्रेरणा, तुमच्या बॉसने तुम्हाला केबिन मध्ये कामासाठी बोलावलं आहे आणि त्याने तुम्हाला अजून जायला नाही सांगितलं आहे.

प्रेरणा: (मान खाली घालून) सॉरी सर, तुमचं माझ्याकडे काय काम होतं.

प्रतिक: (हसणं कंट्रोल करत खुर्चीत बसला) हां ते तुम्हाला एक मेसेज द्यायचा होता...

प्रेरणा: हां बोला ना सर... प्रतिकने लगेच मुद्दाम तिच्या समोर लॅपटॉप मधली एक excel open करुन दिली.

प्रतिक: हे बघा, मिस प्रेरणा... यात किती चुका आहेत.

प्रतिकचं बोलणं ऐकून ती फाईल मध्ये error शोधू लागली. प्रतिक तिला बघत बघत तिच्या जवळ जाऊन उभा राहिला.

प्रेरणा: सर, यात काहीच error नाही आहेत... मी सगळं चेक केलं.

प्रतिक: नाही आहेत का...? असं कसं होईल म्हणत प्रतिकने त्याचा हात तिच्या माऊसवरच्या हातावर ठेवला.

प्रतिक: इथे बघ, इथे दिसतोय का...? असं म्हणत म्हणत मुद्दाम कर्सर फिरवायला लागला. प्रेरणाला त्याचं काय चाललं आहे ते लक्षात आलं.

प्रेरणा: ( स्वतःचा हात सोडवून) काही error वगैरे नाही आहेत हां प्रतिक फाईल मध्ये.. तुम्ही उगाच काहीतरी सांगत आहात...

प्रतिक: (स्वतःच्या ह्रदयाकडे हात दाखवत) हा error या फाईल मध्ये नाही ग... माझ्या या फाईल मध्ये आहे... जो तू समोर नसली की येत राहतो. आता तू समोर आली आहेस ना मग बघ आता कसा लगेच error निघून गेला.

प्रेरणा: (लाजून) प्रतिक, तुम्ही पण ना...

प्रतिक: मी पण ना... हाय हे लाजणं... 

प्रेरणा: जाऊ दे ना मला... खूप काम आहेत... एकट्या मीनावर पडेल...

प्रतिक: (मूड ऑफ करत) बरं... मी आपलं ते तुला thank you म्हणायला बोलावलं होतं... तू आल्याचा चहा पाठवून दिला होतास म्हणून...

प्रेरणा: (हळूच त्याच्या गालावर किस करुन) no need to say thanks... तुमच्यासाठी काय पण... म्हणत ती केबिन मधून प्रतिककडे पाहून निघून गेली. प्रतिक मात्र गालाला हात लावून अजूनही तिच्या अशा रोमँटिक वागण्याने शॉक होऊन तिच्याकडे पाहत राहिला.

***

 

संध्याकाळी प्रतिक घरी आला तेव्हा राजीवचे, रेखाचे आणि प्रेरणाचे आईबाबा पाहून आश्चर्यचकित झाला.

राजीव: प्रतिक, पटकन फ्रेश होऊन ये...

प्रतिक: हो हो आलोच मी... राजीव ही त्याच्या मागोमाग त्याच्या खोलीत गेला.

राजीव: (प्रतिक फ्रेश होऊन आल्यावर) आज खूप काम होतं का...?

प्रतिक: होतं नेहमीसारखंच... पण आजीने सगळ्यांना घरी का बोलावलंय...?

राजीव: म्हणजे तू विसरलास तर...!!

प्रतिक: काय ते...?

राजीव: आजीने लग्नाची तारीख फिक्स करण्यासाठी सगळ्यांना बोलावलं आहे ते...

प्रतिक: (डोक्याला हात लावून) अरे हो रे पार विसरुनच गेलो मी...

राजीव: हो ते आलं मघाशी लक्षात तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून... म्हणून तर आलो मी तुला आठवण करुन द्यायला... चल आता लवकर बाहेर...

प्रतिक: हो हो चल... म्हणत दोघेही लिविंग रुममध्ये आले.

***

 

बाहेर सगळेजण गप्पा मारत बसले होते. गुरुजी पंचांग घेऊन बघत होते. प्रतिक आणि राजीव आजीच्या बाजूला येऊन बसले.

आजी: गुरुजी, कधी कधी मुहूर्त आहेत सांगा जरा.

गुरुजी: दीड महिन्यानंतर 15 तारखेला गुरुवारी खूप चांगला मुहूर्त आहे... म्हणजे पूर्ण दिवस चांगला आहे.

आजी: (सगळ्यांना) चालेल ना दीड महिन्यानंतरचा मुहूर्त...?

नंदा: आई, धावपळ नाही ना होणार...?

आजी: नंदा, लग्न म्हटलं तर धावपळ ही आलीच... मग ते दीड महिन्याने असो किंवा मग सहा महिन्यांनी असो.

आजीने असं बोलून मुहूर्ताची तारीख शिक्कामोर्तबच केली.

गुरुजी: आजी, मग याच तारखेला दोन्ही लग्न ठरली ना...?

आजी: हो हो गुरुजी.. तुम्ही सुद्धा तुमच्या डायरीत लिहून ठेवा. तुमच्या कडूनच हे मंगलकार्य यथासांग पार पडलं पाहिजे.

गुरुजी: हो आजी, ठीक आहे येतो मी... लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टी मी कळवतो तुम्हाला उद्यापर्यंत.

आजी: बरं... चालेल.

गुरुजी सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले. नंदाने सगळ्यांना स्वीटस देऊन तोंड गोड केलं. रेखाचे, प्रेरणाचे आईबाबा घरी जायला निघाले तसे राजीव, प्रतिक दोघेही त्यांच्या पाया पडले आणि त्यांना घरी सोडायला ही गेले.

***

 

प्रतिक-प्रेरणा, रेखा-राजीव चौघांची संध्याकाळची शॉपिंगची धावपळ आता रोज सुरु झाली होती. कधी ते या मार्केट मध्ये कधी त्या मार्केट मध्ये. रेखा-प्रेरणा दोघी तर मस्तपैकी शॉपिंग करुन बॅगा राजीव-प्रतिककडे सांभाळायला देऊ लागल्या. आजही त्या दोघींचा तोच प्रकार चालू होता.

राजीव: प्रतिक, बघतोय ना... आपल्या शॉपिंगच्या ही बॅगा आपल्यालाच उचलाव्या लागत आहेत आणि यांच्या पण... आणि या दोघी मस्तपैकी इकडून तिकडे फिरत आहेत.

रेखा: हॅलो मि राजीव, मी काय म्हणते सवयच करुन घ्या आता या सगळ्याची... हो ना ग प्रेरणा...

रेखाने मागे वळून पाहिलं तर प्रेरणा प्रतिक एकमेकांनाच पाहत होते. त्या दोघांना पाहून रेखा राजीवकडे पाहून हसू लागली. त्यांच्या हसण्याच्या आवाजाने प्रतिक-प्रेरणा भानावर आले.

राजीव: (प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून) आंधळी कोशिंबीर खेळून झाली असेल तर चलायचं का...?

प्रतिकने त्याला चापट मारली. तशी प्रेरणा हसून रेखाबरोबर चालू लागली. पुन्हा दोघांच्या हातातल्या बॅगांची संख्या नव्याने वाढली.

***

 

आज 2 आठवड्यांच्या सुट्टीनंतर समिधा ऑफिसला आली होती.  मीना, प्रेरणा दोघींनी तिला hug करुन स्वागत केलं.

मीना: काहीही बोल हां समिधा, पण लग्नानंतरचा ऑफीसमधला पहिला दिवस... काहीतरी खासच असतो. ते असं हातात हिरवा चुडा, कपाळावर बिंदी, गळ्यात मंगळसूत्र, हातावरची मेहंदी आणि चेहऱ्यावर आलेलं वेगळंच तेज... अहाहा अतिसुंदर... आज नक्कीच सकाळी सकाळी तुला असं तयार झालेलं पाहून जिजूंची विकेट गेली असेल.

समिधा: (लाजून) गप्प ग... मला वाटलंच होतं तू मला असं काही तरी म्हणशील असं...

मीना: प्रेरणा, तूच सांग आता..मी काय करु... या मॅडमची तारीफ करावी तरी यांना प्रोब्लेम... 

समिधा तिच्या या बोलण्यावर खळखळून हसली.

मीना: आता हसायला काय झालं तुला...

समिधा: मी हसतेय या करता कारण तू म्हणतेय तसं खरंच आज तुमचे जिजू माझ्याकडे पाहतच राहिले.

प्रेरणा: वाह वाह... ते तुला पाहते रे च्या जागी तुला पाहतो ग म्हणायला हरकत नाही तर...

प्रेरणा, मीना दोघी एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागल्या.

समिधा: प्रेरणा, तुझ्या पण लग्नाची तारीख येतेच आहे की जवळ... मग बघ, मी पण मीना बरोबर अशीच तुझी मस्करी करणार.

मीना: हो हो चालतंय की... तेव्हा तर आपण फक्त प्रेरणाची नाही तर प्रतिक सरांची पण मस्करी करायची.

समिधा: (मीनाच्या हातावर हात ठेवत) ठरलं तर मग तसंच करायचं...

***

 

प्रेरणा, रेखा दोघी अधून मधून सोनाशी video call करुन बोलत होत्या. सोनाची धावपळ होता कामा नये म्हणून त्यांनी आधीच तिच्या साठी शॉपिंग करुन ठेवली.

जसजसे दिवस सरत होते तसतसे रेखा, प्रेरणा दोघी घरातल्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला शोधत होत्या. दोघींच्या फॅमिलीचं दोघींबरोबर इमोशनल होणं वाढलं होतं. एरवी रिमोट साठी भांडणारे दोघींचे भाऊ आता स्वतः हून रिमोट रेखा, प्रेरणाच्या हातात देऊ लागले आणि त्या दोघींना इमोशनल झालेलं पाहून त्यांना पुन्हा हसवायला त्यांची चेष्टा करु लागले.

***

 

चौघांच्या घरातल्या खूप दूर राहणाऱ्या नातेवाईकांना आजीच्या सांगण्याप्रमाणे मोबाईल वरुनच पत्रिका पाठवण्यात आली. जवळ राहणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना लग्नाचं निमंत्रण देऊन झालं. आता उत्सुकता होती फक्त चौघांच्या लग्नाची...

 

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...