Mar 01, 2024
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-६९

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-६९

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६९


प्रेरणाने दिलेलं लॉकेट नेमकं त्यावेळी उचलण्यासाठी मी वाकलो नसतो तर त्या गन शॉट पासून मला कोणीच वाचवू शकलं नसतं...प्रतिक स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात PI नायर त्याच्या रुममध्ये आले.

प्रतिक: सर, तुम्ही... या ना बसा...

प्रतिकच्या बोलण्या प्रमाणे PI नायर त्याच्या शेजारी बसले.

प्रतिक: Thank you Sir, तुमची माणसे होती म्हणून त्या माणसाला पकडता आलं.

PI नायर: Thank you बोलू नका राजाध्यक्ष... हे आमचं कामच आहे...

प्रतिक: सर, तो माणूस काही बोलला का...? त्याला हे कोणी करायला सांगितलं ते...?

PI नायर: नाही, अजून काही त्याने तोंड उघडलं नाही आहे पण आम्ही यामागे नक्की कोणाचा हात आहे हे शोधून काढूच. तुमची हरकत नसेल तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे.

प्रतिक: कोणता प्लॅन...?

PI नायर: तुम्ही 2-3 दिवस ऑफिस मध्ये जाऊ नका...

प्रतिक: पण त्याने काय होईल...?

PI नायर: त्याने आरोपीचा असा समज होईल की खरंच तुम्हाला काही तरी झालं आहे... आणि तो गाफील राहील. जेणेकरून आपल्याला त्याला पकडणं सोपं होईल. तुम्ही हे 2-3 दिवस माझा सोडून कोणाचे ही कॉल उचलू नका...

प्रतिक: ठीक आहे सर... तसंच करु..

***

 

प्रेरणाने रात्री प्रतिकला कॉल केला पण तिच्या पासून खरं तो लपवू शकला नसता आणि PI नायर यांनी ही कोणाचे कॉल उचलू नका म्हणून सांगितल्याने त्याने तिचा कॉल उचलला नाही. दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसच्या वेळेत बेंगलोरच्या ऑफिसमध्ये कॉल करुन प्रतिक बद्दल विचारलं पण तिथून तिला तो आज ऑफिस मध्ये न आल्याचं कळलं. प्रतिकची काही खबरबात न कळत असल्याने तिला टेन्शन आलं होतं. त्यात भरीस भर म्हणून नचिकेत बरोबर अकाउंट डिटेल चेक करताना तिला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली... आता तिला खात्री झाली, प्रतिकला खरंच धोका आहे. त्याच्या विचारानेच तिने पुन्हा एकदा त्याला कॉल केला पण प्रतिकने कॉल उचलला नाही. प्रतिक ही प्रेरणाला कसं सांगू या विवंचनेत होता.

***

 

PSI रणदिवे आणि नाईक दोघांनी शेवटी त्या माणसाला बोलायला भाग पाडलंच. त्यांनी तात्काळ PI नायर यांना तिथे बोलावून घेतलं.

PI नायर: वाह, तुम्ही दोघांनी शेवटी त्याला बोलतं केलंच.... I am proud of both of you ... आता प्रतिक राजाध्यक्ष यांना याबद्दल सांगायला हवं.

PSI नाईक: सर, मला या प्रकरणामागे फक्त पैशाचाच घोटाळा वाटत नाही आहे...

PI नायर: म्हणजे...

PSI नाईक: म्हणजे सर यामागे प्रतिक राजाध्यक्ष यांच्याशी असलेले मतभेद ही कारण असू शकतं...

PI नायर: (काहीतरी विचार करत) हं शक्यता नाकारता येत नाही... मी एक काम करतो... मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन या विषयावर बोलतो... त्यांच्याकडून काही माहिती कळते का कळेल...

PSI नाईक, रणदिवे: Yes Sir

PI नायर प्रतिकच्या रूमवर आले. त्यांनी या सर्वामागे कोण असल्याचं सांगितलं.

PI नायर: मि राजाध्यक्ष, तुमचं या माणसाशी काही वैर होतं का... किंवा दुसरं काही कारण...?

प्रतिक: नाही सर... मला आठवत त्याप्रमाणे नक्कीच काही नाही... उलट मि वेणुगोपाल मला सिनिअर होते... मी जेव्हा या कंपनी मध्ये एक वर्षासाठी management trainee म्हणून बेंगलोरच्या ऑफिसमध्ये जॉईन झालो होतो. ते असं कसं करू शकतात...? माझा अजूनही यावर विश्वास बसत नाही आहे.

PI नायर: हं, तुम्ही सांगतात त्याप्रमाणे असेल तर.... ही केस अजून ही solve झाली नाही आहे म्हणावं लागेल... पण आपल्याला या गोष्टीवर अविश्वास दाखवून ही नाही चालणार... anyways मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे...

प्रतिक: हो विचारा...

PI नायर: तुम्ही आता काही दिवस झाले ऑफिसमध्ये यामागे कोण आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहात आणि तुमचा काही जणांवर संशय ही होतात असं तुम्ही म्हणालेलात तर मग त्यांच्या against तुम्हाला काही पुरावा मिळाला आहे का...?

प्रतिक: नाही सर... मला ज्यांच्याबद्दल संशय होता त्यांच्याबद्दल अजून काही पुरावा मिळालेला नाही. पण फाईल्स मधला घोटाळा पाहून संशय घेणं कठीण आहे. पण आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मधल्या श्रीधरला मी त्या दिवशी कोणत्या तरी माणसाबरोबर अंधारात बोलताना पाहिलं होतं..

PI नायर: तुम्ही ही गोष्ट खात्रीने सांगू शकतात का, की श्रीधरचा पण यामागे हात असावा...

प्रतिक: श्रीधरचा यात हात नाही आहे... त्याच्याकडून तर एका प्याद्यासारखं काम करून घेतलं आहे... फक्त मला आता हे जाणून घ्यायचं आहे त्याने असं का केलं...?

PI नायर: मला वाटत मि प्रतिक, तुम्ही मि वेणुगोपाल यांच्यापासून पण सावध राहायला हवं...

प्रतिक: ओके सर... पण तुमची हरकत नसेल तर मला मंडेला ऑफिसमध्ये जाता येईल का...? म्हणजे माझा विचार आहे की श्रीधरशी मी प्रत्यक्ष बोललो तर कदाचित तो मला सांगेल...

PI नायर: ठीक आहे पण PSI रणदिवे, PSI नाईक दोघेही तुमच्याबरोबर येतील... कारण आता आम्ही कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही...

प्रतिक: ओके सर... माझी यासाठी काही हरकत नाही... पण ते युनिफॉर्म मध्ये नसतील ना...?

PI नायर: नो नो मि राजाध्यक्ष डोन्ट वरी....ते युनिफॉर्म मध्ये नसतील... पण तुमच्या protection साठी त्यांच्याकडे गन असतील.

प्रतिक: Ok Sir ... thank you so much ....

PI नायर: (हसत) anyways काही लागलं तर कळवा.... आणि ही केस एकदा solve झाली की तुम्ही तुमच्या फॅमिलीला कॉल करू शकतात...

प्रतिक: ओके सर...

PI नायर प्रतिकचा निरोप घेऊन निघाले. पण प्रतिकच्या डोक्यात श्रीधर आणि मि वेणुगोपाल यांच्याबद्दलच चक्रं फिरू लागली.

****

 

प्रेरणाला अकाउंट डिटेल्स मध्ये senior ऑथॉरिटी column मध्ये वेणुगोपाल यांचं नाव पाहिल्यापासून टेन्शन आलं होतं...ती मनात विचार करू लागली, काय करू सुरेश सरांच्या कानावर घालू का....? पण he is senior in position..... ते असं कसं करू शकतात... आणि केलं असेल तर त्यामागे नक्की काय कारण असेल... मी सुरेश सरांना सांगितलं तर ते विश्वास ठेवतील का माझ्यावर....? ते प्रतिकला काही करणार तर नाहीत ना... बाप्पा प्रतिकना काही होऊ देऊ नकोस...ती डोळे मिटून प्रार्थना करू लागली.

मीना: (तिला असं प्रार्थना करताना पाहून) काय झालं प्रेरणा .... मघासपासून बघते आहे मी... नचिकेतच्या डेस्ककडून आल्यापासून तू टेन्शन मध्ये दिसते आहेस.

प्रेरणा: अं आपण नंतर बोलूया का...?

मीना: अग वाजले बघ किती.. लंच नाही का करायचा...?

प्रेरणा: (घड्याळाकडे पाहून) अडीच वाजले.... माझ्या लक्षातच नाही आलं....

मीना: तू चल जेवायला.... तुला गरज आहे २ घास खायची....असं म्हणत ती प्रेरणाला जबरदस्तीने कॅन्टीनमध्ये घेऊन गेली.

 

(कॅन्टीन मध्ये)

मीना: हं आता बोल.... कसलं टेन्शन आलं आहे तुला..?

प्रेरणाने तिला सगळा प्रकार सांगितला.

प्रेरणा: सांगू का मी सुरेश सरांना...? 

मीना: अग तू विसरलीस का...? ते आज संध्याकाळी येणार आहेत इंदोर वरून ते...

प्रेरणा: (डोक्याला हात लावून) हं आता आठवलं... आता काय करु...

तेवढ्यात प्रेरणाला समिधाचा कॉल आला.

प्रेरणा: हां बोल समिधा...

समिधा: उद्या काय आहे माहीत आहे ना...

प्रेरणा: (आठवून काहीशी हसत) हा माहीत आहे...

समिधा: मग तू आणि मीना दोघींनी सकाळीच यायचं आहे.

प्रेरणा: हं...

समिधा: हं नाही हो म्हण... जोरात... आणि आपल्या मीना मॅडम कुठे आहेत... तिला कॉल करतेय ती उचलत नाही आहे...

प्रेरणा: ही काय इथेच आहे... थांब देते तिच्याकडे... म्हणत प्रेरणाने मीनाला लगेच कॉल दिला. मीनाने इकडच्या तिकडच्या गप्पा मारत समिधाला लग्नाला यायचं कबूल केलं आणि कॉल ठेवला.

प्रेरणा: वेणूगोपाल सरांबद्दल कळल्यापासून माझी खरंच इच्छा नाही आहे ग... लग्नाला यायची..

मीना: हं, I can understand... पण समिधाला आपण ही गोष्ट नाही ना सांगणं योग्य आहे... तू ये हवं तर थोडा वेळ आणि लगेच निघ... काहीतरी कारण देऊन...

प्रेरणा: हं

मीना: चल आता आपला लंचब्रेक संपला.. पटापट काम आटपून आपल्याला निघायचं आहे उद्याची तयारी करायला... असं म्हणत मीना तिच्या बरोबर डेस्कवर काम करायला निघून गेली.

***

 

आई: अग प्रेरणा, उठ लवकर आज जायचं आहे ना समिधाच्या लग्नाला...

प्रेरणा: (डोळे उघडत) आई, प्लिज तू आणि बाबा जाल का...?

आई: अग पण तू का जायला तयार नाही आहेस...?

प्रेरणा: (दीर्घ श्वास घेत काय सांगू आईला... काही सांगितलं तरी परत ती काळजी करत बसणार... मग मनाशीच ठरवत) काही नाही ग थोडं डोकं दुखतंय...

आई: थांब मी तुला मसाज करुन देते लगेच बरं वाटेल... मग अंघोळ करुन जा...

प्रेरणा: नको इतकं नाही दुखत आहे... जाते मी लग्नाला... म्हणत ती उठली आणि बाथरुम मध्ये निघून गेली.

आई: (मनाशीच) आता म्हणाली, डोकं दुखतंय... आणि नंतर म्हणते इतकं नाही दुखत आहे... काही समजत नाही हिचं मला...

***

 

प्रेरणा मीना बरोबर लग्नाला आली खरी पण तिच्या डोक्यात सतत प्रतिकचाच विचार चालू होता. मंगलाष्टके झाली, वर-वधूने एकमेकांना माला घातल्या तसं स्टेजवर इतका वेळ समिधा बरोबर थांबलेल्या प्रेरणा-मीना स्टेजवरुन खाली आल्या. स्टेजवरुन उतरल्यावर प्रेरणाचं लक्ष राजीवकडे गेलं. राजीवना नक्की माहीत असणार प्रतिकबद्दल... मनात विचार करत प्रेरणा राजीवपाशी गेली.

प्रेरणा: हॅलो राजीव सर...

राजीव: हॅलो... कशी आहेस...

प्रेरणा: अं, मी ठीक आहे... पण मला तुम्हाला काही विचारायचं होतं...

राजीव: हो विचार ना....!

प्रेरणा: प्रतिकशी तुमचं काही बोलणं झालं का... या 2-3 दिवसांत...

राजीव: नाही... पण प्रतिकशी लास्ट बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला की, तो बुधवार पर्यंत येईल म्हणून... तू नको काळजी करुस... प्रतिक सुखरूप आहे...

प्रेरणा: राजीव सर, प्रतिक जोपर्यंत सुखरुप आहेत हे मी माझ्या डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत मी निश्चिंत नाही होऊ शकत...

तुम्ही माझं एक काम करु शकता का...?

राजीव: हां बोल ना...!!

प्रेरणा: माझं बेंगलोरला जायचं तिकीट काढून देऊ शकता का...?

राजीवला तिच्या वाक्यावर काय बोलावं हे कळेना.

प्रेरणा: द्याल का प्लीज... मला प्रतिकची काळजी वाटते आहे... जेव्हापासून...

राजीव: जेव्हापासून काय...?

राजीवच्या विचारण्यावर प्रेरणाने राजीवला तिला पडलेल्या स्वप्ना बद्दल आणि अकाउंट डिटेल्स मध्ये वेणूगोपाल यांच्या कळलेल्या माहिती बद्दल सांगितलं.

प्रेरणा: मी प्रतिकना काही दिवस झाले कॉल करतेय पण ना ते कॉल उचलत आहेत आणि नाही कॉल करत आहेत.... म्हणून मी बेंगलोरला जायचं ठरवलं आहे.

राजीव: (काही विचार करत) ठीक आहे मी काढतो प्लेनचं तिकीट... पण तू एकटी नाही जाणार आहेस, मी पण तुझ्या बरोबर येईन.

प्रेरणा: हं ठीक आहे. 

राजीव: पण घरुन तुला जाऊ देतील.

प्रेरणा: खरं कारण सांगितलं तर ते पण टेन्शन मध्ये येतील. 

राजीव: हो म्हणूनच विचारतोय... तू घरी काय सांगायचं ठरवलं आहे.

प्रेरणा: ऑफिसच्या कामामुळे बेंगलोरला जावं लागतं आहे असं सांगेन... पण तुम्ही प्रतिकच्या घरी याबद्दल काही कळू देऊ नका.

राजीव: हो ठीक आहे पण तू सुरेश सरांना सांगितलं का...?

प्रेरणा: नाही अजून... आज ते इंदोरवरुन येणार आहेत मग मी रात्री त्यांना तसं कॉल करुन कळवेन.

राजीव: हं ठीक आहे.. मी तुला उद्याच्या flights च्या details मेसेज करतो.

प्रेरणा: हो चालेल.

त्यांचं बोलणं चालू असताना मीना त्यांच्याजवळ आली आणि पुन्हा स्टेजवर फोटो काढायला घेऊन गेली.

***

 

प्रेरणाने सुरेश सरांना जाण्यामागचं खरं कारण सांगितलं. त्यांनी ही ते पण त्यांच्या सोबत येणार असल्याचं सांगितलं. मग तिने घरी आईबाबांना ऑफिसच्या कामा निमित्त बेंगलोरला जावं लागणार असल्याचं सांगितलं. रात्री उशिरा राजीवने तिला flight च्या details सेंड केल्या. त्याचाही कॉल प्रतिकने नाही उचलल्यावर राजीवला सुद्धा आता प्रतिकची काळजी वाटू लागली.

***

 

दुसऱ्या दिवशी राजीव, प्रेरणा आणि सुरेश सामंत सर तिघेही बेंगलोरच्या ऑफिसच्या बिल्डिंगपाशी पोहचले. तिकडच्या गेटकडेच एक 8-9 वर्षाची मुलगी फुलांचा बुके घेऊन विकत होती. प्रेरणाला पाहून ती तिच्यापाशी बुके घेण्यासाठी तगादा लावू लागली... "दीदी ले लो ना आप... दीदी... ले लो ना...!!" त्या मुलीला पाहून प्रेरणाला तिची दया आली. राजीव आणि सरांना पुढे जायला सांगून ती प्रतिकसाठी बुके घ्यायला थांबली.

 

प्रतिक ठरल्याप्रमाणे ऑफिसमध्ये पोहचला.  वेणूगोपाल त्यावेळी ऑफिस मध्ये नव्हते. PSI नाईक, रणदिवे कोणाला कळणार नाही अशा ठिकाणी केबिनमध्ये लपून बसले. प्रतिकने सुब्रमण्यम यांना सांगून श्रीधरला त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतलं. प्रतिकला जिवंत पाहून श्रीधरला आनंद झाला... कारण प्रतिकची वेणूगोपालने दिलेली सुपारी त्याला पटलेली नव्हती. आपल्याला इथे बोलावलं म्हणजे प्रतिकला आपल्याबद्दल कळलं तर नसेल या गोष्टीची दुसऱ्याच क्षणी त्याला जाणीव झाली. श्रीधरला प्रतिकने बसायला सांगितलं. त्याची प्रतिककडे पाहायची हिंमत होईना.

प्रतिक: श्रीधर, तुझी मुलगी कशी आहे आता...?

श्रीधर: (चमकून वर पाहिलं) आता थोडी ठीक आहे... आजच तिला घरी आणलं.

प्रतिक: (त्याच्याकडे डॉक्टरचं prescription देताना) हे घे तुझ्या खिशातून पडलेलं...

श्रीधर: (हिंमत करुन कसंबसं म्हणाला) सर, हे तुम्हाला कुठे भेटलं... म्हणजे हे मी 2-3 दिवस शोधत होतो.

प्रतिक: हे मला त्याच ठिकाणी भेटलं जिथे तू माझ्याबद्दल त्या माणसाशी बोलत होता.

प्रतिकचं बोलणं ऐकून श्रीधरने लगेच प्रतिकचे पाय धरले.

श्रीधर: सर मला माफ करा... मला नव्हतं असं वागायचं पण मला माझ्या मुलीच्या treatment साठी पैसे हवे होते... म्हणून मी सरांना ट्रान्सपोर्टच्या माला मध्ये अफरातफर करायला मदत केली. तेव्हाच सरांनी माझ्या मुलीच्या hospital चा खर्च दिला.

प्रतिक: अरे पण तो तर कंपनीने आधीच दिला होता. तुला आपल्या कंपनीच्या policy माहीत नाहीत का...?

श्रीधर: काय म्हणजे... म्हणजे हा सगळा खर्च आपल्या कंपनीने उचलला होता.

प्रतिक: हो श्रीधर... 

श्रीधर प्रतिकचं बोलणं ऐकून पुन्हा प्रतिकच्या पाया पडू लागला... सर खरंच माझ्या कडून खूप मोठा गुन्हा झाला... सरांच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवत त्यांना साथ देत गेलो... तुम्हाला काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करु शकलो नसतो... सर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे... हवं तर तुम्ही मला पोलिसात द्या. मी सगळं कबूल करेन त्यांच्यासमोर... कसं सरांनी माझ्याकडून या गोष्टी करवून घेतल्या... माझ्याकडे त्यांच्या विरोधात फाईलही आहेत... ज्या तुम्ही त्या दिवशी माझ्याकडे मागत होतात.

प्रतिक: श्रीधर, तू कोणत्या सरांबद्दल बोलतोय...

श्रीधर पुढे काही बोलणार तेवढ्यात वेणूगोपाल प्रतिकच्या केबिनमध्ये आला.

वेणूगोपाल: श्रीधर, लाज नाही वाटत असं करताना... जिस थाली में खाता है उसी में छेद करता है...

श्रीधर: (वेणूगोपालकडे पाहत) मी छेद केला सर... तुम्हाला ही माहीत आहे यामागे कोणाचा हात आहे..

वेणूगोपाल: मुह संभाल के बात कर... तुम दो कोडी के इंसान... तुम्हारी औकात में रहके बात कर... बोलता बोलता त्याने श्रीधरची कॉलर पकडली. सुब्रमण्यम आणि शेट्टी दोघांनी मध्ये पडून श्रीधरला वेणूगोपाल पासून लांब केलं. श्रीधरने स्वतःला सावरलं.

प्रतिक: श्रीधर, सांगशील मला, तुला कोणी हे करायला भाग पाडलं...

श्रीधर: (वेणूगोपाल कडे बोट दाखवून) या सरांनी मला असं करायला भाग पाडलं...

वेणूगोपाल: प्रतिक, तू किसके उपर भरोसा कर रहा है...? ऐसे इंसान पे जिसने ट्रान्सपोर्ट के माल में अफरातफर की है...

वेणूगोपालला वाटलं प्रतिक त्याच्यावर भरोसा ठेवेल पण घडलं भलतंच...

प्रतिक: क्यू किया आपने ऐसे सर... मुझे आपसे ये उम्मीद नहीं थी...

वेणूगोपाल: (जोरजोरात हसू लागला) अब तुम्हे पता चल ही गया है तो सुन... हां मैने ही इस श्रीधर को ट्रान्सपोर्ट के माल में अफरातफर करने बोला था... और मैने ही मेरा आदमी काम पे लगा के अकाउंट में चेंजेस करवा के लिए थे...

प्रतिक: क्या... पर आपने ऐसे क्यू किया...?

वेणूगोपाल: क्यू किया...? तुम ही हो इस सब के लिए जिम्मेदार... प्रतिक राजाध्यक्ष... ex management trainee...

प्रतिक: पण सर, तुम्ही असं का केलं...

वेणूगोपाल: क्या पुछा तुमने... मैने ऐसे क्यू किया... ताकी तुमसे बदला ले सकू... मुझे पैसों की जरूरत कभी नहीं थी... लेकीन तुम्हे मुझे जिंदा नहीं रखना था... और जब तक तुम यहा आते नहीं तब तक मै अपना बदला कैसे पुरा कर पाता...? इसलिये तो मैने सब किया... ताकी इसके पिछे कौन है ये ढुंढने के लिए... तुम यहा बेंगलोर में आते और मै तुम्हारा काम तमाम कर पाता...

प्रतिक: बदला... किस बात का बदला...?

वेणूगोपाल: लगता है तुम इस बात को भूल चुके हो... लेकिन मेरे कान में अभी भी तुम्हारे थप्पड की आवाज गुंजती है... याद कर वो दिन मि प्रतिक राजाध्यक्ष... तुम्हारा promotion होकर तुम्हे मुंबई के ऑफिस में posting मिला था... और सिर्फ 2 महिनों में तुमने कंपनी का profit करवा के दिया था. उस रात सुरेश सामंत तुम्हारे बॉसने पार्टी रखी थी... मै भी इस पार्टी का हिस्सा था... पार्टी के रंग में रंगा हुआ... वो तुम्हारी मुंबई के ऑफिस की रिसेप्शनिस्ट.... वाह क्या कमाल की चीझ थी... मैने उसका सिर्फ डान्स के लिए जबरदस्ती हात क्या पकडा... वो चिल्लाने लगी... उस वक्त मैने उसे जरुर छोड दिया लेकिन पार्किंग प्लेस में उसे छोडने वाला नहीं था... इस वेणूगोपाल को उसने डान्स के लिए मना किया था... उसको उसकी गलती का एहसास मै करने ही वाला था.... तभी तुमने उस लडकी के लिए मेरे उपर... तुम्हारे सिनियर वेणूगोपाल के उपर तमाचा मारा.... तबसे आजतक मै इस बदले की आग में जल रहा हूं...और तुम्हारी जो मुंबई के ऑफिस में हर साल वाहवा हो रही है उसके वजह से मेरी इस बदले की आग और बढ रही है... त्यांचं बोलणं चालू असतानाच PSI नाईक आणि रणदिवे त्याच्या समोर येऊन उभे राहिले.

नाईक:  (हतकडी पुढे करत) Mr Venugopal... you are under arrest...

इतकावेळ त्यांचं बोलणं दरवाजातून हळूच ऐकत असलेले राजीव आणि सुरेश सर आले.

सुरेश सर: मि वेणूगोपाल मुझे आपसे ये उम्मीद नहीं थी... आप जैसा इंसान इतनी गंदी हरकत कर सकता है... शरम आती है मुझे आपको कंपनी का एम्प्लॉय कहने के लिए...

सुरेश सरांचं बोलणं चालू असतानाच नाईक आणि रणदिवे यांचं वेणूगोपालकडून थोडं दुर्लक्ष झालं. याच संधीचा फायदा उचलत वेणूगोपालने नाईक यांच्या खिशातून पिस्तुल बाहेर काढलं आणि प्रतिक समोर रोखलं.

वेणूगोपाल: प्रतिक, तुम्हे क्या लगा... ये पुलिसवालों को बुलाकर तुम बच पाओगे.... अगर मुझे जेल जाना ही है तो मै मेरा बदला पुरा कर के ही जाउंगा...

सुरेश: पागलपन मत कर वेणूगोपाल... प्रतिक को लग जाएगी गोली... अपने आपको पुलीस के हवाले कर... शायद तुम्हारी सजा कम हो जाए...

वेणूगोपाल: (सुरेश सरांकडे पिस्तुल रोखत) एकदम चुप्प... नहीं तो प्रतिक के पहले, कही मै आपके उपर ना पिस्तुल चला बैठू...

(मग प्रतिककडे पिस्तुल रोखत) तो मि प्रतिक, आपकी कोई आखरी ख्वाईश...

प्रेरणा हातात बुके घेऊन प्रतिकच्या केबिनमध्ये आली. वेणूगोपाल याने प्रतिक समोर पिस्तुल रोखलेलं पाहून ती जोरात किंचाळली... प्रतिक... तिच्या आवाजाने तिच्याकडे वेणूगोपालचं लक्ष गेलं... तोपर्यंत राजीवने जोरात पायाने त्याच्या हातातली पिस्तुल पाडली. लगेच नाईक आणि रणदिवे यांनी त्याला पकडलं...

वेणूगोपाल: प्रतिक, अभी मै जा रहा हूं... लेकिन ऐसा मत समझना मै हार गया हूं... तुमसे बदला मै जरूर लेकर रहुंगा... बोलता बोलता तो मानसिक संतुलन बिघडून जोरजोरात हसू लागला... मै जरूर आउंगा... मै जरुर आउंगा... नाईक आणि रणदिवे त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यांच्या बरोबर श्रीधरही गेला. आणि फॉर्मलिटी पूर्ण करायला सुरेश सर ही गेले.

सुब्रमण्यम आणि शेट्टी राजीव, प्रेरणा यांना प्रतिकशी बोलता यावं म्हणून केबिन मधून बाहेर गेले. प्रतिकला सुखरूप पाहून प्रेरणा रडत रडत त्याच्या मिठीत गेली... राजीवने मुद्दाम खाकरत त्या दोघांना त्याच्या असण्याची जाणीव करून दिली.

प्रतिक: ये तू पण ये...

त्याचं बोलणं ऐकून राजीव धावत त्यांच्यापाशी आला आणि तिघांनी मिळून hug केलं.

 

क्रमशः

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ujwala Desai

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...

//