अस्तित्व एक संघर्ष-भाग-६८

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६८


प्रेरणा: (ऑफिसला जायची तयारी करता करता) आई, प्लीज जरा माझा टिफिन भर ना.
आई: अग आज लवकर जायचं होतं तर सांगायचं तरी होतं मला रात्री...
प्रेरणा: आई, अग आजपासून समिधा सुट्टीवर आहे हे माझ्या डोक्यातून पार निघून गेलं...
आई: सुट्टीवर...?
प्रेरणा: अग हो, ते तिचं... पुढे ती काही बोलायच्या आधीच आई घाई घाईत किचनमध्ये जाऊन टिफिन भरुन घेऊन आली.
आई: (टिफिन प्रेरणाकडे देत) हा घे तुझा टिफिन... तर काय म्हणत होतीस तू समिधा बद्दल?
प्रेरणा: अग आई तिचं लग्न आहे ना या संडेला... 
आई: (डोक्यावर हात चोळत) अग हो, मी अगदी विसरुनच गेले. तू जाणार आहेस ना...?
प्रेरणा: म्हणजे काय...!! जावंच लागेल, नाहीतर समिधा तलवार घेऊन शिरच्छेद करायला घरी येईल सरळ...तिचं बोलणं ऐकून दोघी हसू लागल्या.
आई: (हसण थांबवत) काल आजींनी कशाला बोलवलं होतं, हे तू सांगितलंच नाही आम्हाला... लग्नाची तारीख कधीची वगैरे सांगितलं का तुला...?
प्रेरणा: (केसांवरून फणी फिरवत) नाही ग आई, साखरपुड्यानंतर त्यांचं माझं आणि रेखाशी काही बोलणंच झालं नाही म्हणून त्यांनी आम्हाला बोलावलं होतं.
आई: बरं.... 
प्रेरणा: आई, अजून काही विचारु नकोस... चल मी निघते आता ऑफिसला... असं म्हणत ती आईला बाय करुन घरातून निघाली.
***

ऑफिस मध्ये आल्यापासून मीना आणि प्रेरणा दोघीही कामाला लागल्या होत्या. समिधा सुट्टीवर गेल्यामुळे दोघींवरचं काम वाढलं होतं. नाही म्हणायला आशिष आणि विवेक दुपारी मदतीला असणार होते पण तोपर्यंत तरी कामाची धुरा त्या दोघींवरचं होती.
मीना: यार कधी एकदा दुपार होतेय आणि आशिष, विवेक येत आहेत असं झालंय...
प्रेरणा: हो ना, ते account check करायचं काम पण राहूनच गेलं आहे... बहुतेक समिधा जॉईन झाल्यावरच होतंय वाटतं काम आता ते....
मीना: असं करुन नाही चालणार... आपल्या कामातून वेळ काढून आपल्याला हे काम करावंच लागेल.
प्रेरणा: हं you are right... कदाचित तिथून काहीतरी clue लागेल.
दोघींचं बोलता बोलता काम चालू होतं.
***

सतत २ दिवस जास्त तास काम करत असल्यामुळे, अवेळी जेवण यामुळे प्रतिकला आज खूप थकवा जाणवत होता. तरी तो आराम करत न बसता ऑफिस मध्ये आला होता.
शेट्टी: सर, तुम्ही आज थकलेले वाटतात की ओ...
प्रतिक: हां, थोडं अस्वस्थ वाटतं आहे.
शेट्टी: सर, मी काय म्हणून राहिलो, तुम्ही आज आराम करा... मी आणि सुब्रमण्यम बघून राहिलो की ओ...
प्रतिक: नाही शेट्टी, हा प्रोब्लेम खूप मोठा आहे. आपल्याला लवकरात लवकर सोडवायला हवा.
शेट्टी: पण तुमची तब्येत सर...
त्यांचं बोलणं चालू असताना कोणी तरी त्यांच्या नकळत त्यांच्यावर लक्ष ठेवून होतं.
संध्याकाळपर्यंत प्रतिकने पुन्हा काही फाईल्स चेक केल्या. पण अजूनही हाताला हवा तसा पुरावा मिळत नव्हता. त्याचा थकलेला चेहरा बघून शेवटी शेट्टी आणि सुब्रमण्यम यांनी त्याला जबरदस्तीने रुमवर पाठवलंचं.
***

प्रेरणा: हॅलो, प्रतिक कसे आहात...? तुमचा आवाज असा का वाटतोय...?
प्रतिक: प्रेरणा, खूप थकलोय मी... आजपण माझ्या हाती हवं तसा पुरावा मिळाला नाही आहे.
प्रेरणा: मला वाटतं तुम्ही तुमचा शोध दुसऱ्या दिशेने करायला सुरुवात करायला हवी...
प्रतिक: दुसऱ्या दिशेने म्हणजे...?
प्रेरणा: म्हणजे ऑफिसच्या गोदाऊनमध्ये जो माल ट्रान्सपोर्ट होतो तिकडच्या फाईल्स तुम्ही चेक केल्या का...? किंवा मग आपलं दुसरं डिपार्टमेंट आहे जिथे नवीन मालाची एन्ट्री होते तुम्ही तिकडे काही मिळतंय का बघितलं का...?
प्रतिक: पण मला ज्या घोटाळा वाल्या फाईल मिळाल्या आहेत त्यात या मालाशी काही संबंध नाही... 
प्रेरणा: हं मान्य आहे मला... पण असं ही असू शकत ना... की घोटाळा फक्त एकाच ठिकाणी नाही तर अजून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये पण असू शकतो.
प्रतिक: हं तू बोलतेय ते मला पटतंय... ठीक आहे मी उद्याच गोदाऊन मध्ये जाऊन राउंड मारुन येतो. (मग मोबाईलकडे बघून) ऐक ना प्रेरणा, मला राजीवचा कॉल येतोय... मी करतो तुला नंतर कॉल...
प्रेरणा: प्रतिक, तुम्ही मला नंतर कॉल नका करु... आराम करा जेवून... सध्या तुम्हाला आरामाची गरज आहे. आपण उद्या बोलू. काळजी घ्या.
प्रतिक: हं, तू पण काळजी घे... चल बाय... म्हणत दोघांनी कॉल ठेवला.
प्रतिकने लगेच राजीवला कॉल केला.
प्रतिक: हां बोल राजीव... प्रेरणाशी बोलत होतो त्यामुळे कॉल उचलू नाही शकलो.
राजीव: its ok यार... anyways progess कुठपर्यंत आली.
प्रतिक: तेच तर काही होत नाही आहे... काल तर मला माझा कोणी तरी पाठलाग करत असल्यासारखं पण वाटत होतं.
राजीव: what, हे तू आता सांगतोय मला...
प्रतिक: अरे काल तुम्ही एवढा छान टाईम आजीबरोबर स्पेन्ड करत होता त्यात हे सांगितलं असतं तर तुम्ही तर टेन्शन घेतलंचं असतं पण आजीच्या पण हे लक्षात आलं असतं... आणि तुला तर माहीत आहे तिची हल्लीच कुठे तरी तब्येत ठीक झाली आहे.
राजीव: एक मिनिट, मी तर तुला सांगितलं नव्हतं आम्ही तुमच्या घरी जातोय ते... ओह माय माय... प्रेरणाने सांगितलं वाटतं.
प्रतिक: (हसत म्हणाला) अर्थात... कॉल नव्हता केला पण मेसेज केला होता... तुम्ही सुद्धा असायला हवं होतं म्हणून...
राजीव: ओह हो... lovebirds... 
प्रतिक: हां आम्ही lovebirds आणि तुम्ही दोघे angry birds...
प्रतिकच्या बोलण्यावर राजीवला राग न येता हसायला येऊ लागलं.
राजीव: हे तर 100% खरं आहे... anyways तू PI नायर यांच्या कानावर एकदा कालचा मॅटर सांगून ठेव... 
प्रतिक: हं you are right... लगेच करतो कॉल आणि सांगून ठेवतो. राजीवने प्रतिकला काळजी घ्यायला सांगून कॉल ठेवला.
प्रतिकने पण लगेच PI नायर यांना कॉल करुन घडलेला प्रकार सांगितला. PI नायर यांनी त्यांच्या माणसांचं प्रतिककडे लक्ष असल्यामुळे घाबरुन जाऊ नका याची खात्री देऊन निश्चिंत राहायला सांगितलं.
***

प्रतिक प्रेरणाने सांगितल्या प्रमाणे गोदाऊन मध्ये गेला. तिकडच्या कामावर लक्ष ठेवणारा सुपरवायझर श्रीधर प्रतिकच्या अचानक येण्याने गडबडून गेला.
प्रतिक: (त्याला असं गडबडलेलं पाहून) श्रीधर काय झालं... मला पाहून असा घाबरलास का...?
श्रीधर: (स्वतःला सावरत) कुठे काय... छे सर घाबरलो नाही... पण तुम्हाला अचानक इथं पाहून थोडं आश्चर्य वाटलं. तुम्ही कधी आलात मुंबईवरुन सर....?
प्रतिक: झाले 4 दिवस... बरं ते राहू दे... मला जरा आपल्या ट्रान्सपोर्ट मालाची फाईल बघायची होती.
श्रीधर: (काहीतरी मनात विचार करत) हं देतो सर...
श्रीधर उगीचच इकडे तिकडे शोधायचं नाटक करु लागला.
प्रतिक: काय झालं श्रीधर...
श्रीधर: सर, फाईल इथेच ठेवली होती... कुठे दिसत नाही आहे...
प्रतिक: तुला नक्की आठवत आहे तू इथेच ठेवली होती.
श्रीधर: हो सर, राय सरांकडून सही घेऊन मी आलो आणि इथेच ठेवली होती.
प्रतिक: ठीक आहे जाऊदे... जेव्हा भेटेल तेव्हा दे...
श्रीधर: हं चालेल सर.
प्रतिक: बरं तुझी मुलगी कशी आहे...?
श्रीधर: अं आता ठीक आहे... 
प्रतिक: बरं काळजी घे... आणि काही लागलंचं तर सांग मला...
प्रतिकचं बोलणं ऐकून श्रीधरला काय बोलावं हे सुचेना. त्याने मानेनेच हो म्हटलं. प्रतिक त्याच्याशी बोलून ट्रान्सपोर्ट मालाच्या दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये गेला. तिकडे फाईल तर मिळाली पण त्यात त्याला काही गडबड मिळाली नाही. त्याने फाईल तिकडच्या सुपरवायझर संतोषकडे देऊन तो पुन्हा त्याच्या केबिनमध्ये आला. त्याला का कोण जाणे श्रीधरचं वागणं संशयास्पद वाटलं होतं. पण हाती पुरावा असल्या शिवाय तो काहीच करु शकत नव्हता.
***

रात्री 7.30 च्या नंतर ऑफिस पूर्ण खाली झाल्यावर...
श्रीधर: (एका व्यक्तीशी) सर, मला वाटतं प्रतिक सरांना आपल्याबद्दल संशय आला आहे.
तो: तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे... आणि तो पोहचलाच तरी जिवंत राहिला तर काहीतरी करेल ना... आता जा तुझ्या कामाला लाग.... तो माणूस रागातच श्रीधरला म्हणाला.
श्रीधर: हो सर..
प्रतिकच्या कानावर दोघांचं बोलणं ऐकू आलं. पण अंधारात त्याला नक्की ते दोघे कोण आहेत हे लक्षात नाही आलं. दोघेही तिथून निघून गेले तसा प्रतिक तिथे गेला त्याला त्या ठिकाणी श्रीधरच्या खिशातला एक पेपर मिळाला ज्यावर त्याच्या मुलीची औषधे दिली होती. आता प्रतिकला खात्री झाली श्रीधरला नक्कीच यातलं काहीतरी माहीत असणार.. तो पेपर तसाच खिशात घालून त्याच्या रुमवर जायला निघाला.
***

बेंगलोरचं ऑफिस प्रतिकच्या रुमपासून जवळच असल्याने प्रतिक नेहमी प्रमाणे चालतच रुमवर जायला निघाला. प्रतिकला कल्पना ही नव्हती की कोणीतरी त्याच्या मागावर आहे. मूड चेंज करण्यासाठी headpone घालून गाणं गुणगुणत तो चालत होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की त्याच्या गळ्यातलं प्रेरणाने दिलेलं लॉकेट पडलं म्हणून ते उचलण्यासाठी तो खाली वाकला. तेवढ्यात gunshot चा आवाज झाला.


***

प्रतिक, प्रतिक म्हणत झोपेतच जोरजोरात ओरडणाऱ्या प्रेरणाला आईने हात लावून हलवलं.
आई: प्रेरणा, उठ...
प्रेरणा: (खडबडून जागी होत) आई, प्रतिक... प्रतिक...
आई: प्रतिक काय...
प्रेरणा: आई, प्रतिक.... तिला पुढे काही बोलायला सुधरेना... बाबांनी तिला पाणी आणून प्यायला दिलं.
आई: शांत हो... आणि सांग काय झालं...
प्रेरणा: आई, ते प्रतिक यांना कोणीतरी गन... तिला पुढे काही बोलवेना...
आईने तिला जवळ घेऊन शांत केलं.
आई: अग स्वप्न पाहिलं असशील तू...
बाबा: आणि आज ऑफिस मधून आली, चहा घेऊन सुद्धा झोपली कशी... तब्येत ठीक आहे ना...
प्रेरणा: (डोळे पुसत) हं ठीक आहे... आईबाबा प्रतिक ठीक असतील ना...
बाबा: हो प्रेरणा, तू हवं तर खात्री करून घ्यायला त्यांना कॉल करुन बघ... स्वप्न होतं ते फक्त.
प्रेरणा घाई घाईत बेडवरून उठली आणि तिने देवासमोर हात जोडले.
प्रेरणा: बाप्पा, मी फार काही नाही मागत तुझ्याजवळ... फक्त प्रतिक सुखरुप असू देत.
तिने डोळ्यांत आलेलं पाणी पुसलं आणि प्रतिकला कॉल लावला. The number you are trying to call is busy on another call... ऐकून तिने मोबाईल बाजूला ठेवला. प्रतिकचा कॉल बिझी येतोय म्हणजे सगळं ठीक आहे असं तिने मनाला समजावलं. पण त्याचा आवाज ऐकल्याशिवाय तिच्या जीवात जीव येणार नव्हता.
***

बोल कोण आहेस तू...? आणि प्रतिक राजाध्यक्ष यांची सुपारी तुला कोणी दिली होती. PI नायर यांचे विश्वासू अधिकारी PSI नाईक पकडलेल्या माणसाला कानाखाली मारुन विचारत होते.
PSI रणदिवे: नाईक, हा असा ऐकणार नाही... आता याला खाकीचा हिसका दाखवायलाच हवा.... म्हणत त्यांनी त्याला झोडायला सुरवात केली. बराच वेळ दोघेही आलटून पालटून त्या माणसाला मारत होते. काही वेळाने PI नायर तिथे आले.
PI नायर: काही बोलला का हा...?
PSI नाईक: नाही बोलला सर... पण याला काहीही करुन बोलतं करणार आहोत...
PI नायर: हं, ही केस लवकरात लवकर सोडवणं खूप गरजेचं आहे.
दोघे: Yes सर. दोघांनी मिळून नायर यांना salute केलं. नायर त्यांच्या पाठीवर हात थोपटून तिथून बाहेर पडले.

क्रमशः

🎭 Series Post

View all