Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-६६

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-६६
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६६


 

पीच रंगाच्या ड्रेसमध्ये प्रेरणाला पाहून प्रतिकचं ती काय बोलतेय याकडे बिलकुल लक्ष नव्हत. 
प्रेरणा: (प्रतिकला असं तिच्याकडे पाहताना पाहून ती लाजत म्हणाली) प्रतिक निघूया ना आपण...? उशीर होईल नाहीतर घरी जायला...
प्रतिक: (भानावर येऊन, केसांवरून हात फिरवत) हं चल... तिथून प्रेरणाचा हात हातात घेऊन तो निघाला... जणू त्याला आज सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं.... प्रेरणा फक्त त्याची आहे आणि तो प्रेरणाचा... तिला त्याच असं वागणं पाहून आपण खरंच त्याच्यासाठी किती खास आहोत हे जाणवून आनंद होतं होता. प्रेरणा कारमध्ये बसण्यासाठी त्याने डोअर उघडला आणि ती बसल्यावर तो ही बसला. कार सुरु केल्यावर त्याने radio FM स्टार्ट केला. FM वर Jab We Met movie मधलं गाणं सुरु होतं..

ना है ये पाना
ना खोना ही है
तेरा ना होना जाने
क्यूँ होना ही है

तुमसे ही दिन होता है
सुरमई शाम आती
तुमसे ही, तुमसे ही

हर घड़ी साँस आती है
ज़िंदगी कहलाती है
तुमसे ही, तुमसे ही…

प्रतिकने कार ड्राईव्ह करता करता प्रेरणाकडे पाहिलं. तिचा हात हळूच त्याने त्याच्या हातात घेत तिच्या हातावर किस केलं.. तो तिचा हातात असाच हातात घेऊन ड्राईव्ह करत होता. काही वेळाने त्याला जिथे प्रेरणाला न्यायचं होतं त्या वळणावर ते आले.. त्याने कार साईडला थांबवून खिशातून एक रुमाल काढला.
प्रेरणा: प्रतिक, काय झालं, अचानक कार का थांबवली...?
प्रतिक: या पुढचा प्रवास तुला डोळे बंद करून करायचा आहे...
प्रेरणा: असं का...?
प्रतिक: कळेल तुला... डोळे बंद कर आधी... असं म्हणत त्याने तिच्या डोळ्यांवर रुमाल बांधला आणि पुन्हा कार सुरु केली. त्याने ठरवलेल्या जागी त्याची कार पार्क केली. तिचा हात हातात घेऊन दोघेही कारमधून उतरले आणि त्याच्या प्लॅन केलेल्या ठिकाणी घेऊन गेला. अजूनही प्रेरणांच्या डोळ्यांवरचा रुमाल प्रतिकने काढला नव्हता. त्याने हळूच त्याच्या हातातला तिचा हात सोडला... तिला काही कळायच्या आधीच त्याने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली. तिने आजूबाजूला पाहिलं, ते दोघेही एका रेस्टॉरंट मध्ये होते. तिथे छोटी झाडे, त्याच्या आसपास lights आणि त्या झाडांच्या मध्ये टेबल्स अरेंज करण्यात आलं होतं.

प्रतिक तिच्या बाजूलाच उभा राहून तिच्या चेहऱ्यावरच्या मिश्र भावना पाहत होता. पाहताना तिचा चेहरा मध्येच आनंदाने उजळत होता, तर मध्येच आश्चर्याने... मध्येच तिच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न... मध्येच काहीतरी आठवून लाजणं.... खूप वेळानंतर तिने प्रतिकच्या डोळ्यांत पाहिलं.
प्रतिक: आवडलं तुला...
प्रेरणा: (डोळ्यानेच कबूली देऊन) पण हे सगळं आज कशासाठी... म्हणजे रागवू नका पण काही खास आहे का आज ?
प्रतिक: (हसला) आजचा दिवस खरंच खूप खास आहे माझ्यासाठी...!! आजच्याच दिवशी तू माझ्या आयुष्यात आली होती..
प्रेरणा: म्हणजे... प्रतिक कळलं नाही मला...
प्रतिक: (तिचा हात हातात पकडून तिच्या डोळ्यांत पाहत) Oh My Dear , आजच्याच दिवशी तू ऑफिस जॉईन केलं होतं... आणि माझ्या आयुष्यात एका ड्रीम गर्ल सारखी आलीस... मग आजचा दिवस नक्कीच खास आहे.
प्रतिकने प्रेरणा काही बोलायच्या आधीच तिला hug केलं. ती ही त्याच्या मिठीत स्वतःला हरवून गेली. काहीवेळाने दोघेही आपण कुठे आहोत हे लक्षात येऊन भानावर आले.

प्रतिक आणि प्रेरणा दोघेही एका टेबलवर बसले. जेवण ऑर्डर करून झाल्यावर प्रतिकने त्यांच्या दोघांचे सोनाने काढलेले एंगेजमेंटचे फोटोज तिला दाखवले. ती पाहत असतानाच प्लेट्स घेऊन वेटर आले. दोघांना सर्व्ह करून ते गेले. 
प्रेरणा: प्रतिक, सुरवात करुया ना...
प्रतिक: एक मिनिट थांब... आधी डोळे बंद कर बघू...
प्रेरणा: पुन्हा एकदा....
प्रतिक: कर म्हणालो ना...
प्रेरणा: बरं करते.... म्हणत तिने डोळे बंद केले. प्रतिकने खिशातून बॉक्स काढला आणि त्यातील एक pendant तिच्या गळ्यात घातलं.
प्रतिक: आता उघड डोळे...
तिने गळ्यातल्या pendant कडे पाहिलं. P अक्षर gold मध्ये होतं आणि त्यालाच जॉईंट एक diamond मध्ये heart होतं.


प्रतिक: (तिला पेंडंटकडे पाहताना बघून) इस नाचीज का दिया हुआ तोहफा पसंद आया या नहीं...
प्रेरणा काहीच न बोलता त्याला आनंदाने बिलगली. तो ही आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पडून तिच्या मिठीत सुखावला.
भानावर आल्यावर दोघांनी एकमेकांच्या सहवासात candle light dinner चा आनंद लुटला. प्रतिकने बिल पे केलं आणि प्रेरणाला घेऊन तो आनंदाने तिथून निघाला.
***

 

असेच दिवसामागून दिवस जात होते. सोना- समीर परत US ला जाऊन एक आठवडा झाला होता. प्रेरणा प्रतिकचं एकमेकांच्या फॅमिली मेम्बर्सच्या संपर्कात राहणं वाढलं होतं. दोघांच्या ही आयुष्यात आनंदाचे दिवस येऊ लागले होते. पण दोघांनाही कल्पना नव्हती की हा आनंद त्यांच्या आयुष्यातून जाऊ पाहत होता. एक नवीन वादळ लवकरच त्यांच्या आनंदावर विरजण आणणार होतं.
***

 

खूप दिवस झाले प्रतिक बेंगलोरच्या ऑफिस मध्ये होत असलेल्या गडबडीचा शोध घेत होता. त्याला तिथे काम करत असताना काहीतरी गडबड नक्की आहे हे लक्षात आलं होतं पण जोपर्यंत नक्की काही कळत नाही तोपर्यंत तो काहीच सरांना सांगू शकत नव्हता. आज त्याने याच संदर्भात त्याच्या टीम मेंबर्स बरोबर मीटिंग घेतली होती. जवळ जवळ अडीच तास सगळे मिळून फाईल्स चेक करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की हा खूप मोठा पैशाचा घोटाळा आहे. प्रतिकने तात्काळ कॉल करुन त्याच्या सरांच्या कानावर ही गोष्ट सांगितली. सर सगळा प्रकार कळताक्षणी सुट्टी असताना ही लगेच ऑफिस मध्ये आले आणि प्रतिकच्या केबिनमध्ये गेले.
प्रतिक: (सरांना बघून) सर तुम्ही ऑफिसमध्ये...? तुम्ही सुट्टी घेतली होती ना पण....
सर: प्रतिक, जो प्रकार बेंगलोरच्या ऑफिस मध्ये झाला आहे
त्यानंतर मला लगेच ऑफिस मध्ये येणं योग्य वाटलं. बोलता बोलता सर खुर्चीत बसले.
प्रतिक: ओके सर या फाईल्स बघा, या फाईल्स बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल....
सरांनी प्रतिकच्या सांगण्याप्रमाणे फाईल्स चेक केल्या.
सर: प्रतिक, तुला कोणावर संशय आहे का...?
प्रतिक: सर मला काहीजणांचं काम काहीसं संशयास्पद वाटलं आहे.... आणि तिकडच्या काही विश्वासू मेम्बर्सना हाताशी घेऊन त्यांची माहिती ही काढायला सांगितली... असं म्हणत त्याने त्याला ज्यांच्यावर संशय आहे याबद्दल सरांना माहिती दिली.
सर: मग तुला ज्यांच्यावर संशय होता तो खरा ठरला का..?
प्रतिक: हो सर, पण मला वाटतं जेवढ्या फाईल वरुन लक्षात येत आहे त्यापेक्षा जास्त मोठा घोटाळा ही असू शकतो....आणि अजूनही काही बाहेरचे यात असू शकतात. हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जावं लागू शकतं....
सर: प्रतिक, तुला माझी तिथे काही गरज लागेल का...? किंवा अजून कोणत्या टीम मेम्बरची...?
प्रतिक: नाही सर, पण I guess, आपण या बद्दल पोलिसांना ही विश्वासात घ्यावं.. कारण हा घोटाळा मला risky वाटतोय...
सर: Yes right Pratik, I think you have to take protection in that case...
प्रतिक: No sir, अशाने समोरची व्यक्ती अलर्ट होऊ शकते...
सर: ओके तू म्हणतोस ते पण बरोबर आहे... पण प्रोटेक्शन नाही तरी आपण मदत नक्कीच घेऊ शकतो.
प्रतिक: ओके सर
सर: माझ्या ओळखीचे तिकडचे PI नायर आहेत मी त्यांच्या कानावर हे प्रकरण घालतो. ते तुला यात नक्की कोणालाही लक्षात नाही येणार अशी मदत करतील.
प्रतिक: One more thing Sir
सर: Yes Pratik tell me...
प्रतिक: आपण त्यांच्यावर कारवाई करावी की नाही...?
सर: प्रतिक, हा घोटाळा बघता मला तरी असं वाटतं की ही केस आपण पोलिसांनाच डायरेक्ट हँडल करायला द्यावी.
प्रतिक: ओके सर, मी फक्त तिथे जाऊन माझ्याकडून जी माहिती कळेल ती मि नायर यांना देतो आणि ते त्याप्रमाणे action घेतील.... म्हणजे हे मिशन secret राहिलं सगळ्यांसाठीच...
सर: Yes Pratik, but please take care... तुला थोडं तरी तिथे काही risky वाटलं तर तू लगेच protection घेऊन इथे निघून ये... 
प्रतिक: ओके सर
सर: मी आताच बोलून घेतो मि नायर यांच्याशी.... असं म्हणत सर प्रतिकच्या केबिन मधून निघाले.
***

 

प्रतिक, तुम्ही बेंगलोरला जाणं खूप महत्त्वाचं आहे का...? प्रेरणाने प्रतिकची बॅग पॅक करता करता विचारलं.
प्रतिक: प्रेरणा, हे बघ महत्वाचं आहे म्हणून तर जातोय... आणि कोणत्या प्रामाणिक व्यक्तीला त्रास होऊ नये, कोणी चांगली व्यक्ती यात अडकू नये म्हणून तर मी जातो आहे...
प्रेरणा: (प्रतिकचा हात हातात घेऊन) प्रतिक, का कोण जाणे पण माझ्या मनाची खूप चलबिचल होते आहे...
प्रतिक: डोन्ट वरी डिअर, मला काही होणार नाही... आणि मि नायर आहेत ना तिथे action घ्यायला.... प्रतिकने प्रेरणाला जवळ घेत म्हंटलं.
प्रेरणा: (तिच्या कुर्तीच्या खिशातून काहीतरी काढलं) प्रतिक तुम्ही तुमच्या गळ्यात हे लॉकेट घालाल का...?
प्रतिक: कसलं लॉकेट...?
प्रेरणाने तिच्या हातातलं गणपतीचं लॉकेट काढलं आणि प्रतिकच्या समोर दाखवत म्हणाली, हे लॉकेट...!!
प्रतिकची देवावर फार श्रद्धा नसली तरी त्याला प्रेरणाचं मन दुखवायचं नव्हतं.
प्रतिक: (तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला) तू तुझ्या हाताने घालणार असशील तर चालेल मला...
प्रेरणाने आनंदाने त्याच्या गळ्यात लॉकेट घातलं. दरवाजातून आजी बराच वेळ त्या दोघांच काय चालू आहे ते पाहत होती. संध्याकाळी प्रतिकच्या बोलण्यातून त्याचं बेंगलोरचं काम धोकादायक असू शकतं हे तिच्याही लक्षात आलं होतं म्हणूनच तिने प्रेरणाला मुद्दामून प्रतिकची बॅग भरायला नंदाकडून बोलावणं धाडलं होतं. जेणेकरुन प्रतिक काही वेळ त्याचं टेन्शन विसरुन जाईल. प्रेरणाची प्रतिकबद्दलची काळजी बघून आज तिला तिने तिचा प्रेरणाबद्दलचा निर्णय बदलल्याचा आनंद होत होता.

प्रेरणा: ( प्रतिकच्या गळ्यात लॉकेट घातल्यावर) गणपती बाप्पा नक्की तुमच्या पाठीशी राहतील.
प्रतिक: (तिच्या कपाळावर ओठ टेकवत) किती काळजी करतेस तू...!!
प्रेरणा: तुम्हाला नाही समजणार ते आम्हा बायकांचं मन...
प्रतिक: (लाडात येऊन तिला जवळ घेत) सगळ्या बायकांचं कळलं नाही तरी चालेल पण माझ्या प्रेरणाचं मन कळतं बरं मला...
प्रेरणा: प्रतिक सोडा, कोणी तरी बघेल...
आजीने लगेच खाकरण्याचा आवाज केला. दोघांनी मागे वळून बघितलं आणि प्रेरणाने लाजून मान खाली घातली तर प्रतिक उगाच बॅग भरत असल्याचं नाटक करु लागला.
आजी: प्रतिक, झाली बरं बॅग भरुन....
प्रतिक: आजी ते...
आजी: लबाडा, आजीला फसवतोय होय... चला दोघांनी जेवायला...
प्रतिक: आजी ते...
आजी: हं आलं लक्षात.... मी काही बघितलेलं नाही, आणि काही ऐकलेलं ही नाही... आजी प्रेरणाकडे बघत डोळा मिचकावत म्हणाली. आजीचं बोलणं ऐकून दोघांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.
आजी: चला पटकन आवरुन... मी बाहेर जाऊन बसते म्हणत आजी तिथून लिविंग रूमकडे वळली.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...