अस्तित्व एक संघर्ष-भाग-६५

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६५


सकाळी डायनिंग टेबलवर प्रतिक, सोना, राजीव या तिघांची मस्ती चाललेली असते.
सोना: राजीव, तू तर love guru निघालास... आधी सुद्धा प्रतिक आणि प्रेरणाला एकत्र आणायचा प्लॅन केला होता आणि आता ही आजी आणि तू मिळून प्लॅन केलास....!!
प्रतिक: आणि समजा, मी एंगेजमेंटला आलोच नसतो तर...
राजीव: (जोर जोरात हसत) मग काय तुझ्या आणि प्रेरणाच्या एंगेजमेंटला तू मुकला असता...
त्याचं बोलणं ऐकून सोना पण हसू लागली पण प्रतिकचा चेहरा पडला.
राजीव: (जागेवरुन उठत) बस कर मेरे यार अभी नौटंकी मत कर... तुला ओळखत नाही मी, असं वाटलं का तुला... नको त्या डिरेक्शन मध्ये विचार करु नकोस...
तसा तो ही त्या दोघांच्या हसण्यात सामील झाला.
त्या तिघांना तसे आनंदात बघून लिविंग रुममध्ये येणाऱ्या आजीला बरं वाटलं. आजी आनंदात सोनाच्या बाजूला येऊन बसली. तोपर्यंत नंदा सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आली. सगळयांनी तिच्याकडून नाश्ताच्या प्लेट्स घेतल्या.
आजी: (नंदाला विचारते) तुमचे जावईबापू कुठे आहेत...?
नंदा: ते सकाळी लवकरच हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथूनच त्यांच्या घरी जाणार. सोनाला इथेच काही दिवस राहू देत असे बोलले. तुम्ही झोपलेल्या म्हणून तुम्हाला उठवलं नाही.
आजी: आणि मिलिंद कुठेय..?
नंदा: हे आणि भाऊजी (राजीवचे बाबा) खाली walk ला गेले आहेत.
त्यांचं बोलणं चालू असतानाच राजीवची आई सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. आजीने दोघींना त्या नाही म्हणत असताना सुद्धा जबरदस्तीने त्यांच्या सोबत नाश्ता करायला बसवलं. मस्तपैकी हसतखेळत सगळयांचा नाश्ता चालू होता.
आजी: सोना, समीर तर तिकडच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात ना... मग इकडच्या हॉस्पिटलमध्ये कसे गेले...?
सोना: आजी, त्याचं कसं आहे, ईकडच्या हॉस्पिटलमधल्या टीमला ट्रेनिंग द्यायला त्यांना इथे बोलावलं आहे... आणि मी एकटी तिकडे काय करणार होते सो मी पण सुट्ट्या घेतल्या.
आजी: बरं, माझा असा विचार चालू आहे, तुम्ही दोघे इथे आहात तोपर्यंत लवकर लग्नाचा मुहुर्त काढावा. तसं ही हल्ली माझी तब्येत ठीक ही नसते... किती दिवस अजून आहे मी काय माहीत..
सोना: (कोणी काही बोलणार त्या आधीच) आजी, अभी तो आपको बहुत जीना है... तुला अजून पणजी पण व्हायचं आहे... इतकी काय घाई आहे... कुछ और दिन इन चारों को आझादी की सांस लेने दे... (मग राजीव, प्रतिककडे पाहून) ) तुम्हां दोघांना काय ऑफिसला जायचं नाही का..?
प्रतिक: हो हो जायचं आहे... (राजीवला) चल राजीव तयारी करुन निघू.
दोघेही पटकन नाश्ता पूर्ण करुन तयारी करायला रुममध्ये गेले.
राजीव, प्रतिकची आई, सोना आणि आजी यांच्या लग्नावरुन गप्पा मस्त रंगल्या होत्या. तोपर्यंत राजीव-प्रतिक तयार होऊन बाहेर आले.

प्रतिक,राजीव सगळयाना बाय करत आपल्या ऑफिसला जायला निघाले. राजीव त्याच्या बाईकने तर प्रतिक त्याच्या कारने गेला. रस्त्यात प्रतिकला प्रेरणा बरोबर ऑफिसला जायची लहर आली. त्याने कार तिच्या घरच्या रस्त्याला वळवली. तो तिच्या घरी पोहचला पण प्रेरणा तोपर्यंत स्टेशनला पोहचली होती त्यामुळे तिची आणि प्रतिकची चुकामूक झाली. काहीसा मूड ऑफ करत तो ऑफिसला आला. तिथे सगळ्यांनी त्याला अभिनंदन केलं पण प्रतिकचं लक्ष त्याकडे होतं कुठे तो तर प्रेरणाला शोधत होता. त्याला वाटलं तिला उशीरा झाला असावा म्हणून तो आपल्या केबिनमध्ये गेला. केबिनमध्ये सगळीकडे त्याच्या आवडीच्या फुलांचे बुके ठेवलले होते त्याने रुम सगळीकडे पाहू लागला. त्याला एका कोपऱ्यात प्रेरणा बुके अरेंज करताना गुंग दिसली. तिला हळूच जाऊन surprise द्यावं म्हणून तो पावलांचा आवाज न करता तिच्या दिशेला गेला. तो तिचे डोळे बंद करणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. रिंगच्या आवाजाने प्रेरणाने लगेच मागे वळून पाहिलं. त्याला प्रेरणाशी खूप काही बोलायचं होतं म्हणून त्याने कसंबसं पटकन कॉलवरचं बोलणं आटपलं. त्याला असं घाईघाईने कॉल ठेवलेलं पाहून तिला हसू आवरेना. प्रेरणाने हिरव्या रंगाचा कॉटन चुडीदार घातला होता, त्याच रंगाचे कानातले, हातात मण्यांचं कडं, डोळ्यातलं काजळ जणू त्याला घायाळच करण्यासाठीच लावलं होतं.. तिच्याशी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडलं तोच तिने त्याच्या तोंडात त्याच्या आवडीची कलाकंद बर्फी घातली.

प्रतिक: (बर्फी खाऊन झाल्यावर, तिला चिडवण्याच्या उद्देशाने) मिस प्रेरणा, मला कळलं की तुमची काल एंगेजमेंट झाली. तुम्ही तुमच्या बॉसला, टीम मेम्बर्सना invitation द्यायला विसरलात बहुतेक... की तुम्हाला बोलवयचंच नव्हतं...कोणालाही....?
तिला लक्षात आलं प्रतिक तिला मुद्दामून चिडवण्यासाठी असा बोलतोय... पण ती पण माघार थोडीच घेणार होती.
प्रेरणा: त्याचं काय झालं सर, मलाही ठाऊक नव्हतं, माझी एंगेजमेंट होणार आहे ते... मग मी कशी बोलवणार होती कोणाला...?
प्रतिक: म्हणजे, मिस प्रेरणा ही एंगेजमेंट तुमच्या मनाविरुद्ध झाली आहे का....?
प्रेरणा: (स्वतःच हसणं लपवत) सर, खरं सांगू तर सगळं इतकं अचानक घडलं की मला हा विचार करायला वेळच मिळाला नाही...
प्रतिक: मग ही बर्फी कशाला...? 
प्रेरणा: सर, तुमची काल एंगेजमेंट झाली म्हणून मी हे बुके आणि हे sweets आणलं....
प्रतिक: म्हणजे मिस प्रेरणा, तुम्ही तुमच्या एंगेजमेंटने खूश नाही आहात तर...
प्रेरणा: (मुद्दाम चिडवण्यासाठी) नाही...
तिचं बोलणं ऐकून प्रतिकने तिच्या कमरेला त्याच्या हाताने विळखा घालून तिला स्वतःकडे ओढून घेतलं.
प्रतिक: (तिच्या चेहऱ्याजवळ जात) खरंच तू खूश नाहीस...
प्रतिक तिच्या इतक्या जवळ होता की त्याच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती.
प्रेरणा: प्रतिक सोडा मला.... कोणीतरी केबिनमध्ये येईल...
प्रतिक: हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे... आणि उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार पण नाही आहे. केबिनमध्ये कोणीही knock केल्या शिवाय येऊ शकत नाही.... so don't worry, answer my question...
प्रेरणाच्या पापण्यांची होणारी उघडझाप प्रतिकच्या काळजाचा ठाव घेत होती. त्याने तिच्या कमरेवरचा हात अजून घट्ट केला.
प्रेरणा: प्रतिक, प्लीज मला जाऊ द्या... खूप काम पेंडिंग आहे..
प्रतिक: (तिच्यावरची नजर न हटवत) सोडेन एका अटीवर...
प्रेरणा: (त्याच्या डोळ्यात पाहत) कोणती अट
प्रतिक: my ears are eagerly waiting to listen those three magic words from you...
प्रेरणा: प्रतिक, प्लीज जाऊ द्या ना मला...
प्रतिक: अं हं, बिलकुल नाही... already सकाळी तुला pick up करायला तुझ्या घरी गेलो होतो पण तू आधीच गेली होतीस म्हणून माझा मूड ऑफ आहे... आणि माझा मूड चांगला करायचा असेल तर तुला बोलावंच लागेल.
प्रेरणा: अच्छा स्वारी त्यामुळे रुसली आहे तर... ते मला मंदिरात जायचं होतं म्हणून मी लवकर निघाले होते.
प्रतिक: मंदिरात कशाला...?
प्रेरणा: ते काय आहे ना, गणपती बाप्पाचे आभार मानायचे होते मला...कारण मला जे जोडीदार म्हणून हवे होते... त्यांच्याशीच माझी एंगेजमेंट झाली.
प्रतिक: हं, मग मानले की नाही आभार...?
प्रेरणा: हो मानले ना...!! आता तरी मला सोडा ना...
प्रतिक: अं हं, तू बोलल्याशिवाय मी तुला बिलकुल सोडणार नाही आहे.
प्रेरणा: ठीक आहे, तुम्ही डोळे बंद करा बघू आधी...
प्रतिकने डोळे बंद केले... प्रेरणाने हळूच त्याच्या कानाकडे जाऊन ते 3 शब्द बोलून तिच्या प्रेमाची कबूली दिली. प्रतिकने हसून त्याचे डोळे उघडले. तिचा हातांनी झाकलेला चेहरा सोडवत त्याने ही तिला त्याच्या प्रेमाची कबूली दिली. प्रतिककडे पाहताना तिचा चेहरा लाजून लाजून गुलाबी झाला होता. त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं.
प्रेरणा: प्रतिक सोडा ना, जाऊ द्या ना मला...
प्रतिक: या इतक्या दिवसात खूप दुरावा सहन केला आहे मी... आता सहन होत नाही तुला स्वतःपासून दूर ठेवायला...
प्रेरणा: (त्याच्या डोळ्यांत पाहत) आता फक्त मृत्यूचं मला तुमच्या पासून वेगळा करु शकतो... ही प्रेरणा कधीच तुमच्यापासून दूर होणार नाही...
प्रतिक: प्रेरणा, पुन्हा अशा मरणाच्या गोष्टी करु नकोस... हा प्रतिक राजाध्यक्ष तुझ्याविना अधुरा आहे... तू नसशील तर मी ही नसेन....
प्रेरणा: प्रतिक.... सॉरी पुन्हा असं नाही काही बोलणार...
प्रतिक: (तिला मिठीतून सोडवत) मग आज येशील माझ्याबरोबर...?
प्रेरणा: कुठे..?
प्रतिक: कुठे ते विचारु नकोस... फक्त येशील का सांग...?
प्रेरणाने डोळ्याने कबूली दिली. प्रतिकने त्याच्या हाताने बर्फी तिच्या तोंडात टाकली.
प्रतिक: सो मिस प्रेरणा, लवकर कामाला लागा... तुम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं आहे.
प्रेरणा प्रतिकला हो म्हणत त्याच्याकडे हसून पाहत केबिनमधून बाहेर पडली.
***

संध्याकाळी दोघेही ऑफिस मधून एकत्र बाहेर पडले. प्रतिकने आधीच दोघांच्याही घरी उशीर होणार असल्याचं आणि बाहेरूनच जेवून येण्याचं सांगून टाकलं होतं. कार त्याने एका ड्रेस शॉपकडे थांबवली. कार साईडला पार्क करुन प्रेरणाला घेऊन तो त्या शॉपमध्ये शिरला. तिकडे असलेल्या लेडी असिस्टंटला त्याने प्रेरणासाठी काही one piece collection दाखवायला सांगितले आणि तिला त्यातून सिलेक्ट करायला सांगून तो कॉल वर बोलत बाहेर गेला. तिने काही ड्रेसेस बघितले त्यातून तिला एक पीच कलरचा one piece आवडला. तिने तो try करुन बघितला. थोड्याच वेळात प्रतिक कॉलवरचं बोलणं आटपून आला. 
प्रतिक: अग अजून काही निवडलं नाही...?
प्रेरणा: (ड्रेसकडे दाखवत) हा कसा आहे...?
प्रतिक: मस्त आहे, तू try करुन बघितला का...?
प्रेरणा: हो
प्रतिक: ओके मग तू पटकन चेंज करुन ये... मी तोपर्यंत ड्रेसच बिल पे करतो.
प्रेरणा: चेंज करु?
प्रतिक: yes ofcourse.... लवकर चेंज करुन ये... मी इथेच आहे
प्रेरणा चेंजिंग रुममध्ये जाऊन ड्रेस चेंज करुन आली. प्रतिक बिल पे करुन तिची वाट पाहतच होता.
प्रेरणा: प्रतिक, निघूया का...?
प्रतिकने मागे वळून पाहिलं... आणि प्रेरणाला त्या ड्रेसमध्ये बघून तो पाहतच राहिला. 

क्रमशः

🎭 Series Post

View all