Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-६१

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-६१
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६१


राजीव रेखाला घेऊन प्रतिकच्या घरी आला. आजींना पाहून रेखा त्यांच्या पाया पडली. आजीने तिला जवळ घेत म्हटलं, बाळा, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर आहेत...मग राजीवकडे पाहत म्हणाली, राजीव होणाऱ्या बायकोकडून काहीतरी शिक.... तसा राजीव केसांवरून मागे हात फिरवत आजीच्या पाया पडला.... आजीने त्याच्या पाठीवर मारत त्याला ही आशीर्वाद दिला.

आजी: रेखा, बस तू.... आजीच्या सांगण्याप्रमाणे रेखा सोफ्यावर सोना लिहीत असलेली लिस्ट बघत बसली. तोपर्यंत नंदा तिच्यासाठी खायला काही स्नॅक्स आणि juice घेऊन आली.

मिलिंद: (राजीव आणि समीरला) मग कधी निघत आहात.. शॉपिंगला...?

राजीव: (रेखाला चिडवण्याच्या उद्देशाने) या मॅडमच मनसोक्त खाऊन झालं की निघूच...

रेखा: (नंदाला) काकू, आजी बघा ना, राजीव कसे करतात...!!

नंदा, आजी: गप्प रे, खा ग तू... (आजी तिच्याजवळ जात) लक्ष नको देउ त्याच्या कडे... तो असाच आहे...

प्रतिक हे सगळं पाहून मनात विचार करत होता.... आज रेखाच्या जागी प्रेरणा असती तर... 

समीर: ( विचार करत असणाऱ्या प्रतिकला हात लावत) चल जायचं ना शॉपिंगला... चेंज करून घे... निघू थोड्याच वेळात...

प्रतिक काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये चेंज करायला निघून गेला... आजीने माझ्यासाठी दुसरी मुलगी बघितली आणि घरातलं कोणीच कसं मला काही बोललं नाही याबद्दल... इव्हन सोनादीदी पण नाही... ते तरी काय बोलणार म्हणा... माझीच तर सगळी चूक होती... मीच आजीला म्हणालो होतो.... तुझ्या मनानुसार होऊ दे म्हणून... तो विचार करत स्वतःशीच भांडत होता. प्रतिक विचार करता करता तयारी करुन त्याच्या रूममधून बाहेर आला. सोना, समीर आणि रेखा तिघे मिळून राजीवची मस्करी करत होते...  त्यांना पाहून प्रतिकच्या मनाचा प्रवाह पुन्हा प्रेरणाच्या दिशेने वाहू लागला... काय वाटलं असेल तिला जेव्हा राजीवकडून माझ्या एंगेजमेंटबद्दल कळलं असेल.... तो विचारांच्या दिशेत असतानाच राजीवने त्याला जोरात आवाज दिला... प्रतिक चल निघूया....

प्रतिक: (भानावर येत) बाकी सगळे कुठे आहेत...?

राजीव: कुठे हरवला आहेस.... ते आताच तर खाली उतरले... तुझ्यासमोरून... चल निघूया आपण पण... म्हणत तो आजी आणि काकूकाकांना बाय म्हणत प्रतिकबरोबर तिथून निघाला.

प्रतिक आणि राजीव कार पार्किंग मध्ये आले.

प्रतिक: दीदी, जीजू, रेखा कुठे आहेत...? मला वाटलं पार्किंग मध्ये असतील...

राजीव: काय चाललं आहे तुझं प्रतिक.... आताच तर वरती समीर जीजू म्हणाले ना... ते तिघे पुढे जात आहेत म्हणून...

प्रतिक: सॉरी माझं लक्ष नव्हत...

राजीव: ते तर मला तू बेंगलोरवरून आल्यापासूनच लक्षात आलं आहे.... फक्त तुला कारण त्याच सांगायचं नसावं...असं वाटतं... anyways मला तुला काहीतरी सांगायचं आहे...

प्रतिक: हं बोल ना...

राजीव: आता नको कारने जाता जाता बोलू...

प्रतिकने मानेनेच हो म्हटलं आणि त्याने कार सुरु केली. राजीव त्याच्याच बाजूला रेखाशी चॅट करत बसला होता. 

राजीव: (प्रतिककडे पाहत) प्रतिक, मला सांगायचं आहे तुला काहीतरी...

प्रतिक: हो तू म्हणाला होतास मघाशी...

राजीव: मला सांग तू तयार आहेस का या एंगेजमेंटला....?

प्रतिक: राजीव तुला माहित आहे ना... how much I Love प्रेरणा... still you are asking मी...?

राजीव: That I Know very वेल... पण मग आता काय करणार आहेस...?

प्रतिक: खरं सांगू तर मला ही नाही समजत आहे काय करू ते.... आजीची तब्येत ठीक असती तर मी कालच तिला सांगणार होतो... पण तिच्या तब्येतीमुळे मला ही कळत नाही आहे काय करू ते...

राजीव: मग करणार आहेस का एंगेजमेंट...?

प्रतिक: नाही.... या बोटात अंगठी जाईल ती फक्त प्रेरणाचीच....

राजीव: आणि एंगेजमेंटच्या दिवशी काय करणार आहेस...?

प्रतिक: या बोटाला बँडेज करणार आहे...

राजीव: (त्याच्यावर हसत) म्हणजे एंगेजमेंट तर करणार आहेस याचा अर्थ...?

प्रतिक: मग आणखी काय करु... मी नकार दिल्यावर आजीने स्ट्रेस घेतला आणि तिची तब्येत पुन्हा बिघडली तर काय करु...?

राजीव: हं... यासाठीच सोना दीदीने एक सोलुशन काढलं आहे असं म्हणत त्याने त्यांचा प्लॅन सांगितला.

प्रतिक: तुला काय वाटतं हा प्लॅन successful होईल...?

राजीव: सोना दीदीने ठरवला आहे म्हणजे होईल ही... चल आलो आपण मॉलमध्ये..

प्रतिक: (कारमधून उतरत) खरंच माझी अजिबात इच्छा नाही आहे या खोट्या खोट्या एंगेजमेंटसाठी शॉपिंग करायची...

राजीव: (मोबाईल पुढे करत) ठीक आहे सांग मग आजीला तसं कॉल करून... तुला ही एंगेजमेंट करायची नाही आहे ते...

प्रतिक: (मोबाईल त्याच्या खिशात ठेवत) तुला माहित आहे मी आजीच्या तब्येतीवर बेतेल असं काहीही करणार नाही आहे... मला तिची तब्येत ठीक होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

राजीव: बरं तर मग चल...

तसे दोघेही सोना, समीर आणि रेखा जिथे थांबले होते तिथे गेले. सगळे मॉलमध्ये wedding collection असलेल्या एका शॉप मध्ये गेले. सोना समीरला घेऊन तिच्या आवडीच्या collection मध्ये गेली. पाठोपाठ रेखा राजीवचा हात धरुन ओढत तिच्या आवडीच्या collection मध्ये गेली. राजीवला प्रतिकला एकटं सोडून जायचं नव्हतं पण रेखाने त्याला जबरदस्तीने हात धरून ओढत नेलं होतं. प्रतिक सगळे त्यांच्या त्यांच्या आवडीचं collection बघायला गेल्यावर बराच वेळ एकाच ठिकाणी उभा होता. त्याला असं उभं राहिलेलं पाहून शॉपमधली customer assistant त्याच्याकडे आली.

कस्टमर असिस्टंट: सर, काही मदत हवी होती का...?

प्रतिक: (नुसतंच उभं रहावं तरी पंचायत म्हणून प्रतिक काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेला) ते मला wedding collection बघायचं होतं.

कस्टमर असिस्टंट: ओके सर, या माझ्या बरोबर... तुम्हाला आमचं लेटेस्ट कलेक्शन दाखवते असं म्हणत ती त्याला घेऊन गेली. ती त्याला एक एक ड्रेस दाखवत होती. प्रतिक त्याच्या मनात नसताना सुद्धा फक्त बघत होता. तेवढ्यात तिला दुसऱ्या एका कस्टमरने आवाज दिला.

कस्टमर असिस्टंट: (प्रतिकला) सर, तुम्ही बघा हे collection... आणि काही अजून variety हव्या असतील तर मला सांगा मी तुम्हाला दाखवेन. मला ते कस्टमर आवाज देत आहेत सो मला जावं लागेल.

प्रतिक: ओके ओके नो प्रॉब्लेम...

कस्टमर असिस्टंट: thank you sir म्हणत ती दुसऱ्या कस्टमरच्या दिशेने गेली. ती गेल्यावर पुन्हा परत कोणी येऊ नये म्हणून प्रतिक असंच collection बघत बसला होता. बघत असताना त्याची नजर एका couple collection कडे गेली. त्यातला लेहेंगा बघून त्याला प्रेरणाची आठवण झाली. त्याला तिचं आणि त्याचं बोलणं आठवलं...

(भूतकाळात)

प्रतिक: प्रेरणा, आपल्या एंगेजमेंटला तू काय wear करशील...

प्रेरणा: अं हं मी नाही सांगणार...

प्रतिक: (तिला जवळ ओढत) खरंच नाही सांगणार... ठीक आहे तर मग मी पण नाही तुला काही सांगणार...असं म्हणत त्याने तिला नाटकी रागात स्वतः पासून दूर केलं.

प्रेरणा: (त्याच्या नाकाला तिचं नाक लावून) कोणाच्या तरी नाकावर राग आलेला दिसतोय...

प्रतिक: तुला काय त्याचं... तुला तर नाही ना काही सांगायचंय...

प्रेरणा: (त्याचे कान पकडून) सॉरी ना बाबा.... आता तरी गेला ना राग तुमचा...?

प्रतिक: असा नाही जाणार तो राग... आधी सांग बघू तू एंगेजमेंटला काय वेअर करणार ते...

प्रेरणा: मी full एम्ब्रॉयडरी मध्ये purple कलरचा लेहेंगा घालेन... आणि त्यावर त्याच कलरची दुपट्टा असेल... आता तुम्ही सांगा बरं तुम्ही काय वेअर करणार...

प्रतिक: (तिची हनुवटी पकडून) तुझं आणि माझं असं काही वेगळं थोडीच असणार आहे... मला तुझ्या रंगातच स्वतःला एकरूप व्हायला आवडेल.. त्याचं बोलणं ऐकून प्रेरणाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

प्रतिक: (तिचे डोळे पुसत) ए वेडू रडतेय का...

प्रेरणा: मी रडत नाही आहे... हे तर आनंदाश्रू आहेत...

प्रतिक: आनंद झाला तर तो हसून ही व्यक्त करता येतो की... त्यासाठी डोळ्यांत पाणी कशाला हवं... आपल्या एंगेजमेंटला आनंदात ही तुझ्या डोळ्यांत मला पाणी दिसता कामा नये... नाहीतर...

प्रेरणा: (त्याच्या डोळ्यात पाहत) नाहीतर काय करणार तुम्ही...?

प्रतिक: (तिला भिंतीला टेकवत) तुला सगळ्यांच्या समोर उचलेन...

प्रेरणा: (त्याला लाडाने मारत) प्रतिक तुम्ही पण ना...

तसं प्रतिकने तिला हसत मिठीत घेतलं...

 

(वर्तमानात)

प्रतिक लेहेंगा बघून एकटाच प्रेरणा आणि त्याचं बोलणं आठवून हसत होता. तोवर राजीव त्याला शोधत शोधत तिथे आला.

राजीव: झाली का शॉपिंग...? आणि असा एकटाच का हसतोय...?

प्रतिक: काही नाही रे... हा लेहेंगा बघून मला प्रेरणाची आठवण झाली... बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो डोळे पुसत तिथून पुढे निघून गेला. राजीवने एकवार त्या लेहेंग्याकडे पाहिलं.... आणि तो ही प्रतिकच्या मागोमाग निघाला. सोना, समीर, रेखा आणि राजीवची मनसोक्त शॉपिंग करुन झाल्यावर सगळेजण जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जेवून घरी जायला निघाले.

***

 

आजी तिच्या रुममध्ये बसून तिला ज्यांना ज्यांना स्वतःहून आमंत्रण द्यायचं होतं त्या सगळ्यांना कॉल करत होती. सगळ्यांना कॉल करुन झाल्यावर तिने राजीवच्या आईबाबांना ही कॉल केला आणि सकाळीच या म्हणून सांगितलं.... मग तिने प्रेरणाच्या नंबरवर कॉल केला. आजींचा कॉल बघून प्रेरणाने ऑफिसच्या बाहेर येत त्यांचा कॉल उचलला.

प्रेरणा: हां आजी बोला...

आजी: प्रेरणा, तुला तर राजीवकडून समजलंच असेल ना... प्रतिकचा साखरपुडा आहे ते...

प्रेरणा: (स्वतःला कशीबशी सावरत) हो आजी...

आजी: मग तू येतेय ना...?

प्रेरणा: नाही आजी मी नाही येत आहे...

आजी: प्रेरणा तुला यावं लागेल...

प्रेरणा: (हुंदका आवरत) आजी तुम्ही मला नका फोर्स करु...प्लिज...

आजी: हे बघ प्रेरणा, तुला वाटतं ना प्रतिकने लग्न करावं असं... आयुष्यात पुढे जावं तर मग तू यायलाच हवं... आणि तू नाही आलीस तर त्यामुळे त्याला असं वाटेल तुझं आज ही त्याच्यावर प्रेम आहे... म्हणून तू यावं असं मला वाटतं. हवं तर ती माझी विनंती समज...

प्रेरणा: आजी...(तिला पुढे काही बोलवेना)

आजी: तुझी आजी समजून तरी माझ्या विनंतीला मान देऊन ये... येशील ना मग...

प्रेरणा: (पुन्हा हुंदका आवरत) हं... आजी मी कॉल ठेवते ऑफिसच काम खूप बाकी आहे.

आजी: बरं... कर तू काम... पण नक्की ये... मी वाट पाहेन तुझी...

आजीशी बोलणं झाल्यावर प्रेरणाने तिचे डोळे पुसले आणि पुन्हा तिच्या डेस्कवर काम करण्यासाठी निघून गेली.

***

 

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे प्रेरणा आईला कामात मदत करत होती. पण प्रेरणाचं कामात लक्ष बिलकुल नव्हतं. चपाती भाजता भाजता तिच्या हाताला चटका लागला. आईने चटकन तिचा हात तव्यापासून दूर केला. तशी प्रेरणा भानावर आली.

आई:(तिचा हात पाण्याखाली धरून) प्रेरणा, काही झालं आहे का ऑफिस मध्ये..

प्रेरणा: नाही ग आई...

आई: मग तुझं लक्ष नाही आहे कामात... हे काय चटका लावून घेतलास हाताला...

प्रेरणा: आई थोडं तर लागलं आहे तू उगाच काळजी करतेस... (पण माझ्या मनाला जी जखम झाली आहे तिचं मी काय करु आई... ती स्वतःशीच म्हणाली)

आई: जा बघू तू काहीतरी मलम लावून घे त्याला... मी बघते इथे काय करायचं आहे ते... असं म्हणत आईने तिला तिच्या रुममध्ये पाठवलं.

 

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...