Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५७

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५७
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५७


प्रतिकने कोणी हात पकडला हे बघण्यासाठी मागे वळून पाहिलं.

प्रतिक: विवेक तू...? हात सोड माझा.... या मुलाला मी असं नाही सोडणार आहे.

विवेक: मी त्याला मारु नाही देणार तुम्हाला...

प्रतिक: तू त्याला ओळ्खतोस...?

विवेक: (प्रतिकचा हात सोडत) फक्त मी नाही तर प्रेरणा दीदी पण त्याला ओळखते...!!

प्रतिक: प्रेरणा पण ओळखते...(नंतर स्वतःच्याच मनाशी म्हणाला, मग मी विचारलं तेव्हा ती का काही बोलली नाही.)

विवेक: (त्या मुलाची ओळख करुन देत) हा सुहास, प्रेरणा दीदी ज्या आश्रमामध्ये अधून मधून काम करते त्याच आश्रमामध्ये हा राहतो आणि सुहास हे आमचे प्रतिक सर, बॉस म्हणून नाही तर फ्रेंड म्हणून आम्हाला ट्रीट करतात. He is very nice person. प्रतिकने सुहास बरोबर हात मिळवला.

प्रतिक: (विवेकला) म्हणजे प्रेरणा तिकडे जॉब करते..?

सुहास: (विवेक काही बोलायच्या आधीच) नाही, दीदी आश्रमाच्या ऑफिसचं काम करते पण कोणत्याही मोबदल्याशिवाय करते आणि कोणालाही काहीही मदत हवी असेल तर ती नेहमी तयार असते. मला पुढे शिकायचं होतं पण पैसे कुठून आणू म्हणून मी पुढे न शिकता जॉब करायचं असं ठरवलं होतं पण प्रेरणा दीदीला कुठून कळालं माहीत नाही तिने मला पुढे शिकण्यासाठी तयार केलं.... आणि त्यासाठीच तुमच्या ऑफिसमधून loan च्या प्रोसेससाठी मी येत होतो. ती मला कालच हे ही म्हणाली की, काही legal related work असेल तर तिच्या ओळखीचे कोणी advocate राजीव सर आहेत... त्यांच्याशी ती बोलेल.

प्रतिक: तू मला हे मघाशी का नाही सांगितलं...

सुहास: तुम्ही अचानक येऊन मला पकडलं... आणि मुळात मी तुम्हाला ओळ्खतही नव्हतो... आणि तुम्ही प्रेरणा दीदी बद्दल बोलू लागलात म्हणून मग माझं ही डोकं सटकलं. सॉरी मी तुमच्याशी ज्या शब्दांत बोललो त्याबद्दल...

प्रतिक: (त्याच्या पाठीवर हात थोपटत) खरं तर माझंच चुकलं... मी असं वागायला नको होतं. I am extremely sorry for my behaviour....

सुहास: It's Ok Sir...

प्रतिक: आणि तुला माझ्या एन्ड ने काहीही मदत हवी असेल तर कोणताही संकोच न बाळगता सांग...

सुहास: ओके चालेल सर... मी निघतो आता... (मग विवेककडे पाहून त्याला मिठी मारून) चल विवेकभाई... मी येतो...

दोघेही: (सुहासला) बाय बाय...

सुहास जाताक्षणी विवेक तिकडे जास्त वेळ न थांबता लगेच ऑफिसच्या दिशेने चालू लागला.

प्रतिक: (त्याला थांबवण्याच्या उद्देशाने) विवेक, थांब जरा मी पण ऑफिस मध्येच येत आहे. विवेक त्याला थांबायचं नव्हतं तरी थांबला.

विवेक: सर, ते मी आधीच late होतो आणि तुम्हां दोघांना असं पाहून थांबलो त्यामुळे अजून late झाला म्हणून घाईने निघत होतो.

प्रतिक: अरे हो, मान्य आहे पण तुला आता माझ्यामुळेच उशीर झाला ना... आणि मला तुझ्याशी काही बोलायचं पण होतं... जे मी ऑफिस मध्ये बोलू नव्हतो शकत...

विवेक: (चपापून प्रतिककडे पाहतो) काय बोलायचं होतं सर...?

प्रतिक: प्रेरणाच्या हाताला काय झालं...?

विवेक: (त्याच्याकडे न बघता बोलला) काही नाही ते जरा लागलं काल...

प्रतिक: जरा लागलं तर मग बँडेज लावतात का...? विवेक, एक मित्र समजून तरी मला खरं खरं सांग... तो एकदम काकुळतीला येऊन बोलत होता.

विवेक: सर, मित्र म्हणून मी बोलावं तर तुम्ही या मित्राचं एक म्हणणं ऐकालं का...?

प्रतिक: हो बोल ना..!

विवेक: तर मग सर, दीदीने असं काही करता कामा नये असेल आणि तिने खूश रहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर यापुढे तुम्ही दीदी पासून लांब रहा...

प्रतिक: काय बोलतोय तू विवेक... तुला ही माहीत आहे की आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते...

विवेक: सर, तुमच्या सगळ्यांच प्रश्नांची मी उत्तरं नाही देऊ शकत... पण तुम्हांला खरंच जर दीदीने पुन्हा स्वतःला त्रास करुन नको घ्यावा असं वाटत असेल तर प्लीज तुम्ही तिच्या पासून दूर रहा..आणि तिच्याशी कोणत्याही विषयावर यापुढे बोलू नका... विवेक हात जोडून प्रतिकला विनंती करुन तिथेच न थांबता सरळ ऑफिस मध्ये निघून गेला.

प्रतिक: (स्वतःशीच) काय बोलला विवेक.... प्रेरणापासून दूर राहू... काय कारण असेल यामागे..?

तो विचार करत करतच ऑफिसच्या दिशेने निघाला.

***

 

ऑफिसच्या कामात त्याने स्वतःला झोकून दिलं होतं. पण प्रेरणा अशी नक्की का वागतेय हा विचार त्याला शांत बसू देत नव्हता. तो अधून मधून काम करता करता प्रेरणाच्या डेस्ककडे नजर टाकत होता. सरांशी झालेल्या मीटिंगमध्ये पुन्हा एकदा एक दोन दिवसात त्याला बेंगलोरला ऑफिसच्या कामासाठी जावं लागणार आहे असं सांगण्यात आलं. त्याच्या मनात आलं, आम्ही एकमेकांपासून दूर राहिलो तर प्रेरणा मला मिस करुन एकदा तरी कॉल करेल. पण त्याला कुठे कल्पना होती पुढे काय घडणार याची.

***

 

प्रतिक एक आठवड्यासाठी बेंगलोरला जाणार होता. बेंगलोरला जाण्याच्या एक दिवस आधी त्याने प्रेरणाला मेसेज केला की त्याचे काका त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधायला लागले आहेत पण मी पण त्यांना आता सांगणार आहे की मी आधीच एक मुलगी पसंत केली आहे. त्याला अपेक्षा होती की ती त्याला मेसेज करेल त्याच्याशी बोलेल आणि त्यांच्यातलं प्रेम पुन्हा बहरेल पण झालं वेगळंच. तिने त्याला मेसेज केला, ओह ग्रेट तुम्ही लग्नासाठी मुलगी बघण्याचा विचार केला हे खूप छान केलं. All the best for your partner search.. तिचा मेसेज वाचून प्रतिकला वाईट वाटलं. पण हार मानेल तो प्रतिक कसा... त्याने विचार केला की आपण फक्त प्रेरणाला दाखवायला एक मुलगी पसंत करण्याचं नाटक करु म्हणजे आधी जसं राजीवने रेखाला मुद्दामून प्रेरणा समोर पुढे केल्यावर प्रेरणाला वाईट वाटलं होतं आणि तिने तिचं प्रतिकवरचं प्रेम कबूल केलं होतं तसंच आता ही काहीतरी होईल आणि त्याच्या पासून दुरावलेली त्याची प्रेरणा पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल. त्याने आजीच्या रुममध्ये जाऊन सांगितलं, आजी काका जी स्थळं आणेल ती तू बघ आणि त्यातून तुला योग्य वाटेल ती मुलगी निवड... आजीला प्रतिकचं बोलणं ऐकून थोडं आश्चर्य वाटलं पण लगेच ती खूश ही झाली. आजीने लगेच प्रतिक त्याच्या रुममध्ये गेल्यावर प्रेरणाला कॉल करुन तिच्या सांगण्यानुसार प्रेरणा त्याच्या आयुष्यातून दूर झाली यासाठी तिचे आभार मानले. प्रेरणाने आजीचा कॉल ठेवल्यावर ती मात्र पूर्णपणे कोलमडली आणि रात्रभर उशीत तोंड खुपसून रडत राहिली.

***

 

प्रतिक दुसऱ्या दिवशी बेंगलोरला गेला. प्रेरणा त्याला तिकडच्या ऑफिस मध्ये कामाच्या निमित्ताने सुद्धा बिलकुल कॉल करत नव्हती.. प्रतिकने लवकरात लवकर मुंबईत येण्यासाठी कामाचा सपाटा लावला. तो रात्री फक्त 5 तास झोप घेऊ लागला. त्याचं खाण्या पिण्याकडे दुर्लक्षचं होऊ लागलं होतं. आईबाबा, सोना दिदी त्याला अधून मधून ऑफिसच्या नंबरवर कॉल करत होते. पण कॉल येत नव्हता तो फक्त प्रेरणाचा.... कधी एकदा मुंबईला जाऊन प्रेरणाला असं त्याच्यापासून दूर होण्याचं कारण विचारतोय असं त्याला झालं होतं. असेच तीन-चार दिवस त्याचे कामात निघून गेले.

***

 

सकाळी 10 च्या आसपास प्रतिकच्या घरची अचानक बेल वाजली. मिलिंदने दरवाजा उघडला. समोर आजीच्या भजनमंडळातील मैत्रीणी होत्या. त्याने सगळ्यांना आत घेत सोफ्यावर बसायला सांगितलं आणि मिलिंद आईला बोलवायला गेले. आईच्या रुममध्ये जाता जाता त्यांनी किचनमध्ये नंदाला कोण आलं आहे ते सांगितलं. आजी मिलिंदबरोबर बाहेर लिविंग रुममध्ये येईपर्यंत नंदा किचनमधून सगळ्यांना पाणी घेऊन आली.

देशपांडे आजी: नंदा कशी आहेस.. आणि तुझे classes कसे चालू आहेत आमची सुनबाई पण म्हणतेय नंदा ताईकडून cake products शिकायचं...

नंदा: (हसून) मी मस्त काकू, हो हो नक्की शिकवेन शामलला...

तोपर्यंत आजी मिलिंद बरोबर बाहेर आल्या आणि दोघेही समोरच्या खुर्चीत बसले.

जाधव आजी: (आजींना) शशी तब्येत ठीक नाही वाटतं...

आजी: हो ग, थोडा तापामुळे अशक्तपणा आला आहे...

देशपांडे: मग आता तू येणार नाही तर...

आजी: कुठे..?

बर्वे आजी: अग अशी काय करते शशी, तुला सांगितलं तर होतं मी गेल्या आठवड्यात...!!

आजी: अग हो, विसरलेच बघ मी...

देशपांडे: मग येतेय ना...की नाही...?

आजी: येणार तर...

मिलिंद: आई, कुठे जायचं म्हणतेय...?

आजी: अरे, देशपांडे काकूंच्या इकडे एक विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे बुवांचं कीर्तन आहे... तर तिथे जातोय आम्ही... आणि जाता जाता मध्ये सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहोत.

नंदा, मिलिंद: पण आई तुझी तब्येत.... 

आजी: आता मी ठीक आहे... आणि तुम्ही थांबवून मी थोडीच थांबणार आहे... तर मग हसत हसत मला जायची परवानगी द्या.

मिलिंद: (काळजीने) तुम्ही जाणार कसे आहात...? देशपांडे काकूंच्या एरियामध्ये...? आणि किती दिवस आहे कीर्तन...?

देशपांडे: अरे मिलिंदा, तुझी काळजी समजते रे मला... पण आम्ही तुझ्या आईला सांभाळून नेऊ आणि सांभाळून सोडू घरी...

आणि फक्त काही तासांचा तर प्रश्न आहे... आणि तसं ही माझं घर तुमच्या घरापासून फार दूर कुठे आहे..? 

नंदा: पण काकू, आईंना अजून अशक्तपणा आहे...

जाधव: नंदा, सांभाळू ग आम्ही आमच्या मैत्रीणीला...

बर्वे: मग निघायचं का..?

आजी: अग अशी काय करतेय, मला माझे कपडे तर बदलून घेऊ दे.. म्हणत आजी रुममध्ये गेल्या. तोपर्यंत नंदा सगळ्यांसाठी खायला घेऊन आली. सगळ्यांच खाऊन झाल्यावर आजी मिलिंद आणि नंदाचा निरोप घेऊन निघाली.

***

 

आजी आणि तिच्या मैत्रिणी मस्तपैकी गप्पागोष्टी करत कारमधून दादरला सिद्धिविनायकला जायला निघाले. रस्त्यात त्यांची कार ट्रॅफिकमुळे थांबली होती. ट्रॅफिक काही निघत नव्हतं म्हणून आजी काचेतून बाहेरच्या गोष्टींचं निरीक्षण करत होती. तोच आजीचं रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला साईडला बसलेल्या गजरे विकणाऱ्या मुलीकडे लक्ष गेलं. साधारण ती मुलगी 15-16 वय असल्यासारखी वाटत होती. ती मुलगी तिच्या कामात बिझी होती. तोच काही टारगट मुलं तिच्या आजूबाजूला गोळा झाली आणि तिची छेड काढू लागली. ती मुलगी त्यांना सोडून द्या म्हणून विनंती करत होती. पण कोणी तिचं ऐकत नव्हतं. आजूबाजूची लोकं ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. हा सगळा प्रकार पाहून आजीला राग आला आणि ती कारमधून उतरायला बघू लागली. पण तिची तब्येत ठीक नसल्याने कोणीही तिला उतरु देईना. आजी खाली उतरायचंच आहे म्हणून हट्टाला पेटली. शेवटी जाधव आजी म्हणाल्या, शशी मी उतरुन बघते थांब... त्या उतरुन जाणार तेवढ्यात आजीचं पुन्हा त्या मुलीकडे लक्ष गेलं. आता त्या ठिकाणी त्या मुलीबरोबर एक scooty वरची स्कार्फ घातलेली मुलगी दिसली आणि त्या मुलीच्या हालचालींवरून स्कार्फ मधली मुलगी त्यांना ओरडत असल्याचं आजीच्या लक्षात आलं. ती त्यांना ओरडत असतानाच पोलिस त्या ठिकाणी आले.. आणि त्या टारगट मुलांना पकडून घेऊन गेले. गजरे विकणाऱ्या मुलीने तिला वाचवलं म्हणून स्कार्फ मधल्या मुलीचे आभार मानले. त्या मुलीने तिला मायेने कुरवाळून काळजी घ्यायला सांगून तिच्याकडचे काही गजरे विकत घेतले आणि डोक्यावर हेल्मेट घालत scooty वर निघण्यासाठी बसली. आजीला स्कार्फ मधल्या मुलीचं खूप कौतुक वाटलं. आजीने जाधव आजींना त्या स्कार्फ मधल्या मुलीच्या scooty चा फोटो काढायला सांगितला जेणेकरून आजी त्या मुलीला पुन्हा भेटली तर ओळखू शकेल. 

आजींना असं वागताना पाहून देशपांडे आजी म्हणाल्या, शशी काय नातवासाठी मुलगी शोधतेय का... जे त्या मुलीच्या scooty चा फोटो काढायला सांगितलं....? त्यांचं बोलणं चालू असतानाच ती मुलगी scooty start करुन निघून गेली.... आणि त्यांच्या दिशेचं ट्रॅफिक ही निघून त्यांची कार सिद्धिविनायकच्या रस्त्याला निघाली.

आजी: नाही ग... तिच्या धाडसाचं खूप कौतुक वाटलं मला... कधी भेटलोच पुन्हा तर नक्की तिला शाबासकी देईन... पण तू म्हणतेस तसं ही काही करायला हरकत नाही म्हणा... मला अशीच धाडसी नातसून हवी आहे माझी... 

बर्वे: हं म्हणजे शशीने बघायला सुरवात केली आहे तर...

जाधव: पण शशी तुझा नातू मान्य करेल का तूझी पसंत...?

आजी: हो... का नाही करणार... उलट त्याने मलाच शोधायला सांगितलं आहे...

देशपांडे: वाह वाह शशी... याचा अर्थ यंदा तू नातसून घेऊनच येणार तर...

अशाच त्यांच्या गप्पा रंगल्या असताना त्यांची कार सिद्धिविनायकला पोहचली आणि सगळ्याजणी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन महालक्ष्मीला जायला निघाले.

***

 

महालक्ष्मी मंदिरात पोहचल्यावर आजीला मंदिराच्या बाहेर त्याच नंबरची scooty दिसली. आता त्या मुलीशी भेटून बोलायचंच असं आजीने मनाशी ठरवलं. देवीचं दर्शन घेत असताना आजी देवीला म्हणाली, मला माझ्या प्रतिकसाठी एक खूप चांगली बायको हवी आहे.... तू मला अशा मुलीशी भेट घडवून आणून दे... जी माझी नातसून होईल. अचानक आजीच्या बंद डोळ्यासमोर तीच स्कार्फवाली मुलगी दिसली... आणि घंटानाद झाला. आजीने आनंदाने डोळे उघडले आणि मार्ग दाखवल्या बद्दल देवीचे आभार मानले. दर्शन घेऊन झाल्यावर आजीला तीच मुलगी काही लहान मुलांना एकत्र घेऊन बोलताना पाठमोरी दिसली. आजी तिच्याजवळ जाणार तोच ती त्या मुलांसोबत बाहेर पडली. आजी ही तिला पाहण्यासाठी तिच्या मागोमाग निघाली. आजीने दुरुन पाहिलं, त्या मुलीने सगळ्या लहान मुलांना एका बसमध्ये बसवलं.... आणि ड्रायव्हरला काहीतरी सांगत ती तिच्या scooty कडे वळली. ती वळल्यावर आजीला scooty वरच्या मुलीची एक झलक पाहायला मिळाली. तोच मागून देशपांडे आजींनी आजीला आवाज दिला. 

 

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...