Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५५

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५५


प्रतिक 8 ची flight आहे म्हणून लवकर उठून तयार झाला. आईने त्याला गरमागरम नाश्ता खायला दिला. बाबा त्याच्याच बाजूला काहीतरी विचार करत बसले होते.

प्रतिक: (नाश्ता करत करत) बाबा, कसला एवढा विचार करत आहात...? आजी तर आता ठीक आहे... थोडा अशक्तपणा आला आहे इतकंच म्हणाले ना डॉ...

बाबा: काही नाही रे, तुझ्याच लग्नाचा मनात सहज विचार आला.

प्रतिक: (चमकून वर पाहत) त्याचं काय आता बाबा, आजी तर आता लग्नाला तयार आहे ना... तुम्हा दोघांना तर प्रेरणा आधीच पसंत आहे... आणि राहिला प्रश्न तिच्या घरच्यांचा त्यांचा तर खूप आधी होकार मी घेतला आहे. तुम्ही उगाच टेन्शन घेत आहात.

बाबा यावर काहीच बोलले नाहीत... कारण त्यांना जे वाटतं आहे ते त्यांना खात्री केल्याशिवाय कोणाला ही बोलणं योग्य वाटतं नव्हतं. प्रतिकचा नाश्ता झाला तसा तो आईबाबांचा निरोप घेऊन बॅग घेऊन एअरपोर्ट वर जायला निघाला. टॅक्सीमध्ये त्याने प्रेरणाचा काही रिप्लाय आला आहे का बघितलं. तिला पाठवलेला मेसेज अजून ही single tick दाखवत होता. त्याने मनात विचार केला कदाचित काल ती थकली असेल म्हणून मेसेज चेक केला नसेल. त्याने तिला पुन्हा एक मेसेज केला.... गुड मॉर्निंग डिअर, मी बेंगलोरला ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी जातोय.... किती वेळ लागेल सांगू नाही शकत... तिकडे रेंज असेल तर मी कॉल करेन. लवकरात लवकर काम पूर्ण करुन यायला try करेन. खूप मिस करेन तुला... Love you and take care...मेसेज करुन त्याने मोबाईल खिशात ठेवला. तो एअरपोर्ट ला पोहचला. त्याने पुन्हा एकदा मोबाईल वर प्रेरणाचा काही रिप्लाय आला का बघितलं. मेसेजला अजून ही single tick च दाखवतं होतं.  flight ची अनाउन्समेंट झाली तसा तो flight पकडून काही वेळात बेंगलोरला पोहचला.

बेंगलोरच्या ऑफिसचे काही मेंबर्स त्याला welcome करायला एअरपोर्टला त्याची वाट पाहत होते. त्यांच्याशी भेट झाल्यावर तो ऑफिसने सोय केलेल्या हॉटेलमध्ये उतरला. फ्रेश वगैरे झाल्यावर त्याने मोबाईल वरुन कॉल करण्यासाठी मोबाईल चेक केला. पण तिकडे रेंज नसल्याने त्याने हॉटेलच्या landline वरुन घरी बेंगलोरला पोहचल्याच कळवलं. मग त्याने प्रेरणाच्या मोबाईलवर कॉल केला. प्रेरणाचा नंबर अजूनही switch off येत होता. अशी काय ही, अजूनही मोबाईल switch off का येतोय. ठीक आहे.. ती ऑफिसमध्ये गेल्यावर नक्की बेंगलोरच्या ऑफिसमध्ये कॉल करेल मग बोलेन.... त्याने स्वतःच्या मनाला समजावलं आणि बेंगलोरच्या ऑफिसमध्ये जायच्या तयारीला लागला.

***

 

प्रेरणाने ऑफिसमध्ये जायची तयारी करताना मोबाईल switch on केला. मोबाईल on करताक्षणी प्रतिकचे रात्रीपासून सेंड केलेले मेसेजचं नोटिफिकेशन दाखवू लागलं. मेसेज बघू की नको याचाच तिच्या मनात विचार येऊ लागला. शेवटी तिने ऑफिसमध्ये जाऊन मेसेज चेक करायचं ठरवलं आणि तयारी करुन ऑफिसला निघाली. ऑफिसमध्ये गेल्यावर तिने ऑफिस ग्रुपवर send केलेले प्रतिकचे मेसेज वाचले. म्हणजे प्रतिक बेंगलोरला गेले आहेत... एका अर्थी बरंच झालं प्रतिक इथे नाहीत ते... मी कशी फेस करणार होती...त्यांना...तिने मनाशीच विचार केला आणि कामात स्वतःला झोकून दिलं. प्रतिकही ऑफिसमध्ये गेल्यापासून तिकडे झालेले प्रॉब्लेम solve करण्यात इतका बिझी झाला होता की त्याला लंचचं ही भान नाही राहिलं. 3 च्या नंतर जेव्हा भूक अनावर झाली तेव्हा त्याने कॅन्टीनमधून काही तरी ऑर्डर करुन पोटात ढकललं आणि जेवून पुन्हा कामाला लागला. रात्री उशिरापर्यंत काम आटपून तो पुन्हा हॉटेलच्या रुमवर आला. त्याने आल्या आल्या प्रेरणाला कॉल केला पण आता ही तिचा नंबर switch off येत होता. त्याने काहीसं रागावून लँडलाईन ठेवून टाकली....आणि न जेवताच झोपी गेला. बेंगलोरचं काम आटपेपर्यंत चार- पाच दिवस होऊन गेले. या दिवसांत प्रेरणा प्रतिकच्या आजीला कॉल करुन त्यांची तब्येत विचारत होती आणि आजी ही तिला त्याच्यापासून दूर राहायची सतत आठवण करून देत होत्या. आजीच्या सांगण्याप्रमाणे त्याच्यापासून दूर राहायचं म्हणून प्रेरणाने त्याला कॉल केला नाही आणि तिच्यावर रागावून नंतर प्रतिकने ही तिला कॉल केला नाही. शेवटी सहाव्या दिवशी तो ऑफिसमध्ये आला. त्याने पाहिलं प्रेरणा तिच्या कामात इतकी बिझी होती की तो आला याकडे ही तिचं लक्ष नव्हतं. तो रागाने कोणालाही गुड मॉर्निंग रिप्लाय न देता केबिनमध्ये निघून गेला. समिधा आणि मीनाला त्याला असं रागाने जाताना पाहून थोडं आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रेरणाला काही विचारावं म्हणून तिच्याकडे पाहिलं तर तिला प्रतिक आलेल्याचं ही भान नव्हतं इतकी ती कामात हरवून गेली होती. मग त्यांनी तिला काही विचारलंच नाही. थोड्या वेळाने प्रतिकने प्रेरणासकट सगळ्यांना केबिनमध्ये मिटिंगसाठी बोलावलं. सगळ्यांबरोबर जायचं होतं म्हणून प्रेरणा प्रतिकच्या केबिनमध्ये गेली. प्रतिक मीटिंगमध्ये प्रेरणाकडेच पाहून बोलत होता पण ती त्याच्याकडे न पाहता डायरीत फक्त त्याचे पॉईंट note down करत होती. त्याला तिचं असं वागणं बघून प्रचंड राग येत होता. त्याने स्वतःवरचा राग आवरत कशीबशी मीटिंग आटपवली. सगळेजण निघून गेल्यावर त्याने प्रेरणाच्या अशा वागण्याच्या रागाने भिंतीवर त्याचा हात जोरात आपटला. पर्सनल आयुष्य प्रोफेशनल कामात कधीही न आणणारा तो आज मात्र कमालीचा अस्वस्थ होत होता. तिच्या बरोबर नजरानजर व्हावी म्हणून तो केबिनबाहेर फिरत फिरत कॉलवर बोलत असल्याचं दाखवू लागला. त्याने तिच्याकडे कॉल वर बोलता बोलता पाहिले, ती समोरच्या कस्टमरशी एकदम जवळची ओळख असल्यासारखी हसत खेळत बोलत होती. तो तिच्याकडे पाहतोय याकडेही तिचं लक्ष नव्हतं. ती एका कस्टमरशी इतकी क्लोज असल्यासारखी बोलतेय हे पाहून तो तसाच रागात त्याच्या केबिनमध्ये पुन्हा निघून गेला.

***

 

असेच एक दोन दिवस निघून गेले. प्रेरणा आजीमुळे प्रतिक पासून दूर राहत होती तर प्रतिक तिच्यावर रागावल्यामुळे...

आज आजीचं रेग्युलर चेकअप होतं. प्रतिकचे बाबा डॉ कडे तिला घेऊन गेले. घरी येतेवेळी त्यांना राजीवचं ऑफिस रस्त्यात दिसलं. तशी आजी म्हणाली, मिलिंदा हे आपल्या राजीवचं ऑफिस ना रे...?

मिलिंद: हो आई...

आजी: बरेच दिवस झाले राजीव भेटला नाही, चल जाऊ त्याला ऑफिसमध्येच भेटायला...!!

तसे दोघेही त्याच्या ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये त्याची रिसेप्शनिस्ट कॉम्प्युटर वर काही काम करत होती. त्याची असिस्टंट नेहा तिच्या डेस्कवर काम करत होती. आजीने जेव्हा ऑफिस पाहिलं होतं तेव्हापासून आतापर्यंत फार काही बदललं नव्हतं पण नेहमीच्या लादी पुसणाऱ्या मावशींच्या जागी एक वेगळीच बाई आजीने काम करत असलेली पाहिली. मिलिंदने रिसेप्शनिस्ट कडे जाऊन राजीव फ्री आहे का विचारलं. तसं तिने त्याला कॉल केला. एक client आत राजीव बरोबर असल्यामुळे तिने 5 मिनिटे बाहेरचं त्यांना सोफ्यावर बसायला सांगितलं. दोघेही बाहेर सोफ्यावर बसले असताना मिलिंदला डॉ च्या क्लिनिक मधून ते त्यांचे काही रिपोर्ट्स डॉ कडेच विसरल्यामुळे कॉल आला.

मिलिंद: आई, ते डॉ नी काही रिपोर्ट्स घेतले होते ते तिथेच राहून गेले आहेत. तर तू इथेच थांब मी लगेच जाऊन येतो म्हणत ते पुन्हा क्लिनिक मध्ये गेले. आजी सोफ्यावर बसून कोण कोण काय काय काम करत आहेत ते बघत होत्या. मावशीच्या जागी आलेल्या बाईचं काम पाहून आजीला तिचा कामातला टापटीपपणा जाणवला. आजी तिचं काम पाहून खूश झाल्या. राजीवने मावशींच्या जागी योग्य व्यक्तीला कामावर ठेवलं आहे त्या स्वतःशीच बोलल्या. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने आजीला राजीवच्या केबिनमध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणून आवाज दिला. आजींना केबिनमध्ये आलेलं पाहून राजीव खुर्चीवरुन उठला आणि त्याने आजींना बसायला सांगितलं.

राजीव: आजी, तुम्ही पण आलात... मला वाटलं फक्त काका आले आहेत...

आजी: का रे, आजीने येऊ नये का नातवाच्या ऑफिसमध्ये..?

राजीव: अं, तसं नाही काही आजी, तुमचं येणं unexpected होतं... so थोडं आश्चर्य वाटलं इतकंच...

आजी: बरं... तसं फार काही बदल नाही केले तू ऑफिसमध्ये...

राजीव: हो आजी... 

आजी: फक्त मावशींच्या जागी काम करायला नवीन बाई ठेवल्या.

राजीव: हां आजी, मावशीचं वय झालं होतं आणि त्यांची मुलं ही आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत तर मग त्यांनी यापुढे शक्य होणार नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी मी शोधतच होतो या कामासाठी कोणी मिळत आहे का आणि त्या बाईंना कामाची त्यावेळी खूप गरज होती... तिच्या मुलीची जबाबदारी तिच्यावरच होती. मग मी प्रतिकला विश्वासात घेऊन याबद्दल सांगितलं आणि त्यांना कामावर ठेवलं.

आजी: या कामासाठी बाई ठेवताना प्रतिकला का बरं तुला सांगावं असं वाटलं...? आणि तिचा नवरा काय करतो... जे घरची जबाबदारी तिच्यावरच आली म्हणतोय ते...!!

राजीव: (थोडा वेळ शांतच राहिला आणि मग बोलला) आजी ती नरेशची बायको आहे... आणि तिच्या नवऱ्यामुळे तिला काम मिळणं अशक्य होतं.

आजी: म्हणजे... आणि हा नरेश कोण आहे...?

राजीव: आजी, तुम्हाला प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल माहित आहे का..?

आजी: (थोडा वेळ गप्प राहून) त्याचा इथे काय संबंध..?

राजीव: आजी, त्या 2 आरोपींमधला एक आरोपी नरेश होता.

आजीला सगळं ऐकून क्षणभर डोक्यात मुंग्या आल्यासारखं झालं.

आजी: तिला दुसरीकडे मिळालं नसतं का काम...? तू तिला तुझ्याकडेच का ठेवलं कामाला...?

राजीव: (गालातल्या गालात हसला) आजी, एखादी घरकाम करायला बाई ठेवताना ही आजकाल खूप चौकशी केली जाते त्या बाईची... आणि हिच्या नवऱ्याबद्दल कळल्यावर तिला कोण ठेवणार होतं कामासाठी...? आणि ती खूप प्रामाणिक आहे... काम पण तिचं काहीही चुका न काढण्यासारखं असतं... मग आणखी काय हवं...!!

तोच राजीवचा लँडलाईन वाजला.

राजीव: हां चालेल पाठव तिला आत म्हणत त्याने कॉल ठेवला.

आजी, जरा वेळ द्याल मला... आपण आता जिच्याबद्दल बोलत आहोत... तिचंच काहीतरी महत्त्वाचं काम आहे.

आजी: हं हरकत नाही... बोल तू... मी आहे तिथे सोफ्यावर बसून....असं म्हणत आजी बाजूलाच असलेल्या सोफ्यावर जाऊन बसल्या. थोड्या वेळाने नरेशची बायको मंजू राजीवच्या केबिनमध्ये आली. आजी सोफ्यावर बसल्या आहेत हे तिच्या लक्षातच आलं नाही.

राजीव: हां बोला ताई, काय काम होतं तुमचं...?

मंजू: ते दादा, मला कुठे छोटीशी भाड्याने राहायला जागा असेल तर सांगाल का...?

राजीव: पण तुम्ही आता राहतात ती जागा तर खूप चांगली आहे... काही पैशांचा प्रॉब्लेम होतो आहे का...?

मंजू: नाही पैशांचा प्रॉब्लेम नाही आहे... पण आजूबाजूच्या लोकांना आम्ही तिथे राहू नये असं वाटतं आहे...

राजीव: अं, असं का पण...?

मंजू: त्यांना कुठून तरी नरेशबद्दल समजलं मग पूर्ण चाळभर ही गोष्ट पसरली आणि आता 2 दिवसांपूर्वी घरमालकाने आम्हाला घर खाली करायला सांगितलं आहे. दादा, खरंच तुमचे खूप उपकार होतील... मला आणि माझ्या लेकीला रहायला घर हवं आहे हो... माझ्या नवऱ्याच्या कर्माची शिक्षा आम्हाला अजून कुठपर्यंत भोगावी लागणार आहे देव जाणे... ज्या बायका स्वतःहून मोकळेपणाने माझ्याशी, माझ्या लेकीशी बोलायला यायच्या... त्या आता माझ्या नवऱ्याबद्दल कळल्यापासून मी दुरुन रस्त्यात जरी दिसले तरी रस्ता ओलांडून जातात. काय गुन्हा केला आहे मी आणि माझ्या लेकीने जी आम्हाला अशी वागणूक मिळते आहे. बोलताना मंजूच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. पुढे तिला काहीच बोलायला सुधरेना.

राजीव: ताई, तुम्ही शांत व्हा... माझ्या ओळखीचं एक हॉस्टेल आहे तिथेच मी तुमची सोय होते का बघतो... आणि आता टेन्शन नका घेऊ काहीही... यापुढे कसली ही मदत हवी असेल तर मला एक भाऊ म्हणून हक्काने सांगा...

मंजू त्याच्या बोलण्याने त्याला वाकून नमस्कार करणारच होती तोच राजीवने तिला थांबवलं.

राजीव: काय करताय तुम्ही...!!! उगाच मला शरमिंदा करु नका. आता तुम्ही कसलीही काळजी करु नका. आणि हसून घरी जावा.

त्याचं बोलणं ऐकून मंजूने डोळे पुसले आणि त्याचे आभार मानत ती त्याच्या केबीनमधून निघाली. त्या दोघांचं बोलणं ऐकून आजीच्या मनात नकळत प्रेरणाचा विचार आला. तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती पुन्हा राजीवच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसली.

 

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...