Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५३

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५३


प्रतिकच्या घरी जायचं म्हणून ऑफिसमधून घरी आल्यापासून प्रेरणा कपाटातून ड्रेस वर ड्रेस बाहेर काढून बेडवर टाकत होती. हा घालू की तो घालू... तिचं तिलाच समजत नव्हतं. तोच दारावरची बेल वाजली. बाबा आणि विवेक घरी नसल्याने आईने प्रेरणालाच दरवाजा उघडायला सांगितले.

प्रेरणा: (दरवाजा उघडल्यावर अनूला समोर पाहून) अग अनू तू...  

अनू: हो मीच... अजून कोणी अपेक्षित होतं का...?

प्रेरणा: नाही ग... (हातातील डब्ब्याकडे पाहून) यात काय आहे...?

अनू: अग हेच तर द्यायला आले होते... गाजरचा हलवा केला होता तुला आणि विवेकला आवडतो म्हणून घेऊन आले. सांग हां कसा झाला ते...

प्रेरणा: वाव यार... पण मी घरी येऊन खाईन... आता थोडी घाईत आहे.

अनू: कुठे बाहेर जाते आहेस..

प्रेरणा: (काहीशी लाजून हसत) actually हो, तू ये तर आत खरं... की सगळं दारातूनच विचारणार आहे.

अनू: हो हो येते... थांब आधी हा डब्बा काकूंना देते...(असं म्हणत किचनमध्ये जाऊन प्रेरणाच्या आईकडे डब्बा देऊन पुन्हा प्रेरणाकडे येते) हां बोल आता...काय सांगायचं होतं...

प्रेरणा: (तिला रुममध्ये ओढून नेत) चल माझ्या बरोबर.

अनू: अग हळू... पडेन मी..

प्रेरणा: (रुममध्ये आल्यावर) सांग मला मी काय घालू...?

अनू: (बेडवर पडलेल्या कपड्यांकडे पाहून) हे काय किती हा पसारा केला आहेस...

प्रेरणा: ते जाऊदे, ते मी करेन नीट... मला आता फक्त मी यातला कोणता ड्रेस घालू ते सांग...

अनू: तुला कुठे जायचं आहे त्यावर depend करतं ना ते...

प्रेरणा: (डोक्यावर हात लावून) अरे हो, मी तुला सांगितलंच नाही ना... actually... actually... ते मला...

अनू: अग तुझी गाडी आज actually च्या पुढे जाणार आहे की नाही...

प्रेरणा: (एका दमात बोलून मोकळी होते) ते मला प्रतिकच्या घरी प्रतिकच्या आजींनी भेटायला बोलावलं आहे... त्यांना त्यांच्या नातसूनेला भेटायचं आहे... ( थोडा मोकळा श्वास घेते) हुश्श झालं सांगून...

अनू: (तिचे हात पकडून गोल फिरवत) वाह वाह काय भारी न्यूज दिली आहेस...

प्रेरणा: (बेडवर बसत) आता सांग ना मला मी कोणता ड्रेस घालू ते... मला त्यांच्या समोर माझं इम्प्रेशन डाउन नाही करायचं आहे... 

अनू: हो हो सांगते मी.. ( तिने बेडवर पडलेले ड्रेसेस एक एक करुन बघायला सुरवात केली... मग त्यातून एक ड्रेस बाहेर काढून प्रेरणाच्या समोर पुढे केला) घे हा ड्रेस घालून जा... प्रतिक तर आधीच तुला बघून संमोहित होतो.. यावेळी त्याची आजी पण तुला पाहतच राहील.

अनूने पुढे केलेल्या white अनारकली ड्रेस वर navy blue आणि गोल्डन कलरची एम्ब्रॉयडरी होती. त्याला साजेशीच navy blue कलरची लेग्गीनज आणि ओढणी विथ लटकन होते.

प्रेरणा: (ड्रेसकडे पाहून) वाह यार, काय भारी निवडला ड्रेस... मला का नाही मघासपासून हा ड्रेस घालायचं सुचलं...

अनू: ते काय आहे ना मॅडम.... तुम्ही mentally already प्रतिकच्या घरच्या विचारात होतात... (तिच्या डोक्याला हात लावून) त्यामुळे हे तुमचं डोकं आहे ना ते चालत नव्हतं..

प्रेरणा: हो अनू, माझ्या डोक्यात सकाळपासून तोच विचार चालू आहे... थोडं टेन्शन आलं आहे मला... 

अनू: डोन्ट वरी मेरे यार, सब कुछ ठीक हो जाएगा... जस्ट रिलॅक्स...

प्रेरणा: अजून एक माझं छोटं काम आहे...

अनू: हेच ना की यावर कोणते earrings आणि hairstyle try करु...

प्रेरणा: (आश्चर्य वाटत) आई शप्पथ, तुला कसं कळलं... मी हेच बोलणार होते ते...?

अनू: अशी कशी विसरलीस तू... आपण कॉलेज फ्रेंड होतो ना... इतकी वर्ष ओळ्खतेय मी तुला... आज खरंच तुझं डोकं नाही काम करत आहे... मी काय म्हणते मीच तुला hairstyle set करुन देते... आणि earrings याच्यावर ते तू घेतले होते ना मोती कलर मधले झुमके ते घाल... छान दिसेल बघ... 

प्रेरणा: हां चालेल... मी लगेच ड्रेस बदलून आले...

अनू: तू ड्रेस बदलून घे... मी लगेच आईंना सांगून येते... तशा त्या काही बोलणार नाही पण सांगितलेलं बरं ना...थांब आले लगेच... म्हणत ती मालगुडे काकूंना सांगून आली. तोपर्यंत प्रेरणा ड्रेस घालून hairstyle साठी ready राहिली. अनूने तिची मस्त hairstyle करुन दिली. प्रेरणाने डोळ्यांमध्ये काजळ घातलं. हातात मोती रंगांचं कडं, आणि कपाळावर मोती रंगाचीच छोटी बिंदी लावली.

प्रेरणा: एकदा सांग मला मी कशी दिसतेय...

अनू: आपण कॉलेज मध्ये म्हणायचो ना अगदी तसंच एकदम पटाका...????????

प्रेरणाने तिच्या या बोलण्यावर हसत तिला hug केलं... चल निघते मी...

अनू: अग थांब... माझी मेहनत फुकट नको घालवू... तू scooty ने जाणार मग केसांची वाट लागेल जाईपर्यंत... सो तुला आदि येतोय सोडायला...

प्रेरणा: आदि दादा येतोय... अग तो नुकताच आला असेल ना ऑफिसमधून... थकला असेल बिचारा...

अनू: ओह हो... किती काळजी दादाची... मग हाच दादा बहिणीच्या काळजीने येऊ शकतो की सोडायला... तो तुला सोडेल ही आणि तू निघणार असशील तिथून तेव्हा त्याला कॉल कर मग तो तुला घेऊन परत घरी सुद्धा येईल.

प्रेरणा: दादाला तू चांगलंच कामाला लावलं...

अनू: मी नाही काही... आईंनी लावलंय...

प्रेरणा: काय बोलतेस...

अनू: हो ग... खरंच खूप बदलल्या आहेत त्या... माझा तर कधी कधी विश्वासच बसत नाही... असं वाटतं की मी एखादं स्वप्नंच बघतेय...

प्रेरणा: (तिला मुद्दामून चिमटा काढत) आता बघ स्वप्न नाही खरंच घडतं आहे असं...

अनू: (हात चोळत) आई ग... दुखलं ना ग... ते सोड... घरी आल्यावर तरी हलवा खाऊन सांग कसा झाला ते... आणि मी नंतर येईन बरं का विचारायला काय बोलणं झालं नातसूने बरोबर आजीचं...!!

प्रेरणा: (तिचे हात हातात घेऊन) हो नक्की ये... 

अनू: All the best...चल आता मी निघते...

प्रेरणा: चल मी पण निघते. दादाची तयारी झाली असेल ना... तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बाहेर आदि थांबला होता.

अनू: (दरवाजा उघडून) आदि झालात पण ready... 

आदि: हो मग... (प्रेरणाकडे पाहत) कोणाच्या तरी होणाऱ्या घरी जायचं आहे... उशीर करुन कसा चालेल...

प्रेरणा: (लाजत) तू पण ना आदि दादा...

आदि: तर मग चलायचं की थांबूया प्रतिकचा कॉल येईपर्यंत...

प्रेरणा: (पर्स घेत) नको नको चल निघूया.. आई येते मी.. म्हणत ती आदि बरोबर प्रतिकच्या घरी जायला निघतात.

त्या दोघांना अनू आणि प्रेरणाची आई दोघेही बाय करतात आणि अनू प्रेरणाच्या आईला बाय करुन तिच्या घरी जाते.

***

 

आजी प्रेरणाला भेटायला तयार झाली म्हणून प्रतिक खूप खूश होता. प्रेरणाने आदि बरोबर कारमधून निघाल्यावर प्रतिकला ती आदि बरोबर कारने येत असल्याचा मेसेज केला होता. प्रतिक इतका excited होता की कोणत्याही कारचा आवाज आला की तो बाल्कनीत जाऊन प्रेरणा आली का पाहत होता. त्याचा उतावीळपणा आजीला थोडासा खटकलाच होता. पण तिने मनाशी काही गोष्टींचा निर्णय घेतला असल्याने ती प्रतिकला काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने आदिची कार प्रतिकच्या अपार्टमेंट पाशी पोहचली. कारमधून प्रेरणा उतरली. आदिने तिला प्रतिकच्या घरी जायला सांगून तो तिथेच एका मित्राकडे जाऊन येतो म्हणून सांगत त्याने कार मित्राच्या घरी जायला वळवली. प्रेरणाला दूरवरून येताना पाहून प्रतिकला कधी एकदा ती त्याच्या समोर येते आहे असं झालं होतं. प्रतिकने लगेच स्वतःला आरशात तो नीट दिसतोय ना हे पाहिलं. त्याने घर सगळं नीट दिसत आहे ना एकदा सगळीकडे फिरून पाहिलं. 

प्रतिक: (excited होऊन) आजी, आईबाबा प्रेरणा आली खालीच आहे... येईल इतक्यात.

आजी: (न राहवून शेवटी बोललीच) प्रतिक, इतका उतावीळपणा बरा नाही.

प्रतिक: (त्याची excitement control करत) हो आजी...

आजी: आणखीन एक गोष्ट... मी प्रेरणाशी खाजगीमध्ये बोलणार आहे... मग मला फक्त ती आणि मी च हवे आहोत खोलीत.... कळतं आहे ना तुम्हा सर्वांना...

सगळे: हो आई, हो आजी.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रतिकच्या आईने दरवाजा उघडला.

आई: ये प्रेरणा, आत ये...

प्रेरणा: हो काकू... म्हणत ती आत आली. 

प्रतिक बाबांच्या बरोबर सोफ्यावर बसला होता. आजी प्रेरणाच्या बरोबर समोर असलेल्या खुर्चीत बसली होती. आजी तिला न्याहाळत होती. प्रतिक तर तिला समोर पाहताक्षणी सगळं काही विसरुन गेला. प्रेरणाचं लक्ष जेव्हा प्रतिककडे गेलं तेव्हा प्रतिकने तिला इशाऱ्यानेच ती खूप सुंदर दिसत असल्याची पावती दिली.

आजी: नंदा, तिला बसायला तरी सांग.

आजीच्या बोलण्यामुळे प्रेरणाचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती यापूर्वी एकदा सगळ्या टीम बरोबर पूजेच्या निमित्ताने प्रतिकच्या घरी आल्यावर आजीशी बोलली होती...पण यावेळी तिला आजीकडे पाहून ती थोडी बावरली होती. 

आई: हो आई...(प्रेरणाकडे पाहून) प्रेरणा, बस ना... मी पाणी घेऊन आले. आईने पाणी आणून प्रेरणाला प्यायला दिलं.

आजी: मग, ऑफिस किती वाजता सुटतं तुमचं...? 

प्रेरणा: जास्तीत जास्त 6 होतात... पण खूप महत्त्वाचं काम असेल आणि त्याच दिवशी द्यायचं असेल तर थांबतो आम्ही.

आजी: अच्छा... (आजीच्या बोलण्यात जरब जाणवत होती.. प्रेरणाला का कोण जाणे आधीच्या आजीचं आणि आताच्या आजीचं वागणं वेगळं भासलं.)

प्रतिकच्या आई तोपर्यंत तिच्यासाठी चिवडा आणि कॉफी घेऊन आल्या.

प्रेरणा: काकू, हे कशाला...

आई: अग घे थोडं तरी काही तरी...

प्रेरणा: हं

प्रेरणाने थोडाफार चिवडा खाल्ला आणि कॉफी प्यायली. आजी कधी प्रेरणाकडे तर कधी प्रतिककडे पाहत मनात काहीतरी विचार करत होती. ती कप आणि चिवड्याची प्लेट ठेवायला किचनमध्ये गेली. प्रतिकची आई जेवणाची तयारी करत होत्या.

आई: अग तू कशाला आणलं... 

प्रेरणा: ठीक आहे काकू... 

आई: खरं सांगू प्रेरणा, मला ते तुझ्या कडून काकू काकू ऐकायला बिलकुल आवडत नाही.

प्रेरणा: माझं काही चुकलं का... काकू...?

आई: (हसत) अग तसं नाही ग... म्हणजे मला तुझ्याकडून काकू पेक्षा आई ऐकायला जास्त आवडेल. त्यांचं बोलणं ऐकून प्रेरणा चक्क लाजली.

आई: अरे बापरे, आमची होणारी सून लाजल्यावर अजून सुंदर दिसते.... असं म्हणत त्यांनी तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला. 

प्रेरणाला त्यांच्या अशा वागण्याने खूप भरुन आलं. तिला स्वतःचाच खूप हेवा वाटला... की मला किती चांगली माणसे मिळाली आहेत. तिने मनाशीच बाप्पाला म्हटलं, यांचं माझ्यावर असंच प्रेम आणि विश्वास लग्नानंतर ही टिकून राहू दे. आणि मी ही या घरातली एक व्यक्ती होऊन जाऊ दे.

आई: कसला एवढा विचार करतेय...

प्रेरणा: अं, काही नाही, ते आजींना भेटायचं आहे ना... ते थोडं टेंशन आलं आहे.

आई: (तिच्या हातावर हात ठेवत) काही नाही ग होईल सगळं ठीक... नको काळजी करुस... आजींचा दोन्ही नातवांवर खूप जीव आहे... थोडा कडक स्वभाव आहे त्यांचा इतकंच.. पण जमेल तुला...

त्या दोघींचं बोलणं चालू असताना प्रतिक किचनमध्ये आला.

आई: (त्याला आलेलं पाहून चिडवण्यासाठी) तू इथे.. काही हवं होतं का..?

प्रतिक: (केसांवरून हात फिरवत) आई, तू समजतेस तसं काही नाही... ते आजीने प्रेरणाला तिच्या रुममध्ये बोलावलं आहे. (प्रेरणाकडे पाहून) चल प्रेरणा...

आई: प्रेरणा, All the best... टेन्शन नको घेऊस उगाच...

प्रेरणा: (कसंबसं हसत) हो काकू...

म्हणत ती प्रतिकच्या मागोमाग आजीच्या रुमच्या दिशेने निघून गेली.

***

 

आजीच्या रूमचा दरवाजा बंद होता. प्रतिकने प्रेरणाला आजीच्या रुमपर्यंत सोडलं. 

प्रेरणा: प्रतिक, तुम्ही नाही येत...

प्रतिक: (तिचं टेन्शन घालवण्यासाठी नाटकी ढंगात) सॉरी जानेमन... हमारा साथ यही तक का था... (मग हळूच कानात म्हणाला) ते काय आहे ना, माझ्या आजीला तिच्या नातसूनेला एकटं भेटायचं आहे... (मग तिच्या हातात हात ठेवून काळजी करु नकोस बिनधास्त जा असा त्याने तिला विश्वास दिला.) 

खरं तर ती का कोण जाणे खूप घाबरली होती पण प्रतिकच्या दिलेल्या विश्वासाने तिचं थोडं टेन्शन कमी झालं. प्रतिकने आजीच्या रूमचा दरवाजा ठकठकवला. आजीने आतमध्ये यायला सांगताक्षणी प्रतिक प्रेरणाला घेऊन आजीच्या रुममध्ये शिरला.

प्रतिक: आजी, प्रेरणाला तुझी रुम माहीत नव्हती म्हणून मी तिला घेऊन आलो.

आजी: हं, हरकत नाही... आता मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे तर तू आता बाहेर गेलास तरी चालेल.

प्रतिक: हो आजी म्हणत त्याने प्रेरणाकडे एकवार पाहिलं आणि तो बाहेर निघून गेला.

आता रुममध्ये फक्त आजी आणि प्रेरणाचं होते.

आजी: अग उभी का... बस ना...

तशी प्रेरणा आजीच्या बाजूला असलेल्या खुर्चीत बसते.

आजी: हं तर घरी कोण कोण असतं तुझ्या...?

प्रेरणा: आईबाबा आणि एक भाऊ...

आजी: प्रतिकला किती वर्षे झाली ओळ्खतेस...?

प्रेरणा: जेवढी वर्षे इथे जॉबला झाली तेवढीच वर्षे म्हणजे 4 वर्षे...

आजी: मध्ये तू हॉस्पिटलमध्ये होतीस... काय त्रास होत होता तेव्हा...कारण त्यावेळीं मी इथे नव्हते... माझ्या मुलीकडे होते.

आजीने बरोबर मुद्द्यावरच हात ठेवला. प्रेरणाला कळेना की आजींना कसं सांगावं... ती गप्पच राहिली.

आजी: प्रेरणा, सांगते आहेस ना...?

आजीने पुन्हा विचारल्यावर प्रेरणाने तिला त्या दिवशी तिच्या बाबतीत जे घडलं ते सगळं सांगितलं. सांगताना प्रेरणाला रडू आवरेना. आजीला सुद्धा सगळं ऐकून वाईट वाटलं. आजीने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत केलं. ती शांत झाली तसं आजी पुन्हा त्यांच्या जागी बसल्या.

आजी: प्रेरणा, तुझं प्रतिकवर खरंच खूप प्रेम आहे का..?

प्रेरणा: हो आजी, स्वतः पेक्षा ही जास्त..

आजी: आणि प्रतिक सुखी राहण्यासाठी तू काय करु शकतेस..?

प्रेरणा: त्यांच्या सुखासाठी मी काहीही करेन...

आजी: तर मग... प्रतिक पासून कायमचं दूर हो... 

प्रेरणा: आजी...तुम्ही थट्टा करत आहात ना... 

आजी: नाही... मी कोणतीही थट्टा करत नाही आहे... तू प्रतिकपासून कायमचं दूर हो... आणि त्यातच त्याचं भलं आहे... प्रेरणा: पण आजी मी प्रतिक शिवाय नाही जगू शकत... आणि त्यांचं ही माझ्यावर खूप प्रेम आहे...

आजी: प्रेरणा, आता स्पष्टचं सांगते, मला तू प्रतिकसाठी कधीच पसंत नव्हतीस... हा प्रतिकचा हट्ट होता म्हणून मी तुला भेटायला तयार झाले. पण माझा अजूनही तुला नकारच आहे. हे बघ, तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटत आहे पण तू स्वतःच एकदा विचार कर की जेव्हा आमच्या नातेवाईकांत ही गोष्ट कळेल तेव्हा फक्त तुझ्यावरच नाही तर प्रतिकवर ही परिणाम होईल... आणि प्रतिकला दुःखी पाहून आम्ही तर कसे खुश राहू... 

प्रेरणा: (आजीचं बोलणं ऐकून प्रेरणाच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं) पण आजी, माझ्या बाबतीत जे झालं त्यात माझी खरंच काही चूक होती का...? मी सुद्धा ही गोष्ट विसरु नाही शकले. मी स्वतःच अस्तित्व हरवून बसले होते... त्यावेळी प्रतिकच होते ज्यांनी मला यातून बाहेर काढलं... आज मी जी पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्याशी बोलू शकते आहे ते फक्त आणि फक्त प्रतिक आणि त्यांच्या प्रेमामुळे...

आजी: पण तरीही... तू प्रतिक पासून दूर हो...

प्रेरणा: आजी, तुम्ही पण एक स्त्री आहात...मला सांगा, एखाद्या मुलीच्या बाबतीत जेव्हा असं काही घडतं त्यानंतर पुन्हा तिने कधीच तिच्या पायावर उभे राहू नये का...? तिला प्रेम करण्याचा किंवा कोणाला जोडीदार म्हणून निवडण्याचा अधिकार राहत नाही का...? तिची पण स्वतःची अशी भावी जोडीदाराबद्दल, आयुष्याबद्दल स्वप्न असतात ती तिने जगूच नये का...? आजीशी बोलताना तिचा आवाज थरथरत होता.

आजी तिच्या या बोलण्यावर पुढे काहीच बोलू शकली नाही. त्यांना प्रेरणाला नातसून करुन घेतल्यावर त्यांची मान प्रतिष्ठा धुळीला जाईल, आणि लोक काय म्हणतील याची भीती जास्त वाटत होती. आजी काहीच बोलनात तेव्हा प्रेरणाला त्यांचा निर्णय कळून चुकला.

प्रेरणा: आजी, तुमची काय इच्छा आहे...?

आजी: तूझं प्रतिकवर खरंच खूप प्रेम असेल तर त्याच्या सुखासाठी तुला त्याच्यापासून कायमचं दूर व्हायला हवं... इतकं की प्रतिक दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार व्हायला हवा.

प्रेरणा: म्हणजे मी जॉब सोडू का...?

आजी: नाही... तू नोकरी सोडून हा प्रश्न सुटणार नाही आहे... तुला तिथेच राहून प्रतिकला तुझ्या पासून कायमचं दूर करायचं आहे. आणखीन एक गोष्ट प्रतिकला यातलं काही कळता कामा नये... हे लक्षात ठेव.

प्रेरणाने आजीचं बोलणं ऐकून कसाबसा स्वतःचा हुंदका आवरला.

आजी: (तिच्या डोक्यावर हात ठेवून) काळजी घे स्वतःची... मला आशा आहे तू माझी बाजू समजून घेशील.

प्रेरणा स्वतःच्या मनाला सावरत आजींच्या पाया पडली आणि त्यांच्या रूममधून तडक घरी जायला प्रतिकच्या घरातून बाहेर पडली. प्रतिकची आई किचनमध्ये असल्यामुळे त्यांना प्रेरणा रुममधून बाहेर आल्याचं कळलं नाही. प्रतिक त्याच्या सरांशी एका important work related बोलत असल्याने तो त्याच्या रुममध्येच होता. प्रतिकचे बाबा ही त्यावेळी घरात नव्हते. त्यामुळे कोणाला ही प्रेरणा निघून गेल्याचं कळलं नाही.

 

प्रेरणा अपार्टमेंटच्या बाहेर आली तर समोर आदि कारमध्येच तिची वाट पाहत थांबला होता. तिने मनाशी विचार केला यातलं आदि दादाला काही कळता कामा नये. तिने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणत त्याच्या कारपाशी पोहचली.

आदि: (प्रेरणाकडे लक्ष गेल्यावर त्याने कारचा दरवाजा उघडला) अग तू आलीस पण... मला वाटलं आज सासरचे तुला जेऊनच पाठवणार आहेत की काय..?

प्रेरणा: (कारमध्ये बसत खोटं हसू आणत) हो त्यांचा तोच विचार होता पण मी सांगितलं त्यांना घरी सगळे जेवणाची वाट पाहणार म्हणून... आणि मुळात तुला इथे एकटं ठेवून मी कशी जेऊ शकले असते...?

आदि: हो ते पण आहे... मग काय म्हणाल्या आजी सासूबाई...

प्रेरणा: (काय बोलावं हे सुचेना म्हणून) दादा, सगळं इथेच विचारणार आहेस का..? चल ना स्टार्ट कर कार... जाता जाता बोलू...

आदि: बरं बाई...( म्हणत त्याने कार घरच्या दिशेने वळवली)

मग आता तरी सांग काय झालं बोलणं तुमचं...?

प्रेरणा: काही खास नाही... बस त्यांना मला भेटायचं होतं...

आदि: खास कसं नाही... शेवटी तू त्यांच्या नातवाची बायको होणार आहेस... मग ही भेट तर खासच होती. 

प्रेरणा: (विषय बदलण्याच्या हेतूने) दादा Radio FM start करना...

आदि: जो आज्ञा, मिसेस प्रतिक राजाध्यक्ष असं म्हणत त्याने radio fm सुरु केलं.

प्रेरणाच्या डोक्यात मिसेस प्रतिक हे शब्द घुमू लागले. तोपर्यंत radio fm वर photocopy movie मधलं गाणं सुरु झालं...

 

सांग मना…गेल्या का परतून लाटा

जिव जडला तरी.. विसरून ओळखी.. जगायचे कसे

सांग मना.. सांग मना.. सांग मना..

का जिव जडला…

 

गाण्यांच्या शब्दांबरोबर प्रेरणाचं मन एकरुप होऊन तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. आजीशी झालेलं बोलणं तिच्या मनात येऊ लागलं...."प्रतिकपासून दूर हो कायमचं..." ती त्यात इतकी हरवून गेली की बाजूला कार चालवणारा आदि, रडत असलेल्या तिला आवाज देतोय हे ही तिला कळलं नाही. तिचे डबडबलेले डोळे पाहून आदिला तिने आपल्याला जे घडलं असं सांगितलं ते सगळं खोटं होतं हे लक्षात आलं. त्याने radio fm बंद केला... प्रेरणाने अश्रू अनावर होऊन डोळे बंद करून घेतले.

आदिने प्रेरणाला तसंच शांत राहू देत कारचा थोडा वेग वाढवला.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...