Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५२

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५२


प्रतिक प्रेरणाला तिच्या घरी सोडून एकदम मस्त मूड मध्ये घरी येऊन फ्रेश झाला. आजी लिविंग रुममध्ये सोफ्यावर बसून त्याच्याच बाहेर येण्याची वाट पाहत होती. आजीच्या एकंदरीत वागण्यावरून आईबाबांच्या लक्षात आलं, आजीच्या नक्की मनात काहीतरी चाललं आहे.

आई: (आजीच्या मनात जो विषय चालला आहे तो टाळण्यासाठी) प्रतिक, फ्रेश झाला असशील तर जेवणाची ताटं घेऊ का...?

प्रतिक: (बाहेर येत) हो आई आलोच..

बाबा: आज खूप काम होतं का ऑफिसमध्ये..?

प्रतिक: हं होतं तसं थोडंफार... आणि नंतर पाय मोकळे करायला गार्डन मध्ये राउंड मारायला गेलो होतो.

त्यांचं बोलणं चालू असेपर्यंत आई जेवण टेबलवर घेऊन आली.

बाबा: (आजीला) आई, चल जेवायला.

आजी: (प्रतिककडे पाहत) हो आले..

जेवण होईपर्यंत कोणीही कोणाशी फार बोलत नव्हतं.

सगळ्यांच जेवण आटपल्यावर आजी प्रतिकला म्हणाली, प्रतिक थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे...!

प्रतिक: (आजीच्या बाजूला बसून) बोल ना आजी... काय बोलायचं होतं...?

आजी: मी तुझ्यासाठी काही मुलींची स्थळं शोधायला सांगितली आहेत तुझ्या मोहनकाकांना, तर उद्या ते संध्याकाळी फोटो आणि माहिती घेऊन येतील तर बघ तुला कोणती पसंत पडते ते...

प्रतिक: (रागाने सोफ्यावरून उठत) पण आजी तुला माहीत आहे माझं प्रेरणावर प्रेम आहे आणि तरी तू अशी का वागतेय...?

आजी यावर काहीही न बोलता तिच्या रुममध्ये निघून गेली. तिच्या अशा वागण्याने प्रतिकही तावातावाने त्याच्या रुममध्ये निघून गेला. आईबाबा दोघेही आता उद्या काय होणार याच्याच काळजीत पडले.

***

 

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आदल्या दिवशी आजीबरोबर झालेल्या वादामुळे प्रतिकचं कामात बिलकुल मन लागत नव्हतं. प्रेरणाने एकदोन वेळा काहींना काही कामाच कारण काढून केबिनमध्ये जाऊन त्याला त्याच्या टेन्शन मागचं कारण विचारलं पण त्याने काही तसं काळजी करण्यासारखं नाही आहे असंच प्रत्येकवेळी तिला उत्तर दिलं. शेवटी न राहवून तिने बाहेर जाऊन राजीवला याबाबत काहीतरी माहिती असेल म्हणून कॉल केला.

प्रेरणा: हॅलो राजीव सर, मी प्रेरणा बोलतेय...

राजीव: हां बोल ना... काही काम होतं का...?

प्रेरणा: तुम्ही फ्री आहात का...? थोडं महत्वाचं बोलायचं होतं..

राजीव: हां बोल...

प्रेरणा: ते तुम्हाला प्रतिक काही बोलले का...?

राजीव: कशाबद्दल..?

प्रेरणा: actually, ते सकाळपासून खूप टेन्शन मध्ये दिसले... मी त्यांना विचारलं पण त्यांनी काही सांगितलं नाही... 

राजीव: नाही ग, प्रतिकचं आणि माझं काही बोलणं झालं नाही... पण तू टेन्शन नको घेऊस... मी बघतो बोलून त्याच्याशी...

प्रेरणा: चालेल... thank you राजीव सर...

राजीव: अग thank you काय बोलतेस... प्रतिक माझा जिवलग मित्र आहे... आणि जशी तुला प्रतिकची काळजी वाटते तशी मला पण वाटते... फक्त तू सध्या टेंशन फ्री रहा... मी आहे ना... मी बघतो काय ते...असं म्हणत राजीवने कॉल ठेवला. 

राजीवशी बोलून प्रेरणा पुन्हा डेस्कवर येऊन कामाला लागली.

प्रेरणाचा कॉल ठेवताक्षणी राजीवने लगेच प्रतिकला कॉल केला. राजीवचा कॉल बघून कॉल उचलू की नको विचार करता करता प्रतिकने कॉल उचलला.

प्रतिक: हां बोल राजीव...

राजीव: (मस्करी करण्याच्या उद्देशाने) कुठे आहेस... कॉल वगैरे काही नाही ते... जब लाईफ में लडकी नहीं थी... तब दोस्त को हमेशा कॉल करता था... और अब लाईफ में एक लडकी क्या आ गयी तुमने दोस्त को कॉल करना ही छोड दिया...काय यार...दोस्त दोस्त ना रहा...

प्रतिक: (वैतागत) राजीव आपण नंतर बोलूया का... माझं खरंच सध्या डोकं काम करत नाही आहे...

राजीव: काय झालं...? ऑफिस मधलं काही टेन्शन..?

प्रतिक: अं नाही.... वेगळं कारण आहे...

राजीव: अरे मग बोल ना... बोलल्याने आपण काहीतरी मिळून सोल्युशन काढू...

प्रतिक: (काहीसा रागाने) तुला खरंच असं वाटतं तू आजीच्या वागण्याचं सोल्युशन काढू शकशील...?

राजीव: म्हणजे नक्की काय झालं...? (काहीसा विचार करत) तू आजीला प्रेरणाबद्दल सगळं सांगितलं...?

प्रतिक: मी सांगायच्या आधीच तिला सगळं कळलं होतं असं म्हणत त्याने राजीवला घडलेला सगळा प्रकार सांगितला.

राजीव: what... आजीने स्थळं पण बघायला सुरवात केली...?

प्रतिक: हो, आज मोहनकाका काही मुलींची माहिती आणि फोटो ही घेऊन येणार आहेत...

राजीव: शांत हो प्रतिक... हायपर नको होऊस... डोकं शांत ठेवलं तर काहीतरी सोल्युशन काढता येईल आपल्याला...

प्रतिक: माझं डोकं खरंच चालत नाही आहे... असं वाटतं प्रेरणाला घेऊन डायरेक्ट मंदिरात जाऊन लग्न करून यावं...

राजीव: तुला काय वाटतं प्रतिक, प्रेरणा या गोष्टीसाठी तयार होईल... नाहीच होणार...

प्रतिक: अरे ते मला ही माहीत आहे... पण आजीच्या अशा वागण्याने माझी घुसमट होते आहे... आणि प्रेरणा बरोबर पण मी या विषयावर बोलू नाही शकत...

राजीव: हं समजू शकतो मी...(विचार करत) एक काम का नाही करत... आजीची प्रेरणा बरोबर भेट का नाही घडवत... प्रेरणाला भेटून may be तिचा point of view बदलेल.

प्रतिक: हं, तू म्हणतोय ते मला काही प्रमाणात पटतं आहे.. पण प्रेरणाला सांगू काय हे ही समजत नाही आहे मला...

राजीव: सांग की, आजीला तुला भेटायचं आहे...

प्रतिक: ओके चालेल... मी आजच घरी गेलो की बोलतो आजीशी... आणि मग प्रेरणा बरोबर पण बोलेन...

राजीव: येस

प्रतिक: तुला खरं सांगू... खूप मोकळं वाटतं आहे मला आता...thank you भावा...

राजीव: हं बोल तू thank you आता... मघासपासून किती तुझ्या मागे लागलो तेव्हा कुठे जाऊन तू मन मोकळेपणाने सांगितलं... हे बघ प्रतिक, प्रत्येक issue वर सोल्युशन असतं पण आपण कोणाशी बोलतच नाही आणि जो प्रॉब्लेम solve होणार असेल तो अजूनच किचकट करुन बसतो.

प्रतिक: हो खरंच चूक झाली माझी... पुन्हा असा नाही वागणार...

राजीव: हां thats like a good boy... by the way माझ्याशी जसा वागलास तसाच मघाशी ऑफिसमधल्या लोकांशी नाही ना वागलास... म्हणजे आजीचा राग टीम वर नाही ना काढलास..?

प्रतिक: अं नाही रे... पण प्रेरणाच्या लक्षात आलं मी कोणत्या तरी टेन्शन मध्ये आहे ते... केबिनमध्ये काहींना काही कारण काढून येऊन मला मी टेन्शन मध्ये का आहे ते विचारत होती..

राजीव: अच्छा... मग सांगितलं की नाही तिला...

प्रतिक: कसा आणि काय सांगणार होतो...

राजीव: हां ते पण आहे..चल मी ठेवतो कॉल... बोलून घे तिच्याशी... कदाचित तुला टेन्शनमध्ये बघून ती पण टेन्शन मध्ये असेल.. आणि आणखीन एक गोष्ट यापुढे असं काहीही face करावं लागलं तर मनात ठेवून कुठंत राहून आपल्या जवळच्या व्यक्तींना त्रास देण्यापेक्षा बोलून मोकळं व्हावं म्हणजे सोल्युशन निघतं.

प्रतिक: हो चालेल... चल आता तिच्याशी बोलून घेतो...

राजीव: (हसू लागला) हो हो बोल... ठेवतो मी कॉल...

दोघांनी कॉल ठेवल्यावर प्रतिकने प्रेरणाकडच्या लँडलाईनवर कॉल करुन तिला केबिनमध्ये बोलावून घेतलं.

***

 

सकाळपासून प्रतिकला टेन्शन मध्ये पाहत असल्याने त्याने केबिनमध्ये बोलावलं आहे हे कळताक्षणी प्रेरणा त्याच्या केबिनमध्ये लगेच काळजीने गेली. 

प्रेरणा: May I come in Sir...

प्रतिक: (हसून म्हणाला) येस प्रेरणा कम इन...

त्याला विथ स्माईल पाहून प्रेरणाच्या ही चेहऱ्यावर आपसूकच स्माईल आली. ती काहीही न बोलता तशीच त्याच्या समोर त्याला पाहत उभी राहिली.

प्रतिक: (जागेवरुन उठत तिच्यापाशी येऊन) काय झालं अशी का बघतेय...?

प्रेरणा: सकाळपासून तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत होता आणि आता स्माईल करताना पाहून खूप छान वाटतं आहे.

प्रतिक: (तिच्या जवळ येऊन तिचे हात हातात घेऊन) हो थोडा टेन्शनमध्ये होतो... पण आता मी खूप खूश आहे.

प्रेरणा: सर, तुम्हाला असं टेन्शन मध्ये पाहून तुमची खूप काळजी वाटत होती.

प्रतिक: (एक कान पकडून) हं चुकलंच जरा थोडं माझं... I am sorry... माझ्यामुळे तू पण काळजी करत बसलीस...

प्रेरणा: माफ करेन पण एका अटीवर...

प्रतिक: अट... ती कोणती बाबा आता...?

प्रेरणा: यापुढे कोणतही असं टेन्शन असलं की तुम्ही त्यावेळी कोणाशीतरी शेअर करा... मी नाही म्हणत माझ्याशीच करा पण उगाच असा विचार करत बसून स्वतःला त्रास करुन नका घेऊ.

प्रतिक: (तिच्यासमोर वाकून) जो हुकुम मेरे सरकार...

प्रेरणा: प्रतिक, काय करताय तुम्ही... कोणीतरी बघितलं तर काय म्हणेल...

प्रतिक: (तिला जवळ ओढत) कोणी काही म्हणत नाही... कारण या door मधून फक्त बाहेरच दिसतं... आत काय चाललं आहे ते नाही कळत...

प्रेरणा: (स्वतःला सोडवून घेत) जाते मी खूप काम पेंडिंग आहे माझं...

प्रतिक: (तिला जाताना पाहून) मिस प्रेरणा, तुमच्या बॉस ने तुम्हाला इथे काही कामासाठी बोलावलं आहे आणि तुमच्या बॉसने तुम्हाला अजून जायला नाही सांगितलं आहे...

प्रेरणा: (पुन्हा मागे वळून त्याच्या समोर उभी राहून) हं बोला सर... तुम्ही बोलावलंत मला... काही काम होतं का...?

प्रतिक: (तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून) काम तर आहे माझं पण ऑफिसचं नाही थोडं पर्सनल आहे...

प्रेरणा: (त्याचे हात खांद्यावरून काढत) हां बोला ना सर...

प्रतिक: हां तर मिस प्रेरणा तुम्हाला उद्या माझ्या घरी यायचं आहे...

प्रेरणा: प्रतिक, तुमच्या घरी...?

प्रतिक: (पुन्हा नाटकी स्वरात) बॉस आहे मी तुमचा... 

प्रेरणा: ओह सॉरी प्रतिक सर...पण घरी का यायचं आहे मी...

प्रतिक: (तिच्या गालावरून हात फिरवत) ते काय आहे ना मिस प्रेरणा, माझ्या आजीची त्यांच्या होणाऱ्या नातसुनेशी भेट घडवून आणायचा माझा विचार आहे.

प्रेरणा: (त्याला घट्ट मिठी मारून) खरं बोलत आहात तुम्ही...?

प्रतिक: (तिच्या कपाळावर किस करत) अगदी खरं... मग येणार ना घरी उद्या...?

प्रेरणा: (पुन्हा hug करून) हो जरूर...

प्रतिक: मग आजींना भेटून झाल्यावर मला गिफ्ट मिळेल का...?

प्रेरणा: (त्याच्या मिठीतून दूर होत) कसलं गिफ्ट...

प्रतिक: (मस्करी करण्याच्या हेतूने तिच्या ओठांवर बोट ठेवून) हे गिफ्ट...

प्रेरणा: (लाजत त्याला दूर ढकलत) तुमचं गिफ्ट लग्नानंतर तुम्हाला मिळेल...

प्रतिक: (तिचा हात पकडून) ए वेडू... मी तुझी मस्करी करत होतो... माझ्या प्रेरणाचं मन मला कळणार नाही का...!! 

प्रेरणा: (त्याच्या डोळ्यांत पाहत) प्रतिक तुम्ही जे माझं मन असं ओळखता त्यामुळेच तुमच्या मी पुन्हापुन्हा प्रेमात पडते.

प्रतिक: (तिला मिठीत घेत) मग येणार ना उद्या घरी...

प्रेरणा: हो नक्की येईन...जाऊ मी आता खूप काम पेंडिंग आहे...

प्रतिक: (तिला मिठीतून दूर करत) बरं बाबा... 

तशी ती त्याच्याकडे पाहून हसत हसत त्याच्या केबिनमधून बाहेर पडली.

***

 

प्रतिकने संध्याकाळी घरी यायला निघाल्यावर मनाशी पक्कं केलं होतं की काहीही झालं तरी आजीला प्रेरणाशी भेटायला तयार करायचंच.

एरवी समोर मोहनकाकांना पाहून दिलखुलास हसणारा प्रतिक त्यांना आज घरी आलेलं पाहून काहीवेळ तिथेच अडखळला.

मोहनकाका: (प्रतिककडे पाहून) काय प्रतिक, कसा आहेस... बरेच दिवस झाले आमच्याकडे आला नाहीस...

प्रतिक: (कसाबसा हसून हातातील बॅग ठेवत) हां काका, ते हल्ली खूप काम असतं ना ऑफिसचं, त्यामुळे शक्य होत नाही.

काका: हो चालायचंच...पण जोडीने तरी ये बरं...

प्रतिक: (काकांच बोलणं ऐकून प्रतिकच्या मनात धडकीच भरली) काका, मी हातपाय धुवून येतो... म्हणत त्याने तिथून पळ काढला.

काका: (प्रतिकच्या बाबांना) दादा, आपला प्रतिक कधी लग्नाचा झाला कळलंच नाही. आता प्रतिक बाहेर आला की मी दाखवतो तुम्हाला काही मुलींचे फोटोज... एक सो एक स्थळं आणली आहेत मी...

आजी: मग आपला प्रतिक आहेच तसा... त्याला बायको पण साजेशीच हवी...

काका: (आजीला) हो खरं बोललीस मावशी...

प्रतिक फ्रेश होऊन बाहेर येऊन खुर्चीवर बसला. आजीचं त्याच्या वागण्याकडे बारीक लक्ष होतं.

काका: अरे प्रतिक, तिथे काय बसलास... इथे येऊन बस ना माझ्या बाजूला...

प्रतिक इच्छा नसताना ही त्यांच्या बाजूला जाऊन सोफ्यावर बसला. काका त्याला प्रत्येक मुलीचा फोटो आणि माहिती सांगत होते. आजी ही त्यांच्याबरोबर उत्सुकतेने बघत होती. आईबाबा दोघांना ही प्रतिकच्या मनाविरुद्ध सगळं होत आहे हे जाणवत होतं. सगळे फोटोज आणि माहिती आजीकडेच देऊन काका घरी जायला निघाले तशी आजी प्रतिकच्या आईबाबांना म्हणाली, बघा आता तुमची आई कशी तिच्या नातवासाठी सुयोग्य बायको आणते ती... तिचं बोलणं ऐकून प्रतिक त्याच्या रुममध्ये तडक निघून गेला.

****

 

प्रतिकला बराच वेळ आवाज देऊन सुद्धा तो त्याच्या रूममधून बाहेर पडला नाही. आजी देवघरातून नुकतीच बाहेर आली आणि आई बाबा दोघेही काळजीत तिला दिसले.

आजी: मिलिंद, नंदा... काय झालं... असे काय बसला आहात...

मिलिंद: आई ते प्रतिक रूमचा दरवाजा उघडत नाही आहे...

आजी: काय म्हणजे अजून तो रूम मधून बाहेर आलाच नाही आहे...

मिलिंद: हो आई...

आजी: आणि तुम्ही दोघे हे मला आता सांगत आहात...

आजी तडक त्या दोघांना काहीही न बोलता प्रतिकच्या रूमकडे जाऊन दरवाजा ठकठकावू लागली.

आजी: प्रतिक, दरवाजा उघड...

प्रतिक: आजी, मी दरवाजा नाही उघडणार आहे...

आजी: अरे बाळा असा काय करतोय...

प्रतिक: आजी, मला नाही काही बोलायचं आहे..

आजी: आमचं काही चुकलं का प्रतिक...?

प्रतिक: मला नाही काही बोलायचं आहे कोणत्याच विषयावर...

आजी: प्रतिक, एकदा दरवाजा तर उघड... सांग तरी तुझ्या मनात काय आहे ते...

प्रतिकने त्यावर काहीही न बोलता दरवाजा उघडला. प्रतिकचे आईबाबा आणि आजी तिघेही त्याच्या रूममध्ये शिरले. त्याचे डोळे रडून सुजलेले होते. 

आई: प्रतिक, तू का तुझी अशी अवस्था करुन घेतली ...

बाबा: प्रतिक, मला समजत आहे सगळं मघाशी झालं ते तुझ्या मनाविरुद्ध झालं... त्यांच्या या वाक्यावर आजीने त्यांच्याकडे ज्या रागात पाहिलं त्यामुळे पुढे बाबा काही बोलू शकले नाहीत.

आजी: (डोक्यावरून हात फिरवत) बाळा, तुझ्या आजीला नाही का सांगणार काय झालं ते...

प्रतिक: (तिच्या डोक्यावरचा हात बाजूला करून) होत आहे ना सगळं तुझ्या मनासारखं... नको विचारुस मला काही...

आजी: प्रतिक... मी करतेय ते तुझ्या भल्यासाठीच ना...

प्रतिक: नकोय मग मला माझं भलं... ऐकलं तू आजी...

आई: (जोरात ओरडते) प्रतिक, विसरु नकोस तू तुझ्या आजीशी बोलतोय...

प्रतिक: हो मी माझ्या त्याच आजीशी बोलतोय जिला स्वतःच्या हट्टासमोर नातवाच्या भावना महत्त्वाच्या नाही वाटत...

त्याच असं बोलणं ऐकून आजीच्या मनाला धक्का लागतो पण ती मनाशीच काहीतरी ठरवत प्रतिकला म्हणते, ठीक आहे उद्या प्रेरणाला आपल्या घरी बोलावलं आहे म्हणून सांग... मला तिला भेटून बोलायचं आहे.

प्रतिक: (आजीला मिठी मारुन) आजी, खरंच...

आजी: हो अगदी खरं... सांग तिला...उद्या आपल्या घरी यायला...

प्रतिक: (आजीचा हात हातात घेऊन) आजी, मला माझी चूक कबूल आहे... मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं... पण आजी माझं खरंच प्रेरणावर मनापासून प्रेम आहे ग... आणि मी नाही तिच्या शिवाय दुसऱ्या कोणत्या मुलीचा विचार करु शकत.

आणि आज मोहनकाकांनी जेव्हा स्थळं आणलीत तेव्हा मला मी प्रेरणा पासून खरंच दूर जातो आहे का अशी भीती वाटू लागली. आजी, मला नाही गमवायचं आहे तिला...(बोलता बोलता तो रडू लागला)

आजी: (प्रतिकच्या डोळ्यातलं पाणी पुसत) हं समजत आहे मला... आता चल जेवून घे... तुझ्या अशा वागण्याने तुझे आईबाबा दोघेही किती घाबरले आहेत बघ जरा... स्वतःचा नाही तर नाही पण असं वागताना एकदा त्यांचा तरी विचार कर.

प्रतिक: हो आजी, पुन्हा असं नाही होणार माझ्याकडून. आईबाबा, खरंच माझं चुकलं.. मी असं वागायला नको होतं.

बाबा: (त्याला थोपटत) पुन्हा असं काही करु नकोस... 

प्रतिक: हो बाबा...

आई: (प्रतिकला) चल, तुला जेवायला वाढते...(आजीला) आई, तुम्ही पण चला...

आजी: हो हो, मिळूनच घेऊ की जेवायला...

इतके दिवस न बोलता जेवणारे सगळेजण हसत बोलत जेवायला बसले. 

 

क्रमशः

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...