Jan 27, 2022
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५१

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५१

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५१


समिधा ऑफिसला जायचं म्हणून प्लॅटफॉर्मवर प्रेरणाची वाट पाहत होती. प्रेरणा काही वेळाने तिच्यापाशी पोहचली. तिने मस्त पिस्ता कलरची लखनौई कुर्ती, त्याला साजेशी पांढऱ्या रंगांची लेगीज, कपाळावर एक छोटी बिंदी, डोळ्यात काजळ आणि कानात झुमके घातले होते. 

समिधा: (प्रेरणाला पाहून) प्रेरणा, तू तर आज प्रतिक सरांची विकेटच घ्यायचं ठरवलं आहे वाटतं...?

प्रेरणा: (लाजून हसत) काहीही काय...!!

समिधा: अग अगदी खरं... किती सुंदर दिसते आहेस तू आज...

प्रेरणा: पुरे झाली ग मस्करी... मी काहीही केलेलं नाही आहे...

समिधा: ओह फिर तो प्रतिकजी के प्यार के रंग में आप के चेहरे में रौनक आई है...

प्रेरणा: (पुन्हा लाजत केसांना कानावरून मागे करत) समी, तुझं काहीतरीच असतं...

समिधा: बरं बाई, नाही काही आता मी त्यावर बोलत... पण मला सांग ना... घरी सांगितलं की नाही...

प्रेरणा: कशाबद्दल..?

समिधा: कशाबद्दल... काय कशाबद्दल...? प्रतिक सर आणि तुझ्या बद्दल..?

प्रेरणा: (पुन्हा लाजून) हं...

समिधा: (डोक्यावर हात मारत) अग खरंच तू काही सांगितलं की नाही... की घरी पण असंच लाजत होतीस...? 

प्रेरणा: (हळूच तिच्या कानाकडे बोलत) हो सांगितलं मी घरी.... आणि आई बाबा दोघेही हो म्हणाले...

समिधा: ( प्रेरणाला घट्ट मिठी मारून) वाह क्या बात है... तरीच मॅडमच्या चेहऱ्यावर आज ग्लो आला आहे...

प्रेरणा: पुरे ग आता, किती अजून मला छळणार आहेस... सगळे आजूबाजूचे बघ ना कसे बघत आहेत...

समिधा: बघू दे ग... त्यांना मार गोळी... पण आज खरंच सरांचं काही खरं नाही...

प्रेरणा: (ट्रेनकडे बोट दाखवत) चल आपली ट्रेन आली चल निघूया...

दोघीनी ट्रेन पकडली आणि ऑफिस मध्ये यायला निघाल्या.

***

 

प्रतिकची ऑफिस मध्ये यायची वेळ झाली होती. डेस्कवर प्रेरणा, समिधा आणि मीना तिघीही कामात पूर्ण बिझी झाल्या होत्या. प्रतिकने ऑफिस मध्ये एन्ट्री केली आणि security च्या गुड मॉर्निंग सरला प्रतिकने म्हटलेल्या गुड मॉर्निंग मुळे प्रेरणाचं कामावरच लक्ष हटून प्रतिकच्या दिशेने गेलं. प्रतिकने आज लवेन्डर कलरचं शर्ट आणि ब्लॅक कलर ची पॅन्ट घातली होती... प्रतिकची ही नजर प्रेरणाकडेच गेली. दोघांच्या ही नजरा एकमेकांच्या हृदयाचा ठाव घेत होत्या. प्रतिक जसजसा त्यांच्या डेस्कच्या दिशेने येऊ लागला तसतशी प्रेरणाच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तिने स्वतः ला सावरण्यासाठी कॉम्पुटर कडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला पण प्रतिक समोर असताना लक्ष लागेल तर खरं ना...

तो जवळ आला तसं प्रेरणाने कशीबशी कॉम्प्युटर स्क्रीनकडे नजर खाली घेऊन गुड मॉर्निंग म्हटलं त्यावर तो ही हसत हसत तिघींना गुड मॉर्निंग म्हणत त्याच्या केबिनमध्ये गेला. तो गेला तसं समिधा, मीना दोघीही प्रेरणाला मुद्दामून काहीतरी इशारे करुन चिडवत पुन्हा कामाला लागल्या. थोड्या वेळाने प्रतिकने काही प्रोजेक्ट्सच्या फाईल्स घेऊन प्रेरणाला केबिनमध्ये बोलावलं.

प्रेरणा: (दरवाजातून) May I come in Sir...

प्रतिक कॉलवरच असल्याने त्याने तिला हातानेच आत यायचा इशारा केला.

प्रतिक: (त्याच बोलणं झाल्यावर) ते Mehta construction च्या file वर तूच काम केलं होतं ना...?

प्रेरणा: हो सर... काही mistake झाली आहे का सर..?

प्रतिक: (तिच्याकडे पाहून काय बोलायचं ते विसरुन गेला आणि पुन्हा आठवून) अं... मी काय म्हणत होतो... yes Mehta construction ची file... ती तुझ्याकडे आहे की तू माझ्याकडे दिली होती..?

प्रेरणा: मी तुमच्याकडेच दिली होती... तुम्हाला आज मीटिंग आहे म्हणून तुम्ही ती चेक करायला म्हणून लवकर complete करायला सांगितली होती.

प्रतिक: (आठवत) ओह येस येस... आठवलं.... प्रेरणा if you dont mind... please ती फाईल त्या files section मधून शोधून ठेवशील का..? मला एक important conference कॉल घ्यायचा आहे सो मी येईपर्यंत तू प्लीज ती फाईल काढून ठेवशील का..? Actually मी घाईमध्ये त्या दिवशी कुठे ठेवली हे ही मला आठवत नाही आणि मला लगेच एक तासाने निघायचं आहे मीटिंगला... म्हणून मी तुला सांगतोय...सॉरी जरा किचकट काम आहे हे फाईल शोधण्याचं...(प्रतिक ती चिडली तर नाही ना याचा अंदाज घेत बोलला)

प्रेरणा: Its ok sir, no problem... मी फाईल काढून ठेवते..

प्रतिक: ओके thank you... म्हणत तो conference रुममध्ये conference कॉल वर मीटिंग घ्यायला गेला.

प्रेरणाने प्रतिक जाताक्षणी तिच्या हातातील फाईल्स डेस्कवर ठेवल्या आणि कपाटात फाईल शोधू लागली. जवळपास 20 मिनिटे ती फाईल शोधत होती... पण फाईल कुठेच मिळेना... शेवटी ती दरवाजाच्या मागे असलेल्या कपाटात फाईल शोधू लागली. एकदाची फाईल मिळाली तशी ती खूश झाली आणि फाईल बाजूला ठेवून इतर फाईल्स ठेवण्यात बिझी झाली...तोच प्रतिकने केबिन मध्ये येण्यासाठी दरवाजा उघडला. दरवाजाच्या धक्क्याने प्रेरणाचा तोल जाऊन ती पडणार तेवढ्यात प्रतिकने तिला पकडलं. भीतीने प्रेरणाने बंद केलेले डोळे आपण नाही पडलो हे पाहून तिने हळूवार उघडले. समोर प्रतिकला पाहून तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. प्रतिक ही तिच्या उघडझाप होणाऱ्या डोळ्यांत हरवून गेला. कसंबसं स्वतःला सावरुन ती उभी राहिली पण अजूनही प्रतिकची नजर तिच्यावरची हटलीच नव्हती. प्रेरणाने खाली पडलेल्या फाईल्स उचलायला सुरवात केली तसा तो ही तिच्याकडे पाहत तिच्या हातात फाईल्स देऊ लागला.

प्रेरणा: असं का बघताय...?

प्रतिकने यावर काहीही उत्तर न देता तिच्या हातातून फाईल्स घेऊन कपाटात ठेवल्या आणि तिला त्याच्या दोन्ही हातांनी बंदिस्त करुन बंद दरवाजाकडे उभं केलं. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याने तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवून गप्प राहायला सांगितलं.

प्रतिक: (हळूच तिच्या कानांत बोलला) अशीच शांत उभी रहा... मला तुला मन भरुन पाहायचं आहे...

प्रेरणा: (त्याच्या या बोलण्याने लाजून म्हणाली) सर, तुम्हाला मीटिंग आहे ना आज...?

प्रतिक: हो आहे ना... पण आज तुझ्याकडे डोळे भरून पाहतच राहावं असं वाटतं आहे...

प्रेरणा: सर, मी डेस्कवर फाईल शोधून ठेवली आहे आणि बाकीच्या meeting related files पण तिथेच ठेवल्या आहेत.... सर, माझं काम झालं मी जाऊ का माझ्या डेस्कवर...?

प्रतिक: (तिच्या केसांना कानामागे करत) तू जाऊ शकतेस पण एक अट आहे माझी...

प्रेरणा: कोणती अट...?

प्रतिक: आज संध्याकाळी मी तुला घरी सोडेन... I want to spend some time with you...

प्रेरणाने मानेनेच हो म्हटलं.

प्रतिक: अं हं... असं नाही (हात पुढे करुन) promise me....

प्रेरणा: (हात ठेवत) प्रॉमिस... आता जाऊ मी सर...

प्रतिक: एकदा फक्त प्रतिक बोल...

प्रेरणा: प्लीज प्रतिक, जाऊ द्या ना मला...

तसं प्रतिकने तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला, संध्याकाळी एकत्र जाऊ... 

तिने डोळ्यांनीच हो म्हटलं आणि त्याच्याकडे पाहत त्याच्या केबिन मधून निघाली.

प्रतिक: (स्वतःशीच हसत) चला प्रतिक सर, कामाला लागा... म्हणत तो मीटिंगला जाण्यासाठी तयारीला लागला.

***

 

संध्याकाळी ऑफिसच काम झाल्यावर प्रेरणा सोडून सगळे घरी जायची तयारी करु लागले. समिधा आणि मीनाला आधीच माहीत असलं तरी प्रेरणाची मस्करी करण्याच्या उद्देशाने मीना म्हणाली, प्रेरणा... काम खूप जास्त असेल तर आम्ही दोघीपण थांबतो... मग काम पूर्ण करुन एकसाथच निघू... समिधा ही तिच्या बरोबर हो ला हो म्हणू लागली.

प्रेरणा: पुरे ना, निघा ना लवकर...

समिधा: बघ बघ मीना, कोणाला तरी आपल्याला घरी पाठवायची घाई जरा जास्तच झाली आहे...

मीना: बरं प्रेरणा, निघतो आम्ही... असं म्हणत दोघीनी तिला आणि आशिष, विवेकला ही बाय बाय म्हटलं. त्या दोघी गेल्यावर आशिष आणि विवेक ही प्रेरणाला बाय बाय म्हणून निघाले. सगळे घरी गेल्यावर प्रतिक त्याच्या केबिन मधून बाहेर निघाला.

प्रतिक: (प्रेरणाकडे येऊन) अरे मिस प्रेरणा, अजून तुम्ही गेलात नाही... anyways चला मी तुम्हाला सोडतो... काही काम राहिलं असेल तर उद्या येऊन करा.

प्रतिकच्या या बोलण्याने प्रेरणा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली.

प्रतिक: (कोणालाही कळणार नाही असं डोळ्यांनी इशारा करत चल लवकर पॅक कर बॅग...) मिस प्रेरणा, मी बाहेर आहे लिफ्टकडे.. तुम्ही या तुमचं झालं की... असं म्हणत तो लिफ्टकडे गेला. प्रेरणाने भरभर बॅग भरली आणि ती ही प्रतिकच्या मागोमाग लिफ्टच्या दिशेने गेली.

****

 

कारमध्ये प्रतिकने मिररमधून प्रेरणा दिसेल असा मिरर केला.... आणि रेडिओ Fm सुरु केलं... रेडिओवर गाणं लागलं होतं...

 

जाणता अजाणता कुठूनी येई असे प्रेम हे

जाणता अजाणता कवेत घेई असे प्रेम हे

जसे अलगद वाऱ्यासवे दरवळती गंध नवे

जसे अवखळ स्पंदनांचे गुणगुणते गीत नवे

 

गुंतता हृदय हे क्षणात होई मन बावरे

श्वास हे आभास हे बेधुंद सारे हे कसे

अबोल ही चाहूल अंतरी का दाटली

मेघात ओली ही नशा

 

थोडेसे कोवळे, थोडे नवे नवे

वाटते प्रेम हे हवे हवे

आतुर जीव हा काहूर हे मनी

जुनीच रीत ही का प्रीत ही

जसे अल्लड लाटेसवे मन तरते, हरवते

जसे अवखळ भावनांचे गुणगुणते गीत नवे

 

दोघेही गाणं सुरु असताना एकमेकांना एकमेकांच्या नकळत पाहत होते. प्रतिकने हळूच तिचा हात त्याच्या हातात घेतला. प्रेरणाने लाजून हसत हात सोडवून घेतला. तिला लाजताना पाहून प्रतिकने उगाचच राग आल्याचा आव आणला.

प्रेरणा: (त्याला असं रागावलेलं पाहून) सर, रागावलात तुम्ही...?

प्रतिक: प्रेरणा, ऑफिसमधून बाहेर ये... फक्त प्रतिक म्हण मला..

आणि रागावू कशाला बरं...?

प्रेरणा: ते...ते...ते मी हात...

प्रतिक: (मुद्दामून चिडवण्याच्या उद्देशाने) हाताचं काय...?

प्रेरणा: (प्रतिक आपली मस्करी करतोय हे लक्षात येताच) अं काही नाही...प्रतिक मला सांगा ना, आपण कुठे जात आहोत...?

प्रतिक: हे काय आलोच आपण म्हणत त्याने गार्डन पाशी कार थांबवली.

प्रेरणा: हे तेच गार्डन आहे ना, जिथे आजी आजोबा भेटले होते...

प्रतिक: हो हो, हे तेच गार्डन आहे... आणि आज आपण त्यांनाच भेटणार आहोत...

एकमेकांशी बोलत दोघेजण गार्डन मध्ये शिरले आणि आजी आजोबा ज्या ठिकाणी बसले होते तिथे पोहचले.

आजी: (त्या दोघांना पाहून) अगदी वेळेवर आलात तुम्ही दोघे...

प्रतिक: म्हणजे आजी...?

आजोबा: अरे, म्हणजे अजून जरा उशीर झाला असता तर आम्ही दोघे भेटलो नसतो.... आमची होम मिनिस्टर म्हणतच होती की घरी जाऊया म्हणून... पण मी म्हणालो, बस जरा अजून थोडा वेळ... आणि तुम्ही दोघे आलात..

आजी: (प्रेरणाला) चेहरा बघा मुलीचा किती खुलला आहे... आमच्या प्रतिकने नशीब काढलं ग... जी तू त्याच्या आयुष्यात आलीस... बस बघू इथे माझ्या बाजूला...

तशी प्रेरणा आजीच्या बाजूला आणि प्रतिक आजोबांच्या बाजूला बसले.

आजोबा: (प्रतिकला पाहून) चेहरा तर प्रतिकचा पण खुलला आहे... प्रेमात पडलं की असंच होतं... चालायचंच... 

आजी: बरं का प्रेरणा, आम्ही प्रतिकला 5 वर्ष झाली ओळखतो... तसा खूप मोजक्या लोकांशी मनमोकळेपणाने बोलतो पण एकदा का त्याने समोरच्या व्यक्तीला आपलं मानलं की मग त्यांना जीवापाड जपतो... (तिचा हात हातात घेऊन) जप हां प्रतिकला... अशीच एकमेकांना आयुष्यभर साथ द्या...

प्रेरणा: हो आजी... मी आयुष्यभर प्रतिकना साथ देईन.

आजी: (आजोबांना पाहून) अहो, चला निघूया आपण आता... या दोघांना मोकळा वेळ देऊ... म्हणत तिने आजोबांना बाकड्यावरुन उठवलं.

प्रतिक: आजी, मी येऊ का तुम्हाला सोडायला...

आजोबा: अरे नको रे प्रतिक, मला ही देऊ दे की माझ्या होम मिनिस्टरला कंपनी... या वयात आपल्या माणसाचा हात पकडून चालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. 

तसे आजी आजोबा दोघांनी प्रतिक आणि प्रेरणाला बाय बाय म्हटलं आणि ते घरी जायला निघाले.

आजी आजोबा तिथून गेल्यावर प्रतिकने प्रेरणाचा हात हातात घेतला.

प्रतिक: प्रेरणा, मला आपलं नातं असंच हवं आहे आजी आजोबांच्या नात्या सारख... म्हणजे आपण ही वय वाढत गेलं की असे आजी आजोबा होऊ आणि त्यावेळी मी ही तुझा असाच हात पकडून तुझ्या बरोबर चालेन.... मी ही तुला असं होम मिनिस्टर म्हणून आवाज देईन... आवडेल ना तुला...

प्रेरणा: (प्रतिकच्या खांद्यावर डोकं ठेवून) हो खूप आवडेल... आपण ही मग असंच गार्डन मध्ये राउंड मारायला येऊ...

तसे दोघेही एकमेकांकडे पाहत मनमोकळे हसले.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...